Category Archives: दिनविशेष

१७ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 29:33:19 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 12:46:03 पर्यंत
  • करण-भाव – 16:46:21 पर्यंत, बालव – 29:33:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सौभाग्य – 24:56:24 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:21
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 21:33:59
  • चंद्रास्त- 09:39:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • जागतिक धर्म दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १६०१: आजच्या दिवशी मुघल सम्राट अकबर ने असीरगढ येथे असलेल्या किल्यात प्रवेश केला.
  • १७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
  • १८७४: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा मृत्यू. (जन्म: ११ मे १८११)
  • १९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
  • १९४१: नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
  • १९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
  • १९४५: भारतीय चित्रपटाचे गीतकार आणि स्क्रिप्ट लेखक जावेद अख्तर यांचा जन्म.
  • १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
  • १९५६: बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
  • १९८५: इंग्लंड विरुद्ध माजी भारतीय कर्णधार मो.अझरूद्दीन यांनी दुसरे टेस्ट अर्धशतक मारले.
  • १९८९: जे. के. बजाज हे उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय ठरले.
  • २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
  • २००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर
  • २००७: ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर माइकल बेवन यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
  • २००९: भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस रणधीर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४७१: भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म.
  • १७०६: बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
  • १८८८: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक बाबु गुलाबराय यांचा जन्म.
  • १८९५: विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी (मृत्यू: ३ मे १९७८)
  • १९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: ? ? १९८६)
  • १९०६: शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू: ३ मे २०००)
  • १९०८: अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ जून १९९४)
  • १९१७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
  • १९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
  • १९१८: रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९) (मृत्यू: १६ मे २०१४)
  • १९३२: मधुकर केचे – साहित्यिक (मृत्यू: २५ मार्च १९९३)
  • १९४२: मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५५६: हुमायून – दुसरा मुघल सम्राट (जन्म: ७ मार्च १५०८)
  • १७७१: गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार (जन्म: ? ? ????)
  • १८९३: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ आक्टोबर १८२२)
  • १९३०: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म: २६ जून १८७३)
  • १९५१: प्रसिद्ध साहित्यकार ज्योति प्रसाद अग्रवाल यांचे निधन
  • १९६१: पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म: २ जुलै १९२५)
  • १९७१: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (२५ सप्टेंबर १९२२)
  • १९८८: लीला मिश्रा – अभिनेत्री (जन्म: ? ? १९०८)
  • १९९५: डॉ. व्ही. टी. पाटील – ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • २०००: सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते
  • २००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.
  • २००८: रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म: ९ मार्च १९४३)
  • २०१०: ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)
  • २०१३: ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
  • २०१४: रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट भिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)
  • २०१४: ला भारतीय उद्योजक सुनंदा पुष्कर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१६ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 28:09:19 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 11:17:47 पर्यंत
  • करण-वणिज – 15:42:37 पर्यंत, विष्टि – 28:09:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-आयुष्मान – 25:05:42 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:20
  • चन्द्र-राशि-कर्क – 11:17:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:41:59
  • चंद्रास्त- 09:03:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
  • १६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला
  • १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
  • १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
  • १९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
  • १९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
  • १९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
  • १९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
  • १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
  • १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलाव तरण झाले.
  • १९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
  • १९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ’ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
  • २००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६३०: शिखांचे सातवे गुरु गुरु हर राय यांचा जन्म.
  • १८५३: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
  • १९२०: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
  • १९२६: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (मृत्यू: २८ जानेवारी २००७)
  • १९२७: भारतीय चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म.
  • १९४६: कबीर बेदी – चित्रपट अभिनेते

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १६६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)
  • १९०१: समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.
  • १९०९: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १८४२)
  • १९३८: शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
  • १९५४: बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म: ३ जून १८९०)
  • १९६२: प्रसिद्ध लेखक राम नरेश त्रिपाठी यांचे निधन.
  • १९६६: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
  • १९६७: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० डिसेंबर १९०१)
  • १९८८: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)
  • १९८९: तमिळ चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रेम नाझीर यांचे निधन.
  • १९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म: ? ? १९३३)
  • २०००: त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत (जन्म: ? ? १९१३ – बारामुल्ला, जम्मू काश्मीर)
  • २००३: रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • २००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१५ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 27:26:20 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 10:29:17 पर्यंत
  • करण-तैतुल – 15:20:20 पर्यंत, गर – 27:26:20 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 25:46:18 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:17:46
  • सूर्यास्त- 18:20:01
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 19:48:00
  • चंद्रास्त- 08:22:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय सैन्य दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.
  • १७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
  • १८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
  • १८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • १९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
  • १९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
  • १९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
  • १९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
  • १९९९: गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • २००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: ? ? १८३८)
  • १८५६: भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी कुमार दत्त यांचा जन्म.
  • १९१८: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक यशवंत अग्रवाडेकर यांचा जन्म.
  • १९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)
  • १९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
  • १९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)
  • १९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)
  • १९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.
  • १९३८: भारतीय फुटबॉलर चुनी गोस्वामी यांचा जन्म.
  • १९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.
  • १९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.
  • १९८२: प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६)
  • १९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६)
  • १९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८)
  • २००२: विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: ? ? १९३५)
  • २००९: दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे तपन सिन्हा यांचे निधन.
  • २०१२: भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर होमाई व्यारावाला यांचे निधन.
  • २०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)
  • २०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१४ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:24:14 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 10:18:07 पर्यंत
  • करण-बालव – 15:37:27 पर्यंत, कौलव – 27:24:14 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 26:58:11 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:19
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 18:48:59
  • चंद्रास्त- 07:35:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • मकर संक्रमण
\
महत्त्वाच्या घटना:
  • १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
  • १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
  • १९४८: ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
  • १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
  • १९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.
  • २०००: ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५५१: अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक अबुल फ़ज़ल यांचा जन्म.
  • १८८२: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)
  • १८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)
  • १८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)
  • १८९६: ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख (मृत्यू: २ आक्टोबर १९८२)
  • १९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)
  • १९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.
  • १९१८: भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी याचा जन्म.
  • १९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२)
  • १९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)
  • १९२६: महाश्वेता देवी – बंगाली लेखिका
  • १९३१: सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)
  • १९७७: नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर
  • १९८२: माजी प्रधान मंत्री इंदिरा गांधींनी २ सूत्री कार्यक्रमाची घोषणा.
  • १९९२: माजी भारतीय क्रिकेटर दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)
  • १७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
  • १७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)
  • १८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.
  • १९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)
  • १९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)
  • २००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 27:59:20 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 10:39:08 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:29:03 पर्यंत, भाव – 27:59:20 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 28:38:52 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:18
  • चन्द्र-राशि-मिथुन – 28:20:36 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:47:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
  • १८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
  • १८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
  • १९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.
  • १९१०: न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक रेडीओ च्या माध्यमातून प्रसारण.
  • १९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
  • १९४८: १२ जानेवारीच्या संध्याकाळी महात्मा गांधींनी हिंदू मुस्लीम एकतेसाठी उपोषणाला बसण्याचे घोषित केले आणि आजच्या दिवशी ते उपोषणाला बसले.
  • १९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी
  • १९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
  • १९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
  • १९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
  • १९७८: अमेरिकेने पहिल्यांदा महिला अंतरिक्षयात्री निवडली.
  • १९९६: पुणे – मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.
  • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला नॅशनल कांफ्रेंस चे अध्यक्ष बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १९१९: एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ – १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ – १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ – १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ – १९९६) (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)
  • १९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९)
  • १९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार
  • १९४९: राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
  • १९७८: भारतीय अभिनेता अस्मित पटेल यांचा जन्म.
  • १९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू
  • १९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)
  • १९७६: अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: ? ? १८९२?)
  • १९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९१५)
  • १९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२)
  • १९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • २००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे ’शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत. (जन्म: ? ? ????)
  • २०११: प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (जन्म: १४ मार्च १९३१)
  • २०१३: रुसी सुरती – क्रिकेटपटू (जन्म: २५ मे १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 29:05:45 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 11:25:39 पर्यंत
  • करण-गर – 17:48:30 पर्यंत, वणिज – 29:05:45 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 09:09:12 पर्यंत, इंद्रा – 30:44:14 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:18
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 16:45:00
  • चंद्रास्त- 30:42:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय युवा दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
  • १७०८: मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक केल्या गेल्या.
  • १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
  • १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी
  • १९३१: प्रसिद्ध पाकिस्तानी कवी अहमद फ़राज़ यांचा जन्म.
  • १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
  • १९३६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जन्म.
  • १९४९: माजी संसद चे सदस्य पारसनाथ यादव यांचा जन्म.
  • १९६४: राजनीतिज्ञ अजय माकन यांचा जन्म.
  • १९६४: उत्तर प्रदेश चे माजी उपमुख्यमंत्री तसेच राजनीतिज्ञ दिनेश शर्मा यांचा जन्म.
  • १९७२: कॉंग्रेस च्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा जन्म.
  • १९८४: स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी या दिवशी “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
  • १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान
  • २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
  • २००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू
  • २००७: “रंग दे बसंती” या चित्रपटाला ब्रिटिश अॅकेडमी फिल्म पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
  • २००९: जगप्रसिद्ध ए. आर. रेहमान हे गोल्डन ग्लोब अवार्ड मिळणारे पहिले भारतीय ठरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५९८: राजमाता जिजाबाई (मृत्यू: १७ जून १६७४)
  • १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
  • १८६३: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (मृत्यू: ४ जुलै १९०२)
  • १८६९: भारतरत्न पुरस्काराने सन्मानित शास्त्री भगवान दास यांचा जन्म.
  • १८९३: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)
  • १८९९: पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)
  • १९०२: महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (मृत्यू: १३ जुलै १९६९)
  • १९०६: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
  • १९१७: महर्षी महेश योगी (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
  • १९१८: सी. रामचंद्र – संगीतकार (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९७: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (जन्म: ४ जानेवारी १८१३)
  • १९२४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ साहा यांचे निधन.
  • १९३४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सूर्य सेन यांचे निधन.
  • १९४४: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (जन्म: २८ एप्रिल १८५४)
  • १९६६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: १० जानेवारी १८९६)
  • १९७६: अ‍ॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्‍या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
  • १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’ (जन्म: ८ एप्रिल १९२४)
  • १९९७: ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. ’तलाश’, ’ फूल और पत्थर’, ’हलचल’, ’पापी, ’शालिमार’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: ? ? १९२५)
  • २००५: अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

११ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 08:24:11 पर्यंत, त्रयोदशी – 30:36:26 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 12:30:26 पर्यंत
  • करण-बालव – 08:24:11 पर्यंत, कौलव – 19:28:37 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 11:48:22 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:17
  • चन्द्र-राशि-वृषभ – 23:56:13 पर्यंत
  • चंद्रोदय- 15:43:59
  • चंद्रास्त- 29:42:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय सड़क सुरक्षा सप्ताहाला सुरुवात.
महत्त्वाच्या घटना:
  • १६१३: मुघल सम्राट जहागीर ने पहिल्यांदा इस्ट इंडिया कंपनी ला सुरत येथे कारखाना उभारण्यास परवानगी दिली.
  • १७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्‍या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
  • १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले
  • १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
  • १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • १९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
  • २०००: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००९: स्लमडॉग मिलियनर या चित्रपटाला ६६ वा. गोल्डन ग्लोब अवार्ड मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१)
  • १८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)
  • १८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५)
  • १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
  • १९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
  • १९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
  • १९५४: बाल मजुरांच्या विरुद्ध आवाज उचलणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचा जन्म.
  • १९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
  • १९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
  • १९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.
  • १९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
  • १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
  • १९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
  • १९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
  • १९६२: भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेता अजय घोष यांचे निधन.
  • १९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
  • १९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
  • १९९०: भारतीय संगीतकार राम चतुर मलिक यांचे निधन.
  • १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
  • २००८: य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)
  • २००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 10:22:17 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 13:46:36 पर्यंत
  • करण-विष्टि – 10:22:17 पर्यंत, भाव – 21:22:19 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 14:36:35 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:16
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 14:48:00
  • चंद्रास्त- 28:38:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • जागतिक हिंदी दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १६६६: सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
  • १७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
  • १८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
  • १८१०: नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.
  • १८३९: पहिल्यांदा भारताचा चहा इंग्लंड ला पोहचला.
  • १८६३: चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
  • १८७०: जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
  • १८७०: बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
  • १८८४: ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले.
  • १९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
  • १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
  • १९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
  • १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
  • १९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
  • २००६: माजी प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी ला जागतिक हिंदी दिवस म्हणनू साजरे करण्याची घोषणा केली.
  • २००८: टाटा कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो कार ला बाजारात आणण्यासाठी सुरुवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)
  • १८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
  • १९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
  • १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म (मृत्यू: ? ? ????)
  • १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
  • १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
  • १९३७: भातीय राजनीती तज्ञ मुरली देवड़ा यांचा जन्म.
  • १९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
  • १९४९: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा जन्म.
  • १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.
  • १९७१: प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचा जन्म.
  • १९७४: हृतिक रोशन – सिनेकलाकार
  • १९८४: भारतीय अभिनेत्री कल्कि कोचेलिन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६९३: कोलकत्याचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे जाब चारनाक यांचे निधन.
  • १७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: ? ? १७२३)
  • १७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले. (जन्म: २३ मे १७०७)
  • १९६९: उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री संपूर्णानंद यांचे निधन.
  • १९९४: ला प्रसिद्ध लेखक गिरिजाकुमार माथुर यांचे निधन.
  • १९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
  • २००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

९ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 12:25:06 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 15:08:11 पर्यंत
  • करण-गर – 12:25:06 पर्यंत, वणिज – 23:23:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 17:29:21 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:16
  • चन्द्र-राशि-मेष – 20:47:33 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:58:00
  • चंद्रास्त- 27:33:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • प्रवासी भारतीय दिवस,अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले उपकार आणि योगदान लक्षात ठेवणे.
महत्त्वाच्या घटना:
  • १७६०: बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
  • १७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.
  • १७९०: ला बरारी घाटाच्या झालेल्या लढाई मध्ये अहमद शाह दुर्रानी ने मराठ्यांचा पराभव केला.
  • १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
  • १९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
  • १९८२: ला भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला.
  • २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
  • २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
  • २००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
  • २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
  • २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
  • २०१२: ला लिओनेल मेस्सी ने सतत दुसऱ्या वर्षी सुद्धा “बैलोन डीओर” नावाचा पुरस्कार जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८३१: फातिमा शेख : भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका
  • १९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)
  • १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
  • १९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
  • १९२१: बिहार चे माजी मुख्यमंत्री राम सुंदर दास यांचा जन्म.
  • १९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)
  • १९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.
  • १९३४: महेंद्र कपूर – पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)
  • १९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (मृत्यू: २७ आक्टोबर १९७४)
  • १९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य
  • १९६५: फराह खान – नृत्यदिग्दर्शक
  • १९७४: ला बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर यांचा जन्म.
  • १९८३: ला भारतीय अभिनेता शरद मल्होत्रा यांचा जन्म.
  • २०००: ला भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दास यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (जन्म: १६ मार्च १७५०)
  • १८७३: तिसरा नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.
  • १९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (जन्म: १ जून १८४२)
  • १९४५: प्रसिद्ध राजनीती तज्ञ छोटू राम यांचे निधन.
  • १९७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)
  • २००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: ? ? १९१९)
  • २००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: ? ? १९११)
  • २०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९१९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

८ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 14:28:20 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 16:30:38 पर्यंत
  • करण-कौलव – 14:28:20 पर्यंत, तैतुल – 25:26:53 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 20:23:09 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:15
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 13:13:00
  • चंद्रास्त- 26:30:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
  • १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
  • १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.
  • १९२९: नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज यांच्या मध्ये पहिल्यांदा टेलिफोन वर संपर्क झाला.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
  • १९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
  • १९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
  • १९५८: १४ व्या वर्षाच्या बॉबी फिशर ने अमेरिकेची चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.
  • १९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
  • १९७१: पाकिस्तान चे राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी नेता शेख मुजीबुर रहमान यांची जेल मधून सुटका करण्यात आली.
  • १९७३: रशियाने “मिशन ल्‍यूना २१” ला स्पेस मिशन चे प्रक्षेपण केले.
  • २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
  • २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
  • २००९: ४,३०० वर्षाआधीची रानी सेशेशेट ची इजिप्त येथे ममी सापडली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १९०९: ला भारतीय कादंबरीकार आशापूर्णा देवी यांचा जन्म.
  • १९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २०००)
  • १९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३)
  • १९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४)
  • १९२९: सईद जाफरी – अभिनेता
  • १९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)
  • १९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५)
  • १९३९: नंदा – अभिनेत्री
  • १९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक
  • १९८६: प्रसिद्ध अभिनेता नवीन कुमार गोवडा उर्फ यश यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)
  • १८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५)
  • १८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)
  • १९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
  • १९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९)
  • १९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)
  • १९७३: नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २० सप्टेंबर १८९८)
  • १९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८)
  • १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.
  • १९८७: माजी भारतीय क्रिकेटर नाना जोशी यांचे निधन.
  • १९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन
  • १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.
  • १९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२)
  • १९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ आक्टोबर १९१६)
  • २००३: भारतीय कीटकशास्त्रज्ञ महादेव सुब्रमण्यम मनी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search