Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेचा ६ दिवसांचा ब्लॉक; कोकण रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        
Konkan Railway:मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मशीद स्थानकांदरम्यान कार्नाक रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) पुनर्बांधणीसाठी सहा दिवसीय विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ओपन वेब गर्डर्स सुरू करण्यासाठी ब्लॉकची योजना आखण्यात आली आहे. या कामासाठी सलग सहा रात्रींसाठी दीर्घकालीन पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबई  लोकल सेवेबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकचा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार परिणाम खालीलप्रमाणे
गाडी क्र. १२०५२  मडगाव जं. – मुंबई CSMT जनशताब्दी एक्स्प्रेसचा २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास  दादर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२०  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा  दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर समाप्त होईल.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी चा दिनांक २५/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.  जनशताब्दी एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २२२२९  मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.  वंदे भारत एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २६/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २२११९  मुंबई सीएसएमटी – मडगाव तेजस एक्सप्रेस आरंभ स्थानकावरून २० – ३० मिनिटांनी उशिराने निघेल
दिनांक २५/०१/२०२५ रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. २०११२ कोकणकन्या एक्सप्रेस अर्धा तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२  मडगाव  – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.
गाडी क्र. २२१२० मडगाव  – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस चा दिनांक २६/०१/२०२५ रोजी सुरू होणारा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होईल.

२४ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 19:27:59 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 31:08:29 पर्यंत
  • करण-विष्टि – 19:27:59 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योगवृद्वि – 29:07:37 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय-07:16
  • सूर्यास्त-18:25
  • चन्द्र राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय-27:25:00
  • चंद्रास्त-13:39:00
  • ऋतु-शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय बालिका दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.
  • १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
  • १८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.
  • १९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
  • १९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
  • १९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार
  • १९६६: एअर इंडियाचे ‘कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.
  • १९५०: भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
  • १९५१: प्रेम माथुर ह्या देशाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या.
  • १९५२: मुंबई येथे पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव साजरा करण्यात आला.
  • १९६६: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.
  • १९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
  • १९७६: ’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.
  • १९८४: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
  • १९९०: जपान ने पहिला हितेन नावाचा लूनर प्रोब प्रक्षेपित केल्या गेला.
  • १९९६: अमेरिकेच्या पहिल्या महिल्या हिलेरी क्लिंटन यांना न्यायालयात हाजीर राहण्यास सांगितले.
  • २००२: भारतीय उपग्रह इनसेट-३ आपल्या कक्षेत स्थापित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२६: पहिले भारतीय बॅरिस्टर ज्ञानेंद्र मोहन टागोर यांचा जन्म.
  • १८७७: भारतीय स्वातंत्र्य सैनिक पुलिन बिहारी दास यांचा जन्म.
  • १९२४: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई)
  • १९२४: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)
  • १९४३: सुभाष घई – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
  • १९४५: भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म.
  • १९४५: भारतीय राजनीती तज्ञ प्रदीप भट्टाचार्य यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६५: विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)
  • १९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० आक्टोबर १९०९)
  • २००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्‍याव सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
  • २०११: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्ग विरोधात 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबद्दल 15 ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने येथील सहा तालुक्यातील महामार्गाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संघर्ष समितीने कोल्हापुरामध्ये थांबा व पहा ही भूमिका घेतली.पण आमच्या शांत बसण्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूने कंत्राटदारांच्याकडून सुपार्‍या फोडत व अफवा पसरवली जात आहे. महायुतीला मिळालेल्या पाचवी बहुमतानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले शब्द फिरवत आता महामार्ग भेटण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी पोलिसांचेही सहकार्य घेत दंडुकशाही वापरण्याचा जणू फतवाच काढला आहे. पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव दिला असला तरी पर्यावरण विभाग कोणताही ग्राम सर्वे न करता महामार्गास मंजुरी देत आहे. मागील आठवड्यात दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर सहित इतर महामार्ग बाधित जिल्ह्यांमध्ये 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरात देखील इतर जिल्ह्यांच्या आंदोलनाला समर्थन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते २ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील महामार्ग रद्द अधिसूचनेमध्ये काही पळवाटा आहेत यावर जिल्हा प्रशासन व मंत्र्यांना जाब विचारला जाईल.

कोल्हापूर मधून जरी महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा आदेश काढला असला तरी नेमका महामार्ग कोठून व कसा नेणार याचे लेखी काही पुरावे मंत्रांच्याकडे नाहीत. त्यामुळे यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न कोल्हापुरातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे या आंदोलनातून अधिसूचना कोल्हापुरातील रद्द झाली आहे तर महामार्ग कसा जाणार आहे हे लेखी दाखवा याचा जाब विचारणार आहोत.

Mumbai Local: मुंबई लोकल लाईनवर ३ दिवसाचा मेगाब्लॉक; लोकलच्या तब्बल २७७ फेऱ्या रद्द

मुंबई: मुंबईच्या लाईफ लाईनला 3 दिवस ब्रेक असणार आहे. येत्या 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 277 लोकल रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाच्या पुर्नबांधणीसाठी शुक्रवार ते रविवार हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मेगाहाल होण्याची शक्यता असून प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे लागणार आहे.
मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत घेण्यात येणाऱ्या या विशेष ब्लॉकच्या दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी 127 लोकल पूर्णपणे रद्द, तर 60 लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. तर शनिवारी 150 लोकल पूर्णपणे रद्द करण्यात येणार असून 90 लोकल अंशत: रद्द करण्यात येतील. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. लोकल रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
असा असणार विशेष ब्लॉक
भारतीय रेल्वेवरील ‘स्क्रू पायलिंग’वर उभारलेला शवेटचा पूल वांद्रे ते माहीम दरम्यान मिठी नदीवर आहे. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे. याच कामांसाठी 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. तर रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखील ब्लॉक राहील. तसेच 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
पहिला ब्लॉक (शुक्रवार-शनिवार) वेळापत्रक
मुंबईत शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाही. ब्लॉकनंतर शनिवारी सकाळी विरार स्थानकातून पहाटे 5.47 वाजता पहिली चर्चगेट लोकल धावणार आहे. तर ब्लॉकनंतर शनिवारी चर्चगेट स्थानकातून पहिली डाऊन जलद लोकल 6.14 वाटता सुटेल. तसेच शनिवारी सकाळी चर्चकेट स्थानकातून पहिली डाउन धिमी लोकल सकाळी 8.03 वाजता सुटणार आहे.
दुसरा ब्लॉक (शनिवार-रविवार) वेळापत्रक
मुंबईत शनिवारी रात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉक काळात चर्चगेट ते दादर दरम्यान जलद लोकल धावणार आहेत. शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवली धिम्या आणि जलद लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत. अप जलद मार्गावर शेवटची लोकल विरार ते चर्चगेट रात्री 10.08 मिनिटांनी धावेल. तर डाऊन जलद मार्गावर शेवटची लोकल चर्चगेट ते बोरीवली रात्री 10.33 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर रविवारी सकाळी डाऊन जलद मार्गावर पहिली चर्चगेट-विरार लोकल सकाळी 8.35 वाजता सुटणार आहे. तर जलद मार्गावर पहिली विरार-चर्चगेट लोकल 7.38 वाजता धावणार आहे.

चिपळूण: तिसर्‍या लुप लाइनच्या कामासाठी कोकण रेल्वेचा उद्या ब्लॉक; दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

   Follow us on        

Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्‍या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.

दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.

मुंबई: राणीच्या बागेत लवकरच पाहता येणार विविध प्रजातींचे साप

   Follow us on        

मुंबई : भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) लवकरच सापांच्या विविध प्रजाती पाहता येणार आहेत. येथे सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. दरम्यान, येत्या काही महिन्यांत सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.

प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सर्पालयाबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्या प्रस्तावास मागील महिन्यांत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. यानुसार काही दिवसांत सर्पालयासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. आलेल्या निविदांची छाननी करून सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, जुने सर्पालय तोडून १६८०० चौरस फूट जागेत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे विविध प्रजातींचे साप पहायला मिळतील. सध्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, देशी अस्वल आदी प्राणी उपलब्ध आहेत.

२३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 17:40:34 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 29:09:03 पर्यंत
  • करण-गर – 17:40:34 पर्यंत, वणिज – 30:38:56 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 29:05:47 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:25
  • चन्द्र-राशि-तुळ – 22:33:26 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:30:00
  • चंद्रास्त- 12:58:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर
  • १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
  • १७९३: आजच्या दिवशी ह्यूमन सोसाइटी ऑफ़ फिलाडेल्फिया ला संघटीत केल्या गेले.
  • १८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
  • १९२७: मॅडलिन ऑलब्राई ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.
  • १९३२: ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.
  • १९६६: आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • १९६८: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
  • १९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
  • १९७७: जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.
  • १९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
  • २००२: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण
  • २००२: ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.
  • २००९: ला टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये धुम्रपानाच्या दृश्यांवरून बंदी हटवल्या गेली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)
  • १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
  • १८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)
  • १९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२)
  • १९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक (मृत्यू: ? ? २००२)
  • १९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)
  • १९३०: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.
  • १९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)
  • १९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
  • १९८७: भारतीय चित्रपट कलाकार दुष्यंत वाघ चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन (जन्म: १८ मार्च १५९४)
  • १९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (जन्म: २६ मे १८८५)
  • १९३१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)
  • १९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित (जन्म: ? ? ????)
  • १९६३: ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक नरेंद्र मोहन सेन यांचे निधन.
  • १९६४: छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराजांचे निधन.
  • १९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. (जन्म: ११ मे १९०४)
  • १९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • २०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ आक्टोबर १९२७)
  • २०१५: ला सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Jalgaon Railway Accident: आगीच्या अफवेने घेतला सात ते आठ जणांचा बळी

   Follow us on        

Jalgaon Railway Accident : नुसत्या एका आगीच्या अफवेने सात ते आठ प्रवाशांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज जळगावला घडला. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगावातील परांडा स्टेशनजवळ हा अपघात झाला.

मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे तिथे आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. आग लागल्याच्या भीतीनं प्रवासी घाबरले. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. उड्या मारणारे प्रवासी बंगळरु एक्स्प्रेसच्या खाली चिरडले गेले. अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार नवीन अमरावती – वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वे मार्गावर नवीन अमरावती ते कोकण रेल्वेच्या वीर स्थानका दरम्यान एक विशेष अनारक्षित गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.

०११०१ नवीन अमरावती – वीर अनारक्षित विशेष गाडी गुरुवार दि. ६ फेब्रुवारी, २०२५ दुपारी १५:३० ला नवीन अमरावती येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:४५ ला वीर येथे पोहोचेल.

०११०२ वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी मंगळवार दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रात्री २२:०० ला वीर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० ला नवी अमरावती येथे पोहोचेल.

या गाडीला बडनेरा, मुर्तुजापूर,अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा येथे थांबे देण्यात आले आहेत.

ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असून तिला १६ अनारक्षित डबे आणि २ एसएलआर डबे जोडण्यात येणार आहेत.

दावोसमध्ये महाराष्ट्र ‘Unstoppable’. आतापर्यंत झालेत 4 लाख 99 हजार 321 कोटींचे 20 सामंजस्य करार; यादी ईथे वाचा

   Follow us on        

Davos Parishad 2025: दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेलेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक होत असून काल एकाच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे एकूण 20 सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, नागपूर या भागांमध्ये विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उद्या आणखी कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.

आता पर्यंत झालेले सामंजस्य करार 

1) कल्याणी समूह:

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200

 

 

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर

 

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर

 

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड

 

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे

 

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

 

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर

 

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

 

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000

 

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे

 

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000

 

19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search