Category Archives: देश

मुंबईसह देशातील ६ विमानतळांवर उभारली जाणार भव्य ‘एअरपोर्ट सिटी’

   Follow us on        

मुंबई:

देशातील विमानतळ पायाभूत सुविधांना जागतिक दर्जा देण्यासाठी ‘अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड’ने (अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडची उपकंपनी) एका भव्य प्रकल्पाची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील ६ प्रमुख विमानतळांवर तब्बल ६५५ एकर जागेत एकात्मिक ‘एअरपोर्ट सिटी’ (विमानतळ शहरे) विकसित केली जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. हे प्रकल्प केवळ विमानतळापुरते मर्यादित नसून, ते शहरे, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी थेट जोडले जातील. या परिसराची रचना अशा पद्धतीने केली जात आहे, जिथे पर्यटक, व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांना एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधा मिळतील.

​या प्रकल्पाची व्याप्ती महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आसाम अशा ५ राज्यांत असणार असून, यात मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर आणि गुवाहाटी या ६ विमानतळांचा समावेश आहे. एकूण २२ दशलक्ष चौरस फूट जागेत हा विकास केला जाईल. विशेष म्हणजे, या नियोजित गुंतवणुकीतील सुमारे ७० टक्के रक्कम (४४० एकर जागा) केवळ मुंबई आणि नवी मुंबईतील प्रकल्पांसाठी खर्च केली जाणार आहे. या एअरपोर्ट सिटीज सिंगापूरचे चांगी, दुबई, ॲमस्टरडॅम आणि सोल यांसारख्या जागतिक दर्जाच्या विमानतळ शहरांच्या धर्तीवर विकसित केल्या जाणार आहेत.

​आलिशान हॉटेल्स आणि जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा

​या ‘एअरपोर्ट सिटी’मध्ये अत्याधुनिक कार्यालये, रिटेल मॉल्स, खाण्यापिण्याची ठिकाणे, मनोरंजन केंद्रे आणि कन्व्हेन्शन सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून, अदानी समूहाने ‘आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’सोबत पाच लक्झरी हॉटेल्ससाठी करार केला आहे. या करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला ‘किम्पटन’ हा हॉस्पिटॅलिटी ब्रँड भारतात पहिल्यांदाच पदार्पण करत आहे. पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत, या सर्व प्रकल्पांना अमेरिकेच्या ‘यू.एस. ग्रीन बिल्डिंग काउन्सिल’ कडून ‘लीड’ (LEED) गोल्ड प्री-सर्टिफिकेशन मिळाले आहे. यावर बोलताना अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले की, भारताची विमान वाहतूक बाजारपेठ विस्तारत असताना, विमानतळांना केवळ वाहतुकीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना गुंतवणूक आणि रोजगाराचे मोठे केंद्र बनवण्याचा कंपनीचा मानस आहे.

 

Photo Credit – Google

Railway Updates: ‘किसान रेल’ सेवेला अखेर हिरवा कंदील!

 

   Follow us on        

​सांगली:

दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बातमी समोर आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील फळे, भाजीपाला, फुले व इतर नाशवंत कृषी उत्पादनांना देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद व सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिरज-दिल्ली किसान रेल सेवा’ सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने अखेर अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या थेट समन्वयातून या किसान रेल्वेचे पुढील नियोजन केले जाणार असून, बाजारपेठ ते शेतकरी असा थेट व्यवहार शक्य होणार आहे.

​अशोक काकडे हे सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने किसान रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रक्रियेत कृषी विभाग, रेल्वे प्रशासन, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), व्यापारी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी अनेक बैठका घेऊन योग्य समन्वय साधण्यात आला होता.

​ही सेवा मिरज येथूनच सुरू व्हावी, अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती. यामागील मुख्य उद्देश केवळ रेल्वे सेवा सुरू करणे एवढाच नसून, मिरज-सांगली परिसरात नवीन ‘कृषी-लॉजिस्टिक आणि आर्थिक विकास केंद्र’ निर्माण करणे हा आहे. यामुळे भविष्यात वित्तीय संस्थांच्या सहकार्याने शीतगृहे (Cold Storage), पॅक हाउसेस, वेअरहाउसिंग, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व रोजगाराच्या नव्या संधी या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहेत. या किसान रेलमुळे द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ व इतर कृषी उत्पादने दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होईल. परिणामी, मालाची वाहतुकीतील नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.

पासपोर्ट नियमांत बदल: प्रलंबित अर्जदारांना आता अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही

   Follow us on        

मुंबई:

मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (RPO) पासपोर्ट आणि पीसीसी (पॉलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट) अर्जदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पासपोर्ट कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ज्या नागरिकांचे पासपोर्ट किंवा पीसीसी अर्ज जमा केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित आहेत, त्यांना आता कार्यालयात थेट प्रवेश दिला जाणार आहे. या विशेष सुविधेमुळे अर्जदारांना कार्यालयात जाण्यासाठी आधी कोणतीही ऑनलाईन अपॉइंटमेंट (वेळ) घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

​ही नवीन नियमावली आगामी २ जुलै २०२६ पासून लागू करण्यात येत आहे. या अंतर्गत पात्र अर्जदार वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), वांद्रे (पूर्व) येथील ‘विदेश भवन’ स्थित प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात थेट भेट देऊ शकतात. ही सुविधा बुधवार वगळता आठवड्यातील सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९:०० ते ११:०० या मर्यादित वेळेत उपलब्ध असेल. महत्त्वाचे म्हणजे, ज्या अर्जदारांनी आधीच नंतरच्या तारखेची ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केली आहे, परंतु त्यांचे अर्ज ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ रखडले आहेत, ते देखील या वॉक-इन सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

​४५ दिवसांच्या अटीव्यतिरिक्त, विशिष्ट श्रेणीतील इतर काही अर्जदारांनाही अर्जाच्या तारखेचा विचार न करता थेट वॉक-इन प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट (Diplomatic & Official passport) अर्जदार, तसेच पत्ता न सापडल्याने किंवा इतर कारणांमुळे परत आलेल्या (Undelivered) पासपोर्ट किंवा पीसीसीच्या पुनर्रचना (Redispatch) प्रक्रियेसाठीचे अर्जदार थेट कार्यालयात येऊ शकतात.

​यासोबतच, परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर आपला भारतीय पासपोर्ट जमा (Surrender) करू इच्छिणारे नागरिक आणि आपला प्रलंबित पासपोर्ट अर्ज कायमचा बंद (Closure) करण्याची विनंती करणारे अर्जदार यांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. मुंबई पासपोर्ट कार्यालयाच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे विविध कारणांमुळे रखडलेल्या अर्जांचा निपटारा वेगाने होईल आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रासापासून मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Railway Updates: रेल्वेच्या नियमांत बदल; विनातिकीट प्रवास करणे पडेल महागात! नवीन नियम ईथे वाचा

   Follow us on        

Railway Updates:रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या आणि रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना आता चांगलाच दणका दिला आहे. ‘जनविश्वास (दुरुस्ती) कायदा-२०२६’ अंतर्गत रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांनुसार तब्बल २२ वर्षांनंतर रेल्वेने आपल्या विविध दंडांच्या रक्कमेत दुप्पट वाढ केली आहे. या नव्या नियमांनुसार, आता विना तिकीट प्रवासासाठी किमान २५० रुपयांऐवजी थेट ५०० रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी यासंबंधीची अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर रेल्वे मंडळाने सर्व विभागीय रेल्वेला आगाऊ सूचना जारी करत या सुधारित तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या नव्या नियमावलीनुसार केवळ विना तिकीट प्रवासच नव्हे, तर इतर अनेक प्रकारच्या नियमभंगासाठीही दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. जर कोणी महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात अनधिकृत प्रवेश केला, तर त्याला तब्बल २५०० रुपयांचा फटका बसेल. याशिवाय, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास किमान ५०० रुपये अतिरिक्त शुल्क, रेल्वे स्थानक किंवा परिसरात विनापरवाना फेरी मारणे अथवा भीक मागण्यासाठी २,००० रुपये दंड आणि अनधिकृत प्रवेशासाठी ५०० रुपये दंड आकारला जाईल. तसेच, सर्वाधिक दंड हा धोकादायक वस्तूंसह प्रवास करणाऱ्यांवर लावण्यात आला असून, त्यासाठी किमान १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

वाढती महागाई, बदललेली आर्थिक परिस्थिती आणि वंदे भारत, नमो भारत (वंदे मेट्रो), तेजस एक्सप्रेस यांसारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा वाढता खर्च लक्षात घेता जुना २५० रुपयांचा दंड अपुरा ठरत होता, म्हणूनच रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे की, दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित प्रवाशाविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येईल आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये थेट कारावासाची (जेलची) तरतूदही करण्यात आली आहे. अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांना जागेवरच दंड वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले असून, प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पाऊल ठेवण्यापूर्वी हे नियम नीट जाणून घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

रेल्वेच्या सुधारित नियमांनुसार नवीन दंडाची (दंड सूची) यादी खालीलप्रमाणे आहे.

  • ​१) विना तिकीट प्रवास करणे: ₹ ५००/-

  • ​२) दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे: ₹ ५००/-

  • ​३) बेकायदेशीर फेरीवाला (विनापरवाना विक्री करणे): ₹ २०००/-

  • ​४) दारू पिऊन गोंधळ किंवा उपद्रव निर्माण करणे: ₹ १०००/-

  • ​५) शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणे: ₹ १०००/-

  • ​६) रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे: ₹ २५००/-

  • ​७) अनधिकृत प्रवेश (अतिक्रमण करणे): ₹ ५००/-

  • ​८) वैध तिकिटाशिवाय आरक्षित डब्यातून उतरण्यास नकार देणे: ₹ २०००/-

  • ​९) चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) यांच्या आदेशांचे पालन न करणे: ₹ ५००/-

  • ​१०) पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यातून प्रवास करणे: ₹ २५००/-

  • ​११) मालाची खोटी माहिती देणे (घोषणा करणे): ₹ ५००/- प्रति क्विंटल

  • ​१२) आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू सोबत बाळगणे: ₹ १०,०००/-

  • ​१३) सार्वजनिक सूचनांचे विद्रुपीकरण करणे (फाडणे किंवा खराब करणे): ₹ २०००/-

  • ​१४) धूम्रपान करणे: ₹ २०००/-

नाहीतर हप्ते बंद होणार! ‘पीएम किसान’ साठी ई-केवायसीची अंतिम तारीख जाहीर

   Follow us on        

सिंधुदूर्गनगरी:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढील हप्ता सुरक्षित ठेवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे अंतिम आवाहन कृषी विभागाने केले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पीएम किसान’ योजनेचे एकूण १ लाख ९१ हजार लाभार्थी असून, त्यापैकी १ हजार ८४३ शेतकरी अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत. योजनेतील पारदर्शकता वाढवणे आणि केवळ पात्र व जिवंत शेतकऱ्यांपर्यंतच शासकीय मदत पोहोचवणे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने ई-केवायसी सक्तीची केली असून यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

​बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनचे पर्याय

​शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बायोमेट्रिक पडताळणीसाठी लाभार्थी आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रात (CSC) जाऊ शकतात. तसेच, ज्यांना घरबसल्या प्रक्रिया करायची आहे, ते ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या मोबाईलद्वारे ‘चेहऱ्याच्या पडताळणी’ (फेस ऑथेंटिकेशन) माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करू शकतात, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

​वृद्ध व दिव्यांगांसाठी घरपोच सुविधा

​वृद्ध, आजारी अथवा दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्यास प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गावपातळीवरील नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी संबंधित शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी काळजी न करता या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​’ॲग्रीस्टॅक’ नोंदणीही ठरणार महत्त्वाची

​पीएम किसानसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) नोंदणी करून ‘युनिक फार्मर आयडी’ प्राप्त करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून, भविष्यात पीक विमा, अनुदान, कर्जमाफी तसेच थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या विविध लाभांसाठी ती अनिवार्य असेल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसीसोबतच ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीही तातडीने पूर्ण करावी आणि शासकीय योजनांचा लाभ अखंडित ठेवावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

१० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटांचे सत्य काय? माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा मोठा खुलासा

   Follow us on        

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ₹१० आणि ₹२० च्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटा चलनात आल्याच्या आणि त्यावरून महात्मा गांधींचा फोटो हटवल्याच्या पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आणि आधारहीन असल्याचा खुलासा महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने तयार केलेले बनावट फोटो असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​सध्या भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कागदी नोटांच्या वाढत्या छपाई खर्च, त्यांचे कमी आयुष्य आणि त्या लवकर खराब होणे या समस्यांवर दीर्घकालीन उपाय शोधत आहे. यासाठी ₹१० आणि ₹२० च्या कमी मूल्याच्या नोटांसाठी केवळ एका प्रायोगिक (पायलट) प्रकल्पाबाबत प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. आरबीआयच्या पाटणा आणि मुंबई येथील बोर्ड बैठकीत या विषयावर केवळ चर्चा झाली असली, तरी अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. प्लास्टिक नोटा या कागदी नोटांपेक्षा सुमारे २.५ ते ४ पट अधिक टिकाऊ असतात, ज्यामुळे भविष्यात छपाई खर्चात मोठी बचत होऊ शकते, म्हणूनच या पर्यायाचा विचार केला जात आहे.

​या पार्श्वभूमीवर, डीजीआयपीआरने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा खोट्या बातम्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या आणि अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी केवळ आरबीआयची अधिकृत वेबसाइट, अधिकृत निवेदने किंवा शासकीय माध्यमांचाच आधार घ्यावा. सध्या देशात सर्व जुन्या कागदी नोटाच पूर्णपणे वैध आणि चलनात आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पश्चिम घाटात वनस्पतींच्या नव्या प्रजातीचा शोध

   Follow us on        

पालक्कड: दक्षिण पश्चिम घाटात वनस्पती शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वनस्पतींच्या एका अत्यंत दुर्मिळ आणि नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. सूर्यफूल कुटुंबातील (Sunflower Family) असलेल्या या नव्या प्रजातीचे ‘अॅनाफॅलिस सह्याद्रिका’ (Anaphalis sahyadrica) असे नामकरण करण्यात आले आहे. पश्चिम घाटातील अनामुडी आणि मीसापुलीमाला यांसारख्या अति-उंचावरील डोंगराळ गवताळ प्रदेश (Montane Grasslands) आणि ‘शोला’ जंगलांच्या कडेला ही वनस्पती आढळून आली आहे. पालक्कड येथील गव्हर्नमेंट व्हिक्टोरिया कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधक ‘एस. रेम्या’ यांच्या पीचएडी (Doctoral Research) संशोधनाचा हा एक भाग आहे.

​या महत्त्वपूर्ण संशोधनाचे मार्गदर्शन थोलाणूर येथील गव्हर्नमेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेजच्या प्राचार्या डॉ. माया सी. नायर आणि लखनऊ येथील नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (NBRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एम. प्रभूकुमार यांनी केले असून, वनस्पतिशास्त्र संशोधक जी. कनाकांबिका यांनीही या शोधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वनस्पतींच्या वर्गीकरणाशी संबंधित ‘नोव्हॉन’ (Novon) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकाच्या ३४ व्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

​डॉ. नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वनस्पती प्रामुख्याने समुद्रसपाटीपासून २,२०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आढळणारे एक लहान झुडूप (Subshrub) आहे. या वनस्पतीची पाने अतिशय गुळगुळीत आणि केसविरहित असून, पानांवर तीन ठळक शिरा असणे हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे झुडूप साधारणपणे एक मीटर उंचीपर्यंत वाढते आणि याला सुमारे ९० ते १२० पांढऱ्या रंगाची, अर्धगोलाकार फुलांची डोकी (Flower Heads / Capitula) येतात. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

अपुर्ण महामार्गावर आकारण्यात येणाऱ्या टोल दरात १५ जूनपासून कपात

   Follow us on        

​नवी दिल्ली: केंद्र सरकारने महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि संकलन) नियम, २००८ मध्ये सुधारणा करणारी एक महत्त्वाची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. हा नवीन नियम चालू महिन्याच्या १५ तारखेपासून देशभरात लागू होणार असून, यामुळे अंशतः सुरू असलेल्या राष्ट्रीय एक्सप्रेसवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.

​रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा नॅशनल एक्सप्रेसवे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत (End-to-End) पूर्णपणे सुरू झालेला नसेल, तर प्रवाशांकडून संपूर्ण एक्सप्रेसवेचा टोल आकारला जाणार नाही. अशा स्थितीत, एक्सप्रेसवेच्या जितक्या भागाचे काम पूर्ण झाले आहे आणि जो टप्पा वाहतुकीसाठी खुला आहे, तेवढ्याच अंतराचा टोल घेतला जाईल. विशेष म्हणजे, हा टोल एक्सप्रेसवेच्या महागड्या दरांऐवजी सामान्य राष्ट्रीय महामार्गांना (National Highways) लागू असलेल्या कमी दराने आकारला जाणार आहे.

​या महत्त्वपूर्ण सुधारणेचा मुख्य उद्देश अंशतः सुरू झालेल्या एक्सप्रेसवेच्या टप्प्यांचा वापर वाढवणे हा आहे. अनेकदा महामार्गाचे काम अर्धवट असल्याने वाहनचालक एक्सप्रेसवेवर जाणे टाळतात. मात्र आता टोलचे दर कमी केल्यामुळे चालक या नव्या मार्गांचा वापर करण्यास प्राधान्य देतील, असा सरकारला विश्वास आहे.

​या निर्णयामुळे जुन्या आणि समांतर राष्ट्रीय महामार्गांवर होणारी वाहनांची प्रचंड कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. वाहतूक कोंडी सुटल्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक अधिक गतीने व वेळेत पूर्ण होईल. तसेच, गाड्यांचा खोळंबा कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून होणाऱ्या वायू प्रदूषणालाही प्रभावीपणे आळा बसेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Vande Bharat Express: भारताची ‘वंदे भारत’ परदेशातही धावणार

   Follow us on        

​नवी दिल्ली: कधीकाळी रेल्वे तंत्रज्ञानासाठी जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडसारख्या परदेशांवर अवलंबून असलेला भारत आता जागतिक रेल्वे बाजारपेठेत एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. भारताची स्वदेशी बनावटीची आणि सेमी-हाय-स्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ आता लवकरच परदेशी रेल्वे मार्गांवर धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी अभियांत्रिकी सल्लागार कंपनी ‘राईट्स लिमिटेड’ (RITES) केंद्र सरकारसोबत मिळून वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीसाठी एक विशेष रोडमॅप तयार करत आहे. या माध्यमातून भारत रेल्वे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन आणि जपानसारख्या बलाढ्य देशांना थेट टक्कर देणार आहे.

​सध्या भारतात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स या प्रामुख्याने ‘ब्रॉड-गेज’ (Broad-Gauge) ट्रॅकवर चालतात. परंतु, परदेशांमधील रेल्वे नेटवर्क हे बहुतांश करून ‘स्टँडर्ड-गेज’ (Standard-Gauge) ट्रॅकवर आधारित असते. म्हणूनच जागतिक बाजारपेठेची ही गरज ओळखून, राईट्स लिमिटेड आणि भारतीय रेल्वे सध्या स्टँडर्ड-गेजवर चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे डिझाइन विकसित करण्याचे काम वेगाने करत आहेत. या नव्या डिझाइनमुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी खर्चात आधुनिक आणि जागतिक दर्जाची रेल्वे उत्पादने पुरवणारा देश म्हणून आपली ओळख निर्माण करता येणार आहे.

​या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरुवातीला भारताचे शेजारील देश जसे की बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांनी वंदे भारत ट्रेन खरेदी करण्यात मोठी उत्सुकता दर्शवली आहे. याव्यतिरिक्त, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील काही देशांनीही या ट्रेनच्या खरेदीसाठी रस दाखवला आहे, जिथे राईट्स कंपनीचे आधीपासूनच रेल्वे ऑपरेशन्स सुरू आहेत. मेक इन इंडिया मोहिमेचा हा एक मोठा टप्पा मानला जात असून, ही योजना यशस्वी झाल्यास आगामी काळात परदेशी रेल्वे मार्गांवर ‘मेड इन इंडिया’ वंदे भारत ट्रेन दिमाखात धावताना पाहायला मिळेल.

Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत!

   Follow us on        

नवी दिल्ली: पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारतीय रेल्वेने उत्तर भारतातील ‘जिंद-सोनीपत’ या ८९ किलोमीटरच्या मार्गावर या हायड्रोजन ट्रेनला धावण्यासाठी मंजुरी दिली आहे. रेल्वेच्या इतिहासात हा एक नवा ‘हायड्रोजन’ अध्याय मानला जात असून, ही संपूर्ण स्वदेशी रेल्वे रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. हरित क्रांतीचा हा निळा हुंकार भारताला जागतिक महासत्तांच्या पंक्तीत नेऊन ठेवणारा ठरेल.

​प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये:

या हायड्रोजन ट्रेनमध्ये १४०० किलोवॅट क्षमतेची अत्याधुनिक ‘हायड्रोजन फ्युएल सेल प्रॉपल्शन प्रणाली’ वापरण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन ताशी १४० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामध्ये हायड्रोजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते आणि उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याचे थेंब उत्सर्जित होतात. त्यामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक वाहतुकीचे एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.

​जागतिक पातळीवर भारताचे स्थान:

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारताने जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. हायड्रोजन आधारित रेल्वे प्रणाली अजूनही जागतिक स्तरावर प्रारंभिक टप्प्यात असून, अत्यंत कमी देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेचा हा प्रयोग देशाच्या तांत्रिक प्रगतीसाठी मैलाचा दगड मानला जात आहे.

​सुरक्षा आणि मंजुरी:

जिंद येथे स्वदेशी हायड्रोजन साठवण आणि इंधन पुरवठा सुविधा उभारण्यात आली असून; पेट्रोलियम आणि स्फोटक पदार्थ सुरक्षा संघटनेने (PESO) यासाठी आवश्यक परवानग्या दिल्या आहेत. तसेच, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) आणि मानक मंडळाने (RDSO) या हायड्रोजन रेल्वे आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या चाचणीला मान्यता दिली आहे. या प्रणालीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना, नियमित तपासणी आणि प्रमाणित कार्यपद्धतीची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search