Category Archives: आज दिनांक

०९ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 13:26:42 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 14:24:33 पर्यंत
  • करण-भाव – 13:26:42 पर्यंत, बालव – 24:52:31 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 26:15:16 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:20
  • सूर्यास्त- 19:09
  • चन्द्र-राशि-मकर – 26:12:03 पर्यंत
  • चंद्रोदय- 19:23:59
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • क्रांती दिवस
  • जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1173 : पिसाच्या टॉवरचे बांधकाम सुरू झाले. हा मिनार तयार होण्यास 200 वर्षे लागली आणि चुकून तिरका बांधला गेला.
  • 1892 : थॉमस एडिसनला डबल वायर मशीनचे पेटंट मिळाले.
  • 1925 : चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या साथीदारांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • 1942 : क्रांती दिन
  • 1945 : अमेरिकेने जपानच्या नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला..
  • 1965 : मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर सिंगापूर स्वतंत्र राष्ट्र बनले. आपल्या इच्छेविरुद्ध स्वातंत्र्य मिळालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • 1974 : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
  • 1993 : भारत छोडो आंदोलनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सरहद गांधी’, खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
  • 1975 : पंतप्रधानांना न्यायालयात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.
  • 2000 : भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्लीच्या औद्योगिक संशोधन संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी पुरस्कार प्रदान करण्यात आला

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1754 : ‘पिअर चार्ल्स एल्फांट’ – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1825)
  • 1776 : ‘अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो’ – इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 9 जुलै 1856)
  • 1862 : ‘गंगाधर मेहेर’ – ओडिया रिती कवी यांचा जन्म.
  • 1890 : ‘केशवराव भोसले’ – संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य यांचा जन्म. (मृत्यू : 4 आक्टोबर 1921)
  • 1892 : ‘शियाळि रामामृत रंगनाथन्’ – भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ यांचा जन्म.
  • 1909 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1992)
  • 1920 : ‘कृ. ब. निकुम्ब’ – घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी यांचा जन्म.
  • 1936 : ‘सतीश कुमार’ – भारतीय ब्रिटिश कार्यकर्ते आणि वक्ता यांचा जन्म.
  • 1975 : ‘महेश बाबू’ भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
  • 1991 : ‘हंसिका मोटवानी’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 117 : 117ई.पुर्व : ‘ट्राजान – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 53)
  • 1107 : ‘होरिकावा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1078)
  • 1901 : ‘विष्णूदास अमृत भावे’ – मराठी रंगभुमीचे जनक यांचे निधन.
  • 1948 : ‘हुगो बॉस’ – हुगो बॉस कानी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1885)
  • 1976 : ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचे निधन. (जन्म : 14 फेब्रुवारी 1914)
  • 1996 : ‘फ्रॅंक व्हाटलेट’ – जेट इंजिन चे शोधक यांचे निधन. (जन्म : 1 जुन 1907)
  • 2002 : ‘शांताबाई दाणी’ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1918)
  • 2015 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचे निधन. (जन्म : 8 जून 1915)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०७ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 14:29:59 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 14:02:14 पर्यंत
  • करण-तैेतिल – 14:29:59 पर्यंत, गर – 26:26:19 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 06:42:28 पर्यंत, प्रीति – 29:38:50 पर्यंत
  • वार-गुरूवार
  • सूर्योदय- 06:20
  • सूर्यास्त- 19:09
  • चन्द्र-राशि-धनु – 20:12:05 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:53:59
  • चंद्रास्त- 29:03:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • राष्ट्रीय हातमाग दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1789 : यूएस सरकारच्या युद्ध विभागाची स्थापना झाली.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्य पॅसिफिक महासागरातील ग्वाडालकॅनल कालव्यावर उतरले आणि द्वितीय विश्वयुद्धातील सर्वात भयंकर लढाई खेळली गेली. या घटनेपासून जपानची माघार सुरू झाली.
  • 1947 : मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी ताब्यात घेतली.
  • 1947 : थोर हेयरडाहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोन टिकी नावाच्या बाल्सा वुड राफ्टमधून 101 दिवसांत प्रशांत महासागर ओलांडून 7,000 किमी प्रवास केला.
  • 1981 : वॉशिंग्टन स्टार वृत्तपत्र सलग 128 वर्षांच्या प्रकाशनानंतर बंद झाले.
  • 1985 : ताकाओ डोई, मोमोरू मोहोरी आणि चिकी मुकाई यांची जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून निवड झाली.
  • 1987 : लिन कॉक्स अमेरिकेतून सोव्हिएत युनियनमध्ये पोहणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 1990 : आखाती युद्धासाठी अमेरिकेचे पहिले सैन्य सौदी अरेबियात आले.
  • 1991 : पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • 1997 : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावावर असलेला व्हिटोरियो डी सिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2000 : ब्रिटीश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संकल्प मोडवालने नऊ वर्षांखालील गटात संयुक्त विजेतेपद पटकावले.
  • 2020 : एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 ने भारतातील केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी ओव्हरशूट केली आणि क्रॅश झाला, त्यात 190 पैकी 21 जणांचा मृत्यू झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1702 : ‘नसीरुद्दीन मुहम्मद शाह’ – मुघल सम्राट जन्म
  • 1871 : ‘अवनींद्रनाथ टागोर’ – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका यांचा जन्म. (मृत्यू : 5 डिसेंबर 1951)
  • 1876 : ‘माता हारी’ – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1917)
  • 1912 : ‘केशवराव कृष्णराव दाते’ – हृदयरोगतज्ञ यांचा जन्म.
  • 1925 : ‘एम. एस. स्वामीनाथन’ – पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री यांचा जन्म.
  • 1935 : ‘राजमोहन गांधी’ – भारतीय चरित्रकार, इतिहासकार, महात्मा गांधींचे नातू यांचा जन्म.
  • 1936 : ‘डॉ. आनंद कर्वे’ – दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते यांचा जन्म.
  • 1948 : ‘ग्रेग चॅपेल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1966 : ‘जिमी वेल्स’ – विकिपीडियाचे सह-संस्थापक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1934 : ‘जोसेफ मॅरी जाकॉर्ड’ – जॅक्वार्ड लूम चे शोधक यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1752)
  • 1848 : ‘जेकब बर्झेलिअस’ – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 ऑगस्ट 1779)
  • 1941 : ‘रवींद्रनाथ टागोर’ – भारतीय कवी, शिक्षणतज्ञ, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म : 7 मे 1861)
  • 1974 : ‘अंजनीबाई मालपेकर’ – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन.
  • 2018 : ‘एम.करुणानिधी’ – तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०६ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 14:10:33 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 13:00:53 पर्यंत
  • करण-बालव – 14:10:33 पर्यंत, कौलव – 26:24:49 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 07:17:42 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 17:03:00
  • चंद्रास्त- 28:03:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय स्कुबा दिवस
  • जागतिक हिरोशिमा दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1914 : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1926 : गर्ट्रूड एडरली ही इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली महिला ठरली.
  • 1940 : सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टोनियाचा ताबा घेतला.
  • 1945 : अमेरिकेने हिरोशिमा, जपानवर अणुबॉम्ब टाकला. इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.
  • 1952 : राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
  • 1960 : अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून, क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
  • 1962 : जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • 1990 : संयुक्त राष्ट्रांनी कुवेतला जोडण्यासाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले.
  • 1994 : डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1997 : कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 6 बाद 952 धावा केल्या. त्यात सनथ जयसूर्याने 340 धावा केल्या.
  • 2010 : भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषण पूर.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1809 : ‘लॉर्ड टेनिसन’ – इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1892)
  • 1881 : ‘अलेक्झांडर फ्लेमिंग’ – पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 1955)
  • 1900 : ‘सीसिल हॉवर्ड ग्रीन’ – टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 एप्रिल 2003)
  • 1925 : ‘योगिनी जोगळेकर’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 2005)
  • 1933 : ‘ए जी कृपाल सिंग’ – भारतीय कसोटी क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1959 : ‘राजेंद्र सिंग’ – भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1970 : ‘एम. नाईट श्यामलन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1925 : ‘सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1848)
  • 1965 : ‘वसंत पवार’ – संगीतकार यांचे निधन.
  • 1991 : ‘शापूर बख्तियार’ – ईराणचे 74 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 26 जून 1914)
  • 1997 : ‘वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1924)
  • 1999 : ‘कल्पनाथ राय’ – केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1941)
  • 2001 : ‘कुमार चॅटर्जी’ – भारतीय नौदल प्रमुख आधार यांचे निधन.
  • 2019 : ‘सुषमा स्वराज’ – भारतीय महिला राजकारणी आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०५ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 13:14:33 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 11:23:53 पर्यंत
  • करण-विष्टि – 13:14:33 पर्यंत, भाव – 25:47:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-इंद्रा – 07:24:26 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 11:23:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:08:59
  • चंद्रास्त- 27:06:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.
  • 1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
  • 1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.
  • 1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
  • 1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
  • 1994 : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
  • 1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.
  • 1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2024 : बांगलादेश प्रधानमंत्री शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)
  • 1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)
  • 1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)
  • 1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.
  • 1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
  • 1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1987 : ‘जेनेलिया डिसोझा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 882 : 882ई.पुर्व : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
  • 1962 : ‘मेरिलीन मन्‍रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)
  • 1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)
  • 1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)
  • 1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)
  • 1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘ज्योत्स्‍ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)
  • 2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०४ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 11:43:52 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 09:13:31 पर्यंत
  • करण-गर – 11:43:52 पर्यंत, वणिज – 24:33:17 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 07:04:59 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:11
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 15:13:59
  • चंद्रास्त- 26:11:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन
  • आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1854 : हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली.
  • 1924 : सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1956 : अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.
  • 1983 : थॉमस संकरा हे अपर व्होल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1984 : अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले.
  • 1993 : पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडा वर चार सहकाऱ्यांसह समुद्रसपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंग ला खिंड पार केली. त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
  • 1998 : फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2001 : मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली.
  • 2007 : नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1730 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1761)
  • 1821 : ‘लुई व्हिटोन’ – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1892)
  • 1834 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1923)
  • 1845 : ‘सर फिरोजशहा मेहता’ – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 1915)
  • 1863 : ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर’ – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म.
  • 1894 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑक्टोबर 1978)
  • 1929 : ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडूमधील मृदंगम कलाकार यांचा जन्म.
  • 1929 : ‘किशोर कुमार’ – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1987)
  • 1931 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2002)
  • 1950 : ‘एन. रंगास्वामी’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1961 : ‘बराक ओबामा’ – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1978 : ‘संदीप नाईक’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
  • 1060 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
  • 1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
  • 1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
  • 1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
  • 1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
  • 2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०3 ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 09:44:13 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 06:35:57 पर्यंत
  • करण-कौलव – 09:44:13 पर्यंत, तैतुल – 22:47:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 06:24:22 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 19:11
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 14:20:00
  • चंद्रास्त- 25:23:59
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1678 : अमेरिकेने बनवलेले पहिले जहाज ग्रीफॉन लाँच करण्यात आले.
  • 1783 : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले.
  • 1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
  • 1914 : हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविग यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले.
  • 1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
  • 1948 : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
  • 1960 : नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1994 : संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला.
  • 1994 : साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला आहे.
  • 2000 : मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाइट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2004 : राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1984 : ‘सुनील छेत्री’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1886 : ‘मैथिलिशरण गुप्त’ – हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1964)
  • 1898 : ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1966)
  • 1900 : ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1976)
  • 1916 : ‘शकील बदायूँनी’ – गीतकार आणि शायर यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1970 – मुंबई)
  • 1924 : ‘लिऑन युरिस’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 जून 2003)
  • 1939 : ‘अपूर्व सेनगुप्ता’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1955 : ‘चंद्रशेखरन मोहन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1956 : ‘बलविंदरसिंग संधू’ – 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘गोपाल शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘सुनील ग्रोव्हर’ – भारतीय अभिनेता आणि कॉमेडियन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1929 : ‘एमिल बर्लिनर’ – फोनोग्राफ चे शोधक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1851)
  • 1930 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1854)
  • 1957 : ‘देवदास गांधी’ – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1900 – दरबान, दक्षिण अफ्रिका)
  • 1993 : ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ – अध्यात्मिक गुरू यांचे निधन. (जन्म : 8 मे 1916)
  • 2007 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 जून 1933)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०२ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

  • आजचे पंचांग
  • तिथि-अष्टमी – 07:25:25 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-भाव – 07:25:25 पर्यंत, बालव – 20:36:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 19:12
  • चन्द्र-राशि-तुळ – 23:53:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:26:00
  • चंद्रास्त- 24:40:00
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1677 : शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनाला भेट दिली. तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली.
  • 1790 : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली.
  • 1870 : टॉवर सबवे, जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे, लंडनमध्ये उघडली.
  • 1923 : केल्विन कूलिज हे अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.
  • 1979 : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1990 : इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली.
  • 1996 : अटलांटा ऑलिम्पिकमध्ये, अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ऍथलीट बनला ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • 2001 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1820 : ‘जॉन टिंडाल’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 डिसेंबर 1893)
  • 1834 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1904)
  • 1835 : ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1901)
  • 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
  • 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
  • 1877 : ‘रविशंकर शुक्ला’ – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1965)
  • 1892 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1978)
  • 1910 : ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1978)
  • 1918 : ‘जे. पी. वासवानी’ – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म.
  • 1929 : ‘विद्याचरणा शुक्ला’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुन 2013)
  • 1932 : ‘लमेर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2016)
  • 1941 : ‘ज्यूल्स हॉफमन’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘बंकर रॉय’ – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा जन्म.
  • 1958 : ‘अर्शद अयुब’ – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1589 : ‘हेन्‍री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1551)
  • 1781 : ‘सखारामबापू बोकील’ – पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली मंत्री यांचे निधन.
  • 1922 : ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल’ – टेलिफोन चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1847)
  • 1934 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1847)
  • 1978 : ‘अॅन्टोनी नोगेस’ – मोनॅको ग्रांप्री चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1890)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

३१ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 29:00:25 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 24:42:33 पर्यंत
  • करण-गर – 15:50:07 पर्यंत, वणिज – 29:00:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 28:32:00 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या – 11:16:07 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:46:00
  • चंद्रास्त- 23:26:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक रेंजर दिन
  • हॅरी पॉटर वाढदिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1498 : ख्रिस्तोफर कोलंबस हा पश्चिम गोलार्धातील तिसऱ्या प्रवासादरम्यान त्रिनिदाद बेटांचा शोध घेणारा पहिला युटोपियन बनला.
  • 1657 : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
  • 1658 : औरंगजेब मुघल सम्राट झाला.
  • 1856 : न्यूझीलंडची राजधानी क्राइस्ट चर्चची स्थापना.
  • 1937 : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
  • 1948 : न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडले.
  • 1951 : जपान एरलाइन्सची स्थापना झाली.
  • 1954 : के-2 (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर इटालियन गिर्यारोहकांनी प्रथमच सर केले.
  • 1956 : जिम लेकर कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
  • 1964 : रेंजर 7 अंतराळयानाने चंद्राची पहिली स्पष्ट छायाचित्रे घेतली.
  • 1992 : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • 1992 : सातारचे वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2000 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्र डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2001 : डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार संचालक प्रदान.
  • 2012 : मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1704 : ‘गॅब्रिअल क्रॅमर’ – स्विस गणिती यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1752)
  • 1800 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1882)
  • 1872 : ‘लक्ष्मणरामचंद्र पांगारकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1941)
  • 1880 : ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1936)
  • 1886 : ‘फ्रेड क्विम्बे’ – अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 16 सप्टेंबर 1965)
  • 1902 : ‘के. शंकर पिल्ले’  व्यंगचित्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1989)
  • 1907 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 1966)
  • 1912 : ‘मिल्टन फ्रिडमन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 2006)
  • 1918 : ‘डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर’ – संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 2000)
  • 1919 : ‘हेमू अधिकारी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
  • 1941 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2004)
  • 1947 : ‘मुमताज’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘मनिवंनान’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2013)
  • 1965 : ‘जे. के. रोलिंग’ – हॅरी पॉटर च्या लेखिका यांचा जन्म.
  • 1992 : ‘श्रेया आढाव’ – आहारतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1992 : ‘कियारा अडवाणी’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1750 : ‘जॉन (पाचवा)’ – पोर्तुगालचा राजा यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1689)
  • 1805 : ‘धीरान चिन्नमलाई’ – तामिळ सरदार यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1765)
  • 1865 : ‘जगन्नाथ शंकर शेटे’ – आधुनिक मुंबईचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1803)
  • 1875 : ‘अँड्रयू जॉन्सन’ – अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1808)
  • 1940 : ‘उधम सिंग’ – भारतीय कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1899)
  • 1968 : ‘पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1867)
  • 1980 : ‘मोहंमद रफी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1924 – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
  • 2014 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 23 जून 1948)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

३० जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 26:43:39 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 21:53:56 पर्यंत
  • करण-कौलव – 13:42:43 पर्यंत, तैतुल – 26:43:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 27:40:13 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 10:56:59
  • चंद्रास्त- 22:52:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
  • व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 762 : 762ई.पुर्व : खलीफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
  • 1629 : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप झाला आणि सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1898 : विल्यम केलॉगने कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
  • 1930 : पहिला विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
  • 1945 – दुसरे महायुद्ध : जपानी पाणबुडी I-58 ने यूएसएस इंडियानापोलिस बुडवले आणि 883 नाविकांचा मृत्यू झाला. विमानाने वाचलेल्यांना लक्षात येईपर्यंत पुढील चार दिवसांत बहुतेकांचा मृत्यू होतो.
  • 1962 : ट्रान्स कॅनडा महामार्ग, जगातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग, सुमारे 8,030 किमी खुला झाला.
  • 1971 : अपोलो 15 चंद्रावर उतरले.
  • 1997 : राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर यांना जाहीर.
  • 2000 : चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
  • 2001 : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2014 : पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू.
  • 2020 : नासाच्या मंगळ 2020 मोहिमेचे केप कॅनवेरल एअर फोर्स स्टेशनवरून ॲटलस V रॉकेटवर प्रक्षेपण करण्यात आले

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1818 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1848)
  • 1855 : ‘जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स’ – जर्मन उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1919)
  • 1863 : ‘हेन्री फोर्ड’ – फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 1947)
  • 1947 : ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर’ – ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे 38वे राज्यपाल यांचा जन्म.
  • 1951 : ‘गॅरी यहूदा’ – भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार यांचा जन्म.
  • 1973 : ‘सोनू निगम’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1973 : ‘सोनू सूद’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1980 : ‘जेम्स अँडरसन’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1622 : ‘संत तुलसीदास’ – यांनी देहत्याग केले.
  • 1718 : ‘विल्यम पेन’ – पेनसिल्व्हेनियाचे स्थापक यांचे निधन.
  • 1898 : ‘ऑटोफोन बिस्मार्क’ – जर्मनीचे पहिले चान्सलर यांचे निधन. (जन्म : 1 एप्रिल 1815)
  • 1930 : ‘जोन गॅम्पर’ – बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1877)
  • 1947 : ‘जोसेफ कूक’ – ऑस्ट्रेलियाचे 6वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1960 : ‘गंगाधर बाळकृष्ण देशपांडे’ – कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 31 मार्च 1871)
  • 1983 : ‘वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक यांचे निधन. (जन्म : 2 मे 1920)
  • 1994 : ‘शंकर पाटील’ – मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1926)
  • 1995 : ‘डॉ. विनायक महादेव दांडेकर’ – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1920)
  • 1997 : ‘बाओडाई’ – व्हिएतनामचा राजा यांचे निधन.
  • 2007 : ‘इंगमार बर्गमन’ – स्विडिश चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2007 : ‘मिकेलांजेलो अँतोनियोनी’ – इटालियन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2011 : ‘डॉ. अशोक रानडे’ – संगीत समीक्षक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1937)
  • 2013 : ‘बेंजामिन वॉकर’ – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२९ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 24:48:47 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 19:28:34 पर्यंत
  • करण-भाव – 12:03:07 पर्यंत, बालव – 24:48:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 27:04:48 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 10:07:59
  • चंद्रास्त- 22:21:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
  • पावसाचा दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1852 : जोतिबा फुले यांचा विश्रामबाग वाडा येथे स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
  • 1876 : फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
  • 1920 : अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली.
  • 1921 : ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला.
  • 1946 : टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले.
  • 1948 : 12 वर्षानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले.
  • 1957 : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना.
  • 1985 : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1987 : भारत-श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली.
  • 1997 : हरनाम घोष कोलकाता, स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला.
  • 2021 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1838 : ‘शाहजहान बेगम’ – भोपाळच्या नवाब बेगम यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1901)
  • 1883 : ‘बेनिटो मुसोलिनी’ – इटलीचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1945)
  • 1898 : ‘इसिदोरआयझॅक राबी’ – नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1904 : ‘जे. आर. डी. टाटा’ – भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 29 नोव्हेंबर 1993)
  • 1922 : ‘ब. मो. पुरंदरे’ – लेखक आणि शिवशाहीर यांचा जन्म.
  • 1925 : ‘शि. द. फडणीस’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म.
  • 1937 : ‘डॅनियेल मॅकफॅडेन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1953 : ‘अनुप जलोटा’ – भजन गायक यांचा जन्म.
  • 1954 : ‘हर्षद मेहता’ – भारतीय स्टॉक ब्रोकर आणि एक दोषी फसवणूक करणारा यांचा जन्म.
  • 1959 : ‘संजय दत्त’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1981 : ‘फर्नांडो अलोन्सो’ – स्पॅनिश फोर्मुला वन रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 238 : 238ई.पुर्व : ‘बाल्बिनस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1108 : ‘फिलिप (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 23 मे 1052)
  • 1891 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर’ – यांचे निधन.
  • 1781 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1713)
  • 1890 : ‘व्हिन्सेंटव्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1853)
  • 1891 : ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ – बंगाली समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1820)
  • 1900 : ‘उंबेर्तो पहिला’ – इटलीचा राजा यांचे निधन
  • 1987 : ‘बिभूतीभूशन मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1894)
  • 1994 : ‘डोरोथीक्रोफूट हॉजकिन’ – नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1996 : ‘अरुणा असफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म : 16 जुलै 1909)
  • 2002 : ‘सुधीर फडके’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जुलै 1919)
  • 2003 : ‘जॉनी वॉकर’ – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1926)
  • 2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1928)
  • 2009 : ‘महाराणी गायत्रीदेवी’ – जयपूरच्या राजमाता यांचे निधन. (जन्म : 23 मे 1919)
  • 2013 : ‘मुनीर हुसेन’ – भारतीय क्रिकेटरपटू यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search