कोल्हापूर येथे बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. पंचगंगेत विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे इराणी खाणीत प्रशासनातर्फे बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. एका सरकत्या रॅम्पच्या मार्फत इथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सोय केली गेली आहे.
विसर्जनाच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी आणि विसर्जनासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आले आहे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. ह्या आधुनिक पद्धतीचा भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर अनेक भाविकांनी आपला विरोध पण दर्शविला आहे.
ह्या रॅम्पवरून गणेश विसर्जन करून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे असे बोलले जात आहे. रॅम्प च्या टोकावरून मूर्ती पाण्यात टाकली जात आहे. गणेश मुर्त्यांची संख्या वाढली असल्याने काही कर्मचारी अक्षरशः गणेशमूर्ती पाण्यात फेकून देत असल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी ह्या पद्धतीवर आपला आक्षेप दर्शविला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी
”याला विसर्जन म्हणताच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???” ह्या शब्दात आपला विरोध दर्शविला आहे.
याला विसर्जन म्हणताच नाही !!!
कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला??? pic.twitter.com/V5aYBmx95A— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2022