Category Archives: दिनविशेष

२९ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 18:08:09 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 08:21:31 पर्यंत
  • करण-नागा – 18:08:09 पर्यंत, किन्स्तुघ्ना – 29:13:11 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्वि – 21:21:19 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:28
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 18:25:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.
  • १८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
  • १८८६: कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
  • १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
  • १९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १२७४: संत निवृत्तीनाथ (मृत्यू: १७ जून १२९७)
  • १७३७: थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू: ८ जून १८०९)
  • १८४३: विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)
  • १८५३: मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यांपैकी एका कुटुंबात जन्म. (मृत्यू: ? ? १९१२)
  • १८६०: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवीघेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (मृत्यू: १५ जुलै १९०४)
  • १८६६: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)
  • १९२२: प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (मृत्यू: १४ जुलै २००३)
  • १९२६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)
  • १९५१: अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज
  • १९७०: राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५९७: महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)
  • १८२०: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८)
  • १९३४: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)
  • १९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४)
  • १९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक. अहिल्या आणि इतर कथा, घारापुरी (१९४८), संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत. (जन्म: ? ? ????)
  • १९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ (जन्म: ? ? ????)
  • १९९५: रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • २०००: पांडुरंग सावळाराम तथा काका वडके – शिवसेना नेते (जन्म: ? ? ????)
  • २०००: देवेन्द्र मुर्डेश्वर – बासरीवादक (जन्म: ? ? ????)
  • २००१: राम मेघे – महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२८ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 19:38:50 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 08:59:34 पर्यंत
  • करण-विष्टि – 08:12:38 पर्यंत, शकुन – 19:38:50 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वज्र – 23:51:08 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:28
  • चन्द्र-राशि-धनु – 14:53:01 पर्यंत
  • चंद्रोदय- 31:07:00
  • चंद्रास्त- 17:22:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
  • १९६१: ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
  • १९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
  • २०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४५७: हेन्‍री (सातवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ एप्रिल १५०९)
  • १८६५: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
  • १८९९: फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (मृत्यू: १५ मे १९९३)
  • १९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)
  • १९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
  • १९३७: सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी, उरिया इ. अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.
  • १९५५: निकोलस सारकोझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५४७: हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जून १४९१)
  • १६१६: संत दासोपंत समाधिस्थ (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)
  • १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)
  • १९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. (जन्म: २ नोव्हेंबर १८९७)
  • १९९६: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)
  • १९९७: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (जन्म: २७ जुलै १९११)
  • २००७: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२७ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 24:19:12 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 09:45:51 पर्यंत
  • करण-वणिज – 11:56:20 पर्यंत, विष्टि – 24:19:12 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-अतिगंड – 11:26:52 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:36:21
  • सूर्यास्त-17:32:46
  • चन्द्र राशि-वृश्चिक – 09:45:51 पर्यंत
  • चंद्रोदय-10:05:00
  • चंद्रास्त-20:07:59
  • ऋतु-हेमंतआजचे पंचांग
  • तिथि-त्रयोदशी – 20:37:33 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 09:03:14 पर्यंत
  • करण-गर – 08:52:47 पर्यंत, वणिज – 20:37:33 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-हर्शण – 25:56:48 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय-07:12:02
  • सूर्यास्त-17:55:58
  • चन्द्र राशि-धनु
  • चंद्रोदय-30:22:00
  • चंद्रास्त-15:35:00
  • ऋतु-शिशिर

महत्त्वाच्या घटना:

  • १८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे ‘द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी’ची स्थापना

     

  • १९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.

     

  • १९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या ’रेड आर्मी’ने पोलंडमधील ’ऑस्विच’ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.

     

  • १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.

     

  • १९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.जन्म

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • १७५६: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१)

     

  • १८५०: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२)
  • १९०१: लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्‍गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ’तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४)

     

  • १९२२: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (मृत्यू: २२ आक्टोबर १९९८)

     

  • १९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)

     

  • १९६७: बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १९४७: पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८)

     

  • १९६८: सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२)
  • १९८६: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ आक्टोबर १९३१)
  • २००७: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२)

     

  • २००८: सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१)

     

  • २००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२६ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 22:22:31 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व फाल्गुनी – 22:17:04 पर्यंत
  • करण-तैतुल – 09:07:56 पर्यंत, गर – 22:22:31 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वैधृति – 12:16:30 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:51:25
  • सूर्यास्त- 17:59:07
  • चन्द्र-राशि-सिंह – 29:02:44 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:51:00
  • चंद्रास्त- 13:46:00
  • ऋतु- हेमंत

जागतिक दिवस:
  • भारतीय प्रजासत्ताक दिन – भारत.
  • ऑस्ट्रेलिया दिन – ऑस्ट्रेलिया
  • मुक्ति दिन – युगांडा.
महत्त्वाच्या घटना:
  • १५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
  • १६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया
  • १८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
  • १८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
  • १९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
  • १९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली. स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड झाली. पुढे प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक राज्यपध्दती स्वीकारली जाऊन तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन
  • १९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
  • १९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू
  • १९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना ’पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान
  • २००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९१: ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, ’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत. (मृत्यू: १७ मार्च १९३७)
  • १९२१: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू: ३ आक्टोबर १९९९)
  • १९२५: पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)
  • १९५७: शिवलाल यादव – क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली (जन्म: ? ? ????)१)
  • १८२३: एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर (जन्म: १७ मे १७४९)
  • १९५४: मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म: २१ मार्च १८८७)
  • १९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा ‘बापूजी’ अणे (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)
  • २०१५: रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (जन्म: २४ आक्टोबर १९२१)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२५ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 20:34:52 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-भाव – 08:06:49 पर्यंत, बालव – 20:34:52 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-घ्रुव – 28:37:22 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:26
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 28:22:59
  • चंद्रास्त- 14:26:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
  • १५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
  • १८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
  • १८६३: आजच्या दिवशी अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांनी अमेरिकेतील चलन कायद्यावर सही केली.
  • १९३५: ’फॉक्स मॉथ’ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
  • १९५२: नार्वे ची राजधानी ओस्लो मध्ये आजच्या दिवशी हिवाळी ऑलिम्पिक समारोह पार पडला.
  • १९६२: कॉंग्रेस सार्वत्रिक निवडणूक जिंकली.
  • १९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
  • १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी
  • १९९६: ’स्वर्गदारा’तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्‍याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले.
  • २००८: ‘नो कंट्री फ़ॉर ओल्ड मॅन” या चित्रपटाला ८० व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
  • २००९: आजच्या दिवशी माजी सैन्य अधिकारी धीरज मल्होत्रा यांना इंडियन प्रीमियर लीग चे
  • २०१३: रशियन सरकार ने रस्त्यांवर आणि शाळेच्या जवळपास धूम्रपान न करण्याचा नवीन कायदा बनवला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८४०: विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्‍नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. (मृत्यू:९ आक्टोबर १९१४)
  • १८९४: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
  • १८९९: पंजाब चे माजी मुख्यमंत्री गुरनाम सिंह यांचा जन्म.
  • १९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
  • १९४०: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)
  • १९४३: जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)
  • १९४८: डॅनी डेंग्झोप्पा – चित्रपट अभिनेते
  • १९७४: दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)
  • १९८१: भारतीय अभिनेता अनुज साहनी यांचा जन्म.
  • १९८१: भारतीय अभिनेता शहीद कपूर यांचा जन्म.
  • १९९२: हिंदी चित्रपट अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांचा जन्म.
  • १९९४: हिंदी चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५९९: संत एकनाथ (जन्म: ? ? १५३३)
  • १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी
  • १९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव ’एस. पी. कॉलेज’ असे करण्यात आले. (जन्म: ? ? ????)
  • १९६४: शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री (कुंकू, दुनिया ना माने, अमृत मंथन इ.) (जन्म: ? ? १९१६)
  • १९७८: डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: २९ जून १८९१)
  • १९८०: गिरजाबाई महादेव केळकर – लेखिका व नाटककार (जन्म: ? ? ????)
  • १९९९: ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ एप्रिल १९१२)
  • २००१: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
  • २००७: मल्याळम कवी पी भास्करन यांचे निधन.
  • २०१६: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२४ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 19:27:59 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 31:08:29 पर्यंत
  • करण-विष्टि – 19:27:59 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योगवृद्वि – 29:07:37 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय-07:16
  • सूर्यास्त-18:25
  • चन्द्र राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय-27:25:00
  • चंद्रास्त-13:39:00
  • ऋतु-शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय बालिका दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.
  • १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
  • १८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.
  • १९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
  • १९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
  • १९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार
  • १९६६: एअर इंडियाचे ‘कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.
  • १९५०: भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
  • १९५१: प्रेम माथुर ह्या देशाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या.
  • १९५२: मुंबई येथे पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव साजरा करण्यात आला.
  • १९६६: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.
  • १९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
  • १९७६: ’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.
  • १९८४: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
  • १९९०: जपान ने पहिला हितेन नावाचा लूनर प्रोब प्रक्षेपित केल्या गेला.
  • १९९६: अमेरिकेच्या पहिल्या महिल्या हिलेरी क्लिंटन यांना न्यायालयात हाजीर राहण्यास सांगितले.
  • २००२: भारतीय उपग्रह इनसेट-३ आपल्या कक्षेत स्थापित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२६: पहिले भारतीय बॅरिस्टर ज्ञानेंद्र मोहन टागोर यांचा जन्म.
  • १८७७: भारतीय स्वातंत्र्य सैनिक पुलिन बिहारी दास यांचा जन्म.
  • १९२४: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई)
  • १९२४: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)
  • १९४३: सुभाष घई – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
  • १९४५: भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म.
  • १९४५: भारतीय राजनीती तज्ञ प्रदीप भट्टाचार्य यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६५: विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)
  • १९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० आक्टोबर १९०९)
  • २००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्‍याव सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
  • २०११: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 17:40:34 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 29:09:03 पर्यंत
  • करण-गर – 17:40:34 पर्यंत, वणिज – 30:38:56 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 29:05:47 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:25
  • चन्द्र-राशि-तुळ – 22:33:26 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:30:00
  • चंद्रास्त- 12:58:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर
  • १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
  • १७९३: आजच्या दिवशी ह्यूमन सोसाइटी ऑफ़ फिलाडेल्फिया ला संघटीत केल्या गेले.
  • १८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
  • १९२७: मॅडलिन ऑलब्राई ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.
  • १९३२: ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.
  • १९६६: आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • १९६८: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
  • १९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
  • १९७७: जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.
  • १९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
  • २००२: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण
  • २००२: ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.
  • २००९: ला टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये धुम्रपानाच्या दृश्यांवरून बंदी हटवल्या गेली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)
  • १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
  • १८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)
  • १९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२)
  • १९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक (मृत्यू: ? ? २००२)
  • १९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)
  • १९३०: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.
  • १९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)
  • १९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
  • १९८७: भारतीय चित्रपट कलाकार दुष्यंत वाघ चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन (जन्म: १८ मार्च १५९४)
  • १९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (जन्म: २६ मे १८८५)
  • १९३१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)
  • १९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित (जन्म: ? ? ????)
  • १९६३: ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक नरेंद्र मोहन सेन यांचे निधन.
  • १९६४: छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराजांचे निधन.
  • १९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. (जन्म: ११ मे १९०४)
  • १९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • २०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ आक्टोबर १९२७)
  • २०१५: ला सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 15:21:09 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 26:35:03 पर्यंत
  • करण-कौलव – 15:21:09 पर्यंत, तैतुल – 28:34:08 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 28:36:48 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 25:37:00
  • चंद्रास्त- 12:20:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
  • १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
  • १९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
  • १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
  • १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९२: रॉबर्टा बॉन्डर ह्या अवकाशात जाणाऱ्या पहिला महिला ठरल्या.
  • १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
  • २००१: ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
  • २००६: इवा मोराल्स यांनी बोलीवियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
  • १८७७: आसाम चे प्रमुख कार्यकर्ते तरुण राम फुकन यांचा जन्म.
  • १८९२: भारताचे स्वातंत्र्य सैनिक ठाकुर रोशन सिंह यांचा जन्म.
  • १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
  • १८९७: भारताचे प्रसिद्ध गायक दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
  • १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
  • १९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
  • १९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
  • १९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
  • १९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी
  • १९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ? ? ????)
  • १९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
  • १९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
  • १९४९: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा जन्म.
  • १९५८: दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (मृत्यू: ९ जून १९९३)
  • १९७३: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली, कोणतीही महिला गर्भवती असताना ६ महिन्यांपर्यंत गर्भपात करू शकते.
  • १९९६: कॅलिफोर्निया च्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वी पासून ३,५०,००० प्रकाश वर्ष इतक्या अंतरावर असलेल्या दोन नवीन ग्रहांचा शोध लावला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १२९७: योगी चांगदेव समाधिस्थ (जन्म: ? ? ????)
  • १६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२)
  • १६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: ? ? १६०८)
  • १७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
  • १९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. (जन्म: २४ मे १८१९)
  • १९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
  • १९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९०३)
  • १९७३: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
  • १९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
  • १९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
  • २००४: भारतीय चित्रपट अभिनेत्री मेनका देवी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तितिथि-सप्तमी – 12:42:52 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 23:37:32 पर्यंत
  • करण-भाव – 12:42:52 पर्यंत, बालव – 26:03:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 27:48:37 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-राशि-कन्या – 10:04:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:45:59
  • चंद्रास्त- 11:46:59
  • ऋतु- शिशिरतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय आलिंगन दिन.
महत्त्वाच्या घटना:
  • १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
  • १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
  • १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
  • १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
  • १९५८: कॉपीराईट चा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला.
  • १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट
  • १९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
  • २०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
  • २००९: भारतीय वायुसेनेचे सूर्यकिरण नावाच्या एका प्रशिक्षण विमानाचा कर्नाटक च्या बिदर येथे अपघात झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३)
  • १८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)
  • १९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ’संत तुकाराम’ चित्रपटातील ’आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते. (मृत्यू: २ मे १९७५)
  • १९२२: पंजाब चे माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रर यांचा जन्म.
  • १९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)
  • १९४३: प्रसिद्ध भारतीय लेखिका प्रतिभा राय यांचा जन्म.
  • १९५२: भारतीय चित्रपट अभिनेता प्रदीप रावत यांचा जन्म.
  • १९५३: पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक
  • १९८६: भारतीय चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)
  • १९०१: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८३५)
  • १९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७०)
  • १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)
  • १९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)
  • १९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३)
  • १९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
  • १९६३: ला भारतीय प्रसिद्ध कादंबरीकार शिवपूजन सहाय यांचे निधन.(जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
  • १९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: ? ? १९३०)
  • १९९७: ला भारताचे माजी नौदल प्रमुख सुरेंद्रनाथ कोहली यांचे निधन.
  • १९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६)
  • २०१६: ला भारताची प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 10:01:42 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 20:31:00 पर्यंत
  • करण-वणिज – 10:01:42 पर्यंत, विष्टि – 23:21:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 26:51:31 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-रशि-कन्या
  • चंद्रोदय- 23:57:59
  • चंद्रास्त- 11:15:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
  • १८४१: ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.
  • १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.
  • १९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्‍न झाले होते.
  • १९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
  • १९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
  • १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
  • १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
  • २००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७५: आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० जून १८३६)
  • १८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
  • १८७१: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
  • १८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
  • १८९८: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (मृत्यू: २० आक्टोबर १९७४)
  • १९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
  • १९६०: आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९१: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
  • १९३६: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)
  • १९५१: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
  • १९८०: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
  • १९८८: खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (जन्म: ३ जून १८९०)
  • १९९३: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ मे १९२९)
  • २००२: रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. (जन्म: १० मे १९१८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search