Category Archives: आज दिनांक

०२ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 09:17:53 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 13:05:21 पर्यंत
  • करण-बालव – 09:17:53 पर्यंत, कौलव – 20:30:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 27:19:32 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:12
  • सूर्यास्त- 18:59
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 10:11:59
  • चंद्रास्त- 24:04:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय भाऊ आणि बहिण दिन National Brothers And Sister Day
  • राष्ट्रीय जीवन विमा दिवस National Life Insurance Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1908 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
  • 1918 : जनरल मोटर्सने शेवरलेट मोटर कंपनी विकत घेतली.
  • 1921 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव आणि तात्याराव यांना अंदमानातून हिंदुस्थानात पाठवण्यात आले.
  • 1994 : बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण.
  • 1994 : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहण्याचा विक्रम केला.
  • 1997 : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1997 : पुण्याच्या अभिजित कुंटेने राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपदाचे निकष पूर्ण केले.
  • 1999 : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.
  • 1999 : मीरा मॉस्कोसो पनामाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.
  • 2004 : एस. राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2011 : ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे नेव्ही सील 6 ने ठार मारले.
  • 2012 : नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मुंच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात $120 दशलक्षमध्ये विकले गेले. हा नवा विश्वविक्रम ठरला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1899 : ‘भालजी पेंढारकर’ – मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1994)
  • 1920 : ‘डॉ. वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1983)
  • 1921 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1992)
  • 1929 : ‘जिग्मे दोरजी वांगचुकयांचा’ – भूतानचे राजे जन्म. (मृत्यू: 21 जुलै 1972)
  • 1969 : ‘ब्रायन लारा’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘अहटी हेनला’ – स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1519 : ‘लिओनार्डो दा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1452)
  • 1683 : ‘रघुनाथ नारायण हणमंते’ तथा रघुनाथपंडित शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी यांचे निधन.
  • 1963 : ‘डॉ. के. बी. लेले’ – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1882)
  • 1973 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 8 जून 1910)
  • 1975 : ‘शांताराम आठवले’ – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1910)
  • 1998 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य यांचे निधन. (जन्म: 18 मे 1913)
  • 1999 : ‘पं. सुधाकरबुवा डिग्रजकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
  • 2011 : अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन ला अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: 10 मार्च 1957)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०१ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 11:26:47 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 14:22:01 पर्यंत
  • करण-विष्टि – 11:26:47 पर्यंत, भाव – 22:16:55 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-अतिगंड – 08:33:58 पर्यंत, सुकर्मा – 29:38:19 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:13
  • सूर्यास्त- 19:59
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 09:07:59
  • चंद्रास्त- 23:07:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • महाराष्ट्र दिन
  • मराठी राजभाषा दिन
  • आंतरराष्ट्रीय कामगार दिन

महत्त्वाच्या घटना :
  • 1707 : इंग्लंडचे राज्य आणि स्कॉटलंडचे राज्य विलीन होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य निर्माण झाले.
  • 1739 चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईवर हल्ला केला. तीन महिन्यांच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात गेली.
  • 1840 : युनायटेड किंगडममध्ये पेनी ब्लॅक, पहिले अधिकृत टपाल तिकीट जारी करण्यात आले.
  • 1844 : हाँगकाँग पोलीस दलाची स्थापना जगातील दुसरे आधुनिक पोलीस दल आणि आशियातील पहिले पोलीस दल म्हणून करण्यात आली.
  • 1882 : आर्य महिला समाजाचे पं. रमाबाईंच्या पुढाकाराने पुण्यात त्याची स्थापना झाली.
  • 1884 : अमेरिकेत कामगारांनी दिवसात 8 तास काम करावे या मागणीची घोषणा.
  • 1886 : आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
  • 1890 : जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
  • 1897 : रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
  • 1927 : जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • 1930 : सूर्यमालेतील प्लुटो चे नामकरण करण्यात आले.
  • 1940 : युद्धाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळ रद्द करण्यात आले.
  • 1960 : मुंबईसह मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्य आणि ‘गुजरात’ राज्य या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
  • 1960 : गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1961 : क्युबाचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाला समाजवादी देश घोषित केले आणि निवडणुका रद्द केल्या.
  • 1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
  • 1978 : जपानचे ‘नामी उमुरा’ हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
  • 1983 : ‘अमरावती विद्यापीठाची’ स्थापना.
  • 1998 : कोकण रेल्वे प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
  • 1999 : नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1218 : जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1291)
  • 1913 : ‘बलराज साहनी’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
  • 1915 : डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1995)
  • 1919 : ‘मन्ना डे’ – भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर २०१३)
  • 1922 : ‘मधु लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1995)
  • 1932 : ‘एस. एम. कृष्णा’ – कर्नाटकचे 16 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1943 : ‘सोनल मानसिंह’ – नृत्यांगना यांचा जन्म.
  • 1955 : ‘आनंद गोपाल महिंद्रा’ – महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1971 : ‘अजित कुमार’ – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
  • 1988 : ‘अनुष्का शर्मा’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1945 : ‘जोसेफ गोबेल्स’ – जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता यांचे
  • निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1897)
  • 1958 : गणेश शिवराम उर्फ नाना जोग – नाटककार यांचे नागपुर येथे निधन.
  • 1972 : ‘कमलनयन बजाज’ – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1915)
  • 1993 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते यांचे निधन. (जन्म: 15 जून 1907)
  • 2013 : ‘निखील एकनाथ खडसे’ यांचे निधन


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

३० एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 14:15:06 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 16:19:11 पर्यंत
  • करण-गर – 14:15:06 पर्यंत, वणिज – 24:46:31 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 12:01:16 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:13
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-वृषभ – 27:16:02 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:05:59
  • चंद्रास्त- 22:03:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • प्रामाणिकपणा दिवस National Honesty Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
  • 1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
  • 1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
  • 1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
  • 1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • 1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
  • 1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
  • 2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • 2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
  • 1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
  • 1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
  • 1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
  • 1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
  • 1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
  • 1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
  • 1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.
  • 1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
  • 1945 : ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
  • 2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
  • 2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
  • 2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
  • 2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२९ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 17:34:05 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 18:48:09 पर्यंत
  • करण-बालव – 07:21:58 पर्यंत, कौलव – 17:34:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 15:53:16 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:14
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 07:09:00
  • चंद्रास्त- 20:56:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस International Dance Day
  • जागतिक इच्छा दिन World Wish Day
  • जागतिक पुरवठा दिवस National Supply Chain Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1639: मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ल्याची पायाभरणी केली.
  • 1930: ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली.
  • 1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • 1945: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने मित्र राष्ट्रांना बिनशर्त आत्मसमर्पण केले.
  • 1986: लॉस एंजेलिस सेंट्रल लायब्ररीला लागलेल्या आगीत सुमारे 400,000 पुस्तके नष्ट झाली.
  • 1991: बांगलादेशच्या दक्षिणेकडील चितगाव जिल्ह्यात आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे सुमारे 1,38,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले.
  • 2010 : शत्रूच्या रडारने न पकडली जाणारी मुंबईतील मांजगाव येथे बांधण्यात आलेली आधुनिक उपकरणे असलेली INS शिवालिक ही युद्धनौका भारताने नौदलात सामील केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1727 : ‘जीन-जॉर्जेस नोव्हर’ – फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1810)
  • 1848 : ‘राजा रवि वर्मा’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1906)
  • 1867 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि अग्रगण्य शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1935)
  • 1891 : ‘भारतीदासन’ – भारतीय कवी आणि कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1964)
  • 1901 : ‘मिचेनोमिया हिरोहितो’ – दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 7 जानेवारी 1989)
  • 1936 : ‘झुबिन मेहता’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
  • 1966 : ‘फिल टफनेल’ – इंग्लिश फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
  • 1970 : ‘आंद्रे आगासी’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1979 : ‘आशिष नेहरा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1945 : ‘हेन्रिच हिमलर’ – जर्मन नाझी अधिकारी यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1900)
  • 1960 : ‘पं. बाळकृष्ण शर्मा’ – हिंदी कवी यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1897)
  • 1980 : ‘श्रीकृष्ण के. क्षीरसागर’ – लेखक, विचारवंत आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1901)
  • 1980 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1899)
  • 2006 : ‘जे. के. गालब्रेथ’ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 ऑक्टोबर 1908)
  • 2020 – ‘इरफान खान’ – भारतीय अभिनेता यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२८ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 21:13:41 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 21:38:36 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 11:07:55 पर्यंत, भाव – 21:13:41 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 20:01:52 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-मेष – 26:54:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 06:16:59
  • चंद्रास्त- 19:45:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस World Day For Safety And Health At Work
महत्त्वाच्या घटना :
  • 1916 : होम रुल लीगची स्थापना झाली.
  • 1920: अझरबैजान सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाला.
  • 1969 : चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2001 : डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
  • 2003 : ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
  • 2007 : 2007 साली श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला.
  • 2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ‘PSLV-C9’ उपग्रह प्रक्षेपित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1758 : ‘जेम्स मोन्‍रो’ – अमेरिकेचे 5 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1831)
  • 1854 : ‘वासुकाका जोशी’ – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1944)
  • 1908 : ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
  • 1916 : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 1993)
  • 1931 : लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
  • 1937 : इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 2006)
  • 1942 : इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
  • 1968 : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1740 : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1700)
  • 1903 : ‘जोशिया विलार्ड गिब्स’ – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1945 : इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: 29 जुलै 1883)
  • 1978 : अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1909)
  • 1992 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1909)
  • 1998 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 20 जून 1939)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२७ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 25:03:20 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 24:39:27 पर्यंत
  • करण-चतुष्पाद – 14:58:34 पर्यंत, नागा – 25:03:20 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 24:18:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 18:37:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • वर्ल्ड डिझाईन डे
महत्त्वाच्या घटना :
  • 1854: पुणे ते मुंबईला उपग्रहाद्वारे पहिला संदेश पाठवण्यात आला
  • 1908: लंडनमध्ये चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1941: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने अथेन्समध्ये प्रवेश केला.
  • 1961: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 1974: अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 10,000 लोकांनी निदर्शने करून राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
  • 1992: बेट्टी बूथरॉइड ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
  • 1999: एकाच रॉकेटने अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात विकसित करण्यात आली.
  • 2005: एअरबस A-380 विमानाचे पहिले प्रात्यक्षिक.
  • 2018 : उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात पानमुनजोम घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली, कोरियन संघर्ष संपवण्याचा त्यांचा हेतू अधिकृतपणे घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1791 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 1872)
  • 1822 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 जुलै 1885)
  • 1883 : भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ ‘मामा वरेरकर’ – नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1964)
  • 1912 : ‘जोहरा सेहगल’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचा जन्म. (मृत्यू: 10 जुलै 2014)
  • 1920 : ‘डॉ. मणिभाई भीमभाई देसाई’ – महात्मा गांधींचे अनुयायी यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1993)
  • 1927 : ‘कोरेटा स्कॉट किंग’ – मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी यांचा जन्म.
  • 1976 : ‘फैसल सैफ’ – पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1521 : ‘फर्डिनांड मॅगेलन’ – पोर्तुगीज शोधक यांचे निधन.
  • 1980 : ‘विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील’ – पद्मश्री सहकारमहर्षी यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1901)
  • 1882 : ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1803)
  • 1989 : ‘कोनोसुके मात्सुशिता’ – पॅनासोनिक कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1894)
  • 1898 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1853)
  • 2002 : ‘रुथ हँडलर’ – बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1916)
  • 2017 : ‘विनोद खन्ना’ – भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1946)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२६ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 08:30:22 पर्यंत, चतुर्दशी – 28:52:21 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 06:27:53 पर्यंत, रेवती – 27:39:31 पर्यंत
  • करण-वणिज – 08:30:22 पर्यंत, विष्टि – 18:43:21 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वैधृति – 08:40:42 पर्यंत, विश्कुम्भ – 28:34:12 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:16
  • सूर्यास्त- 18:57
  • चन्द्र-राशि-मीन – 27:39:31 पर्यंत
  • चंद्रोदय- 29:30:59
  • चंद्रास्त- 17:33:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • एलियन डे Alien Day
  • जागतिक बौद्धिक संपदा दिवस World Intellectual Property Day
  • राष्ट्रीय लहान मुले आणि पाळीव प्राणी दिवस National Kids And Pets Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1755 : रशियातील जुन्या प्रसिद्ध मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
  • 1841 : द बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची मुंबईत स्थापना झाली आणि ती प्रथम रेशमी कापडावर प्रकाशित झाली
  • 1903 : ऍटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
  • 1933 : गेस्टापो, नाझी जर्मनीच्या गुप्त पोलिस दलाची स्थापना झाली.
  • 1962 : नासाचे ‘रेंजर-4’ चंद्रावर कोसळले.
  • 1964 : टांगानिका झांझिबारमध्ये विलीन होऊन टांझानिया देशाची निर्मिती झाली.
  • 1970 : जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करणारे अधिवेशन अंमलात आले.
  • 1973 : अजित नाथ रे भारताचे 14 वे सरन्यायाधीश बनले.
  • 1986 : रशियातील चेरनोबिल येथील अणुभट्टीत मोठा स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात सोडले.
  • 1989 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 1,300 लोकांचा मृत्यू झाला, 12,000 लोक जखमी झाले आणि 80,000 बेघर झाले.
  • 1995 : भारताच्या निशा मोहोता हिने आशियाई प्रादेशिक बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला मास्टर विजेतेपद पटकावले.
  • 2005 : आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाखाली सीरियाने लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1479 : ‘वल्लभाचार्य’ – पुष्टिमार्गाचे संस्थापक यांचा जन्म.
  • 1900 : ‘चार्लस रिश्टर’ – रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1985)
  • 1908 : ‘सर्व मित्र सिकरी’ – भारताचे 13 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 24 सप्टेंबर 192)
  • 1942 : ‘मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी’ – भारतीय मोल्वी आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2014)
  • 1948 : ‘मौशमी चटर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘मेलानिया ट्रम्प’ – अमेरिकेचे 45वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1920 : ‘श्रीनिवास रामानुजन’ – थोर भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 डिसेंबर 1887)
  • 1976 : त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ – साहित्यिक चिंतामणी यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1930)
  • 1987 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
  • 1999 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 20 जून 1920)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२५ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 11:47:42 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 08:54:29 पर्यंत
  • करण-तैतुल – 11:47:42 पर्यंत, गर – 22:12:12 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-इंद्रा – 12:30:00 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 18:57
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 28:48:59
  • चंद्रास्त- 16:32:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • जागतिक मलेरिया दिवस World Malaria Day
  • आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस International Delegates Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1859 : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
  • 1901 : स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
  • 1953 : डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
  • 1966 : भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला.
  • 1982 : भारतात दूरदर्शनवर पहिल्यांदा रंगीत प्रसारण सुरू झाले यात रामायण, महाभारत अशा मालिका होत्या.
  • 1983: पायोनियर-10 अंतराळयान सूर्यमालेतून बाहेर गेले.
  • 1989 : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या 330,000 तमिळांना मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
  • 2000: सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त अलमट्टी धरणाची उंची 519.6 मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली.
  • 2008 : जागतिक मलेरिया दिन
  • 2015 : नेपाळमध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपात 9100 लोकांचा मृत्यू
  • 2022 : ट्वीटरने एलोन मस्क कडून 44 अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1214 : लुई (नववा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 1270)
  • 1874 : ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ – रेडिओचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1937)
  • 1918 : ‘शाहू मोडक’ – हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1993)
  • 1940 : ‘अल पचिनो’ – हॉलिवूडमधील अभिनेता यांचा जन्म.
  • 1961 : ‘करण राझदान’ – अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1961 : ‘दिनेश डिसोझा’ – भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
  • 1964 : ‘आर. पी. एन. सिंग’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1999 : ‘पंढरीनाथ रेगे’ – साहित्यिक यांचे निधन.
  • 2002 : ‘इंद्रा देवी’ – लाटव्हियाच्या योगशिक्षिका यांचे निधन. (जन्म: 12 मे 1899)
  • 2003 : ‘लिन चॅडविक’ – ब्रिटिश शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 24 नोव्हेंबर 1914)
  • 2005 : ‘स्वामी रंगनाथानंद’ – भारतीय साधू आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म: 15 डिसेंबर 1908)
  • 2023 : ‘प्रकाशसिंग बादल’ – भारतीय राजकारणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२४ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 14:35:36 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 10:50:29 पर्यंत
  • करण-बालव – 14:35:36 पर्यंत, कौलव – 25:15:49 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-ब्रह्म – 15:55:11 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 18:57
  • चन्द्र-राशि-कुंभ – 27:26:40 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:08:59
  • चंद्रास्त- 15:31:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय पंचायत राज दिवस
  • बहुपक्षीयता आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस International day of multilateralism & diplomacy for peace
महत्त्वाच्या घटना :
  • 1674 : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
  • 1717 : खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
  • 1800 : अमेरिकेत जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालय ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ उघडली.
  • 1967 : रशियन अंतराळयान सोयुझ-1 क्रॅश. अंतराळवीर व्लादिमीर कोमारोव यांचे निधन.
  • 1968 : मॉरिशस संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1970 : गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
  • 1990 : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
  • 1993 : दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 427 दहशतवाद्यांनी अपहरण केले. सर्व 141 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
  • 2013 : ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून 1129 जणांचा बळी गेला आणि 2500 जण जखमी झाले.
  • 2017 : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 25 CRPF जवान शहीद झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1889 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1952)
  • 1896 : ‘रघुनाथ वामन दिघे’ – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1980)
  • 1910: ‘राजा परांजपे’ – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1979)
  • 1929 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 2006)
  • 1942 : ‘जॉर्ज वेला’ – माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष
  • 1942 : ‘बार्बारा स्ट्रायसँड’ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1970 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
  • 1971 : ‘कुमार धरमसेना’ – श्रीलंका चे क्रिकेट खेळाडू व पूर्व कप्तान.
  • 1973 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
  • 1987 : ‘वरुण धवन’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1993 : 73 वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1942 : ‘दीनानाथ मंगेशकर’ – नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 29 डिसेंबर 1900)
  • 1960 : लक्ष्मण बळवंत तथा ‘अण्णासाहेब भोपटकर’ – नामवंत वकील यांचे निधन.
  • 1972 : ‘जामिनी रॉय’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1887)
  • 1974 : ‘रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1908)
  • 1994 : उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: 28 मे 1903)
  • 1999 : ‘सुधेंदू रॉय’ – चित्रपट कला दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2014 : भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1968)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२३ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 16:46:54 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 12:08:56 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:46:54 पर्यंत, भाव – 27:46:12 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 18:50:40 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 27:30:00
  • चंद्रास्त- 14:31:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय सहलीचा दिवस International Picnic Day
  • इंग्रजी भाषा दिन English Language Day
  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन World Book & Copyright Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1635 : बोस्टन लॅटिन स्कूल, अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा, स्थापन झाली.
  • 1818 : ब्रिटीश अधिकारी मेजर हॉल यांना कर्नल प्रायर यांनी रायगड किल्ल्यावर गस्त घालण्यासाठी पाठवले.
  • 1984 : वैज्ञानिकांना एड्सचा विषाणू सापडला.
  • 1990 : नामिबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1995 : जागतिक पुस्तक दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 2005 : मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1564 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचा जन्म. (निधन: 23 एप्रिल 1616)
  • 1791 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1868)
  • 1858 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1947)
  • 1858 : ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ – समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1922)
  • 1873 : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1944)
  • 1897 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे 14 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 डिसेंबर 1972)
  • 1938 : ‘एस. जानकी’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
  • 1968 : ‘किशोरी शहाणे’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1969 : ‘मनोज बाजपेयी’ – अभिनेते मनोज बाजपेयी यांचा जन्म.
  • 1977 : ‘काल पेन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1616 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1564)
  • 1850 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म: 7 एप्रिल 1770)
  • 1926 : ‘हेन्री बी. गुप्पी’ – ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 डिसेंबर 2854)
  • 1958 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1871)
  • 1968 : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1902)
  • 1986 : ‘जिम लेकर’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1922)
  • 1992 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 2 मे 1921)
  • 1997 : ‘डेनिस कॉम्पटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 मे 1918)
  • 2000 : ‘बाबासाहेब भोपटकर’ – 40 वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे यांचे निधन.
  • 2001 : ‘जयंतराव टिळक’ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1921)
  • 2007 : ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1931)
  • 2013 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search