Category Archives: आज दिनांक

१५ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-पौर्णिमा – 27:00:12 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 21:55:41 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:39:42 पर्यंत, भाव – 27:00:12 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-व्यतापता – 07:29:28 पर्यंत, वरियान – 27:32:36 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय- 06:48
  • सूर्यास्त- 17:58
  • चन्द्र-राशि-मेष – 27:17:30 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:26:59
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १८३०: आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंड या देशाला प्रयाण केले होते.
  • १८८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
  • १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
  • १९६१: संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेने आजच्याच दिवशी परमाणु हत्यारावर बंदी आणली होती.
  • १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.
  • १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
  • १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान
  • २०००: देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
  • २०००: फिजी या देशात अकाली शासन बदल करणे अवैध घोषित करण्यात आले.
  • २००४: अमेरिकेचे पूर्व विदेश मंत्री कॉलीन पॉवेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • २००७: चिली या देशात ७.७ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.
  • २००८: योगेंद्र मक़बाल यांनी राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.
  • २०१२: शी जिनपिंग आजच्याच दिवशी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७३८: विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)
  • १८६६: भारताची प्रथम महिला बैरिस्टर कार्नेलीया सोराबजी यांचा जन्म झाला होता.
  • १८७५: बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)
  • १८८५: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)
  • १८९१: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)
  • १९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)
  • १९१७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)
  • १९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)
  • १९२७: उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)
  • १९२९: शिरीष पै – कवयित्री
  • १९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)
  • १९४८: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (मृत्यू: ११ जुलै २००३)
  • १९८६: अशोक चक्र सन्मानित भारतीय वायुसेनेतील शहीद गरुड कमांडो ज्योतीप्रकाश निराला यांचा जन्म झाला होता.
  • १९८६: सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६३०: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१)
  • १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)
  • १९३७: हिंदीचे प्रसिध्द साहित्यकार जयशंकर प्रसाद यांचे निधन झाले होते.
  • १९३८: पंजाब येथील प्रसिध्द आर्य समाजाचे नेता तसेच समाजसुधारक महात्मा हंसराज यांचे निधन झाले होते.
  • १९४९: नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी (जन्म: १९ मे १९१०)
  • १९४९: नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी (जन्म: ?? ???? १९२५)
  • १९६१: कम्युनिस्ट नेते बंकिम मुखर्जी यांचे निधन झाले होते.
  • १९८२: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न – १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
  • १९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)
  • १९९६: भारताचे प्रसिध्द कवी व कथाकार आर सी प्रसाद सिंह यांचे १९९६ साली निधन झाले होते.
  • २०१२: कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (जन्म: ? ? १९३१)
  • २०१३: मथुरा येथील प्रसिध्द संत कृपालू जी महाराज अनंतात विलीन झाले होते.
  • २०१७: हिंदी कवी कुवर नारायण यांचे निधन झाले होते.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search