Category Archives: अंबरनाथ – बदलापूर
- मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
- हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
- कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
- मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
- हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
- घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
- या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
- कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
- या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
- हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.




बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला आहे.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत आहेत.
बदलापूर दि. २५ एप्रिल : बदलापुर आणि अंबरनाथ येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात उद्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार २६ एप्रिल सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गेल्याच आठवड्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला होता. त्यात तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उंच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच येत्या शुक्रवारी उल्हास नदी किनारच्या खरवई येथील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथे नवी पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल.