Category Archives: ईतिहास

“दिनांक, दूरदर्शन, वेतन……….” स्वा. सावरकरांनी मराठी भाषेला दिलेत शेकडो शब्द; यादी येथे वाचा

   Follow us on        
Savarkar Contribution’s for Marathi Language : स्वात्रंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्याचे देश प्रेम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गोष्टी आताच्या प्रेक्षकवर्गाला चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  या शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट जी अनेकांना माहितीही नसेल ती  म्हणजे त्यांचे मराठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले शेकडो शब्द.
सावरकरांनी दिलेले हे शब्द त्यांच्याकडून मरठी भाषेला दिलेलं एक गिफ्ट्च आहे..
कारण मराठी भाषेची व्याप्ती ही वेळीच वाढविणे खूप गरजेचे आहे हे सावरकरांनी आधीच ओळखले होते..त्यामुळे रोजच्या वापरात असे काही शब्द होते की जे उर्दू,हिंदी याची सरमिसळ असणारे शब्द होते.. त्यामुळे मराठी भाषेचे सौंदर्य खुलवायचे असेल तर त्या भाषेला साजेशी अशी शब्दरचना असायला हवी ही सावरकरांची इचछा होती.
सर्वसामान्य माणसाच्या संवादाचे माध्यम असणारी आपली ही सुंदर भाषा जर त्याच शैलीत बोलल्या गेली नाही तर त्याचे सौंदर्य हे खुलत नाही असे सावरकरांचे म्हणणे होते..अनेक इंग्रजी शब्द आपण आजही मराठी भाषेत वापरतो हे सावरकरांना मान्य नव्हतं.. आणि त्यातूनच त्यांनी अशी काही मराठी शब्दरचना केली की जी आजही आपण वापरतो..
  • दिनांक (तारीख)
  • क्रमांक (नंबर)
  • बोलपट (टॉकी)
  • नेपथ्य
  • वेशभूषा (कॉश्च्युम)
  • दिग्दर्शक (डायरेक्टर)
  • चित्रपट (सिनेमा)
  • मध्यंतर (इन्टर्व्हल)
  • उपस्थित (हजर)
  • प्रतिवृत्त (रिपोर्ट)
  • नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
  • महापालिका (कॉर्पोरेशन)
  • महापौर (मेयर)
  • पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
  • विश्वस्त (ट्रस्टी)
  • त्वर्य/त्वरित (अर्जंट)
  • गणसंख्या (कोरम)
  • स्तंभ ( कॉलम)
  • मूल्य (किंमत)
  • शुल्क (फी)
  • हुतात्मा (शहीद)
  • निर्बंध (कायदा)
  • शिरगणती ( खानेसुमारी)
  • विशेषांक (खास अंक)
  • सार्वमत (प्लेबिसाइट)
  • झरणी (फाऊन्टनपेन)
  • नभोवाणी (रेडिओ)
  • दूरदर्शन (टेलिव्हिजन)
  • दूरध्वनी (टेलिफोन)
  • ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
  • विधिमंडळ ( असेम्ब्ली)
  • अर्थसंकल्प (बजेट)
  • क्रीडांगण (ग्राउंड)
  • प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
  • मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
  • प्राध्यापक (प्रोफेसर)
  • परीक्षक (एक्झामिनर)
  • शस्त्रसंधी (सिसफायर)
  • टपाल (पोस्ट)
  • तारण (मॉर्गेज)
  • संचलन (परेड)
  • गतिमान
  • नेतृत्व (लिडरशीप)
  • सेवानिवृत्त (रिटायर)
  • वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

Loading

रत्नागिरी शहरात होणार परप्रांतीय फेरीवाल्यांचा सर्व्हे

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी |  रत्नागिरी शहरात परप्रांतीय फेरीवाले आणि स्थानिकांत होणारे वाद वाढत चालले आहेत. या वादांनी गंभीर स्वरुप घेऊ नये यासाठी शहरातील परप्रांतीय फेरीवाल्यांचा प्रशासनातर्फे आता सर्व्हे केला जाणार आहे. शहरातील फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटनेमध्ये सुरू असलेली धुसफूस वाढवण्यापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वातावरण थंड करण्यासाठी  सर्व्हे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व्हे झाल्यावर आवश्यक ती माहिती हाती येईल आणि फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटना यांच्यामध्ये समन्व्य साधता येईल असे ते म्हणाले. दरम्यान, पुढील निर्णय होईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नका अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शहरातील रामआळीमध्ये बसणाऱ्‍या फेरीवाल्यांच्या म्होरक्याकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार शहर व्यापारी संघटनेने पोलिस ठाण्यात दिली होती. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे अशी मागणी नगर पालिका व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे नगर पालिकेने फेरीवाले हटाव मोहीम राबवण्याचे जाहीर केले. यातून फेरीवाले विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा राहण्याचे चित्र निर्माण झाले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रत्नागिरी दौऱ्‍यात शहर व्यापारी संघटना व फेरीवाले यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीत जोरदार खडाजंगीही झाली. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे व त्यांना अन्यत्र जागा द्यावी अशी प्रमुख मागणी व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे फेरीवाले व्यावसायिक व लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. अनेक फेरीवाले हे मतदार असून अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत, त्यामुळे त्यांना हटवू देणार नाही असा पवित्रा माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी घेतला. या वेळी विजय खेडेकर, किशोर मोरे, स्मितल पावसकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका मांडली. मात्र सामंत यांनी फेरीवाले व व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांची समजूत घातली.

Loading

कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल केलेली ती चूक शेवटी Google ने सुधारली….शिवभक्तांच्या मोहिमेला यश

Google या सर्च इंजिन वर कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल चुकीची माहिती लिहिली गेली होती ही बाब लक्षात घेऊन शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमीं संघटनांनी यावर आक्षेप घेण्यासाठी मोहीम राबवली होती. दोन दिवसात हजारो आक्षेप गुगलकडे नोंदविण्यात आले होते. यानंतर गुगलने या संदर्भातील दुरुस्ती केली आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या समोरील पायरेट्स म्हणजे समुद्री डाकू असा उल्लेख हटविण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे

हेही वाचा धक्कादायक: स्वराज्याच्या आरमाराच्या प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती- कान्होजी आंग्रे यांचा ‘समुद्री डाकू’ असा उल्लेख







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

अंबरनाथच्या पुराणकाळातील शिवमंदिराचा इतिहास.

 

अंबरनाथ : अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.

 

देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. हे एक भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत.या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्‍याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.

अंबरनाथ शिवालय’ पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.

1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि ‘Bombay branch of the Royal Asiatic Society’च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.

त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये “…हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले”, असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव ‘आम्रनाथ’ असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.

पर्यटकांसाठी पर्वणी
केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.

तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.

 

Loading

असा होता जगातील सर्वात लांब बस मार्ग

भारतातून लंडनला बसने जाता येत होते…!

 

१९५७ ला अल्बर्ट ट्रॅव्हल्सने ही बस सेवा चालू केली होती.त्यांची पहिली बस लंडन येथून १५ एप्रिल १९५७ रोजी सुटली ती भारतात कलकत्ता येथे ५ जून रोजी पोहचली होती.कलकत्ता ते  लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा मार्ग होता.

 

हा मार्ग बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण (अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, ऑस्ट्रीया, जर्मनी, बेल्जियम मार्गे थेट लंडन असा जात होता.

 

ह्या बस चा प्रवास एखाद्या सहली सारखा असायचा. मार्गात भेटणारी काही निवडक प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येत होते. त्यात ताजमहाल, बनारस ईत्यादी ठिकाणांचा समावेश असायचा. त्याचप्रमाणे शॉपिंग साठी पण बस काही प्रसिद्ध बाजारपेठेत थांबायची त्यात प्रवासी दिल्ली, तेहरान, काबुल, इस्तंबुल, साल्जबर्ग, विएन्ना येथे शॉपिंग करू शकत होते. साहजिकच ह्या सर्वांसाठी काही दिवस राखीव ठेवण्यात आले होते.

 

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ/टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते. फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. झोपण्यासाठी सीट स्लीपर मोड मध्ये करायची सुविधा उपलब्ध होती.

 

तेव्हा बसभाडे होते ८५ पौंड.( आत्ताचे साधारण ८०१९रु.)

 

ही बस काही काळासाठी ऑस्ट्रेलिया च्या सिडनी पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सिडनी-कलकत्ता-लंडन असा तो मार्ग होता. हा मार्ग कापण्यासाठी ह्या बसला तब्बल १३०/१३५  दिवस लागायचे.

 

पुढे भारत-पाक यांच्यातील सीमावादामुळे ही बस बंद करावी लागली.

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search