Category Archives: व्यवसाय

शेवाळ शेती: कोकणकरांसाठी अर्थजनाचा नवीन पर्याय

मालवण: कोकणातील मच्छीमार व्यावसायिकांना लवकरच अर्थाजनाचा एका चांगला स्रोत मिळणार आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या धर्तीवर प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत कोकणातील किनार पट्ट्यांवर मच्छीमारांना शेवाळी शेती करता येणार आहेत. 
आचरा येथील जामडूल खाडीत या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात होत आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे .यासाठी मच्छीमारांना समुद्र शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे दाभोळ भीव बंदर येथे या प्रकारचे प्रशिक्षण मच्छीमारांना देण्यात आले आहे त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या मच्छीमार शेतकऱ्यांनी तो प्रकल्प सुरू केला आहे .आचरा येथे जामडूल खाडपात्रात या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली आहे. याचा शुभारंभ बुधवारी आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस यांच्या हस्ते झाला. यावेळी गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विवेक ताम्हणकर, प्रमोद वाडेकर,अर्जुन बापर्डेकर,सौ प्रतिक्षा वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समुद्र शेवाळाला जगभरातून औषध उत्पादक कंपन्यांकडून मागणी आहे सौंदर्यप्रसाधन विविध औषधे तसेच याच्या पासून बनवलेल्या लिक्विड खताला सेंद्रिय शेतीत महत्वाचे स्थान आहे.यामुळे याला खूप मागणी आहे. खारया पाण्यातील या शेतीमुळे मच्छीमारांना अर्थार्जनाचे एक नवीन दालन खुले होणार आहे. 
असा हा प्रकल्प महाराष्ट्र फिशरी डिपार्टमेंट मार्फत महाराष्ट्रात आलेला आहे अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे यांनी दिली आहे या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही माशांना ते खाद्य म्हणून खूप उपयुक्त ठरते त्यामुळे माशांची पैदासही वाढते आणि मच्छीमारांचा फायदा होतो अतिशय अकुशल असणाऱ्या लोकांना या व्यवसाय करता येतो या प्रकल्पासाठी महिलांचा सहभाग फारच उपयुक्त ठरतो आणि महिलांच्या हाताला काम मिळते.  
समुद्र शेवाळ्याची शेती करताना बीज समुद्रात टाकले की 30 किंवा 45 दिवसांमध्ये ती शेती तयार होते हे उत्पादन विकत घेण्याकरता उद्योजक ,मोठ्या कंपन्यांना बोलावले जाते आणि हे उद्योजक हे शेवाळ विकत घेतात यातून मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा होतो .अतिशय उपयुक्त अशा या प्रकल्पाचा जिल्ह्यात आचरा येथे प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ झाला आहे .तामिळनाडू गुजरात या ठिकाणी हे प्रकल्प यशस्वी ठरले आहेत. याबाबत माहिती देताना मोनिका कवळे यांनी सांगितले की प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हा प्रोजेक्ट सुरु केला जात असून पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत दहा जागा शोधून शेवाळ शेती करायची आहे. सध्या महाराष्ट्रात रत्नागिरी दाभोळ भीव येथे, देवगड आणि मालवण तालुक्यातील आचरा येथे ही शेवाळ शेती केली जाणार आहे. शेवाळपासून केरीटीन आणि आगार आगार अशी दोन केमिकल्स मिळतात.यांचा वापर खाद्य,सौंदर्य, फार्माक्यूटीकल इंडस्ट्रीज मध्ये केला जात आहे. या शेवाळाची लागवड तीन प्रकारे केली जाते तामिळनाडू भागात पाणी शांत असल्याने बांबू तराफा पद्धतीने लागवड केली जाते. पण आपल्या कडे महाराष्ट्रात पाणी उथळ असल्याने यथे प्लोटीन मोनोलाईन पद्धतीने शेवाळ शेती केली जात आहे. आचरे मध्ये पण याच पद्धतीने शेती केली जात आहे. 

Loading

सिंधुदुर्गातील उद्योजकांसाठी महत्वाची बातमी – महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे (2022) कुडाळ येथे आयोजन

सिंधुदुर्ग :महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ च्या उद्धिष्टपुर्तीचा एक भाग म्हणून तळागाळातील नाव उद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाचे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्र (BOOTCAMP ) १३ ओक्टोम्बर रोजी कुडाळ येथे संत राऊळ महाराज महाविद्यालयात संपन्न होणार आहे. या उपराक्रमात नवउद्योजकांना तज्ञ् मार्गदर्शन, प्रोत्साहन, निधी व पाठबळ या संबधी आवश्यक ती माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येईल. तरी या उपक्रमात नवसंकल्पना असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन तसेच शिबिराच्या दिवशी ऑफलाईन नावनोंदणी करून सहभागी होण्यासाठी शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. 
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्टे:-
महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यनपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनाना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे.  महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.
प्रत्येक जिल्हयामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जाणार आहेत यामध्ये रु 10,000/- ते 1,00,000 पर्यंतचे पारितोषिक रक्कम अदा करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व क्षेत्रांचा(sector) समावेश असेल उदा. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास(sustainability),smart Infrastructure &mobility), इ. प्रशासन आणि इतर कुठलाही उपाय अथवा समाधान जो नाविन्यपूर्ण आहे इत्यादी. 
राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल निधीसाठी सहाय, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे तसेच सॉप्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड केडीटस,क्लाऊड क्रेडीटस सारखे इतर लाभ पुरविण्यात येतील. 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search