आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – पूर्ण रात्र पर्यंत
- नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 18:53:26 पर्यंत
- करण-गर – 18:11:52 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शुभ – 06:41:33 पर्यंत, शुक्ल – 29:51:34 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:04
- सूर्यास्त- 19:06:52
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 24:04:59
- चंद्रास्त- 10:28:00
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस
- आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1498 : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरावर आला.
- 1804 : नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
- 1912 : पुंडलिक हा संपूर्ण भारतात बनलेला मूकपट प्रदर्शित झाला.
- 1938 : प्रभातचा गोपाळकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा, मुंबई येथे प्रदर्शित झाला.
- 1940 : प्रभातचा ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट एकाच दिवशी, मुंबई व पुणे या ठिकाणी प्रदर्शित झाला.
- 1972 : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
- 1974 : भारताने पोखरण-1 परमाणू परीक्षण केले.
- 1990 : फ्रान्सच्या TGV रेल्वेने 515.3 किमी/ताशी वेगाने नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
- 1991: हेलन शर्मन रशियाच्या सोयुझमध्ये अंतराळात चालणारी पहिली ब्रिटिश महिला ठरली.
- 1995 : स्थानिक ठिकाणचे 5000 रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
- 1995 : अलेन ज्युपे फ्रान्सचे पंतप्रधान झाले.
- 1998 : पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले.
- 2009 : श्रीलंकेच्या सरकारने LTTE चा पराभव केला, जवळजवळ 26 वर्षांचे युद्ध संपवले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1048 : ‘ओमर खय्याम’ – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1131)
- 1872 : ‘बर्ट्रांड रसेल’ – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1970)
- 1913 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते, नेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1998)
- 1920 : ‘पोप जॉन पॉल (दुसरा)’ – यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2005)
- 1933 : ‘एच. डी. देवेगौडा’ – भारताचे 11 वे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1979 : ‘जेन्स् बर्गेंस्टन’ – माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1988 : ‘सोनाली कुलकर्णी’ – मराठी अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1808 : ‘एलीया क्रेग’ – बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते यांचे निधन.
- 1846 : ‘बाळशास्त्री जांभेकर’ – मराठी पत्रकारितेचे पितामह यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1812)
- 1966 : ‘पंचानन माहेश्वरी’ – वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1904)
- 1997 : ‘कमलाबाई कामत’ तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1901)
- 1999 : ‘रामचंद्र सप्रे’ – पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते यांचे निधन.
- 2009 : ‘वेल्लुपल्ली प्रभाकरन’ – एल. टी. टी. ई. चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1954)
- 2012 : ‘जय गुरूदेव’ – भारतीय धार्मिक नेते यांचे निधन.
- 2017 : ‘रीमा लागू’ – भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 21 जुन 1958)
- 2020 : ‘रत्नाकर मतकरी’ – मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.