Category Archives: आज दिनांक

२४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वादशी – 19:23:09 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 13:49:19 पर्यंत
  • करण-कौलव – 09:00:56 पर्यंत, तैतुल – 19:23:09 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-आयुष्मान – 14:59:51 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:07
  • चन्द्र राशि-मीन – 13:49:19 पर्यंत
  • चंद्रोदय-28:03:59
  • चंद्रास्त-16:17:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • शांतता आणि नि:शस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन
  • राष्ट्रीय बंधू दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1626 : पीटर मिनुएटने स्थानिकांकडून मॅनहॅटन बेट $24 मध्ये विकत घेतले.
  • 1830 : युनायटेड स्टेट्समधील पहिली प्रवासी रोड रेल्वे सेवा सुरू झाली.
  • 1844 : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी त्यांनी विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
  • 1883 : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
  • 1923 : आयरिश गृहयुद्ध संपले.
  • 1940 : इगोर सिकोरसकी यांनी सिंगल-रोटर हेलिकॉप्टर यशस्वीपणे उडवले.
  • 1976 : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू केली.
  • 1991 : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1993 : मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
  • 1994 : 26 फेब्रुवारी 1993 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या चार दहशतवाद्यांना प्रत्येकी 240 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • 2000 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेला Insat-3B हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
  • 2001 : 18 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
  • 2004 : उत्तर कोरियाने आपल्या देशात मोबाईल फोनवर बंदी घातली.
  • 2010 : सात सिलिकॉन रेणूंच्या आकाराचे जगातील सर्वात लहान ट्रान्झिस्टर बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1686 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1736)
  • 1819 : ‘व्हिक्टोरिया’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1901)
  • 1924 : ‘रघुवीर भोपळे’ ऊर्फ जादूगार रघुवीर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1984)
  • 1933 : ‘हेमचंद्र तुकाराम’ तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1999)
  • 1942 : ‘माधव गाडगीळ’ – पर्यावरणतज्ञ यांचा जन्म.
  • 1955 : ‘राजेश रोशन’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1973 : ‘शिरीष कुंदर’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1543 : ‘निकोलस कोपर्निकस’ – पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1473)
  • 1950 : ‘आर्चिबाल्ड वावेल’ – भारताचे 43वे गर्वनर जनरल यांचे निधन. (जन्म: 5 मे 1883)
  • 1984 : ‘विन्स मॅकमोहन सीनिय’ – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1914)
  • 1990 : ‘के. ऎस. हेगडे’ – लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचा मृत्यू.
  • 1993 : ‘बुलो चंदीराम रामचंदानी’ ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक यांचे निधन. (जन्म: 6 मे 1920 – हैदराबाद)
  • 1995 : ‘हॅरॉल्ड विल्सन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 11 मार्च 1916)
  • 1999 : ‘विजयपाल लालाराम’ तथा गुरू हनुमान – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1901)
  • 2000 : ‘मजरुह सुलतानपुरी’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि – एकादशी – 22:32:49 पर्यंत
  • नक्षत्र – उत्तराभाद्रपद – 16:03:29 पर्यंत
  • करण – भाव – 11:57:55 पर्यंत, बालव – 22:32:49 पर्यंत
  • पक्ष – कृष्ण
  • योग – प्रीति – 18:36:05 पर्यंत
  • वार – शुक्रवार
  • सूर्योदय – 06:04
  • सूर्यास्त – 19:07
  • चन्द्र राशि – मीन
  • चंद्रोदय – 27:21:00
  • चंद्रास्त – 15:15:00
  • ऋतु – ग्रीष्म

जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
  • १५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
  • १८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
  • १८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
  • १९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
  • १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
  • १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
  • १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
  • १९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
  • १९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
  • १९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
  • १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
  • २००८: भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • २०१६: भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
  • १७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
  • १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
  • १८९६: जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म.
  • १९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
  • १९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
  • १९२२: प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.
  • १९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
  • १९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
  • १९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
  • १९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
  • १९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
  • १९४८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.
  • १९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
  • १९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५७: ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
  • १९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)
  • १९३०: प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.
  • १९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)
  • १९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
  • १९७५: भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.
  • १९३४: क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
  • २०१०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कानू सन्याल यांचे निधन.
  • २०१०: राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन.
  • २०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
  • २०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२२ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

तिथि – दशमी – 25:15:26 पर्यंत
नक्षत्र – पूर्वाभाद्रपद – 17:48:30 पर्यंत
करण – वणिज – 14:24:43 पर्यंत, विष्टि – 25:15:26 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – विश्कुम्भ – 21:48:52 पर्यंत
वार – गुरूवार
सूर्योदय – 06:04
सूर्यास्त – 19:07
चन्द्र राशि – कुंभ – 12:09:33 पर्यंत
चंद्रोदय – 26:41:59
चंद्रास्त – 14:16:00
ऋतु – ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस International Day for Biological Diversity
महत्त्वाच्या घटना :
  • 1762 : स्वीडन आणि प्रशिया यांच्यात हॅम्बर्गचा तह.
  • 1906 : राइट बंधूंनी फ्लाइंग मशीनचे पेटंट घेतले.
  • 1915 : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 ट्रेनची धडक होऊन 227 लोक ठार आणि 246 जखमी.
  • 1927 : चीनच्या झिनिंगजवळ 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 200,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
  • 1960 : द ग्रेट चिलीचा भूकंप हा 9.5 रिश्टर स्केलचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
  • 1961 : हुंडाबंदी कायदा राष्ट्रपतींच्या संमतीने हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.
  • 1972 : सिलोनने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. देशाचे नामकरण श्रीलंका करण्यात आले आणि राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1987 : मेरठ जिल्ह्यात हाशिमपुरा हत्याकांड घडले.
  • 1990 : उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन रिपब्लिक ऑफ येमेन या नावाने एकत्र आले.
  • 2004 : भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी पदभार स्वीकारला.
  • 2009 : मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
  • 2015 : सार्वमतानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1408 : ‘अन्नामचार्य’ – हिंदू संत यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1503)
  • 1772 : ‘राजा राम मोहन रॉय’ – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1833)
  • 1783 : ‘विल्यम स्टर्जन’ – विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1850)
  • 1813 : ‘रिचर्ड वॅग्‍नर’ – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1883)
  • 1859 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1930)
  • 1871 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1933)
  • 1905 : ‘बोडो वॉन बोररी’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1956)
  • 1907 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 1989)
  • 1940 : भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
  • 1948 : ‘नेदुमुदी वेणू’ – भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1959 : ‘मेहबूबा मुफ्ती’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1984 : ‘डस्टिन मॉस्कोविट्झ’ – फेसबुकचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1987 : ‘नोव्हान जोकोव्हिच’ – सर्बियाचा टेनिस खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1545 : ‘शेरशाह सूरी’- भारतीय शासक यांचे निधन.
  • 1802 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी यांचे निधन. (जन्म: 2 जून 1731)
  • 1885 : ‘व्हिक्टर ह्यूगो’ – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 26 फेब्रुवारी 1802)
  • 1991 : ‘श्रीपाद अमृत डांगे’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1899)
  • 1995 : ‘रविंद्र बाबुराव मेस्त्री’ – चित्रकार व शिल्पकार यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ. मधुकर आष्टीकर’ – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1928)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२१ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 27:25:15 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 18:59:18 पर्यंत
  • करण-तैतुल – 16:16:41 पर्यंत, गर – 27:25:15 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वैधृति – 24:34:06 पर्यंत
  • वार=बुधवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:06
  • चन्द्र राशि-कुंभ
  • चंद्रोदय-26:03:59
  • चंद्रास्त-13:18:59
  • ऋतु-ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक ध्यान दिवस
  • जागतिक मासे स्थलांतर दिन
  • आंतरराष्ट्रीय चहा दिवस
  • सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1881 : वॉशिंग्टन (डी.सी.) मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली.
  • 1904 : फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (FIFA) ची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
  • 1927 : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग एक अमेरिकन विमानचालक आणि लष्करी अधिकारी होता. त्यांनी न्यूयॉर्क शहर ते पॅरिस पर्यंत 3,600 मैल (5,800 किमी) चे पहिले नॉनस्टॉप उड्डाण केले, 33.5 तास एकट्याने उड्डाण केले.
  • 1932 : अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला ठरली.
  • 1991 : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या.
  • 1992 : चीनने 1,000 किलोटन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
  • 1994 : मिस इंडिया सुष्मिता सेनने ४३व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.
  • 1996 : सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1916 : ‘हेरॉल्ड रॉबिन्स’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1997)
  • 1923 : ‘अर्मांड बोरेल’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑगस्ट 2003)
  • 1928 : ‘ज्ञानेश्वर नाडकर्णी’ – कला समीक्षक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2010)
  • 1931 : ‘शरद जोशी’ – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1991)
  • 1956 : ‘रविन्र्द मंकणी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1958 : ‘नइम खान’ – भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1960 : ‘मोहनलाल’ – दक्षिण भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘आदित्य चोप्रा’ – भारतीय चित्रपट निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1471 : ‘हेन्‍री (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1421)
  • 1686 : ‘ऑटो व्हॉन गॅरिक’ – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1602)
  • 1979 : ‘जानकीदेवी बजाज’ – स्वातंत्र्य वीरांगना यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1893)
  • 1991 : ‘राजीव गांधी’ – भारताचे माजी पंतप्रधान यांची हत्या. (जन्म: 20 ऑगस्ट 1944)
  • 1998 : ‘आबासाहेब बाबूराव किल्लेदार’ – इंटकचे सोलापुरातील नेते यांचे निधन.
  • 2000 : ‘मार्क आर. ह्यूजेस’ – हर्बालाइफ कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1956)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२० मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 28:58:48 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 19:33:23 पर्यंत
  • करण-बालव – 17:31:32 पर्यंत, कौलव – 28:58:48 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-इंद्रा – 26:49:36 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:05
  • सूर्यास्त-19:06
  • चन्द्र राशि-मकर – 07:36:34 पर्यंत
  • चंद्रोदय-25:26:00
  • चंद्रास्त-12:22:59
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक मधमाशी दिन World Bee Day
  • आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवस International Clinical Trials Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1498 : पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत (कलकत्ता) भारतीय बंदरावर आला.
  • 1540 : छायाचित्रकार अब्राहम ऑर्टेलियस यांनी पहिले आधुनिक ॲटलस थिएटरम ऑर्बिस टेरारम प्रकाशित केले.
  • 1873 : लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याच्या बटणांसह निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.
  • 1891 : थॉमस एडिसनने किनेटोस्कोपचा पहिला नमुना प्रदर्शित केला
  • 1902 : क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1927 : सौदी अरेबियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1948 : चियांग काई शेक यांची चीन प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
  • 1990 : हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळातून पहिली छायाचित्रे पाठवली.
  • 1996 : देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.
  • 2000 : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
  • 2001 : चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2011 : झारखंडच्या गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल यांनी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला होण्याचा मान मिळवून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला.

 

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1818 : ‘विल्यम फार्गो’ – अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1881)
  • 1850 : ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ – केसरी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1882)
  • 1851 : ‘एमिल बर्लिनर’ – ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1929)
  • 1860 : ‘एडवर्ड बकनर’ – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1917)
  • 1884 : ‘पांडुरंग दामोदर गुणे’ – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1922)
  • 1900 : ‘सुमित्रानंदन पंत’ – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी यांचा जन्म. (मृत्यू: 28 डिसेंबर 1977)
  • 1913 : ‘विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट’ – हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 2001)
  • 1915 : ‘मोशे दायान’ – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑक्टोबर 1981)
  • 1944 : ‘डीट्रिख मत्थेकित्झ’ – रेड बुल चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1952 : ‘रॉजर मिला’ – कॅमेरुनचा फूटबॉलपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1506 : ‘ख्रिस्तोफर कोलंबस’ – इटालियन दर्यावर्दी व संशोधक यांचे निधन.
  • 1571 : ‘केशवचैतन्य’ ऊर्फ बाबाचैतन्य – राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.
  • 1766 : ‘मल्हारराव होळकर’ – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1693)
  • 1878 : ‘कृष्णशास्त्री चिपळूणकर’ – समाजसुधारक व संस्कृत विद्वान यांचे निधन.
  • 1932 : ‘बिपिन चंद्र पाल’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1858)
  • 1961 : ‘भाई विष्णूपंत चितळे’ – कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते यांचे निधन.
  • 1992 : ‘डॉ. लीला मूळगांवकर’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1916)
  • 1994 : ‘के. ब्रम्हानंद रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 28 जुलै 1909)
  • 1997 : ‘विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर’ – इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील यांचे निधन.
  • 2012 : ‘लीला दुबे’ – भारतीय मानववंशशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1923)
  • 2012 : ‘यूजीन पॉली’ – रिमोट कंट्रोल चे शोधक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1915)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१८ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 18:53:26 पर्यंत
  • करण-गर – 18:11:52 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुभ – 06:41:33 पर्यंत, शुक्ल – 29:51:34 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:04
  • सूर्यास्त- 19:06:52
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 24:04:59
  • चंद्रास्त- 10:28:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस
  • आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1498 : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरावर आला.
  • 1804 : नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
  • 1912 : पुंडलिक हा संपूर्ण भारतात बनलेला मूकपट प्रदर्शित झाला.
  • 1938 : प्रभातचा गोपाळकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा, मुंबई येथे प्रदर्शित झाला.
  • 1940 : प्रभातचा ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट एकाच दिवशी, मुंबई व पुणे या ठिकाणी प्रदर्शित झाला.
  • 1972 : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1974 : भारताने पोखरण-1 परमाणू परीक्षण केले.
  • 1990 : फ्रान्सच्या TGV रेल्वेने 515.3 किमी/ताशी वेगाने नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
  • 1991: हेलन शर्मन रशियाच्या सोयुझमध्ये अंतराळात चालणारी पहिली ब्रिटिश महिला ठरली.
  • 1995 : स्थानिक ठिकाणचे 5000 रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
  • 1995 : अलेन ज्युपे फ्रान्सचे पंतप्रधान झाले.
  • 1998 : पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले.
  • 2009 : श्रीलंकेच्या सरकारने LTTE चा पराभव केला, जवळजवळ 26 वर्षांचे युद्ध संपवले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1048 : ‘ओमर खय्याम’ – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1131)
  • 1872 : ‘बर्ट्रांड रसेल’ – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1970)
  • 1913 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते, नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1998)
  • 1920 : ‘पोप जॉन पॉल (दुसरा)’ – यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2005)
  • 1933 : ‘एच. डी. देवेगौडा’ – भारताचे 11 वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1979 : ‘जेन्स् बर्गेंस्टन’ – माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1988 : ‘सोनाली कुलकर्णी’ – मराठी अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1808 : ‘एलीया क्रेग’ – बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते यांचे निधन.
  • 1846 : ‘बाळशास्त्री जांभेकर’ – मराठी पत्रकारितेचे पितामह यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1812)
  • 1966 : ‘पंचानन माहेश्वरी’ – वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1904)
  • 1997 : ‘कमलाबाई कामत’ तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1901)
  • 1999 : ‘रामचंद्र सप्रे’ – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते यांचे निधन.
  • 2009 : ‘वेल्लुपल्ली प्रभाकरन’ – एल. टी. टी. ई. चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1954)
  • 2012 : ‘जय गुरूदेव’ – भारतीय धार्मिक नेते यांचे निधन.
  • 2017 : ‘रीमा लागू’ – भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 21 जुन 1958)
  • 2020 : ‘रत्नाकर मतकरी’ – मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१६ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 29:16:40 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 16:08:19 पर्यंत
  • करण-भाव – 16:44:20 पर्यंत, बालव – 29:16:40 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 07:13:12 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03:43
  • सूर्यास्त- 19:06:05
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 22:30:59
  • चंद्रास्त- 08:33:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस
  • राष्ट्रीय डेंग्यू दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1665 : पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
  • 1866 : युनायटेड स्टेट्समध्ये पाच सेंट किंवा निकेल नाणे सुरू झाले.
  • 1899 : क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.
  • 1929 : हॉलिवूडच्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्सेसने मोशन पिक्चर्समधील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी पहिला समारंभ आयोजित केला. हे पुरस्कार पुढे ऑस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • 1969 : सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान शुक्र ग्रहाच्या वातावरणात प्रवेश मिळवणारे पहिले अंतराळयान.
  • 1975 : सिक्कीमचे भारतात विलीन झाले.
  • 1975 : जपानची जुनको ताबेई माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला ठरली.
  • 1993 : बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याचा मान मिळवून दिला व नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • 1996 : अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताचे 10 वे पंतप्रधान म्हणून पद स्वीकारले. मात्र आवश्यक पाठबळ न मिळाल्याने त्यांचे सरकार केवळ 13 दिवस टिकले.
  • 2000 : बॅडमिंटनला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आणि खेळाचे प्रसारण सुलभ करण्यासाठी, क्वालालंपूर येथे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या बैठकीत हा खेळ 15 गुणांऐवजी 7 गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा नियम 2006 मध्ये बदलण्यात आला.
  • 2005 : कुवेतमध्ये महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 2007 : निकोलस सार्कोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • 2010 : वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 20-20 विश्वचषकाच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचे 147 धावांचे लक्ष्य तीन गडी गमावून पूर्ण केले आणि प्रथमच विश्वविजेता ठरला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1825 : ‘केरुनाना लक्ष्मण छत्रे’ – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 19 मार्च 1884)
  • 1831 : ‘डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस’ – मायक्रोफोन चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1900)
  • 1905 : ‘हेन्‍री फोंडा’ – अमेरिकन अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑगस्ट 1982)
  • 1926 : ‘माणिक वर्मा’ – गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 10 नोव्हेंबर 1996)
  • 1931 : ‘के. नटवर सिंह’ – भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘गॅब्रिएला सॅबातिनी’ – अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1988 : ‘विक्की कौशल’ – भारतीय बॉलिवूड अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1830 : ‘जोसेफ फोरियर’ – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 मार्च 1768)
  • 1950 : ‘अण्णासाहेब लठ्ठे’ – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री यांचे निधन. (जन्म: 9 डिसेंबर 1878)
  • 1977 : ‘मादीबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 4 जुन 1915)
  • 1990 : ‘जिम हेनसन’ – द मपेट्स चे जनक यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1936)
  • 1994 : ‘माधव मनोहर’ – साहित्य समीक्षक यांचे निधन.
  • 1994 : ‘फणी मुजुमदार’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 28 डिसेंबर 1911)
  • 2008 : ‘रॉबर्ट मोन्डवी’ – ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 18 जुन 1913)
  • 2014 : ‘रुसी मोदी’ – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1918)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१५ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 28:05:49 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 14:08:04 पर्यंत
  • करण-वणिज – 15:21:33 पर्यंत, विष्टि – 28:05:49 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-शिव – 07:00:36 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:04:06
  • सूर्यास्त- 19:05:42
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 14:08:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 21:37:59
  • चंद्रास्त- 07:41:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
  • आंतरराष्ट्रीय ग्राहक समर्थन दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1718 : जगातील पहिल्या मशीन गनचे पेटंट जेम्स पुकल यांनी केले.
  • 1730 : रॉबर्ट वॉलपोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान बनले.
  • 1811 : पॅराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1836 : सूर्यग्रहणापूर्वी दिसणारे बेलीचे मणी प्रथम शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी पाहिले.
  • 1928 : प्लेन क्रेझी शोमध्ये मिकी माऊस कार्टून प्रथम प्रसारित झाले.
  • 1935 : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • 1940 : सॅन बर्नार्डिनो, कॅलिफोर्निया येथे पहिले मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट उघडले.
  • 1958 : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 3 लाँच केले.
  • 1960 : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 4 लाँच केले.
  • 1961 : पुण्यातील चतु:श्रृंगी पॉवर स्टेशनमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला.
  • 2000 : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1817 : ‘देवेन्द्रनाथ टागोर’ – भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1905)
  • 1859 : ‘पिअर क्युरी’ – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1906)
  • 1903 : ‘रामचंद्र श्रीपाद जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1977)
  • 1907 : ‘सुखदेव थापर’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 1931)
  • 1967 : ‘माधुरी दिक्षीत-नेने’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1988 : ‘राम पोथिनेनी’ – भारतीय फिल्म अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1350 : ‘संत जनाबाई’ – यांचे निधन.
  • 1729 : ‘खंडेराव दाभाडे’ – मराठा साम्राज्याचे कुशल सरदार यांचे निधन.
  • 1993 : ‘के. एम. करिअप्पा’ – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1899)
  • 1994 : ‘ओम अग्रवाल’ – जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता यांचे निधन.
  • 1994 : चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.
  • 2000 : ‘सज्जन’ – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते यांचे निधन.
  • 2007 : ‘जेरी फेलवेल’ – लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1933)
  • 2010 : ‘भैरोंसिंह शेखावत’ – भारताचे माजी उपराष्ट्रपती यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 24:38:19 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 09:09:31 पर्यंत
  • करण-बालव – 11:35:04 पर्यंत, कौलव – 24:38:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:04:53
  • सूर्यास्त- 19:04:56
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 19:48:59
  • चंद्रास्त- 06:09:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • छत्रपती संभाजी महाराज जयंती

महत्त्वाच्या घटना :
  • 1796 : इंग्लंडमधील ग्लुसेस्टर काउंटीमधील बर्कले येथील आठ वर्षांच्या जेम्स फिलिप या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
  • 1900 : पॅरिसमध्ये दुसऱ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • 1948 : इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा
  • 1955 : सोव्हिएत रशिया, अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि पूर्व जर्मनी या साम्यवादी राष्ट्रांमधील वीस वर्षांच्या परस्पर संरक्षणासाठी वॉर्सा करारावर पोलंडमधील वॉर्सा येथे स्वाक्षरी झाली.
  • 1960 : एअर इंडियाने मुंबई-न्यूयॉर्क सेवा सुरू केली.
  • 1963 : कुवेत संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला.
  • 1965 : चीनने सकाळी 7.30 वाजता दुसऱ्या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
  • 1973 : अमेरिकेने स्कायलॅब या आपल्या अवकाशातील प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले.
  • 1982 : ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.
  • 1997 : देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव देण्यात आहे.
  • 2001 : भारत आणि मलेशिया यांच्यात सात करार झाले.
  • 2012 : अयशस्वी लँडिंग, अग्नी एअर फ्लाइट सीएचटी नेपाळमध्ये क्रॅश झाली, 15 लोक ठार झाले. यात ‘तरुणी सचदेव’ (रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार) यांचाही मृतू.
  • 2021 : चीनने मंगळावर पहिले रोव्हर ‘झुरोंग’ यशस्वीरित्या उतरवले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1657 : ‘छत्रपती संभाजी महाराज’ – यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1689)
  • 1907 : ‘आयुब खान’ – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1974)
  • 1909 : ‘वसंत शिंदे’ – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1999)
  • 1923 : ‘मृणाल सेन’ – दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1926 : ‘डॉ. इंदुताई पटवर्धन’ – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका यांचा जन्म. (मृत्यू: 8 फेब्रुवारी 1999)
  • 1965 : ‘सचिन खेडेकर’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1981 : ‘प्रणव मिस्त्री’ – भारतीय संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1990 : ‘मार्क झकरबर्ग’ – फेसबुकचे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1998 : ‘तरुणी सचदेव’ – रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 मे 2012)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1643 : ‘लुई (तेरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 27 सप्टेंबर 1601)
  • 1923 : ‘चार्ल्स दि फ्रेसिने’ – फ्रांसचा पंतप्रधान यांचे निधन.
  • 1923 : ‘सर नारायण गणेश चंदावरकर’ – कायदेपंडित, समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1855)
  • 1963 : ‘डॉ. रघू वीरा’ – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1902)
  • 1978 : ‘जगदीश चंद्र माथूर’ – नाटककार व लेखक यांचे निधन. (जन्म: 16 जुलै 1917)
  • 1978 : ‘रॉबर्ट मेंझिस’ – ऑस्ट्रेलियाचे बारावे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1988 : ‘विलेम ड्रीस’ – नेदरलॅंड्सचा पंतप्रधान यांचे निधन.
  • 1998 : ‘फ्रँक सिनात्रा’ – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1915)
  • 2000 : ‘ओबुची कीझो’ – जपानी पंतप्रधान यांचे निधन.
  • 2012 : ‘तरुणी सचदेव’ – रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार यांचे निधन. (जन्म: 14 मे 1998)
  • 2013 : ‘असगर अली इंजिनिअर’ – भारतीय लेखक यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 24:38:19 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 09:09:31 पर्यंत
  • करण-बालव – 11:35:04 पर्यंत, कौलव – 24:38:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:07
  • सूर्यास्त- 19:03
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 19:48:59
  • चंद्रास्त- 06:09:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय बेडूक उडी दिवस
  • आंतरराष्ट्रीय हुमस दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1880 : थॉमस अल्वा एडिसनने मेनलो पार्क, न्यू जर्सी येथे इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेतली.
  • 1939 : अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडिओ स्टेशन सुरू झाले.
  • 1950 : फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली शर्यत सिल्व्हरस्टोन येथे झाली.
  • 1952 : भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन झाले.
  • 1962 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न.
  • 1962 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.
  • 1967 : डॉ. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
  • 1970 : कोरिओग्राफर सितारादेवी यांनी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात 11 तास 45 मिनिटे सतत नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.
  • 1995 : ऑक्सिजन किंवा शेर्पांच्या मदतीशिवाय एव्हरेस्टवर चढणारी एलिसन हरग्रीव्हस ही पहिली महिला ठरली.
  • 1996 : ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल 332 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
  • 1996 : लघुपट निर्माते अरुण खोपकर दिग्दर्शित कुटुंब नियोजनावरील ‘सोच समाज के’ या लघुपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • 1998 : भारताने पोखरण येथे दोन अणुचाचण्या घेतल्या.
  • 2000 : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यांची पुनर्रचना आणि अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती करण्याच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली.
  • 2000: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1857 : ‘सर रोनाल्ड रॉस’ – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1932)
  • 1905 : ‘फक्रुद्दीन अली अहमद’ – भारताचे ५वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 11 फेब्रुवारी 1977)
  • 1916 : ‘सच्चिदानंद राऊत’ – भारतीय ओरिया भाषेचे कवी यांचा जन्म.
  • 1918 : ‘तंजोर बालसरस्वती’ – भरतनाट्यम नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1984)
  • 1925 : ‘डॉ. भालचंद्र दिनकर फडके’ – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 2004)
  • 1951 : ‘आनंद मोडक’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1956 : ‘श्री श्री रविशंकर’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म.
  • 1956 : ‘कैलाश विजयवर्गीय’ – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचा जन्म.
  • 1973 : ‘संदीप खरे’ – गीतलेखक, कवी यांचा जन्म.
  • 1978 : ‘दिलशान वितरणा’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1984 : ‘बेनी दयाल’ – भारतीय गायक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1626 : ‘मलिक अंबर’ – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण यांचे निधन.
  • 1903 : ‘अपोलिनेरियो माबिनी’ – फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 जुलै 1864)
  • 1950 : ‘रामकृष्ण भांडारकर’ – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1875)
  • 2001 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – लेखक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1906)
  • 2010 : ‘विनायक महादेव कुलकर्णी’ – कवी आणि बालकुमार-साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1917)
  • 2018 : ‘जॉर्ज सुदर्शन’ – पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 2013 : ‘जगदीश माळी’ – भारतीय छायाचित्रकार यांचे निधन.
  • 2021 : ‘इंदू जैन’ – टाइम्स ऑफ इंडिया मीडिया ग्रुपच्या चेअरपर्सन यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search