Ganpati Special ST Buses: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५००० जादा गाड्या

   Follow us on        

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणार्‍या भाविकांसाठी एक खुशखबर आहे चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतूकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.

 

यंदा सुमारे ५००० जादा गाड्या धावणार

मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफा-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार ५००० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation अॅपव्दारे, उपलब्ध होणार आहे.

Facebook Comments Box

Sawantwadi: रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाविरोधात थेट पंतप्रधानांकडे तक्रार

   Follow us on        

Sawantwadi: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी टर्मिनसच्या कामास होत असलेल्या प्रचंड विलंबामुळे आणि कोकण रेल्वे मार्गावरील अपुऱ्या रेल्वे सेवांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात पांडुरंग चंद्रकांत मुळीक यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ११ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. कोकण रेल्वे मार्ग पूर्ण होऊन २७ वर्षे उलटली तरी मार्गावर कोकणातील प्रवाशांसाठी पुरेश्या गाड्या नाहीत. तसेच सन २०१५ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असलेले सावंतवाडी टर्मिनस अजूनही अर्धवट स्थितीत असल्याकडे श्री. मुळीक यांनी या तक्रारीद्वारे पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष वेधले आहे.

या पत्रात म्हटले आहे, कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्या दक्षिण भारत व गोव्यासाठी धावतात. उत्सव व हंगामी विशेष गाड्याही सावंतवाडी टर्मिनसपर्यंत न सोडता त्या पुढे गोवा, केरळ पर्यंत सोडल्या जातात. यामुळे कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील रेल्वे प्रवाशांची नेहमीच परवड होते. जिल्ह्यातील

प्रवाशांना नेहमीच गर्दीतून गुरे-ढोरे कोंबल्याप्रमाणे प्रवास करावा लागतो. शिवाय शासनाच्या महत्वाकांक्षी ‘अमृत भारत’ योजनेत कोकण रेल्वे मार्गावरील एकाही स्थानकाचा समावेश नाही. सावंतवाडी टर्मिनसचे काम गेली १० वर्षे अर्धवट स्थितीत आहे. परिणामी सावंतवाडी स्थानकावर अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबे मिळत नाहीत. तरी सावंतवाडी स्थानकाचा ‘अमृत भारत’ योजनत समावेश करून सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती या पत्राद्वारे श्री. मुळीक यांनी केली आहे.

ही तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून, पंतप्रधान कार्यालयाचे अवर सचिव (सार्वजनिक) मुकुल दीक्षित यांनी ती स्वीकारली आहे. या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतली जाईल व सावंतवाडी टर्मिनसच्या विकासाला गती मिळेल तसेच कोकणवासियांना अपेक्षित रेल्वे सुविधा लवकरात लवकर मिळतील, असा विश्वास श्री. मुळीक यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Facebook Comments Box

Chiplun: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा टेरव येथे साडेतीनशे किल्ल्यांचे सचित्र प्रदर्शन.

   Follow us on        

चिपळूण: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील १ अशा भारतातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याबद्दल ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को या संस्थेने महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण आहे. या ११ किल्ल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याचाही समावेश झाल्यामुळे विशेष आनंद आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती व ऐतिहासिक वारसा या विषयी अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक मोने सर यांच्या संकल्पनेतून व संग्रहित ३५० किल्ल्यांचे सचित्र माहितीसह प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शन व आनंदोत्सवाचे उद्घाटन टेरव गावचे मुंबई स्थित ग्रामस्थ व सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सुधाकर कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सुमन विद्यालय टेरवचे शिक्षक श्री भंडगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, सौ चिपळूणकर, सौ निशिगंधा कांबळे , श्री अनंत पवार, सौ स्नेहल गायकवाड, श्री प्रवीण सन्मुख, श्रीमती तनुजा मोहिते, हे शिक्षक – शिक्षिका उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचा लाभ सुमन विद्यालय टेरवचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा टेरव १ मधील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार सर यांनी केले तर आभार श्री प्रवीण सन्मुख यांनी मानले.

 

श्री दिपक मोने, मुख्याध्यापक

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव 

Facebook Comments Box

Railway Updates: रेल्वे गाड्यांमधील गुन्हेगारी आणि चोरींच्या घटनेला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

   Follow us on        

Railway Updates । प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्हमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. निवडक कोच आणि लोकोमोटिव्हमध्ये यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच काळापासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे रेल्वेतील गैरप्रकार रोखण्यात येतील अशी आशा रेल्वेला आहे.

प्रत्येक कोचमध्ये चार डोम -प्रकारचे CCTV कॅमेरे असतील – प्रत्येक प्रवेशद्वारा जवळ दोन कॅमेरे असतील. हे कॅमेरे प्रवाशांच्या कोणत्याही गोपनीयतेला अडथळा न आणता इतर जागा कव्हर करतील. लोकोमोटिव्हमध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे असतील, जे पुढील, मागील आणि बाजूकडील दृश्यांचे निरीक्षण करण्यासाठी बसवले जातील. रेल्वेत (Indian Railways) बसवले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टतेसह आणि एसटीक्यूसी प्रमाणित असणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाची चित्रीकरण फीत उपलब्ध होईल, याची खात्री करावी.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कव्हरेज संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ चोरीविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करेल. प्रवास करताना प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेमध्ये अनेकदा चोरीच्या मारामारीच्या घटना घडतात अशा घटनांना सुद्धा या नव्या सीसीटीव्ही सिस्टीम मुळे आळा बसेल. प्रवाशांना शिस्त लागेल.

 

 

Facebook Comments Box

१४ जुलै पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 24:02:25 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 06:50:05 पर्यंत
  • करण-भाव – 12:36:11 पर्यंत, बालव – 24:02:25 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-आयुष्मान – 16:13:45 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:11
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 22:06:00
  • चंद्रास्त- 09:09:59
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1789 : पॅरिसमध्ये, नागरिकांनी फ्रेंच राज्याच्या दडपशाहीचे प्रतीक असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आणि आतील सात कैद्यांची सुटका केली. हि घटना फ्रेंच राज्यक्रांतीत फार महत्वाची मानली जाते.
  • 1867 : अल्फ्रेड नोबेल यांनी स्फोटक डायनामाइटची यशस्वी चाचणी केली.
  • 1925 : जर्मनीमध्ये नाझी पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
  • 1942 : काँग्रेसच्या वर्धा अधिवेशनात, “भारत छोडो” ठराव मंजूर करण्यात आला, महात्मा गांधींना ब्रिटनपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम करण्यास अधिकृत केले.
  • 1958 : इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेत.
  • 1960 : ‘जेन गुडॉल’ यांनी चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी टांझानियामधील एका अभयारण्यात प्रवेश केला. त्यांनी 45 वर्षे संशोधन केले.
  • 1969 : अमेरिकेने चलनातून $500, $1,000, $5,000 आणि $10,000 च्या नोटा काढून घेतल्या.
  • 1976 : कॅनडामध्ये मृत्युदंडावर बंदी घालण्यात आली.
  • 2003 : संदीप चंदा यांना जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून ग्रँडमास्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2013 : पोस्टल विभागाची 160 वर्षे जुनी तार सेवा बंद करण्यात आली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1856 : ‘गोपाल गणेश आगरकर’ – थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1895)
  • 1862 : ‘गुस्टाफ क्लिम्ट’ – ऑस्ट्रियन चित्रकार यांचा जन्म.
  • 1884 : ‘यशवंत खुशाल देशपांडे’ – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1970)
  • 1893 : ‘गारिमेला सत्यनारायण’ – भारतीय कवी आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 1952)
  • 1910 : ‘विल्यम हॅना’ – टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार यांचा जन्म.
  • 1917 : ‘रोशनलाल नागरथ’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 1967)
  • 1920 : ‘शंकरराव चव्हाण’ – केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 2004)
  • 1947 : ‘नवीन रामगुलाम’ – मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1957 : ‘आलोक कुमार वर्मा’ – भारतातील केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे(सी.बी.आय.)माजी संचालक यांचा जन्म.
  • 1967 : ‘हशन तिलकरत्ने’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1904 : ‘पॉल क्रुगर’ – दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी यांचे निधन.
  • 1936 : ‘धनगोपाळ मुखर्जी’ – भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1890)
  • 1963 : ‘स्वामी शिवानंद सरस्वती’ – योगी व आध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 सप्टेंबर 1887)
  • 1975 : ‘मदनमोहन’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जून 1924)
  • 1993 : ‘श्रीमंत विजयमाला राणीसाहेब’ – करवीर संस्थानच्या महाराणी यांचे निधन.
  • 1998 : ‘रिचर्ड मॅकडोनाल्ड’ – मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 16 फेब्रुवारी 1909)
  • 2003 : ‘लीला चिटणीस’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1909)
  • 2003 : ‘प्रो. राजेंद्र सिंग’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4 थे सरसंघचालक यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1922)
  • 2008 : ‘यशवंत विष्णू चंद्रचूड’ – सर्वोच्‍च न्यायालयाचे 16 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म : 12 जुलै 1920)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

गोव्याहून सोलापूरसाठी निघालेले विमान मागे फिरले; कारण काय?

   Follow us on        

गोवा: अलीकडेच सुरु झालेल्या सोलापूर ते गोवा विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, गोव्याहून सोलापूरकडे जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन पावसाळी सुट्ट्यांमध्ये अनेकांनी गोव्यात सहलीचे नियोजन केले होते, मात्र ही विमानसेवा ठप्प झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडले

फ्लाय ९१ या विमान कंपनीला तांत्रिक कारणामुळे शनिवारी (दि.१२) रोजी संध्याकाळचे उड्डाण रद्द करावे लागले. हे विमान उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरून ४.५ मिनिटांनी सोलापूरसाठी उड्डाण करणार होते, यांनतर तांत्रिक कारणामुळे वैमानिकांनी उशीर होणार असल्याचे जाहीर केले. मात्र पुढे ६.३० पूर्वी सोलापूरात उतरणे शक्य नसल्याने अखेर हे उड्डाण रद्द करावे लागले.

गोव्यातून सोलापूरकडे येणाऱ्या या विमानात अंदाजे ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. विमान अचानक रद्द झाल्याने या सर्व प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे बिघडले. विमानतळ प्राधिकरण अधिकारी अंजली शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले असून, सर्व प्रवाशांना तिकिटाचे शंभर टक्के पैसे परत केले जाणार आहेत.

सोलापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, मात्र या कमी कालावधीत १३०० हून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला होता. अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला जात असला तरी, यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

 

 

Facebook Comments Box

१३ जुलै पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 25:05:21 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 06:54:01 पर्यंत
  • करण-वणिज – 13:29:41 पर्यंत, विष्टि – 25:05:21 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 18:00:30 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:11
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-मकर – 18:54:31 पर्यंत
  • चंद्रोदय- 21:26:59
  • चंद्रास्त- 08:13:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय खडक दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1660 : पावनखिंडीची लढाई लढली.
  • 1830 : जनरल असेंब्ली संस्था, भारतातील कलकत्ता येथे अलेक्झांडर डफ आणि राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केली.
  • 1832 : हेन्री रो स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचा उगम शोधला.
  • 1837 : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
  • 1863 : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाले
  • 1908 : महिलांना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी.
  • 1929 : जतींद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात उपोषण सुरू केले. या उपोषणात त्यांचा मृत्यू झाला.
  • 1954 : जिनिव्हा येथे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचे व्हिएतनामच्या विभाजनावर एकमत झाले.
  • 1955 : 28 वर्षीय रुथ एलिसला तिच्या प्रियकराची हत्या केल्याबद्दल फाशी देण्यात आली. ग्रेट ब्रिटनमधील महिला कैद्याची शेवटची फाशी.
  • 1983 : श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. 3,000 तामिळ व्यक्तींची हत्या. 4,00,000 हून अधिक तामिळींचे पलायन.
  • 2011 : मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 26 ठार, 130 जखमी.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1814 : ‘भानुभक्त आचार्य’ – हे नेपाळी कवी, ज्यांनी नेपाळी भाषेत रामायण रचले यांचा जन्म.
  • 1892 : ‘केसरबाई केरकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1977)
  • 1942 : ‘हॅरिसन फोर्ड’ – अमेरिकन अभिनेता यांचा जन्म.
  • 1944 : ‘एरो रुबिक’ – रुबिक क्यूब चे निर्माते यांचा जन्म.
  • 1953 : ‘लॅरी गोम्स’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1964 : ‘उत्पल चॅटर्जी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1660 : ‘बाजीप्रभू देशपांडे’ – पावनखिंड लढवून स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
  • 1793 : ‘ज्याँपॉल मरात’ – फ्रेंच क्रांतिकारी यांचे निधन.
  • 1969 : ‘धुंडिराजशास्त्री विनोद’ – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1902)
  • 1980 : ‘सेरेत्से खामा’ – बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1990 : ‘अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी’ – क्रीडा समीक्षक व समालोचक यांचे निधन.
  • 1994 : ‘पं.कृष्ण गुंडोपंत गिंडे’ – धृपद गायक, संगीतकार शिक्षक यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1925)
  • 2000 : ‘इंदिरा संत’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1914)
  • 2009 : ‘निळू फुले’ – हिंदी मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 2010 : ‘मनोहारी सिंग’ – सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1931)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

१२ जुलै पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • दिनांक : 12 जुलै 2025
  • वार : शनिवार
  • माह (अमावस्यांत) : आषाढ
  • माह (पूर्णिमांत) : श्रावण
  • ऋतु : वर्षा
  • आयन : दक्षिणायन
  • पक्ष : कृष्ण पक्ष
  • तिथी : द्वितीया तिथी (13 जुलै रात्री 01:46 पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
  • नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (सकाळी 06:35 पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
  • योग : विष्कुम्भ योग (रात्री 07:30 पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
  • करण : तैतुला करण (दुपारी 02:00 पर्यंत) त्यानंतर गराजा करण
  • चंद्र राशी : मकर राशी
  • सूर्य राशी : मिथुन राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : सकाळी 09:26 ते सकाळी 11:05 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:17 ते दुपारी 01:10
  • सूर्योदय : सकाळी 06:11
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:18
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत

जागतिक दिन :

  • वाळू आणि धुळीच्या वादळांशी लढण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1674 : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
  • 1799 : रणजित सिंगने लाहोर काबीज केले आणि पंजाबचा सम्राट झाले.
  • 1920 : पनामा कालवा अधिकृतपणे उघडला गेला.
  • 1961 : पानशेत आणि खडकवासला धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात 2,000 लोक मरण पावले आणि 100,000 लोक बेघर झाले.
  • 1962 : रोलिंग स्टोन्सने लंडनमधील मार्की क्लबमध्ये त्यांची पहिली मैफिल आयोजित केली.
  • 1979 : किरिबाटीला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1982 : कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (NABARD) ची स्थापना झाली.
  • 1985 : पी. एन. भगवती भारताचे 17 वे सरन्यायाधीश बनले.
  • 1995 : अभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 1998 : 16व्या फिफा विश्वचषकात यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझीलचा 3-0 असा पराभव करत विश्वचषक जिंकला.
  • 1999 : सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2001 : स्वामिनाथन यांना कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम.एस. टिळक पुरस्कार.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 100 : 100 ई .पूर्व : ‘ज्यूलियस सीझर’ – रोमन सम्राट यांचा जन्म.
  • 1817 : ‘हेन्‍री थोरो’ – अमेरिकन लेखक व विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1862)
  • 1852 : ‘हिपोलितो य्रिगोयेन’ – अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1854 : ‘जॉर्ज इस्टमन’ – संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1932)
  • 1863 : ‘वि. का. राजवाडे’ – इतिहासाचार्य यांचा जन्म.
  • 1864 : ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1943)
  • 1864 : ‘वि. का. राजवाडे’ – इतिहासाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 31 डिसेंबर 1926)
  • 1909 : ‘बिमल रॉय’ – प्रथितयश दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1966)
  • 1913 : ‘मनोहर माळगावकर’ – इंग्रजी लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 2010)
  • 1917 : ‘सत्येंद्र नारायण सिन्हा’ – बिहारचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1920 : ‘यशवंत विष्णू चंद्रचूड’ – सर्वोच्च न्यायालयाचे 16 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 2008)
  • 1947 : ‘पोचिआ कृष्णमूर्ति – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1961 : ‘शिव राजकुमार’ – भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते यांचा जन्म.
  • 1965 : ‘संजय मांजरेकर’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1660 : ‘बाजी प्रभू देशपांडे’ – यांचे निधन.
  • 1910 : ‘चार्ल्स रोलस्’ – रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1877)
  • 1949 : ‘डग्लस हाइड’ – आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1994 : ‘वसंत साठे’ – हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार यांचे निधन.
  • 1999 : ‘राजेंद्र कुमार’ – हिन्दी चित्रपट अभिनेता यांचे निधन. (जन्म: 20 जुलै 1929)
  • 2000 : ‘इंदिरा संत’ मराठी कवयित्री यांचे निधन.
  • 2012 : ‘दारासिंग’ – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1928)
  • 2013 : ‘प्राणकृष्ण सिकंद’ – भारतीय अभिनेता यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1920)
  • 2013 : ‘अमर बोस’ – बोस कॉर्पोरेशन चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1929)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

११ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 26:10:55 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-बालव – 14:12:59 पर्यंत, कौलव – 26:10:55 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वैधृति – 20:44:04 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:07:34
  • सूर्यास्त- 19:20:02
  • चन्द्र-राशि-धनु – 12:09:20 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:00:59
  • चंद्रास्त- 06:15:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक लोकसंख्या दिवस
  • आंतरराष्ट्रीय आवश्यक तेल दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1659 : शिवाजी राजे राजगड सोडून अफझलखानाशी लढण्यासाठी प्रतापगडावर पोहोचले.
  • 1801 : धूमकेतू पोहनचा शोध फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॉन लुईस पोहन यांनी लावला.
  • 1804 : अमेरिकेचे उपाध्यक्ष ॲरॉन बुर यांनी कोषागार सचिव अलेक्झांडर हॅमिल्टन यांना द्वंद्वयुद्धात ठार मारले.
  • 1889 : मेक्सिकोतील तिजुआना शहराची स्थापना.
  • 1893 : कोकिची मिकीमोटो, एक जपानी उद्योजक होता ज्यांना पहिले सदभिरुची असलेला मोती तयार करण्याचे श्रेय दिले जाते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मोती उद्योगाची सुरुवात करून मोती उद्योगाची स्थापना केली.
  • 1908 : मंडाले येथे लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची शिक्षा झाली.
  • 1919 : नेदरलँडमध्ये कामगारांसाठी आठ तासांचा दिवस आणि रविवारची सुट्टी लागू करण्यात आली.
  • मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1930 : ऑस्ट्रेलियाचा पाठलाग करणारा डोनाल्ड ब्रॅडमनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद 309 धावा केल्या.
  • 1950 : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) सदस्य झाला.
  • 1955 : अमेरिकेने चलनावर “देवावर आमचा विश्वास आहे” असे छापण्याचे ठरवले.
  • 1971 : चिलीच्या तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • 1979 : अमेरिकेचे पहिले स्पेस स्टेशन स्कायलॅब हिंद महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले.
  • 1989 : जागतिक लोकसंख्या दिन सुरू झाला.
  • 1994 : पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार.
  • 2001 : आगरतळा आणि ढाका दरम्यान बससेवा सुरू झाली.
  • 2006 : मुंबईतील उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोटात 209 ठार आणि 714 जखमी.
  • 2021 : रिचर्ड ब्रॅन्सन – त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानातून अंतराळात प्रवास करणारे पहिले नागरिक बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1889 : ‘नारायणहरी आपटे’ – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1971)
  • 1891 : ‘परशुराम कृष्णा गोडे’ – प्राच्यविद्या संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 28 मे 1961)
  • 1921 : ‘शंकरराव खरात’ – दलित साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 2001)
  • 1923 : ‘उमा देवी’ – भारतीय पार्श्वगायिका आणि विनोदी अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1934 : ‘जियोर्जियो अरमानी’ – जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक यांचा जन्म.
  • 1953 : ‘सुरेश प्रभू’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1956 : ‘अमिताव घोष’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
  • 1967 : ‘झुम्पा लाहिरी’ – भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1989 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता यांचे निधन. (जन्म: 22 मे 1907)
  • 1994 : ‘मेजर रामराव राघोबा राणे’ – परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी यांचे निधन.
  • 2003 : ‘सुहास शिरवळकर’ – कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक यांचे निधन. (जन्म: 15 नोव्हेंबर 1948)
  • 2009 : ‘शांताराम नांदगावकर’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 19 ऑक्टोबर 1936)
  • 2022 : ‘के. एन. ससीधरन’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Mumbai Local: ज्येष्ठ नागरिकांना आजपासून लोकल प्रवासात ‘नो टेंशन’, मिळाला हक्काचा डबा

   Follow us on        

Mumbai Local: मध्य रेल्वेने मुंबई लोकलमध्ये प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा सुरू केला. ही पहिली सेवा आज, दिनांक १०.०७.२०२५ रोजी, दुपारी ३:४५ वाजता सीएसएमटी–डोंबिवली लोकलने सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाढीव आसनव्यवस्था, सुरक्षेची अधिक व्यवस्था आणि आकर्षक देखणं सजावट असलेला हा खास डबा आता सर्व लोकल गाड्यांना जोडण्यात येणार आहे. हा डबा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित आहे, ज्यामुळे त्यांना गर्दीतून थोडा दिलासा मिळेल. आसने मऊ असून, वयोवृद्ध प्रवाशांच्या सोयीसाठी खास डिझाइन करण्यात आली आहेत. हँडरेल, सुरक्षिततेसाठी कॅमेरे, तसेच प्रभावी प्रकाश व्यवस्था उपलब्ध आहे. डब्याची सजावट सौंदर्यपूर्ण आणि आरामदायक ठेवण्यात आली आहे, जेणेकरून प्रवास अधिक सुखद होईल.

हे डबे एमयूएम लोकल रेकमध्ये हळूहळू इतर गाड्यांमध्येही समाविष्ट केले जाणार आहेत. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या डब्यात सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता येईल.

 

 

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search