Category Archives: दिनविशेष

१० फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 19:00:14 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 18:01:59 पर्यंत
  • करण-कौलव – 07:11:05 पर्यंत, तैेतिल – 19:00:14 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-प्रीति – 10:26:28 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-मिथुन – 11:57:44 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:37:00
  • चंद्रास्त- 30:17:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
महत्त्वाच्या घटना:
  • १९२१: ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला.
  • १९२१: महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
  • १९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
  • १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
  • १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
  • १९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
  • १९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना
  • १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
  • १९७९: इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश ची राजधानी बनले.
  • १९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या “डीप ब्लू” या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
  • २००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
  • २००९: आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८४७: प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.
  • १८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५)
  • १८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
  • १९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२)
  • १९४२: भारतीय अभिनेत्री माधबी मुखर्जी यांचा जन्म.
  • १९४५: राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २०००)
  • १९७०: प्रसिद्ध भारतीय कवी कुमार विश्वास यांचा जन्म.
  • १९८५: प्रसिद्ध गायिका महाथी यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८६५: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४))
  • १९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)
  • १९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५)
  • १९२२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)
  • १९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
  • १९९५: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार गुलशेर ख़ाँ शानी यांचे निधन.
  • २००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४)
  • २०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

९ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 19:28:02 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 17:53:59 पर्यंत
  • करण-भाव – 07:50:42 पर्यंत, बालव – 19:28:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 12:06:45 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त-18:34
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 15:35:59
  • चंद्रास्त- 29:29:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच तिसरा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस (चॉकलेट डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १९००: लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.
  • १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
  • १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
  • १९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
  • १९७१: “अपोलो १४ मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
  • १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
  • १९७५: रशिया चे सुयोज-१७ हे अवकाशयान २९ दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
  • १९९९: भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला.
  • २००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
  • २०१०: बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.
  • १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)
  • १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)
  • १९१७: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (मृत्यू: २७ जून १९९८)
  • १९२२: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)
  • १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
  • १९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक विष्णू खरे यांचा जन्म.
  • १९४५: संसद चे माजी सदस्य श्याम चरण गुप्ता यांचा जन्म.
  • १९५८: भारतीय चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.
  • १९६८: भारतीय अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म.
  • १९७०: ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
  • १९८४: ला भारतीय अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८७१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)
  • १८९९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चापेकर यांचे निधन.
  • १९१८: प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी. बालासरस्वती यांचे निधन.
  • १९६६: दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली. (जन्म: ? ? ????)
  • १९७९: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म: २४ एप्रिल १९१०)
  • १९८१: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
  • १९८४: तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: १३ मे १९१८)
  • २०००: शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म: ? ? १९१५)
  • २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
  • २००६: भारतीय अभिनेत्री नादिरा यांचे निधन.
  • २००८: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
  • २०१२: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

८ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि- एकादशी – 20:18:38 पर्यंत
  • नक्षत्र- मृगशिरा – 18:08:01 पर्यंत
  • करण- वणिज – 08:51:29 पर्यंत, विष्टि – 20:18:38 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- वैधृति – 14:04:08 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:34
  • चन्द्र राशि- मिथुन
  • चंद्रोदय-14:35:00
  • चंद्रास्त- 28:33:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
  • १८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
  • १८९९: रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
  • १९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ नावाचे पाक्षिक सुरू केले.
  • १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
  • १९४३: आजच्या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस जर्मनी मधून एका नावेच्या माध्यमाने जपान साठी निघाले.
  • १९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.
  • १९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
  • १९८६: आजच्या दिवशी दिल्लीच्या विमानतळावर प्रीपेड टॅक्सी ची सुरुवात.
  • १९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
  • १९९९: आजच्या दिवशी अंतराळातून स्टारडस्ट नावाचे अंतरीक्ष यान रवाना झाले.
  • २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
  • २००८: ओडीसा च्या शशुपालगढ येथे २५०० वर्षापूर्वीचे शहर उत्खनन करते वेळी सापडले.
  • २०१५: नीती आयोगाची पहिली बैठक
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६७७: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)
  • १७००: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२)
  • १८२८: ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५)
  • १८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)
  • १८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार (मृत्यू: ? ? ????)
  • १८८१: सिविल सर्विसेस मध्ये असलेले वी.टी. कृष्णमाचारी यांचा जन्म.
  • १८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (मृत्यू: ३ मे १९६९)
  • १९०९: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (३ जानेवारी १९९८)
  • १९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)
  • १९४१: जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० आक्टोबर २०११)
  • १९५१: हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक अशोक चक्रधर यांचा जन्म.
  • १९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू
  • १९८०: भारतीय चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत यांचा जन्म.
  • १९८६: भारतीय महिला क्रिकेटर एकता बिष्ट यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७२५: पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२)
  • १९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)
  • १९६५: च्या भारत – पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ? मार्च १९१३)
  • १९७१: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (जन्म: ३० डिसेंबर १८८७)
  • १९७५: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)
  • १९९४: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२)
  • १९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ? ? १९११)
  • १९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल.
  • १९९५: भारतीय स्वातंत्र्य सैनिक कल्पना दत्त यांचे निधन.
  • १९९५: राजस्थान चे माजी मुख्यमंत्री टीका राम पलीवाल यांचे निधन.
  • १९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६)
  • २००६: भारतीय मॉडेल कुलजित रंधवा यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

७ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 21:28:52 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 18:41:02 पर्यंत
  • करण-तैतुल – 10:10:29 पर्यंत, गर – 21:28:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-इंद्रा – 16:16:27 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:33
  • चन्द्र-राशि-वृषभ – 30:22:20 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:37:00
  • चंद्रास्त- 27:33:59
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा दिवस.
  • ’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन
  • व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात. (रोस डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
  • १९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.
  • १९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
  • १९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
  • १९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
  • १९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • १९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.
  • १९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
  • १९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी
  • २००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • २०१०: आजच्या दिवशी अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचा समारोप झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
  • १८०४: डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)
  • १८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७०)
  • १८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)
  • १८९८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म.
  • १९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
  • १९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
  • १९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते
  • १९८०: चित्रपट अभिनेत्री प्राची शाह यांचा जन्म.
  • १९९३: प्रसिद्ध टेनिसपटू किदंबी श्रीकांत चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १२७४: श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)
  • १३३३: निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
  • १९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८)
  • १९४२: आजच्या दिवशी “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन” ची स्थापना करणारे शचींद्रनाथ सान्याल यांचे निधन.
  • १९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

६ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 22:56:03 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 19:30:25 पर्यंत
  • करण-बालव – 11:45:19 पर्यंत, कौलव – 22:56:03 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 18:41:50 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:33
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 12:43:59
  • चंद्रास्त- 26:30:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.
  • १७७८: फ्रांस ने अमेरिकेला राष्ट्र म्हणून मान्यता दिली.
  • १८८८: आजच्या दिवशी गिलिस बिल्दट हे स्वीडन चे प्रधानमंत्री बनले.
  • १९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.
  • १९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.
  • १९३२: ’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली. ती राणी बनल्याची बातमी तिला केनियातील झाडावरच्या एका हॉटेलमधे देण्यात आली.
  • १९५९: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
  • १९६८: चे दहावे हिवाळी ऑलिम्पिक फ्रान्सच्या ग्रोनेबल येथे सुरु झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९०: भारतरत्नने सन्मानित ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान यांचा जन्म.
  • १९११: रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४)
  • १९१२: ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
  • १९१५: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)
  • १९४५: जमैकन गायक बॉब मार्ली यांचा जन्म.
  • १९५२: डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी
  • १९६५: संसद चे सदस्य संजय निरूपम यांचा जन्म.
  • १९८३: श्रीशांत – क्रिकेटपटू, सट्टेबाज व ’फिक्सर’
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८०४: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (जन्म: १३ मार्च १७३३)
  • १९३१: मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१)
  • १९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. (जन्म: १० मार्च १८६३)
  • १९५२: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ डिसेंबर १८९५)
  • १९७६: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)
  • १९८३: पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रज्ञ आत्माराम यांचे निधन.
  • १९९३: आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३)
  • २००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 24:38:03 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 20:34:08 पर्यंत
  • करण-विष्टि – 13:34:02 पर्यंत, भाव – 24:38:03 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 21:18:46 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:32
  • चन्द्र-राशि-मेष – 26:16:58 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:56:00
  • चंद्रास्त- 25:26:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
  • १६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
  • १७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट
  • १९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
  • १९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
  • १९४८: गांधी हत्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
  • १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • १९५३: आजच्या दिवशी वॉल्ट डिज़्नी यांची पीटर पॅन मूवीचा प्रीमियर ची सुरुवात झाली.
  • १९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
  • १९६१: आजच्या दिवशी संडे “टेलिग्राफ न्यूज” चा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
  • १९७१: आजच्या दिवशी अपोलो-१४ अंतरीक्ष यान चंद्रावर उतरून अंतराळवीर सुद्धा चंद्रावर उतरले.
  • १९९९: नेल्सन मंडेला यांनी संसद मध्ये त्यांचे शेवटचे भाषण दिले आणि मे महिन्यात त्यांनी पदाचा त्याग केला.
  • २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
  • २००४: ’पुण्याची’ स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
  • २००७: सुनिता विल्यम्स हि अंतराळात जास्त वेळ राहणारी पहिली भारतीय महिला बनली.
  • २०१०: आजच्या दिवशी अभिनव बिंद्रा ने नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशिप मध्ये ६०० पैकी ५९६ अंक मिळवून सुवर्ण पदक स्वतःच्या नावावर केले.
  • २०१६: ला आजच्या दिवशी वित्त मंत्रालयाने युटूब चॅनेल सुरु केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
  • १८४०: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (मृत्यू: २३ आक्टोबर १९२१)
  • १९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
  • १९१४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)
  • १९१६: भारतीय कवी जानकी वल्लभ शास्त्री यांचा जन्म.
  • १९१९: देशाचे पहिले मुस्लीम विदेश मंत्री खुर्शीद आलम खान यांचा जन्म.
  • १९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
  • १९३६: बाबा महाराज सातारकर – कीर्तनकार
  • १९४९: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म.
  • १९७६: अभिषेक बच्‍चन – अभिनेता
  • १९९०: ला भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)
  • १९२७: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२)
  • १९९९: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध नर्तकी इंद्राणी रहमान यांचे निधन.
  • २०००: कालिंदी केसकर – गायिका (जन्म: ? ? ????)
  • २००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या ‘हरिजन’ या मराठी अंकाचे संपादक (जन्म: ? ? ????)
  • २००८: महर्षी महेश योगी – योग गुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७)
  • २०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

४ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 26:33:05 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 21:50:25 पर्यंत
  • करण-गर – 15:34:57 पर्यंत, वणिज – 26:33:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 24:05:59 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:31
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 11:13:00
  • चंद्रास्त- 24:25:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • जागतिक कर्करोग दिन;दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संस्था (WHO) याच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला ‘ असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
  • १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
  • १९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
  • १९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
  • १९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
  • १९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान
  • २०००: विश्व कर्करोग दिन
  • २००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण कर ण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
  • २००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
  • १९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)
  • १९१७: जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)
  • १९३८: पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू
  • १९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११)
  • १९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.
  • १९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: ? ? ????)
  • १८९४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)
  • १९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४)
  • २००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८)
  • २००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

३ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 28:39:25 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 23:17:29 पर्यंत
  • करण-कौलव – 17:46:11 पर्यंत, तैतुल – 28:39:25 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-साघ्य – 27:02:08 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय-07:14
  • सूर्यास्त-18:31
  • चन्द्र राशि-मीन – 23:17:29 पर्यंत
  • चंद्रोदय-10:31:59
  • चंद्रास्त-23:23:59
  • ऋतु-शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
  • १८१५: स्विझर्लंड येथे पहिली पनीर बनविण्याचा कारखाना बनविण्यात आला.
  • १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
  • १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
  • १९२८: ‘सायमन गो बॅक’ या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
  • १९३४: आजच्या दिवशी विमानाने पार्सल पाठविण्याची सेवा सुरु झाली.
  • १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
  • १९७२: जापान च्या साप्पारो नावाच्या शहरात पहिल्यांदा आशियात हिवाळी ऑलंपिक चे आयोजन केल्या गेले.
  • १९९९: भारतीय राज्य जम्मू काश्मीर मध्ये डेमोक्रेटिक जनता दल या पार्टीची पुन:स्थापना करण्यात आली.
  • २००६: आजच्या दिवशी इजिप्त चे जहाज एम.एस अल-सलाम बोकॅसिओ-९८ हे जहाज समुद्रात बुडाले.
  • २००९: आजच्या दिवशी शिल्पा शेट्टी यांनी राजस्थान रॉयल्स मध्ये स्वतःची हिस्सेदारी खरेदी केली.
  • २०१८: आजच्या दिवशी भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमने चौथ्यांदा वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२१: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१०)
  • १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)
  • १८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.
  • १९००: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)
  • १९०९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सुहासिनी गांगुली यांचा जन्म.
  • १९३८: भारतीय चित्रपट अभिनेत्री वहीदा रहमान यांचा जन्म.
  • १९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ
  • १९८३: चित्रपट अभिनेता सिलांबरासन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.
  • १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
  • १९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २८ डिसेंबर १८५६)
  • १९५१: वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणाऱ्यांपैकी एक चौधरी रहमत अली यांचे निधन.
  • १९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)
  • २०००: ला प्रसिद्ध तबलावादक उस्ताद कुरैशी अल्‍ला रक्‍खा खान यांचे निधन.
  • २०१२: ला बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक राज कवर यांचे निधन.
  • २०१६: ला मध्य प्रदेश चे माजी गव्हर्नर बलराम जाखड यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 09:16:39 पर्यंत, पंचमी – 30:54:55 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 24:53:00 पर्यंत
  • करण-विष्टि – 09:16:39 पर्यंत, भाव – 20:05:13 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 09:13:56 पर्यंत, सिद्ध – 30:05:33 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय-07:14
  • सूर्यास्त- 18:30
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 09:54:00
  • चंद्रास्त- 22:25:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • World Wetland Day
महत्त्वाच्या घटना:
  • १६२६: आजच्या दिवशी पहिला चार्ल्स इंग्लंड चा राजा बनला.
  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
  • १८६३: आजच्या दिवशी शंभू नाथ पंडित हे कोलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश बनले.
  • १९०१: आजच्या दिवशी राणी विक्टोरिया चा अंतिम संस्कार करण्यात आला.
  • १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात
  • १९५२: आजच्या दिवशी भारताला पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळाला.
  • १९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
  • १९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति
  • १९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
  • १९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
  • २००६: महात्मा गांधी नरेगा कायदा आजच्या दिवसापासून २०० जिल्ह्यांमध्ये लागू केल्या गेले.
  • २०१३: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत राहत असेलेल्या एका विदेशी शास्त्रज्ञाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८५६: स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
  • १८८४: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
  • १८८७: प्रसिद्ध राजनीतितज्ञ तसेच समाजसेविका अम्रित कौर यांचा जन्म.
  • १९०५: अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू: ६ मार्च १९८२)
  • १९१५: प्रसिद्ध भारतीय लेखक खुशवंत सिंह यांचा जन्म.
  • १९१६: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री दसरथ देब यांचा जन्म.
  • १९२३: ललित नारायण मिश्रा – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)
  • १९७०: संसद च्या सदस्य प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा जन्म.
  • १९७९: शमिता शेट्टी – अभिनेत्री
  • १९८९: भारतीय अभिनेत्री संदीप धार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
  • १९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)
  • १९३०: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व शकार. त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
  • १९४१: हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यकार तसेच निबंधकार आचार्य रामचंद्र शुक्ला यांचे निधन.
  • १९६०: हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक आचार्य चतुरसेन शास्त्री यांचे निधन.
  • १९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (१८ मे १८७२)
  • १९८२: ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री मोहन लाल सुखाडीया यांचे निधन.
  • १९८७: अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)
  • २००७: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 11:40:35 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 26:33:43 पर्यंत
  • करण-गर – 11:40:35 पर्यंत, वणिज – 22:28:38 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-परिघ – 12:24:08 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-07:15
  • सूर्यास्त-18:31
  • चन्द्र राशि-कुंभ – 20:59:12 पर्यंत
  • चंद्रोदय-09:16
  • चंद्रास्त-21:06:00
  • ऋतु-शिशिर

जागतिक दिवस:
  • भारतीय तटरक्षक दल दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
  • १७९०: न्यूयोर्क मध्ये पहिल्यांदा “सुप्रीम कोर्ट ऑफ़ द यूनाइटेड स्टेट्स’ चे आयोजन केल्या गेले.
  • १८२७: कोलकता येथे बंगाल क्लब ची स्थापना झाली.
  • १८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
  • १८८४: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
  • १८८४: देशात पोस्टल विमा योजना सुरु करण्यात आली.
  • १८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
  • १९४१: डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
  • १९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
  • १९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९६४: आजच्या दिवशी युनिटी ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली.
  • १९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
  • १९७७: ‘इंडियन कोस्ट गार्ड चे स्थापना करण्यात आली.
  • १९७७: आजच्या दिवशी देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची दिल्ली येथे स्थापना करण्यात आली.
  • १९७९: १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
  • १९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
  • १९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा जन्म.
  • १९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.
  • १९९२: आजच्या दिवशी केंद्राशाशित प्रदेश दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून दर्जा मिळाला.
  • १९९८: पीटर कोरडा यांनी मार्सिलो रियोस यांना हरवून ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली
  • २००२: अमेरिकेचे प्रसिद्ध पत्रकार डेनियल पर्ल यांचे अपहरण करून त्यांची आजच्या दिवशी हत्या करण्यात आली.
  • २००४: मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
  • २०१३: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
  • १८८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
  • १९०१: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)
  • १९१२: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
  • १९१४: भारतीय प्रसिद्ध चित्रपट कलाकार अवतार किशन हंगल यांचा जन्म.
  • १९१५: हैज या विषाणूवर संशोधन करणारे भारतीय शास्त्रज्ञ शंभूनाथ दे यांचा जन्म.
  • १९१७: ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
  • १९२७: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)
  • १९२९: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
  • १९३१: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)
  • १९५५: प्रसिद्ध कुश्ती पैलवान सतपाल सिंह चा जन्म.
  • १९५६: दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार ब्रम्हानंद यांचा जन्म.
  • १९५७: बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ यांचा जन्म.
  • १९६०: जॅकी श्रॉफ – अभिनेता
  • १९७१: अजय जडेजा – क्रिकेटपटू
  • १९८१: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १८८२: ब्रिटीशांसाठी हिमालयाला एकस्फ्लोर करणारे भारतीय नैन सिंह रावत यांचे निधन.
  • १९७६: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
  • १९९५: मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
  • २००३: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१)
  • २०१२: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search