मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फीचा मोह पडणार महागात; महामार्ग पोलिसांकडून कारवाई सुरू

   Follow us on        

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवासी आपले वाहन महामार्गावर थांबवून सेल्फी आणि फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांचा हा सेल्फीचा मोह आता त्यांच्या जीवावर बेतू शकतो, ही बाब लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी अशा बेशिस्त प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.

​महाराष्ट्र दिनी (१ मे) उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ साधारण ३० मिनिटांनी कमी झाला असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका झाली आहे. मात्र, हा मार्ग अतिवेगवान असून येथे वाहने १०० ते १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत केवळ फोटो काढण्यासाठी वाहन थांबवणे हे भीषण अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकते.

​महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे वाहन थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर प्रसंगी गुन्हेही दाखल केले जातील. प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर कोठेही थांबू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला असला तरी, प्रवाशांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Facebook Comments Box

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावर कडक वाहतूक नियम लागू

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) प्रकल्पावर वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांना दिली आहे.

१३.३ किलोमीटर लांबीच्या या आठ पदरी मार्गावर केवळ कार आणि बसेसनाच प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी वाहने तसेच ट्रेलर्स यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

१ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. खंडाळा घाटातील धोकादायक  वळणे टाळून हा मार्ग तयार करण्यात आला असून, त्यामुळे प्रवास वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होईल.

एमएसआरडीसीने सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे नियम लागू केले आहेत. सर्व वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे एमएसआरडीसीने आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत! गाड्या ३ ते ५ तास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे कोलमडले असून, अनेक महत्त्वाच्या गाड्या ३ ते ५ तास उशिराने धावत आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी असतानाच, या विलंबाचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे.

​विंलंबाचे मुख्य कारण: नांदगाव रोड-कणकवली दरम्यान ‘ब्लॉक’? 

​रेल्वे प्रशासन काही कारण पुढे करत नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ३० एप्रिल आणि १ मे २०२६ रोजी विशेष ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेतला होता. या तांत्रिक कामामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, ब्लॉक संपल्यानंतरही गाड्यांचे वेळापत्रक अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. परिणामी, कालपासून अनेक गाड्या एकामागोमाग एक रखडल्या आहेत. हा ब्लॉक घेण्यासाठी रेल्वेने ऐन हंगामाचा मुहूर्त का पकडला असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

​अनेक गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून रीशेड्यूल (वेळ बदलणे) करण्यात आले आहे. प्रमुख गाड्यांच्या विलंबाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​मांडवी एक्सप्रेस (१०१०३): ही गाडी आज, २ मे रोजी सीएसएमटीवरून सकाळी ७:१० ऐवजी १०:०० वाजता (२ तास ५० मिनिटे उशिराने) सुटली आहे. आता ती चार तास उशिराने धावत आहे. काल १ मे रोजी देखील ही गाडी मडगावला रात्री ११:३० च्या सुमारास पोहोचली होती.

​शेवटची लोकल चुकली 

जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२): मडगाववरून सुटलेली ही गाडी तब्बल ५ तास २४ मिनिटे उशिराने पहाटे ५:३४ वाजता मुंबईला पोहोचली. त्यामुळे दिवसा प्रवास करून रात्री किमान शेवटची लोकल पकडून घरी जाण्याचा प्रयत्नात असलेल्या चाकरमान्यांना दुसर्‍या दिवसाची पहिली लोकल पकडून घरी जावे लागले.

​कोकण कन्या एक्सप्रेस (२०११२): मडगाव येथून सुटलेली ही गाडी २ तास ४८ मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली.

​एलटीटी-मडगाव उन्हाळी विशेष (०११०३): ही गाडी १ मे रोजी २ तास ५ मिनिटे उशिराने सुटली आणि मडगावला तब्बल ५ तास १० मिनिटे उशिराने पोहोचली.

​तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस १ मे रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा १ तास ४८ मिनिटे उशिराने सावंतवाडीला पोहोचली.

आपल्या नेहमीच्या लेटमार्क साठी ‘कुप्रसिद्ध’ असलेल्या एलटीटी – मडगाव – एलटीटी ( ११०९९/११०००) दोन्ही दिशेने सुमारे ५  तासांचा लेटमार्क लावला.

​प्रवाशांचा खोळंबा:

​उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात गाड्यांना आधीच मोठी प्रतीक्षा यादी असताना, या ब्लॉकमुळे झालेल्या विलंबाने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली आहे. वाढत्या उकाड्यात प्रवास लांबल्याने जनरल आणि स्लीपर डब्यातून प्रवास करण्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, मात्र वेळापत्रक कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

 

Facebook Comments Box

मिसिंग लिंकवर मराठी ‘मिसिंग’? प्रशासनाने स्पष्टीकरण दिले

   Follow us on        

लोणावळा: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी करणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान टनेलच्या प्रवेशद्वारावर दिसलेल्या एका डिजिटल पाटीमुळे सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

​नेमका वाद काय?

​प्रकल्पाच्या उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे लक्ष टनेलच्या दर्शनी भागावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल पाटीकडे गेले. या पाटीवर “Missing Link Tunnel में आपका स्वागत है” असा हिंदी मजकूर झळकताना दिसला. महाराष्ट्र दिनीच राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर मराठीऐवजी हिंदी भाषेचा वापर केल्याचे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

​प्रशासनाचे स्पष्टीकरण

​सोशल मीडियावरील वाढती चर्चा आणि टीकेची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “ती एक आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल पाटी आहे. या पाटीवर माहिती केवळ एकाच भाषेत नसून ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये क्रमाने (Rotation) प्रदर्शित केली जाते. ज्यावेळी फोटो काढला गेला, त्यावेळी हिंदीतील संदेश स्क्रीनवर दिसत होता.”

​प्रवाशांच्या सोयीसाठी आणि माहितीसाठी या तिन्ही भाषांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

आशियातील सर्वात रुंद बोगदा

​वेळेची बचत: या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील २५ मिनिटे वाचणार असून ६ किमीचे अंतर कमी होणार आहे.

​प्रकल्प खर्च: सुमारे ₹६,६९५ कोटी खर्चून हा १३.३ किमीचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

​जागतिक विक्रम: प्रकल्पातील ८.९ किमी लांबीचा आणि २२.३ मीटर रुंदीचा बोगदा हा ‘आशियातील सर्वात रुंद बोगदा’ ठरण्याची शक्यता असून, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याचे संकेत आहेत.

​सुरक्षित प्रवास: खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि दरड प्रवण क्षेत्राला हा मार्ग सक्षम पर्याय ठरणार आहे.

​मिसिंग लिंक प्रकल्पामुळे आता पुण्याहून मुंबईला जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला असला, तरी उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या या भाषिक चर्चेने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Facebook Comments Box

दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याला ३ नवीन एक्सप्रेस गाड्या आणि १ नवीन पॅसेंजर गाडीची भेट

   Follow us on        

Railway Updates: ​मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. नांदेड मंडळांतर्गत तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस, एक नवीन डेमू (DEMO) सवारी गाडी आणि एका विद्यमान गाडीच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.

​या नवीन गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​१. नांदेड – तिरुचानूर – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस (१७६३३/३४)

​प्रारंभ: ९ मे पासून प्रत्येक शनिवारी (नांदेडून).

​वेळ: शनिवारी दुपारी १६:४५ वाजता सुटून रविवारी दुपारी १२:२० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १० मे पासून प्रत्येक रविवारी तिरुचानूरहून १९:४५ ला निघून सोमवारी १८:२० वाजता नांदेडला पोहोचेल.

​कोच: १६ कोच (१ AC फर्स्ट, १ AC टू-टियर, ४ AC थ्री-टियर, ६ स्लिपर, ४ जनरल).

​२. जालना – तिरुचानूर – जालना साप्ताहिक एक्सप्रेस (१७६२३/२४)

​प्रारंभ: ११ मे पासून प्रत्येक सोमवारी (जालन्याहून).

​वेळ: सोमवारी सकाळी ७:०० वाजता सुटून मंगळवारी दुपारी १२:०० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १२ मे पासून प्रत्येक मंगळवारी तिरुचानूरहून १५:१५ ला निघून बुधवारी रात्री २१:०० वाजता जालन्याला पोहोचेल.

​कोच: २२ कोच (३ AC टू-टियर, ५ AC थ्री-टियर, १० स्लिपर, ४ जनरल).

३. तिरुपती – पंढरपूर – तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस (१७४३७/३८)

​प्रारंभ: १६ मे पासून प्रत्येक शनिवारी (तिरुपतीहून).

​वेळ: शनिवारी १६:०० वाजता सुटून रविवारी सायंकाळी १९:०० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १७ मे पासून प्रत्येक रविवारी रात्री २०:०० वाजता पंढरपूरहून निघून सोमवारी रात्री २३:३० ला तिरुपतीला पोहोचेल.

​प्रमुख थांबे: लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, बीदर.

​४. नवीन डेमू (DEMU) सवारी गाडी (७७६२३/२४)

​मार्ग: पूर्णा – जालना – हुजूर साहिब नांदेड.

​दिनांक: ४ मे पासून पूर्णेहून आणि ५ मे पासून जालन्याहून दररोज धावणार.

​कोच: ८ डबे (द्वितीय श्रेणी).

​५. रायचूर – परभणी गाडीचा जालन्यापर्यंत विस्तार (१७६६३/६४)

​रायचूर – परभणी आणि परभणी – जालना या गाड्यांचे एकत्रीकरण करून आता ही गाडी थेट रायचूर ते जालना दरम्यान चालवली जाईल. ही सेवा ५/६ मे पासून सुरू होत आहे. रायचूर ते परभणी दरम्यानच्या जुन्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Facebook Comments Box

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला

   Follow us on        

लोणावळा:१ मे २०२६ रोजी सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. रणरणत्या उन्हामुळे एकापाठोपाठ १० ते १२ वाहने नादुरुस्त (ब्रेकडाउन) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. या भीषण कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजारो प्रवाशांना बसला असून, नागरिक तब्बल ३ ते ४ तास एकाच जागी अडकून पडले होते. विशेषतः लोणावळा आणि खोपोली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोंडीत अडकलेल्या सर्व वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Missing Link Project) तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

​वास्तविक हा प्रकल्प आज मध्यरात्रीनंतर लोकांसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, घाटातील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेता, उद्घाटन सोहळा संपताच हा मार्ग तात्काळ सुरू करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे घाटातील प्रवासाचा वेळ वाचणार असून, रखडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Facebook Comments Box

अखेरपर्यंत सुटली नाही मायेची मिठी; जबलपूर दुर्घटनेत आई-मुलाचा करुण अंत, हृदयद्रावक फोटोने देश हळहळला

   Follow us on        

जबलपूर:निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. ३० एप्रिल रोजी जबलपूरच्या बर्गी धरणात एमपी टुरिझमची क्रूझ बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत ९ निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. मात्र, या दुर्घटनेच्या १५ तासांनंतर समोर आलेल्या एका छायाचित्राने संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठीत घट्ट धरून ठेवल्याचे पाहायला मिळाले.

​नर्मदा नदीच्या संथ पात्रात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने पर्यटकांच्या आनंदाचे रूपांतर किंकाळ्यांमध्ये केले. सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट खमरिया बेटाजवळ वादळात सापडली आणि पाहता पाहता उलटली. बचाव पथकाने १५ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तर ९ जणांचे मृतदेह हाती लागले. अद्यापही काही जण बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.

​मरणानेही ज्यांना वेगळे केले नाही…

बचाव कार्यादरम्यान समोर आलेल्या एका दृश्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले. पाण्यात तरंगणाऱ्या एका माऊलीने आपल्या लहान मुलाला छातीशी इतके घट्ट धरून ठेवले होते की, मृत्यूनेही त्यांची ती मिठी सोडवली नव्हती. दोघांनीही लाईफ जॅकेट घातले होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. “आई” काय असते, हे त्या फोटोने पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला वाचवण्याचा त्या माऊलीचा प्रयत्न आणि ती मायेची ओढ पाहून संपूर्ण सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

​प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवले असले तरी, या घटनेने पर्यटनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे मानवी प्रयत्न तोकडे पडले, पण त्या आई-मुलाच्या अमर प्रेमाची कहाणी आता प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, बेपत्ता व्यक्ती सुखरूप मिळाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Facebook Comments Box

मुंबई: २.२४ लाख फुकट्या प्रवाशांना मध्यरेल्वेचा दणका; एका महिन्यात १६ कोटींचा दंड वसूल

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल २०२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या एका महिन्यात रेल्वेने तब्बल २.२४ लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून १६ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दंड वसुलीत १७० टक्क्यांची अवाढव्य वाढ झाली असून, रेल्वे प्रशासनासाठी हा एक मोठा टप्पा (माईलस्टोन) मानला जात आहे.

​मागील वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, एप्रिल २०२५ मध्ये १.४२ लाख प्रवाशांकडून ५.९२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. मात्र, यंदा मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि कठोर नियोजनामुळे ही वसुली १६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या रेल्वे जाळ्यामध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेली ही मोहीम यशस्वी ठरली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना या कारवाईमुळे मोठा दणका बसला आहे. रेल्वे प्रशासनाने या यशाचे श्रेय आपल्या तिकीट तपासणी पथकाच्या अथक परिश्रमाला दिले आहे.

Facebook Comments Box

Mumbai Pune Expressway: ‘मिसिंग लिंक’ वरील बोगद्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये स्थान

   Follow us on        

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या प्रकल्पातील २३.५ मीटर रुंदीच्या भव्य बोगद्याला ‘जगातील सर्वांत रुंद रस्ता बोगदा’ म्हणून प्रतिष्ठित ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प साकारला असून, यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश असून, त्यातील एक ८.९ किलोमीटर तर दुसरा १.७५ किलोमीटर लांबीचा आहे. हे बोगदे खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्राला पूर्णपणे वळसा (बायपास) घालणार आहेत. यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून, प्रवाशांचा सुमारे २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. ६,६९५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या मेगा प्रकल्पात केवळ बोगदेच नव्हे, तर विलोभनीय केबल-स्टेड ब्रिज आणि उंच व्हायाडक्ट्सचाही समावेश आहे.

​महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याच सोहळ्यात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. या ‘मिसिंग लिंक’मुळे घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, प्रवाशांना निसर्गरम्य आणि अत्याधुनिक प्रवासाचा अनुभव घेता येईल. सुरक्षितता आणि वेगाचा उत्तम मेळ घालणारा हा प्रकल्प राज्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Facebook Comments Box

महाराष्ट्र दिनानिमित्त युवासेनेतर्फे राज्यभरात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण! चित्रपटगृहांची यादी ईथे तपासा

   Follow us on        

मुंबई: आज १ मे, महाराष्ट्र दिनाचा उत्साह संपूर्ण राज्यात ओसंडून वाहणार आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून युवासेनेच्या (शिंदे गट) वतीने महाराष्ट्रातील जनतेसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींचा दैदीप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

​युवासेनेचे कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देत शिवप्रेमींना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

​प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे आणि वेळ

​या उपक्रमांतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रमुख चित्रपटगृहात शो आयोजित करण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:

१. मुंबई आणि परिसर (Mumbai & Region)

​मुंबई शहर:

​INOX मेट्रो, मरीन लाईन्स – ३.०५ PM

​PVR फिनिक्स, लोअर परेल – ३.०५ PM

​प्लाझा, दादर – २.१५ PM

​जयहिंद मुक्ता A2, लालबाग – ३.४५ PM

​मुंबई उपनगर:

​PVR ओबेरॉय, गोरेगाव – २.०५ PM

​PVR स्काय मॉल, बोरिवली – २.०५ PM

​ठाणे:

​सिनेपोलिस लेक सिटी मॉल – १२.४५ PM

​मुव्हीमॅक्स इटर्निटी मॉल – ३.३० PM

​आनंद, ठाणे – ११.०० AM

​मिरा-भाईंदर:

​मुव्हीमॅक्स, मिरा रोड – ३.३० PM

​मॅक्सस, भाईंदर – १२.३० PM

​२. कोकण विभाग (Konkan Division)

​रायगड: पीजी सिटी, महाड – १२.०० PM

​रत्नागिरी: सिटी प्राईड – ३.१५ PM

​सिंधुदुर्ग: लक्ष्मी, कणकवली – २.३० PM

​३. पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra)

​पुणे: PVR आयकॉन पॅव्हेलियन – ३.०५ PM

​पिंपरी-चिंचवड: आयनॉक्स जय गणेश – २.३५ PM

​सातारा: सेव्हन स्टार – २.०० PM

​सांगली: मुक्ता A2 – २.३० PM

​कोल्हापूर: PVR DYP सिटी – २.३५ PM

​सोलापूर: ई-स्क्वेअर ओएसिस – ११.३० AM

​४. उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra)

​अहिल्यानगर (अहमदनगर): कॉनप्लेक्स – २.०० PM

​धुळे: ज्योती – १२.०० PM

​नंदुरबार: मिराज सिनेमा – ११.०० AM

​जळगाव: PVR मल्टिप्लेक्स – ३.४० PM

​५. विदर्भ (Vidarbha)

​नागपूर: सिनेपोलिस ट्रिनिटी मॉल – १२.४५ PM

​अमरावती: मिराज सिनेमा – ११.०० AM

​अकोला: मिराज सिनेमा – ३.०० PM

​बुलढाणा: एआरडी मल्टिप्लेक्स – ११.३० AM

​वाशिम: H2M मल्टिप्लेक्स – २.५५ PM

​यवतमाळ: एलिमेंट ई स्क्वेअर – १२.०० PM

​वर्धा: युरीच मॉल – १२.३० PM

​भंडारा: एआर सिनेमा – २.४० PM

​गडचिरोली: पिक्चर टाइम – १२.०० PM

​चंद्रपूर: मिराज सिनेमा – ११.०० AM

​गोंदिया: ईओएस मल्टिप्लेक्स – १२.०० PM

​६. मराठवाडा (Marathwada)

​छत्रपती संभाजीनगर: अंजली रत्नदीप थिएटर – १.४५ PM

​धाराशिव: सितारा सिनेप्लेक्स – ३.१५ PM

​लातूर: PVR सिनेमा – २.१० PM

​नांदेड: भारत स्क्वेअर – १२.३० PM

​बीड: तनिष्का थिएटर – २.०० PM

​परभणी: अनुसया स्क्वेअर – ११.३० AM

​हिंगोली: संस्कार थिएटर – ११.०० AM

​जालना: कृष्णा मल्टिप्लेक्स – २.३० PM

​’राजा शिवाजी’ चित्रपट आणि युवासेनेचा पुढाकार

​छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष आणि स्वराज्याची गाथा मांडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त मराठी माणसाने, विशेषतः तरुणांनी हा ऐतिहासिक वारसा जवळून पाहावा, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले आहे.

​”जय महाराष्ट्र! जय शिवराय!” अशा घोषणा देत युवासेनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर केली असून, नागरिकांनी आपापल्या जवळील चित्रपटगृहात जाऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search