शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे आणि त्यांचा सुरक्षारक्षक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.
सरकारच्या मराठा आरक्षण संबंधित आजच्या सभेच्या उपस्थितीसाठी ते मुंबई येथे येत असताना हा अपघात घडला आहे. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता तो किरकोळ जखमी झाल्याचे समजते आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन डोंगर कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर नियमित फेऱ्यांशिवाय काही विशेष गाड्या ह्या आधीच सोल्डल्या आहेत. त्या गाड्यांचे आरक्षण जवळपास फुल झाले आहे. प्रवासाचा वाढत प्रतिसाद पाहता कोकण रेल्वेने ह्या कालावधी साठी आजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे
ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक १५ ऑगस्ट रोजी चालू होईल.
LTT-KUDAL-LTT WEEKLY-01167
दिनांक २४.०८.२०२२ रोजी बुधवारी हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
LTT KUDL SPL (01167)
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
LOKMANYATILAK T
00:45
1
2
THANE
01:10
1
3
PANVEL
01:55
1
4
ROHA
03:10
1
5
MANGAON
03:36
1
6
KHED
04:32
1
7
CHIPLUN
05:12
1
8
SAVARDA
05:30
1
9
SANGMESHWAR
05:52
1
10
RATNAGIRI
06:55
1
11
RAJAPUR ROAD
08:12
1
12
VAIBHAVWADI RD
08:30
1
13
KANKAVALI
09:12
1
14
SINDHUDURG
09:32
1
15
KUDAL
11:00
1
डब्यांची स्थिती 18 Sleeper (SL) + 2 SLR
LTT-KUDAL-LTT WEEKLY-01168
दिनांक २५.०८.२०२२ रोजी गुरुवारी हि गाडी कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
KUDL LTT SPL (01168)
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
KUDAL
11:00
1
2
SINDHUDURG
11:12
1
3
KANKAVALI
11:32
1
4
VAIBHAVWADI RD
12:12
1
5
RAJAPUR ROAD
12:40
1
6
RATNAGIRI
15:05
1
7
SANGMESHWAR
15:42
1
8
SAVARDA
16:20
1
9
CHIPLUN
17:42
1
10
KHED
18:22
1
11
MANGAON
19:52
1
12
ROHA
21:40
1
13
PANVEL
22:40
1
14
THANE
23:20
1
15
LOKMANYATILAK T
23:55
1
डब्यांची स्थिती 18 Sleeper (SL) + 2 SLR
KUDAL-PANVEL-KUDAL WEEKLY-01170
दिनांक २४.०८.२०२२ रोजी बुधवारी हि गाडी कुडाळ ते पनवेल दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
KUDL PNVL SPL (01170)
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
KUDAL
12:00
1
2
SINDHUDURG
12:12
1
3
KANKAVALI
12:32
1
4
VAIBHAVWADI RD
13:02
1
5
RAJAPUR ROAD
13:40
1
6
RATNAGIRI
15:25
1
7
SANGMESHWAR
16:10
1
8
SAVARDA
16:42
1
9
CHIPLUN
17:42
1
10
KHED
18:22
1
11
MANGAON
19:52
1
12
ROHA
21:40
1
13
PANVEL
22:55
1
डब्यांची स्थिती 18 Sleeper (SL) + 2 SLR
KUDAL-PANVEL-KUDAL WEEKLY-01169
दिनांक २५.०८.२०२२ रोजी गुरुवारी हि गाडी पनवेल ते कुडाळ टर्मिनसदरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
PNVL KUDL SPL (01169)
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
PANVEL
00:10
1
2
ROHA
01:25
1
3
MANGAON
01:52
1
4
KHED
03:02
1
5
CHIPLUN
03:40
1
6
SAVARDA
04:02
1
7
SANGMESHWAR
04:24
1
8
RATNAGIRI
05:05
1
9
RAJAPUR ROAD
06:02
1
10
VAIBHAVWADI RD
06:20
1
11
KANKAVALI
06:52
1
12
SINDHUDURG
07:22
1
13
KUDAL
09:00
1
डब्यांची स्थिती 18 Sleeper (SL) + 2 SLR
LTT-SAWANTWADI-LTT WEEKLY-01171
दिनांक २५.०८.२०२२ रोजी गुरुवारी हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
रत्नागिरी ते मडगाव ह्या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी ह्या दोन गाड्या तात्पुरत्या काळापुरती रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
ह्या आधी एका दिनांक 16/06/2022 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे ह्या गाड्या दिनांक 15/08/2022 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक 31/10/2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पहिला टप्पा पार पाडला आहे,त्यात शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. पण ह्या वाटपावरून शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याचे पहावयास मिळाले. काहीजणांनी तर आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली तर काहीजणांनी ती आपल्या कृतीमधून दाखवून दिली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढविणारी एक घटना समोर आली आहे.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केली होती त्यामध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक विडिओ पोस्ट करून ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब…’ असे ट्विट केले आहे.
त्यांच्या ह्यांच्या ट्विट मुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने ते पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत अशा चर्चा होवू लागल्या आहेत.
दरम्यान, ह्यासंबधी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते त्यांनी सारवासारवीची उत्तरे दिल्याचेही समजते. आधी ते म्हणाले की माननीय उद्धव ठाकरे यांचे स्थान हे आमच्यासाठी कुटुंबप्रमुखाचेच आहे असे समजते. ह्या ट्विटचा वेगळा अर्थ घेवू नये असे ते म्हणाले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी ही ट्विट डिलीट केली आणि आपल्याकडून ही ट्विट चुकून पोस्ट झाली असे ते म्हणाले. आपला राजकारणातील 38 वर्षाचा अनुभव आणि मताधिक्य पाहता मला मंत्रिपद मिळायला हवे होते. तसा शब्दही दिला गेला होता असे बोलून त्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली.
कदाचित मी मंत्रिपदासाठी पात्र नसेन म्हणुन मला मंत्रिपद दिले नसेल, पुढे कधितरी त्यांना मी पात्र झाली असे वाटेल तेव्हा ते मला मंत्रिपदा देतील अशा शब्दात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना मंत्रिपद का दिले नाही ह्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या आहेत. त्यांच्या ह्या वक्तव्यातून त्यांची नाराजी व्यक्त होत असून त्यासंबंधी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना मुद्दाम डावलले जात आहे असे भाजपवर आरोप केले आहेत. एकंदर माजी भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जवळील नेत्यांना आताच्या भाजपा नेत्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पंकजा मुंडे ह्या ओबीसी आहेत आणि त्यांना डावलून त्यांनी ओबीसी समाजावर पण अन्याय केला आहे असेही आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेत.
एकनाथ खडसे ह्यांच्या ह्या विधानावर प्रत्युत्तर देताना भाजपचे नवनिर्वाचित मंत्री गिरीश महाजन म्हणाले की भाजपने ओबीसी समजाला न्याय दिला आहे. मी स्वतः ओबीसी आहे तसेच जिल्हय़ाचे बघायचे तर मंत्रिपदाची शपथ घेतलेले गुलाबराव पाटील पण ओबीसी आहेत. पंकजा मुंडे संबंधी बोलायचे झाले तर त्यांना लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार असे सूचक विधान केले आहे.
मुंबई :खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा हा वाद चालू असताना शिंदे गटाने नवीन प्लॅन आखला आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करणार असे बोलले जात होते पण आज आज एक नवीन माहिती समोर आली आहे. शिंदेगट आता दादर आणि कुलाबा येथे प्रतिसेनाभवन उभे करणार आहे आणि त्यासाठी जागेचे संशोधन चालू केले गेले आहे. एवढेच नाही तर मुंबई मध्ये सर्व ठिकाणी शिंदे गट आपल्या गटाच्या शाखा खोलणार आहेत. अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची गती पाहता त्यांना एका अशा भवनाची गरज आहे जे आमच्या पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय समजले जाईल. असे ते पुढे म्हणाले.
शिवसेनाभवन हे पक्षाचे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते, ह्या ठिकाणी पक्षासंबंधी सर्व बैठकी आणि निर्णय घेतले जातात. शिवसेनेच्या शाखा ह्या शिवसेना पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेला जोडण्याचा एक मुख्य दुवा समजला जातो. बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष ह्या शाखेंद्वारे घरोघरी पोहचवला होता. आता त्याची पुनरावृत्ती शिंदेगट आपल्या गटाचे राजकारणातील स्थान मजबूत करण्यासाठी करणार आहे. सुरवातीला मुंबईमध्ये सर्व विभागात ह्या शाखा असतील, तसेच प्रत्येक शाखेत शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांची नियुक्ती करण्यात येणार आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी ह्यावर टीका केली आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी हे मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असे ते म्हणाले.
मेट्रो 3 च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील प्रस्तावित जागा कोणत्याही दृष्टीने योग्य नसून फक्त आपल्या ‘EGO’ साठी ठाकरे सरकार आरे येथील कारशेडला विरोध करून कांजूरमार्ग येथील जागेसाठी प्रयत्नशील होते असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मविआ सरकार सत्तेत असताना त्यांनी कारशेड च्या जागेच्या प्रश्नासाठी एक समिती नेमली होती त्याच समितीने ह्यावर आपला अहवाल दिला होता. त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केले होते की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आजून ४ वर्षे लागतील आणि प्रचंड खर्च होईल आणि व्यवहार्यदृष्ट्या पाहता योग्य नाही. त्यांचाच समितीने हा निर्णय दिला असताना कांजूरमार्गच्या जागेला मेट्रो 3 च्या कारशेड साठी निवडणे हा निर्णय केवळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त आपल्या ‘EGO’ साठी घेतला आहे.
आरे येथील कारशेडचे काम 29% पूर्ण झाले आहे, एकूण प्रकल्पाचे काम 85% पूर्ण झाले आहे. ह्यापुढे एकही झाड ह्या प्रकल्पासाठी तोडावे लागणार नाही. आणि आता जर कारशेड तिकडे हलवायचे म्हंटले तर त्यासाठी बराच खर्च करावा लागेल. सामान्य जनतेच्या खिशातून आलेल्या पैशाची अशी उधळण करता येणार नाही असे ते पुढे म्हणाले.
मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 17 ते 26 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीमध्ये ठाकरे गटाला डावलून शिंदे गटातील उदय सामंत आणि दादा भुसे यांचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर खालील सदस्यांची नामनियुक्ती
समिती प्रमुख
१) राहुल नार्वेकर, (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा तथा समिती प्रमुख)
सदस्य
1) एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री
2) देवेंद्र फडणवीस, मा. उप मुख्यमंत्री
3) अजित पवार, मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा
4) राधाकृष्ण विखे-पाटील, मा. मंत्री
5) सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री
6) चंद्रकांत पाटील, मा.मंत्री
7) दादाजी भुसे, मा.मंत्री
8) उदय सामंत, मा. मंत्री
9) जयंत पाटील, विधानसभा सदस्य
10) बाळासाहेब थोरात, विधानसभा सदस्य
11) अशोक चव्हाण, विधानसभा सदस्य
निमंत्रित सदस्य
1) नरहरी झिरवाळ, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
2)आशिष शेलार, विधानसभा सदस्य
3) छगन भुजबळ, विधानसभा सदस्य
4) अमिन पटेल, विधानसभा सदस्य
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये ठाकरे गट वरचढ.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये शिंदे गटाऐवजी ठाकरे गटाने बाजी मारली आहे.. ठाकरे गटाचे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड आणि अनिल परब यांचा विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल.
नक्की शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे ह्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद चालू आहे त्यात निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याना एक आजून धक्का दिला आहे. पक्षावर किंवा निवडणूक चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला त्यासंबंधी पुरावे आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी १ महिन्यांची मुदत मागितली होती.पण आज निवडणूक आयोगाने एक महिन्याची मुदत न देता जेमतेम १५ दिवसांची मुदत दिली आहे.
येत्या २३ ऑगस्ट पर्यंत त्यांना सर्व पुरावे आणि कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागतील. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याचे पुरावे म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आणि इतर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतील.
सावंतवाडी : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शनिवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या मतदारसंघात जाहीर मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ ह्याबद्दल त्यांनी आजून काही सांगितले नाही आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून चालत आलेल्या महाराष्ट्र राज्यातील सत्ता राज्य नाट्यामध्ये दीपक केसरकर यांचा रोल महत्वाचा राहिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी ह्या गटाची एक महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली आहे.
दीपक केसरकर हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा मतदारसंघात येवून गेले होते. त्यावेळी त्यांनी कोणतीही सभा किंवा शक्तिप्रदर्शन केले नव्हते. ह्याच दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे सभा झाली होती. ह्या सर्व गोष्टींमुळे दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघातील शक्ति कमी झाल्याची विधाने त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणुन हा जाहीर मेळावा म्हणजे एक प्रकारचे शक्ति प्रदर्शन असेल असे बोलण्यात येत आहे.
शिंदेगट सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले होते. आता दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद पण मिळाले आहे. ह्या सर्वाचा फायदा मतदारसंघात विकास कामांसाठी होईल अशी आशा आहे असे बोलले जात आहे.