Tag Archives: mini train

माथेरान ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर; बंद पडलेली टॉय ट्रेन उद्यापासून सुरु

रायगड :नेरळ माथेरान ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. येथील प्रसिद्ध असलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे. उद्या दिनांक २२ ओक्टोम्बर रोजी हि सेवा पुन्हा चालू होणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. 
येथे पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारे भुरस्सलन ह्यामुळे ह्या मार्गावरील रेल्वे रुळे खराब झाल्याकारणाने हि सेवा बंद करावी लागली होती. मागील ३ वर्षे हि सेवा बंद होती. आता ह्या रेल्वे मार्गात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.  
उद्यापासून खालील सेवा चालू होतील 
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन 
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन स्वरूपात 4 गाड्या चालवनिण्यात येणार आहेत.  त्यापैकी २ नेरळ ते माथेरान  आणि २ माथेरान ते नेरळ अशा चालणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत. 
माथेरान ते अमन लॉज (शटल सेवा)
ह्या मार्गावर टॉय ट्रेन स्वरूपात ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत. 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search