Category Archives: आज दिनांक

३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 23:41:41 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 22:22:30 पर्यंत
  • करण-वणिज – 12:27:33 पर्यंत, विष्टि – 23:41:41 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 12:36:59 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:15
  • सूर्यास्त- 18:12
  • चन्द्र-राशि-मकर – 10:48:19 पर्यंत
  • चंद्रोदय- 09:58:00
  • चंद्रास्त- 21:37:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन
  • मूलभूत कर्तव्यपालन दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.
  • १९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.
  • १९४३: पहिल्यांदा टीवी वर हरविलेल्या व्यक्तींविषयी सूचना सुरु करण्यात आली.
  • १९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
  • १९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.
  • १९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
  • १९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
  • १९९४: रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतन ला पुष्प जत्रेचे उद्घाटन केले.
  • १९९७: या दिवशी इटली चे अभिनेते आणि लेखक डारिओ फो यांना नोबेल पारितोषका ने सन्मानित करण्यात आले.
  • २००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८३१: सावित्रीबाई फुले – समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)
  • १८८२: प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांचा जन्म.
  • १८८३: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)
  • १९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७)
  • १९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.
  • १९२७: ओडीसा चे माजी मुख्यमंत्री बल्लभ पटनायक यांचा जन्म.
  • १९३१: य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
  • १९४१: भारतीय अभिनेता संजय खान यांचा जन्म.
  • १९८१: भारतीय हॉकी खेळाडू तसेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू सूरज लता देवी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०३: अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (जन्म: ७ जून १८३७)
  • १९७२: ला प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश यांचे निधन.
  • १९७५: बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजुनही उलगडलेले नाही. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)
  • १९७८: ला विद्वान संशोधक परशुराम चतुर्वेदी यांचे निधन.
  • १९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म:
  • १९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्यगोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)
  • २०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
  • २००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)
  • २००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 25:10:39 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 23:11:21 पर्यंत
  • करण-तैतिल – 13:50:27 पर्यंत, गर – 25:10:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-हर्शण – 14:57:30 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:11
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 09:15:00
  • चंद्रास्त- 20:37:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
  • १८३९: लुई दागुएरे यांनी चंद्राचा पहिला फोटो प्रदर्शित केला होता.
  • १८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
  • १८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
  • १९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
  • १९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
  • १९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.
  • १९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
  • १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
  • १९९१: तिरुअनंतपुरम च्या विमानतळाला आंतराष्ट्रीय चा दर्जा देण्यात आला.
  • १९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
  • १९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.
  • २०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
  • २०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७८: भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते मन्नत्तु पद्मनाभन यांचा जन्म.
  • १९०५: भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते जैनेंद्र कुमार यांचा जन्म.
  • १९०६: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्म.
  • १९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)
  • १९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)
  • १९३२: भारतीय चित्रपट निर्माते जॉनी बक्षी यांचा जन्म.
  • १९४०: अमेरिकी-भारतीय वैज्ञानिक एस. आर.श्रीनिवास वर्धन यांचा जन्म.
  • १९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि खासदार
  • १९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)
  • १९७०: स्विमर बुला चौधरी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १३१६: अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान (जन्म: ? ? ????)
  • १९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)
  • १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल (जन्म: ? ? ????)
  • १९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३)
  • १९५०: समाज सेविका तसेच स्वातंत्र्य सैनिकांमधील एक डॉ.राधाबाई यांचे निधन.
  • १९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
  • १९८८: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार अन्वर हुसेन यांचे निधन.
  • १९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)
  • १९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
  • २००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: ? ? १९४७)
  • २०१०: गुजराती कवी राजेंद्र शहा यांचे निधन.
  • २०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 26:26:25 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 23:46:54 पर्यंत
  • करण-बालव – 14:57:55 पर्यंत, कौलव – 26:26:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 17:06:01 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:11:46
  • सूर्यास्त- 18:12:09
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 08:26:00
  • चंद्रास्त- 19:37:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • नववर्ष दिन
  • जागतिक शांतता दिन
  • जागतिक कौटुंबिक दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
  • १७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
  • १८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
  • १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
  • १८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
  • १८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
  • १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
  • १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
  • १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
  • १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
  • १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • १९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
  • १९१२: याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
  • १९१५: ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
  • १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • १९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
  • १९२३: ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
  • १९३२: डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
  • १९६४: मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
  • १९७२: वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
  • १९७३: मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
  • १९९५: WTO ची स्थापना झाली.
  • २०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
  • २००१: कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
  • २००४: चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती /वाढदिवस:
  • १६६२: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
  • १८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
  • १८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
  • १८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
  • १९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
  • १९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
  • १९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
  • १९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
  • १९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
  • १९३५: ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
  • १९३६: राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
  • १९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
  • १९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
  • १९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
  • १९५१: नाना पाटेकर – अभिनेता
  • १९५३: ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
  • १९६१: ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
  • १९७१: संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
  • १९७५: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
  • १९७९: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)
  • १७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
  • १८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
  • १९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
  • १९५५: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
  • १९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
  • १९८३: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
  • १९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
  • २००८: ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.
  • २००९: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

३१ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:24:15 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 24:04:19 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 15:44:43 पर्यंत, भाव – 27:24:15 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 18:58:44 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:10
  • चन्द्र-राशि-धनु – 30:01:57 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:33:59
  • चंद्रास्त- 18:34:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
  • १७८१: अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
  • १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
  • १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • १९२९: महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
  • १९९७: मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.
  • १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
  • १९८४: राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
  • १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
  • २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.
  • २००८: ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)
  • १९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
  • १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)
  • १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.
  • १९३७: अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
  • १९४७: सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म.
  • १९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)
  • १९५१: लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.
  • १८९८: बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म.
  • ????: शाहीर पिराजीराव सरनाईक (जन्म: ? ? ????)
  • १९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)
  • १९५६: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री यांचे निधन
  • १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९८६: राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: ? ? १९१७)
  • १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)
  • १९९७: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
  • २००१: भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

३० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 27:58:36 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 23:58:04 पर्यंत
  • करण-चतुष्पाद – 16:05:10 पर्यंत, नागा – 27:58:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वृद्वि – 20:31:30 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:09
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 17:34:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • ०: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
  • १८०३: ला ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले.
  • १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
  • १९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
  • १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
  • १९७९: ला पश्चिम आफ्रिकेतील एका देशाने संविधानाला स्विकार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ३९: टायटस – रोमन सम्राट (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
  • १८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
  • १८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
  • १८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
  • १९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)
  • १९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)
  • १९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)
  • १९३५: प्रथम भारतीय चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म.
  • १९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.
  • १९५०: भारतीय समज सेवक डॉ. हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म.
  • १९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.
  • १९८९: भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी चा जन्म.
  • १९९२: भारताच्या युवा बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा जन्म.
  • १९९४: भारताच्या आर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेता रजत चौहान चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७)
  • १९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६)
  • १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
  • १९८२: दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट) (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)
  • १९८७: दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार (जन्म: ? ? ????)
  • १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)
  • २००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७)
  • २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 28:03:47 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 23:22:41 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:53:51 पर्यंत, शकुन – 28:03:47 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 21:40:25 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 23:22:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:37:00
  • चंद्रास्त- 16:38:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८४५: टेक्सास हे अमेरिकेचे २८ वे राज्य बनले.
  • १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
  • १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
  • १९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
  • १९७२: कोलकता मध्ये मेट्रो रेल्वे च्या कामाला आजच्या दिवशी सुरुवात.
  • १९८३: भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध २३६ रन बनविले, तेव्हा हा स्कोर कसोटी सामन्यामधील सर्वात जास्त होता.
  • २००६: चीन ने राष्ट्रीय सुरक्षेसाठी श्वेत पत्र जारी केले.
  • २०१२: पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आतंकवादी हल्यात २१ सुरक्षाकर्मी मरण पावले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८००: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू: १ जुलै १८६०)
  • १८०८: अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ३१ जुलै १८७५)
  • १८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.
  • १८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.
  • १९००: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)
  • १९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)
  • १९१७: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)
  • १९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)
  • १९४२: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य (मृत्यू: १८ जुलै २०१२)
  • १९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.
  • १९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६७: पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २४ जून १८९७)
  • १९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.
  • १९८०: भारतीय चित्रपट निर्माते नंदुभाई वकील यांचे निधन.
  • १९८६: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)
  • २००८: प्रसिद्ध चित्रकार मंजीत बावा यांचे निधन.
  • २०१२: टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ आक्टोबर १९४६)
  • २०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
  • २०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
  • २०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२८ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 27:34:55 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 22:13:45 पर्यंत
  • करण-गर – 15:06:41 पर्यंत, वणिज – 27:34:55 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 22:22:26 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 29:38:59
  • चंद्रास्त- 15:48:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.
  • १८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • १८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.
  • १८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू
  • १८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
  • १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.
  • १९२६: इंपिरियल एयरवेज ने भारत आणि इग्लंड यांच्या मध्ये पहिली पोस्ट सेवा सुरु केली.
  • १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
  • १९८३: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध ३० वे शतक पूर्ण करून सर डॉन ब्रॅडमन यांचे रेकॉर्ड तोडले.
  • १९८४: राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये कॉंग्रेसने लोकसभेची निवडणूक जिंकली.
  • १९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • २०००: भारतीय डाक विभागाने वीरता पुरस्काराच्या सन्मानार्थ पाच पोस्टाचे तिकीटांचा एक सेट ३ रुपयांचे एक सचित्र तिकीट जारी केले.
  • २०१३: आम आदमी पार्टी ने कॉग्रेस सोबत गठबंधन करून दिल्ली मध्ये सरकार बनविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
  • १८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
  • १९००: मराठी पत्रकार लेखक तसेच कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म.
  • १९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.
  • १९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)
  • १९२२: अमेरिकन कॉमिक्स लेखक स्टॅन ली यांचा जन्म.
  • १९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
  • १९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)
  • १९३७: जगप्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांचा जन्म.
  • १९४०: ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
  • १९४१: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.
  • १९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१)
  • १९५२: अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
  • १९६९: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.
  • २००१: अंडर-१९ च्या भातीय टीम चे सदस्य यशस्वी जैसवाल चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)
  • १९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: ? ? १८६०)
  • १९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.
  • १९७४: राजस्थान चे पहिले मुख्यमंत्री हीरा लाल शास्त्री यांचे निधन.
  • १९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)
  • १९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: ? ? १९०९)
  • २०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
  • २०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
  • २००२: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युत कानविंडे यांचे निधन
  • २००३: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.
  • २००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 26:29:02 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 20:29:05 पर्यंत
  • करण-कौलव – 13:42:07 पर्यंत, तैतुल – 26:29:02 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 22:36:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-तुळ – 13:57:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:41:59
  • चंद्रास्त- 15:03:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८६१: पहिल्यांदा कोलकत्ता येथे चहा ची सार्वजनिक बोली पार पडली.
  • १९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
  • १९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
  • १९३४: पर्शिया च्या शाह ने पर्शिया चे नाव बदलवून इरान ठेवण्याची घोषणा केली.
  • १९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
  • १९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६६: जगातील सर्वात लांब गुफा “Cave of Swallows” चा शोध लागला.
  • १९६८: चंद्राची परिक्रमा करणारे अपोलो-8 स्पेस एअर क्राफ्ट समुद्रात उतरविले.
  • १९७२: उत्तर कोरिया मध्ये नवीन संविधान मंजूर झाले.
  • १९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
  • १९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
  • २००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
  • २००८: व्ही शांताराम पुरस्कार समारोहा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तारे ज़मीं पर ला पुरस्कार मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
  • १६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
  • १७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
  • १७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
  • १८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)
  • १८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
  • १९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
  • १९३७: लोकसभेचे माजी सदस्य शंकर दयाल सिंह यांचा जन्म.
  • १९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
  • १९४२: परमवीर चक्र विजेता आणि देशाचे सैनिक अल्बर्ट एक्का यांचा जन्म.
  • १९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
  • १९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.
  • १९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
  • १९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.
  • १९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
  • १९७२: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २३ एप्रिल १८९७)
  • १९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
  • २००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.
  • २००३: ला भारतीय कवी के एस एस नरसिंहस्वामी यांचे निधन.
  • २००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३)
  • २०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 24:46:24 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 18:10:07 पर्यंत
  • करण-भाव – 11:42:37 पर्यंत, बालव – 24:46:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 22:22:32 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:07
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 27:47:00
  • चंद्रास्त- 14:24:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
  • १८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले
  • १९०४: दिल्ली ते मुंबई पहिली क्रॉस कंट्री मोटारकार रॅलीचे उद्घाटन.
  • १९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
  • १९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
  • १९७८: भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जेल मधून सुटका करण्यात आली.
  • १९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
  • १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
  • १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
  • २००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.
  • २००६: शेन वार्न ने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये ७०० विकेट घेऊन एक नवीन विक्रम रचला..
  • २०१२: चीनची राजधानी बीजिंग पासून तर ग्वांग्झू पर्यंत पहिल्यांदा जगातील सर्वात लांब आणि वेगवान रेल्वे रस्ता सुरु केल्या गेला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७१६: १८ व्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी थॉमस ग्रे यांचा जन्म.
  • १७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१)
  • १७९१: चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू: १८ आक्टोबर १८७१)
  • १८९३: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू: ९ सप्टॆंबर १९७६)
  • १८९९: भारताचे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी जनरल डायर वर गोळ्या झाडून जालियानवाला बाग हत्याकांडा चा बदला घेतला अश्या सरदार उधम सिंग यांचा आजच्या दिवशी जन्म.
  • १९१४: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
  • १९१४: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)
  • १९१७: डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
  • १९२५: पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक (मृत्यू: १३ जुलै १९९४)
  • १९२९: गुजराती साहित्यिक तारक मेहता यांचा जन्म.
  • १९३५: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
  • १९४१: लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
  • १९४८: डॉ. प्रकाश आमटे
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५३०: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)
  • १९६१: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक तसेच लेखक भूपेंद्रनाथ दत्त यांचे निधन.
  • १९६६: पंजाब चे पहिले मुख्यमंत्री तसेच गांधी स्मारक निधी चे पहिले अध्यक्ष गोपी चंद भार्गव यांचे निधन.
  • १९७२: हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ मे १८८४)
  • १९८९: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
  • १९९९: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
  • २०००: प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक (जन्म: ? ? ????)
  • २००६: कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
  • २०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 22:31:51 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 15:22:47 पर्यंत
  • करण-वणिज – 09:15:28 पर्यंत, विष्टि – 22:31:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 21:45:38 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:07
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 26:55:00
  • चंद्रास्त- 13:48:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
  • राष्ट्रीय सुशासन दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • ०: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
  • १७७१: मुघल प्रशासक दुसरा शाह आलम दिल्लीच्या सिंहासनावर बसले.
  • १७६३: भरतपूर चे महाराजा सुरजमल यांची हत्या.
  • १९४६: ताईवान ने संविधानाला स्वीकारले.
  • १९७४: रोम जात असेलेले एअर इंडिया चे बोईंग ७४७ चे अपहरण.
  • १९७६: ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
  • १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
  • १९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.
  • २००२: चीन आणि बांगलादेश मध्ये संरक्षण करार पार पडला.
  • २००५: ४०० वर्षाआधी लुप्त झालेला पक्षी “डोडो” चे दोन ते तीन हजार वर्ष जुने अवशेष आढळले.
  • २००८: भारताने पाठविलेल्या चंद्रयान-१ च्या पेलोडर ने चंद्राचा पहिला नवीन फोटो पाठविला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६४२: सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (मृत्यू: २० मार्च १७२७)
  • १८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)
  • १८६१: पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
  • १८७२: संस्कृत भाषेचे विद्वान पंडित गंगानाथ झा यांचा जन्म.
  • १८७६: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
  • १८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९४१)
  • १८८६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
  • १८८९: रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८४)
  • १९११: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)
  • १९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०१२)
  • १९१८: अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ आक्टोबर १९८१)
  • १९१९: नौशाद अली – संगीतकार (मृत्यू: ५ मे २००६)
  • १९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर २०००)
  • १९२४: अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
  • १९२५: प्रसिद्ध चित्रकार सतीश गुजराल यांचा जन्म.
  • १९२६: चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (मृत्यू: ५ आक्टोबर १९९७)
  • १९२६: डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७)
  • १९२७: पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये
  • १९३२: प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
  • १९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)
  • १९४९: नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
  • १९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.
  • १९८०: राष्ट्रवादी मुस्लीम नेते मुख्तार अहमद अंसारी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४)
  • १९५७: प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस – पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)
  • १९७२: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (जन्म: १० डिसेंबर १८७८)
  • १९७७: चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (जन्म: १६ एप्रिल १८८९)
  • १९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१८)
  • १९९४: ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
  • १९९५: डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते (जन्म: ७ जून १९१७)
  • १९९८: दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक (? ? १९२५)
  • २०१५: भारतीय अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search