Tag Archives: ganpati special22

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. या स्पर्धेचा विषय ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून; तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल,ह्या हेतूने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बक्षिसांचे स्वरूप 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :

अ. प्रथम क्रमांक :- ५१,०००/

ब. द्वितीय क्रमांक :- २१, ०००/-

क. तृतीय क्रमांक :- ११,०००/-

ड. उत्तेजनार्थ :- ५००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :

अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/

ब. द्वितीय क्रमांक :- ७, ०००/-

क. तृतीय क्रमांक :- ५,०००/-

ड. उत्तेजनार्थ :- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

स्पर्धेची नियमावली :

१. सदर स्पर्धा वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी आहे.

२. सदर स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :

२.१ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.

२.२ प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.

२.३ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी.

२.४ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल.

२.५ चित्रफितीला आवाजाची जोड (व्हाइस-ओव्हर) देऊ शकता.

२.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त १०० MB असावी. तसेच ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी.

३. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :

३.१ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या देखाव्याचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.

३.२ प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.

३.३ आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या मताधिकार, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी.

३.४ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यांवर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल.

३.५ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त ५०० MB असावी. तसेच ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि १० मिनिटांपेक्षा अधिक असू नये.

३.६ गणेशोत्सव मंडळाने सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गूगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून, त्यानंतर डॅशचे चिन्ह (-) देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे (उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मंदार मोरे) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहावा.

३.७ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गूगल अर्जावर जोडावे. या पत्राचा नमुना गूगल अर्जावर, जिथे हे पत्र जोडायचे आहे, तिथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

४. स्पर्धकांनी आपले फोटो आणि ध्वनिचित्रफीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

५. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.

६. दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ ते ९ सप्टेंबर २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

७.मतदान, निवडणूक, लोकशाही या विषयांना अनुसरून साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.

८. आलेल्या देखाव्या-सजावटींमधून सर्वोत्तम देखावे-सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

९. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही.

१०.  स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.

११. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

   

Loading

गणेशभक्तांसाठी खुशखबर – ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही

गेल्या वर्षी गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. गेल्या वर्षी कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी निवड झाल्यावर नारायण राणे यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. या वर्षीही मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे.
हि विशेष गाडी दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीसाठी सुटणार आहे. हि गाडी चिपळूण,रत्नागिरी, कणकवली या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचा सर्व संपूर्ण खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे.
मुंबईतील प्रत्येक मंडलमधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात येतील. जिल्हाध्यक्षांची चर्चा करून ही ही नावे नोंदवली जातील. नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
RELATED NEWS

Loading

गणेशोत्सव दरम्यान ह्या गाडीचे डबे वाढविण्यात येणार.

गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने MEMU विशेष रोहा-चिपळूण-रोहा (01157/01158) ह्या गाडीचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या आधी ही गाडी ८ डब्यांची चालणार असे घोषित करण्यात आले होते ती आता १२ डब्यांची केली आहे.

मागच्याच आठवड्यात कोकण रेल्वेने ६१०११ /६१०१२ दिवा-रोहा-दिवा ही गाडीपुढे चिपळूण पर्यंत विस्तारित केली होती. हीच गाडी पुढे रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा ०११५७/०११५८ ह्या नंबरने चालविण्यात येणार आहे.

 

Related :गणेशोत्सवासाठी वेस्टर्न लाईनला राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेच्या अजून विशेष गाडया

 

०११५७ ही गाडी रोह्यातून सकाळी ११.०५ ला सुटेल ती चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल. ०११५८ ही गाडी ३.४५ ला चिपळूण येथून सुटून १६.१० ला रोह्याला पोहोचेल.

माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड ह्या स्टेशन वर ह्या गाड्या थांबतील.

गणेशभक्तांना कोकण रेल्वेची अजून एक खुशखबर. ह्या गाडीचा विस्तार

गणेशभक्तांसाठी खुशखबर – ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही

 

Loading

गणेशोत्सवासाठी वेस्टर्न लाईनला राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेच्या अजून विशेष गाडया

 

वसईमार्गे गणेशोत्सवासाठी काही विशेष गाड्या सोडण्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 18 जुलै रोजी चालू होईल. ह्या गाड्यांचा फायदा ठाणे आणि पालघर तालुक्यातील कोकणवासीयांना होईल. मुंबई सेंट्रल वरून वसईमार्गे काही गाड्या सोडण्यात आल्या आहेत. वेस्टर्न लाईनला राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी ह्या गाड्यांना बोरिवली येथे थांबा दिला आहे. 

 

1. MUMBAI CENTRAL TO THOKUR

MUMBAI CENTRAL- THOKUR EXPRESS  (09001)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 23/08/2022, 30/08/2022, 06/09/2022 रोजी ही गाडी 12.00 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल ती ठोकूर, मंगलोरला दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता पोहोचेल.

THOKUR – MUMBAI CENTRAL EXPRESS  (09002)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी बुधवारी 24/08/2022, 31/08/2022, 07/09/2022 रोजी ही गाडी 10.45 वाजता ठोकूरवरून,मंगलोर निघेल ती मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 7.05 वाजता पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती  AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2  Total 24 Coaches.

ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्णा रोड,कुमता,मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.


2. MUMBAI CENTRAL TO MADGAON JN

 

MUMBAI CENTRAL- MADGAON JN EXPRESS  (09003)
हि गाडी आठवड्यातून रोज मंगळवार सोडून दिनांक 24/08/2022 ते 11/09/2022 पर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी 12.00 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघेल ती मडगावला दुसऱ्या दिवशी 4.30 वाजता पोहोचेल.

MADGAON JN – MUMBAI CENTRAL EXPRESS  (09004)

हि गाडी आठवड्यातून रोज बुधवार सोडून दिनांक 25/08/2022 ते 12/09/2022 पर्यंत चालविण्यात येईल. ही गाडी 09.15 वाजता मडगाववरून निघेल ती मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी 1.00 वाजता पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती  AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2  Total 24 Coaches.

ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली road,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या स्थानकांवर थांबतील.


3. BANDRA TO  KUDAL

 

BANDRA(T) – KUDAL  EXPRESS  (09011)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी गुरुवारी 25/08/2022, 01/09/2022, 06/09/2022 रोजी ही गाडी 14.40 वाजता बांद्रा टर्मिनसवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.

KUDAL – BANDRA(T) EXPRESS  (09012)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शुक्रवारी 26/08/2022, 02/09/2022, 07/09/2022 रोजी ही गाडी 6:45 वाजता कुडाळवरून निघेल ती बांद्रा टर्मिनसला दुसऱ्यादिवशी 21:30 ला पोहोचेल.

डब्यांची स्थिती   General – 20 + Generator Car-2  Total 22 Coaches.

ह्या गाड्या बोरिवली,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग  ह्या स्थानकांवर थांबतील.


4. UDHNA TO  MADGAON JN

UDHNA – MADGAON  EXPRESS  (09018)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शुक्रवारी 26/08/2022, 02/09/2022, 09/09/2022 रोजी ही गाडी 15:25 वाजता उधनावरून निघेल ती मडगावला दुसऱ्यादिवशी 9:00 ला पोहोचेल.

 MADGAON – UDHNA EXPRESS  (09017)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी शनिवारी 27/08/2022, 03/09/2022, 10/09/2022 रोजी ही गाडी 10:05 वाजता मडगाववरून निघेल ती उधनाला दुसऱ्यादिवशी 5:00 ला पोहोचेल.

डब्यांची स्थिती  AC (2A) -1 + Sleeper (SL)-12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2  Total 24 Coaches.

ह्या गाड्या नवसारी ,वलसाड, वापी, पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या स्थानकांवर थांबतील.


5. AHMEDABAD TO  KUDAL 

AHMEDABAD – KUDAL EXPRESS  (09412)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 09:30 वाजता अहमदाबादवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.

 

KUDAL- AHMEDABAD EXPRESS  (09411)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 06:45 वाजता कुडाळवरून निघेल ती अहमदाबादला दुसऱ्यादिवशी 3:30 ला पोहोचेल.

डब्यांची स्थिती  AC (2A) -2 + Sleeper (SL)-8 + General – 4 + AC (3A)-6 + SLR-2  Total 22Coaches.

ह्या गाड्या सुरत,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील.


6. VISHVAMITRI TO  KUDAL 

VISHVAMITRI – KUDAL EXPRESS  (09150)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी सोमवारी 29/08/2022, 05/09/2022,रोजी ही गाडी 10:00 वाजता विश्वामित्रीवरून निघेल ती कुडाळला दुसऱ्यादिवशी 5:40 ला पोहोचेल.

 

KUDAL- VISHVAMITRI EXPRESS  (09411)

हि गाडी आठवड्यातून एक दिवशी मंगळवारी 30/08/2022, 06/09/2022,रोजी ही गाडी 06:45 वाजता कुडाळवरून निघेल ती विश्वामित्रीला दुसऱ्यादिवशी 1:00 ला पोहोचेल.

डब्यांची स्थिती  AC (2A) -1 + Sleeper (SL)- 12 + General – 4 + AC (3A)-5 + SLR-2  Total 24 Coaches.

ह्या गाड्या भारूच ,सुरत,वापी,पालघर,वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा ,आरवली,संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली, सिंधुदुर्ग ह्या स्थानकांवर थांबतील..

 

 

कोकणरेल्वेच्या गणेशोत्सवासाठी अजून गाड्या – एकूण 20 फेऱ्या

गणेशभक्तांसाठी खुशखबर – ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही

गणेशोत्सव दरम्यान ह्या गाडीचे डबे वाढविण्यात येणार.

MEMU ट्रेन म्हणजे काय?

Loading

कोकणरेल्वेच्या गणेशोत्सवासाठी अजून गाड्या – एकूण 20 फेऱ्या

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर याआधी सोडलेल्या काही विशेष गाड्यांशिवाय अजून काही विशेष गाड्या सोडणार आहेत असे जाहीर केले आहे . नागपूर ते मडगाव ह्या स्टेशन दरम्यान ह्या गाड्या चालविण्यात येतील. ह्या गाडीच्या एकूण 20 फेऱ्या चालविण्यात येतील. 
ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक 16 जुलै रोजी चालू होईल.

NGP MAO SPECIAL (01139)

हि गाडी 27 जुलै ते 28 सप्टेंबर पर्यंत आठवड्याला 2 दिवस बुधवार आणि शनिवार 27,30 जुलै,3,6,10ऑगस्ट, 14,17,21,24,28 सप्टेंबर ह्या दिवशी
चालविण्यात येणार आहेत.

डब्यांची स्थिती    AC (2A) -1 + Sleeper (SL)-11 + General – 4 + AC (3A)-4 + SLR-2  Total 22 Coaches.

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

NGP MAO SPECIAL (01139)

Station Name TIME Day
NAGPUR 15:05 1
WARDHA JN 16:12 1
PULGAON JN 16:33 1
DHAMANGAON 16:50 1
BADNERA JN 18:03 1
AKOLA JN 19:03 1
MALKAPUR 20:25 1
BHUSAVAL JN 21:35 1
NASHIK ROAD 01:00 2
IGATPURI 01:50 2
KALYAN JN 04:35 2
PANVEL 05:40 2
ROHA 06:50 2
MANGAON 07:24 2
VEER 07:38 2
KHED 08:26 2
CHIPLUN 08:48 2
SAVARDA 09:04 2
ARAVALI ROAD 09:18 2
SANGMESHWAR 09:32 2
RATNAGIRI 10:25 2
ADAVALI 10:56 2
VILAVADE 11:12 2
RAJAPUR ROAD 11:36 2
VAIBHAVWADI RD 12:02 2
NANDGAON ROAD 12:20 2
KANKAVALI 12:40 2
SINDHUDURG 13:02 2
KUDAL 13:22 2
SAWANTWADI ROAD 13:52 2
THIVIM 14:42 2
KARMALI 15:32 2
MADGAON 17:30 2

 

 

MAO NGP SPECIAL (01140)

हि गाडी 28 जुलै ते 29 सप्टेंबर पर्यंत आठवड्याला 2 दिवस गुरुवार आणि रविवार 28,31 जुलै. 4,7,11ऑगस्ट, 15,18,22,25,29 सप्टेंबर चालविण्यात येणार आहेत.

डब्यांची स्थिती    AC (2A) -1 + Sleeper (SL)-11 + General – 4 + AC (3A)-4 + SLR-2  Total 22 Coaches.

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

Station Name TIME Day
MADGAON 19:00 1
KARMALI 19:32 1
THIVIM 19:52 1
SAWANTWADI ROAD 20:24 1
KUDAL 20:44 1
SINDHUDURG 20:56 1
KANKAVALI 21:22 1
NANDGAON ROAD 21:44 1
VAIBHAVWADI RD 22:07 1
RAJAPUR ROAD 22:42 1
VILAVADE 23:10 1
ADAVALI 23:32 1
RATNAGIRI 00:45 2
SANGMESHWAR 01:20 2
ARAVALI ROAD 01:38 2
SAVARDA 01:52 2
CHIPLUN 02:12 2
KHED 02:58 2
VEER 03:52 2
MANGAON 04:04 2
ROHA 05:20 2
PANVEL 07:05 2
KALYAN JN 08:20 2
IGATPURI 10:05 2
NASHIK ROAD 11:10 2
BHUSAVAL JN 14:40 2
MALKAPUR 15:22 2
AKOLA JN 16:50 2
BADNERA JN 18:25 2
DHAMANGAON 18:52 2
PULGAON JN 19:02 2
WARDHA JN 19:30 2
NAGPUR 21:30 2

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search