Category Archives: ताज्या घडामोडी

इन्सुली घाटात पुणे-पणजी शिवशाही बसला अपघात.

सिंधुदुर्ग – इन्सुली घाटीत ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने धडक दिल्याने पुणे-पणजी प्रवास करणार्‍या शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र शिवशाही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

दरम्यान अपघात झाल्यावर टेम्पो चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला.याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली. तशी तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Loading

वैभववाडी येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची आत्महत्या

13-02-2023 17:00 PM
  • वैभववाडी : येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
  • महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे त्या मयत तरुणाचे नाव आहे.
  • मी माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे. असे चिठ्ठीत लिहून ठेवले
  • घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस अभिजित मोरे, सुरज पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
  • तरुणाचा मृतदेह पोलीसानी शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे.
  • अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.
13-02-2023 12:00 AM

इंडियन आयडॉल च्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याद्वारे आयोजित

  • कणकवली:छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली भाजप ऑफिस समोरील कणकवली पर्यटन महोत्सव च्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
  • या निमित्ताने इंडियन आयडॉल च्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी होणार आहे.
  • यासोबत १९ ते २१ फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी सूक्ष्म, लघु व मध्यम या केंद्रीय उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजनांचे स्टॉ ल देखील लावले
    जाणार आहेत.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवलेजात असून या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे…

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search