रत्नागिरी : कोकणवासियांचा राग दिसून येत नाही, तो कमालीचा सहनशील आहे आणि त्याची सहनशीलता त्यांना घातक ठरत आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत रिफायनरी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असे त्यांनी प्रकल्पाबत संमिश्र वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले.
हेही वाचा : जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल केल्यास… माजी खासदार निलेश राणे यांचा इशारा.
कोकणवासियांचा राग दिसून येत नाही.
या राज ठाकरे यांनी म्हटले की, कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. कोकणवासीयांची सहनशक्ती त्यांना घातक ठरत आहे. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.
कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय, बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जेव्हा मोठ्या प्रमाणात अशी बाहेरच्या भुरट्यांकडून खरेदी होते तेव्हा कोकणी माणूस जागृत राहिला पाहिजे असे ते म्हणाले.