Category Archives: दिनविशेष

१८ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-तृतीया – 18:57:59 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 15:49:04 पर्यंत
  • करण-वणिज – 07:58:22 पर्यंत, विष्टि – 18:57:59 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-सिद्ध – 17:20:39 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय- 06:50
  • सूर्यास्त- 17:58
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 20:16
  • चंद्रास्त- 09:14
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
  • १७३८: फ्रांस व ऑस्ट्रिया या दोन देशांदरम्यान शांती करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या.
  • १७७२: पेशवा माधवराव प्रथम यांचे छोटे बंधू नारायणराव ह्याने पेशवा पदाची सूत्रे सांभाळली होती.
  • १८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
  • १८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.
  • १९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
  • १९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
  • १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
  • १९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.
  • १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
  • १९५६: मोरक्को या देशाने स्वतंत्रता प्राप्त केली होती.
  • १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
  • १९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
  • १९७२: वाघाची भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून निवड करण्यात आली होती.
  • १९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
  • २००३: आर्नोल्ड श्वार्णजेगर याची आजच्याच दिवशी कैलिफोर्निया या अमेरिकेतील प्रांताचा गवर्नर म्हणून निवड करण्यात आली होती.
  • २००५: प्रधानमंत्री महेंद्र राजपक्षे यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.
  • २०१३: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर मावेन नामक यान पाठविले होते.
  • २०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला
  • २०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
  • २०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.
  • २०१७: आजच्याच दिवशी भारताची मानुषी छील्लर हिने जागतिक सुंदरी हा पुरस्कार प्राप्त केला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९८: प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,
  • १९१५: टेनिस खेळातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ग्रैंड स्लाम जिंकणारी प्रथम दक्षिणा अमेरिका खंडातील  महिला खेळाडू अनिता लीजना हिचा जन्म झाला होता.
  • १९२२: रशियन कवी युरी नोरोजोव यांचा जन्म झाला होता.
  • १९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
  • १९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)
  • १९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)
  • १९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५)
  • १९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य (मृत्यू: ? ? १९८६)
  • १९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७७२: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)
  • १८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)
  • १८३५: इंग्लिश अधिकारी व इतिहासकार कर्नल टॉड यांचे निधन झाले होते.
  • १८९३: ब्रिटीश पुरातत्वशास्त्री कनिंघम यांचे निधन झाले .
  • १९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
  • १९६२: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५)
  • १९७८: प्रसिध्द बंगाली निर्देशक व अभिनेते धीरेंद्र गांगुली यांचे निधन झाले होते.
  • १९९३: पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • १९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: ? ? ????)
  • १९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्‍याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक (जन्म: ? ? ????)
  • १९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ’कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी (जन्म: ? ? ????)
  • २००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली. (जन्म: ? ? १९१९ – खांडवा, मध्य प्रदेश)
  • २००६: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
  • २०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)
  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.
  • २०१७: अशोचक्र सन्मानित भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो शहीद ज्योतीप्रकाश निराला यांचे निधन झाले होते.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१७ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि- द्वितीया – 21:08:21 पर्यंत
  • नक्षत्र- रोहिणी – 17:22:57 पर्यंत
  • करण- तैतुल – 10:26:48 पर्यंत, गर – 21:08:21 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- शिव – 20:20:14 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:49
  • सूर्यास्त- 17:58
  • चन्द्र राशि- वृषभ – 28:31:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 19:15:59
  • चंद्रास्त- 08:09:00
  • ऋतु- हेमंत

जागतिक दिवस:

  • जागतिक अपस्मार जागरुकता दिन.
महत्त्वाच्या घटना:
  • १५२५: मुघल शासक बाबर याने पाचव्यांदा भारत जिंकण्याच्या उद्देशाने भारतात प्रवेश केला.
  • १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
  • १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
  • १९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.
  • १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
  • १९६६: भारताच्या रिता फरिया हिने जागतिक सुंदरी हा विश्व पुरस्कार जिंकला होता, हा पुरस्कार जिंकणारी ती आशिया खंडातील महिला होती.
  • १९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
  • १९७०: सेवियत अंतराळ यान ‘ लुनाखोद -१’ चंद्राच्या भूमीवर उतरले होते.
  • १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर
  • १९९२: देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ’जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड
  • १९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड
  • १९९४: रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.
  • १९९९: आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाला युनेस्को ने मान्यता दिली होती.
  • २००५: राष्ट्रपती पदासाठी श्रीलंका येथे निवडणुका पार पडल्या होत्या.
  • २००६: अमेरिकेच्या सिनेट ने आजच्याच दिवशी भारत -अमेरिका परमाणु तहाला मंजुरी दिली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ०००९: व्हेस्पासियन – रोमन सम्राट (मृत्यू: २३ जून ००७९)
  • १७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)
  • १७५५: लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)
  • १९००: सरोजिनी नायडू यांच्या पुत्री पद्मजा नायडू यांचा जन्म झाला होता.
  • १९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)
  • १९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)
  • १९२२: अमेरिका येथील शरीर विज्ञानशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त स्टेनली कोहेन यांचा जन्म झाला होता.
  • १९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
  • १९२५: रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: २ आक्टोबर १९८५)
  • १९३२: शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.  वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)
  • १९३८: रत्‍नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते
  • १९४२: अमेरिकन चित्रपटसृष्टीचे प्रसिध्द निर्देशक मार्टिन स्कोर्सीस यांचा जन्म झाला होता.
  • १९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.
  • १९२८: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २८ जानेवारी १८६५)
  • १९३१: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (जन्म: ६ डिसेंबर १८५३)
  • १९३५: गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)
  • १९६१: कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)
  • २००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)
  • २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)
  • २०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)
  • २०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.
  • २०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.
  • २०१६: आसाम, जम्मू -काश्मीर व अरुणाचल प्रदेश या राज्यांचे पूर्व राज्यपाल श्रीनिवास कुमार सिन्हा यांचे निधन झाले होते.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१६ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-प्रथम – 23:52:27 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 19:28:37 पर्यंत
  • करण-बालव – 13:24:01 पर्यंत, कौलव – 23:52:27 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-परिघ – 23:46:48 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय- 06:49
  • सूर्यास्त- 17:58
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 18:18:59
  • चंद्रास्त- 07:00:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Day for Tolerance
महत्त्वाच्या घटना:
  • १८२१: कनाडा या देशात नागरिकता कायदा आणखी कडक करण्यात आला होता.
  • १८२१: मेक्सिको या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.
  • १८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता ’हेलिऑस’ वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
  • १८७०: ओकलाहोमा आजच्याच दिवशी अमेरिकेचे ४६ वे प्रांत बनले होते.
  • १८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन
  • १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
  • १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ’फेडरल रिझर्व्ह’ सुरू झाली.
  • १९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
  • १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
  • १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
  • १९६५: वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.
  • १९७५: पापुआ न्यू गिनी या देशाने ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.
  • १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
  • १९९५: भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद व टोबैगो या देशाचे आजच्याच दिवशी पंतप्रधान बनले होते.
  • १९९६: ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड
  • १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
  • १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधी ल ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
  • २०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर
  • २००६: पाकिस्तान ने मध्यम अंतराच्या गोरी- व्ही क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.
  • २००७: भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले होते.
  • २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्‍न’ हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
  • २०१४: इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)
  • १८३६: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (मृत्यू: २० जानेवारी १८९१)
  • १८४६: उर्दूचे प्रसिध्द शायर अकबर इलाहाबादी यांचा जन्म झाला होता.
  • १८८०: ब्रिटीश लेखक , कवी तसेच नाटककार अल्फ्रेड नॉयस यांचा जन्म झाला होता.
  • १८९४: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)
  • १८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)
  • १९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)
  • १९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)
  • १९१७: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)
  • १९२०: अमेरिका येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार सैनमन यांचा जन्म झाला होता.
  • १९२२: पोर्तुगाल येथील प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते लेखक जोसे सरामैगो यांचा जन्म झाला होता.
  • १९२२: विएतनाम या देशाचे राजनेते व प्रसिध्द राजनीतिज्ञ होंग मिन्ह चिन्ह यांचा जन्म झाला होता.
  • १९२७: डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’ क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
  • १९२८: डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान (मृत्यू: २९ जुलै २००६)
  • १९३०: मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (मृत्यू: ११ जून १९९७)
  • १९३१: भारतीय क्रिकेट पंच आर रामचंद्र राव यांचा जन्म झाला होता.
  • १९६३: मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
  • १९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)
  • १९७३: पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५७: पासी जातीची वीरांगना उदा देवी यांचा मृत्यू झाला होता.
  • १९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. (जन्म: ? ? १८८८ – तळेगाव ढमढेरे, पुणे)
  • १९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)
  • १९५०: डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे एक संस्थापक (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)
  • १९६०: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (१ फेब्रुवारी १९०१)
  • १९६७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (जन्म: १४ जुलै १९१७)
  • २००६: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १९१२)
  • २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१४ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-त्रयोदशी – 09:45:26 पर्यंत, चतुर्दशी – 30:21:14 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 24:33:29 पर्यंत
  • करण-तैतिल – 09:45:26 पर्यंत, गर – 20:03:32 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-सिद्वि – 11:29:20 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:48
  • सूर्यास्त- 17:59
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 16:40:00
  • चंद्रास्त- 29:53:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • बाल दिन (भारत)
महत्त्वाच्या घटना:
  • १६८१: आजच्याच दिवशी ईस्ट कंपनीने बंगाल ला वेगळे प्रांत बनविण्याची घोषणा केली होती.
  • १७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
  • १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
  • १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना
  • १९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
  • ???? : दर वर्षी या दिवशी नेहरू पुरस्कार देण्यात येतात.
  • १९७३: आजच्याच दिवशी ब्रिटेन राजघराण्यातील राजकुमारी ‘ऐन’ ने इतिहासत प्रथमच एका सामान्य व्यक्तीशी विवाह केला होता, तत्पूर्वी असे कधीही घडले न्हवते.
  • १९७५: स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.
  • १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • २००२: तत्कालीन चीनचे राष्ट्रपती जियांग जेमिन यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.
  • २००६: भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांतील विदेश सचिवांनी आजच्याच दिवशी दिल्ली येथे बैठकीत आतंकवाद विरोधी कार्यपध्दती विकसित करण्याचे धोरण ठरविले.
  • २००७: डेन्मार्क या देशाचे पंतप्रधान आंद्रे फाग यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
  • २०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६५०: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ८ मार्च १७०२)
  • १७६५: रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
  • १७१९: लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक आणि जगप्रसिद्ध वूल्फगँग मोत्झार्टचे वडील (मृत्यू: २८ मे १७८७)
  • १८६३: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
  • १८८१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)
  • १८८९: पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न [१९५५] (मृत्यू: २७ मे १९६४)
  • १८९१: बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)
  • १९०४: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जुलै १९९५)
  • १९०७: हिंदी भाषेचे प्रसिध्द भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांचा जन्म झाला होता.
  • १९१७: प्रसिध्द हिंदी साहित्यकार गजानन मुक्तिबोध यांचा जन्म झाला होता.
  • १९१८: रघुवीर मूळगावकर – चित्रकार (मृत्यू: ३० मार्च १९७६)
  • १९१९: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (मृत्यू: २६ आक्टोबर १९९१)
  • १९२२: ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली – संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस
  • १९२२: अमेरिकेची अभिनेत्री वेरोनिका लेक हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९२४: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (मृत्यू: १० आक्टोबर २००८)
  • १९२६: उदारवादी धोरणाचे पुरस्कर्ते व मुक्त आर्थिक व्यवहार नीतीचे खंदे समर्थक पिलू मोदी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९३५: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)
  • १९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)
  • १९७१: अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज
  • १९७४: हृषिकेश कानिटकर – क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९१५: बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (जन्म: ५ एप्रिल १८५६)
  • १९६७: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (जन्म: ३१ आक्टोबर १८९५)
  • १९७१: नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)
  • १९७७: अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (जन्म: १ सप्टेंबर १८९६)
  • १९९३: डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार (जन्म: २७ एप्रिल १९२०)
  • २०००: प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
  • २०१०: भारताचे प्रसिध्द अर्थशास्त्री लक्ष्मीचंद जैन यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते.
  • २०१३: प्रसिध्द बाल साहित्यकार व संपादक हरिकृष्ण देवसरे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
  • २०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१३ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-द्वादशी – 13:03:25 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 27:11:41 पर्यंत
  • करण-बालव – 13:03:25 पर्यंत, कौलव – 23:25:45 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 15:24:39 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:47
  • सूर्यास्त- 17:59
  • चन्द्र-राशि-मीन – 27:11:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 15:56:59
  • चंद्रास्त- 28:48:59
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
  • १८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
  • १९१३: रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक
  • १९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
  • १९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
  • १९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
  • १९६८: पाकिस्तान मध्ये आजच्या दिवशी झुल्फिकार अली भुट्टो यांना अटक करण्यात आली होती.
  • १९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
  • १९७१: अमेरीकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे पाठविलेले यान मरिनर -९ आजच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचले होते.
  • १९७५: जागतिक आरोग्य संघटनेने आजच्याच दिवशी आशिया खंडातून देवी या रोगाचा समूळ नायनाट झाल्याची घोषणा केली होती.
  • १९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
  • १९९७: सुरक्षा परिषदेने इराक या देशावर यात्रेवर निर्बंध लावले होते.
  • १९९८: चीन च्या विरोधाला झुगारून आजच्याच दिवशी दलाई लामा व तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बील क्लिंटन यांनी एकमेकांची भेट घेतली होती.
  • २००४: तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आजच्याच दिवशी फिलीस्तीन देशाच्या निर्मितीकरिता चार वर्षांचा कार्यकाल ठरविला होता.
  • २००८: ‘असम गणपरीषद ‘ संघटन आजच्याच दिवशी राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन नावाच्या पक्षात समाविष्ट झाले होते.
  • २००९: झारखंड या राज्यात आजच्याच दिवशी नक्सलवादी संघटनेने नेते रामचंद्र सिंह यांच्या समवेत ईतर सात लोकांचे अपहरण केले होते.
  • २०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७८०: महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (मृत्यू: २७ जून १८३९)
  • १८५०: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)
  • १८५५: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: १४ जून १९१६)
  • १८७३: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (मृत्यू: १० मार्च १९५९)
  • १८९८: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६९)
  • १९१७: गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)
  • १९१७: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (मृत्यू: १ मार्च १९८९)
  • १९५४: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.
  • १९६७: प्रसिध्द भारतीय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९६८: हिंदी चित्रपट सृष्टी तील प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५८९: लाहोर या ठिकाणी भगवान दास यांचे निधन झाले होते.
  • १७४०: कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी. त्यांचा ’हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: ? ? १६७४)
  • १९५६: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल))
  • २००१: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)
  • २००२: ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते (जन्म: ? ? १९२५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१२ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-एकादशी – 16:06:51 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 07:52:49 पर्यंत, उत्तराभाद्रपद – 29:40:52 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:06:51 पर्यंत, भाव – 26:37:26 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-हर्शण – 19:08:39 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:46
  • सूर्यास्त-17:59
  • चन्द्र राशि-मीन
  • चंद्रोदय-15:16:59
  • चंद्रास्त-27:47:00
  • ऋतु-हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
  • १९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
  • १९२५: अमेरिका व इटली या दोन देशांनी आजच्याच दिवशी शांतता करारावर स्वाक्षरी केली होती.
  • १९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
  • १९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
  • १९३६: केरळ येथील मंदिरे सर्व हिंदू धर्मियांकारिता खुले करण्यात आले होते.
  • १९५६: आजच्याच दिवशी मोरक्को, सुदान आणि ट्युनिशिया हे देश संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेत समाविष्ट झाले होते.
  • १९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९६७: आजच्याच दिवशी इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.
  • १९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
  • १९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. १५ सप्टेंबर २००२ पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.
  • २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस ’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.
  • २०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
  • २००३: ’शांघाय ट्रान्सरॅपिड’ या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • २०१५: आजच्याच दिवशी लेबेनॉन या देशांत आतंकवादी हल्ल्यात ४३ जन मृत्यमुखी पडले होते ह्या हल्ल्याची जबाबदारी आई एस आई संघटनेने स्वीकारली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१७: बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)
  • १८६६: चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९२५)
  • १८८०: पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)
  • १८८९: रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)
  • १८९६: डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (मृत्यू: २७ जुलै १९८७)
  • १९०४: श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: १ एप्रिल १९८९)
  • १९४०: अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८६१: महान स्वतंत्रता सेनानी व समाज सुधारक मदन मोहन मालवीय यांचा मृत्यू झाला होता.
  • १९४६: पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)
  • १९५९: केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले. (जन्म: ९ मे १८८६)
  • १९५९: सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)
  • १९६९: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १३ नोव्हेंबर १८९८)
  • १९९७: वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी (जन्म: ? ? ????)
  • २००५: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (जन्म: २१ जानेवारी १९२४)
  • २००७: भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)
  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

११ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि- दशमी – 18:48:39 पर्यंत
  • नक्षत्र- शतभिष – 09:40:54 पर्यंत
  • करण- तैतुल – 07:59:40 पर्यंत, गर – 18:48:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- व्याघात – 22:35:41 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:46
  • सूर्यास्त- 17:59
  • चन्द्र राशि- कुंभ – 26:22:18 पर्यंत
  • चंद्रोदय- 14:37:59
  • चंद्रास्त- 26:48:00
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १६७५: गुरु गोविंद सिंह आजच्याच दिवशी शीख धर्माचे गुरु म्हणून नियुक्त झाले होते.
  • १९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.
  • १९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
  • १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.
  • १९५०: आजच्याच दिवशी भारतातील चित्तरंजन येथोल रेल्वे कारखान्यात भारतातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन बनवण्यात आले होते .
  • १९५६: भारताची राजधानी दिल्ली आजच्याच दिवशी केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित झाली होती.
  • १९५६: भाषेच्या आधारावर मध्य प्रदेश राज्याची आजच्या दिवशी निर्मिती झाली होती.
  • १९५८: तत्कालीन सेवियत संघाने आजच्याच दिवशी अणु परीक्षण केले होते.
  • १९६२: कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.
  • १९६६: आजच्याच दिवशी पंजाब या राज्यापासून हरियाणा विलग करण्यात आले होते व स्वतंत्र हरियाणा राज्य म्हणून दर्जा मिळाला होता.
  • १९७३: आजच्याच दिवशी म्हैसूर संस्थानचे नाव बदलवून कर्नाटक असे करण्यात आले होते.
  • १९७८: मॉमून अब्दुल गयूम आजच्याच दिवशी मालदीव येथील राष्ट्रपती झाले होते.
  • १९७५: अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८१: अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • २०००: ऑस्ट्रिया या देशात आजच्या दिवशी भूसुरंग मधून जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग लागून अपघाती दुर्घटना घडली होती यात १८० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
  • २००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)
  • १८५१: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (मृत्यू: ४ जानेवारी १९०८ – मुंबई)
  • १८७२: ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (मृत्यू: २७ आक्टोबर १९३७)
  • १८८६: श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)
  • १८८८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (१९९२) (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)
  • १८८८: जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (मृत्यू: १९ मार्च १९८२)
  • १८८९: स्वतंत्रता सेनानी जमनलाल बजाज यांचा जन्म झाला होता.
  • १९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)
  • १९११: गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू – ’लोककवी’ (मृत्यू: ७ मे १९९१)
  • १९२४: रुसी शेरियर मोदी – कसोटी (मृत्यू: १७ मे १९९६)
  • १९२६: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (मृत्यू: २९ जुलै २००३)
  • १९३६: माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
  • १९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.
  • १९४२: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)
  • १९४३: भारतीय परमाणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा जन्म झाला होता.
  • १९६२: डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४४: कन्नड भाषेचे कवी व लेखक कुप्पाली पुटप्पा यांचा मृत्यू झाला होता.
  • १९७१: प्रसिध्द चित्रपट निर्देशक देवकी बोस यांचा मृत्यू झाला होता.
  • १९८२: कवी व गीतकार उमाकांत मालवीय यांचा मृत्यू झाला होता.
  • १९८४: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (जन्म: १९ डिसेंबर १८९९)
  • १९९४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (जन्म: २९ डिसेंबर १९०४)
  • १९९७: यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते (जन्म: ? ? ????)
  • १९९९: अरविंद मेस्त्री – शिल्पकार (जन्म: ? ? ????)
  • २००४: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
  • २००५: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
  • २००८: प्रसिध्द हिंदी व राजस्थानी भाषेचे कवी कन्हैय्यालाल सेठिया यांचे निधन झाले होते.

pacer height=”20px”]


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१० नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि- नवमी – 21:03:23 पर्यंत
  • नक्षत्र- धनिष्ठा – 11:00:21 पर्यंत
  • करण- बालव – 09:59:23 पर्यंत, कौलव – 21:03:23 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- घ्रुव – 25:41:20 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:45
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र राशि- कुंभ
  • चंद्रोदय- 13:58:59
  • चंद्रास्त- 25:48:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला. त्यावेळी अफझलखान ’दगा ऽऽऽ दगा ऽऽऽ …’ असे ओरडला.
  • १६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले
  • १८८५: गोटलिएब डीमेलर ने आजच्याच दिवशी जगातील पहिली मोटर सायकल जगासमोर ठेवली होती.
  • १९५०: अमेरिकेचे लेखक विलियम फोक्नर यांना साहित्याकरिता नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • १९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.
  • १९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.
  • १९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.
  • १९८९: जर्मनी या देशात बर्लिन ची भिंत पाडण्याचे कार्य आजच्याच दिवशी सुरु करण्यात आले होते.
  • १९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
  • १९९५: नायजेरिया या देशात पर्यावरण प्रेमी कार्यकर्ता व नाट्यकार केन सारो विवो यांना आठ लोकां समवेत तेथील सरकारने आजच्याच दिवशी फासीवर चढविले होते.
  • १९९७: आजच्याच दिवशी चीन व रशिया या दोन देशादरम्यान घोषणा पत्र कराराद्वारे सीमा विवाद संपुष्टात आला होता.
  • १९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर
  • २०००: गंगा – मेकांग संपर्क परियोजनेचे कार्यास सुरुवात आजच्याच दिवशी करण्यात आले होते.
  • २००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड
  • २००४: झेंगझोऊ हे चीनचे सर्वात प्राचीन आठवे शहर म्हणून घोषित करण्यात आले होते.
  • २००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या
  • २००८: भारतीय क्रिकेट संघाने आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करीत बॉर्डर – गावस्कर चषक २-० ने जिंकला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७५०: म्हैसूर राज्याचा शासक टिपू सुलतान याचा जन्म झाला होता.
  • १८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)
  • १८४८: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)
  • १८५१: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (मृत्यू: १९ जुलै १८८२)
  • १९०४: कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)
  • १९०९: अमेरिका येथील गीतकार व संगीतकार जॉनी मार्क्स यांचा जन्म झाला होता.
  • १९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)
  • १९२५: रिचर्ड बर्टन – अभिनेता (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)
  • १९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.
  • १९५२: सुनंदा बलरामन ऊर्फ सानिया – लेखिका
  • १९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.
  • २०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १२४०: प्रसिध्द अरबी सुफी कवी इबने अरबी यांचा मृत्यू झाला.
  • १६५९: अफझल खान – आदिलशहाचा सेनापती (जन्म: ????)
  • १९०८: भारतीय स्वतंत्रता सेनानी कनाईलाल दत्त यांचे निधन झाले.
  • १९२०: दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक (जन्म: १४ आक्टोबर २००४)
  • १९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.
  • १९३१: प्रसिध्द हिंदी साहित्यकार गंगाप्रसाद अग्निहोत्री यांचे निधन झाले.
  • १९३८: मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ मे १८८१)
  • १९४१: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक (जन्म: ३१ जुलै १८७२)
  • १९८२: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (जन्म: १९ डिसेंबर १९०६)
  • १९७०: फ्रांस चे पूर्व राष्ट्रपती चार्ल्स द ग्वाल यांचा मृत्यू झाला.
  • १९९५: प्रसिध्द शायर फजल ताबिश यांचे निधन झाले.
  • १९९६: माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’वंदे मातरम’, ’सीता स्वयंवर’, ’मायाबाजार’, ’गुळाचा गणपती’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. ’वाजई पावा गोविंद’, ’त्या चित्तचोरट्याला’, ’अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. (१६ मे १९२६)
  • २००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)
  • २००९: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार (जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

९ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-अष्टमी – 22:47:22 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 11:48:21 पर्यंत
  • करण-विष्टि – 11:27:09 पर्यंत, भाव – 22:47:22 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-वृद्वि – 28:22:37 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:45
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र-राशि-मकर – 23:28:22 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:18:00
  • चंद्रास्त- 24:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १५८०: स्पेन या देशाच्या सेनेने आयर्लंड देशावर आक्रमण केले होते.
  • १७९४: तत्कालीन रशियाच्या सेनेने पोलंडची राजधानी वारसा ताब्यात घेतली होती.
  • १९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
  • १९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
  • १९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
  • १९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
  • १९४९: कोस्टारिका या देशाने संविधानाचा अंगीकार केला होता.
  • १९५३: कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
  • १९५४: दार्जीलिंग या थंड हवेच्या ठिकाणी हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
  • १९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ’फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.
  • १९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
  • १९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
  • १९८९: ब्रिटनने मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातली होती.
  • १९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान
  • २०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • २०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
  • २०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती.
  • २००१: पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र या जागतिक संस्थेच्या महासभेला संबोधित केले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४८३: मार्टिन ल्युथर यांचा जन्म झाला होता.
  • १८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)
  • १८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)
  • १८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)
  • १८७७: सर मुहम्मद इक्‍बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)
  • १८८९: प्रसिध्द भारतीय पत्रकार इंद्र विद्यावाचस्पती यांचा जन्म झाला होता.
  • १९०४: पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: १८ मे १९६६)
  • १९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २००२)
  • १९२४: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (मृत्यू: १० जानेवारी २००२)
  • १९३१: एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
  • १९३४: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)
  • १९३६: प्रसिध्द हिंदी कवी सुदाम पांडे यांचा जन्म झाला होता.
  • १९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)
  • १९८०: पायल रोहतगी – अभिनेत्री व मॉडेल.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९२२: फ्रांस येथील प्रसिध्द विदुषक रेमंड डेवोस यांचा जन्म झाला होता.
  • १९४०: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १८ मार्च १८६९)
  • १९४१: संस्कृत भाषेचे पंडित व विद्वान गंगानाथ झा यांचे निधन झाले होते.
  • १९५२: चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)
  • १९६२: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (जन्म: १८ एप्रिल १८५८)
  • १९६७: नटवर्य बाबूराव पेंढारकर (जन्म: ? ? १८९७)
  • १९७०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)
  • १९७७: केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’ कुंकू’, ’माझा मुलगा’,’ संत ज्ञानेश्वर’, ’संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ’एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ’वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत. (जन्म: २३ मे १८९६)
  • २०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)
  • २००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.
  • २००५: फ्रांस या देशात आजच्याच दिवशी आणीबाणी घोषित करण्यात आली होती.
  • २००५: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (जन्म: २७ आक्टोबर १९२०)
  • २०११: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ९ जानेवारी १९२२)
  • २०१३: प्रसिध्द राजस्थानी साहित्यकार विजयदान देथा यांचे निधन झाले होते.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

८ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-सप्तमी – 23:58:40 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 12:03:56 पर्यंत
  • करण-गर – 12:21:56 पर्यंत, वणिज – 23:58:40 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-शूल – 08:27:10 पर्यंत, गण्ड – 30:37:59 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय- 06:44
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 12:33:00
  • चंद्रास्त- 23:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.
  • १८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.
  • १९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
  • १९३९: म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.
  • १९४५: हॉंगकॉंग या देशांत आजच्या दिवशी भीषण जहाज अपघात होवून १५५० लोकांचा बळी गेला होता.
  • १९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.
  • १९५६: संयुक्त राष्ट्र संघाने तत्कालीन सेवियत संघाला युरोपीय देश हंगेरीतून मागे हटण्यास सांगितले.
  • १९५७: ब्रिटन ने आजच्याच दिवशी ख्रिसमस बेट समूहाजवळ परमाणु परीक्षण केले होते.
  • १९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • १९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.
  • १९९०: आयर्लंड या देशात पहिली महिला राष्ट्रपती बनली होती.
  • १९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड
  • १९९८: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान शेख मुज्जीबुर रहमान यांच्या हत्ये प्रकरणी १५ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
  • १९९९: भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर यांनी आजच्याच दिवशी एकदिवसीय खेळात ३३१ धावांची भागीदारी करीत जागतिक कीर्तीचा विश्वविक्रम  रचला होता.
  • २००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००८: भारताचे पहिले विनामानव यान अंतराळ मोहीम अंतर्गत चांद्रयान-१ आजच्याच दिवशी चंद्राच्या कक्षेत पोहचले होते.
  • २०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • २०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • १६५६: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जानेवारी १७४२)
  • १८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)
  • १८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)
  • १८९३: प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) – थायलँडचा राजा (मृत्यू: ३० मे १९४१)
  • १९०९: नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८) नरुभाऊ लिमये
  • १९१७: कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, देशातील कर्करोग संशोधनाची सुरुवात करण्याचे श्रेय डॉ. व्ही. आर. खानोलकर व डॉ. कमल रणदिवे यांना दिले जाते. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)
  • १९१९: पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते (मृत्यू: २ जून २००० – पुणे)
  • १९२०: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१४)
  • १९२२: दक्षिण आफ्रिकेचे शस्त्रक्रिया तज्ञ क्रिश्चियन बनार्ड ह्यांचा जन्म झाला होता.
  • १९२७: लालकृष्ण अडवाणी – भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते.
  • १९२९: भाजपचे वरिष्ठ नेते व पूर्व केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी ह्यांचा जन्म झाला होता.
  • १९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)
  • १९७०: मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.
  • १९७४: नारुतो चे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.
  • १९७६: ब्रेट ली – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १२२६: लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)
  • १६२७: मुघल शासक जहांगीर याचे निधन झाले होते.
  • १६६१: शीख धर्मगुरू हर राय यांचे निधन झाले होते.
  • १६७४: जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (जन्म: ९ डिसेंबर १६०८)
  • १९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.
  • १९७७: दक्षिणात्य सिनेसृष्टीचे प्रसिध्द बोमी रेड्डी नरसिम्हा रेड्डी यांचे निधन झाले होते.
  • २०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)
  • २०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)
  • २०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search