



Weather Update: पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध किनारपट्टी जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ते २६ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत समुद्रात लाटांची उंची सुमारे ३.८ मीटर ते ४.७ मीटर पर्यंत असू शकते.
हा इशारा विशेषतः ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील किनारपट्टी भागांसाठी लागू आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या उंच लाटा आणि संभाव्य वादळवाऱ्यांमुळे समुद्र परिस्थिती अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे, लहान होड्यांचे मालक, मासेमारी करणारे आणि किनारपट्टीवरील रहिवासी यांना खबरदारीचे उपाय घेण्याचे आणि या कालावधीत समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडूनही स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, समुद्र किनारी जाणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड,… pic.twitter.com/c4acNoClpW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2025