Category Archives: क्रिकेट

मुंबई ठाण्यातील क्रिकेट प्रेमींना खुशखबर: 50 एकर मध्ये लवकरच उभारले जाणार राज्यातील सर्वात मोठे स्टेडियम

   Follow us on        

मुंबई : 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत ठेवण्याचा बेत होता. मात्र वानखेडे स्टेडियम च्या कमी प्रेक्षक संख्येचे कारण देवून तो सामना गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला. क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना याचे मोठे दुःख झाले होते. मात्र आता मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. हे स्टेडियम आसन क्षमते बाबतीत राज्यातील पाहिले तर देशातील दुसर्‍या क्रमांकाचे स्टेडियम ठरणार आहे.

पाहिल्या मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाईल.

ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं स्टेडियम उभारण्याचं दिवंगत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचं स्वप्न होतं. मागच्याच महिन्यात अमोल काळे यांचं 47व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.

Loading

T20 WorldCup: उद्यापासून सुपर-8 सामन्यांचा थरार; असे रंगणार सामने

   Follow us on        

T20 WorldCup: भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत 19 जूनपासून सुपर-8 सामने खेळवले जाणार आहेत.

प्रत्येक संघ सुपर-8 फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघांनी 3-3 सामने खेळल्यानंतर, दोन्ही गटात जे संघ टॉप-2 मध्ये असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अंतिम विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

ग्रुप-1 : अफगाणिस्तान,भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश

सुपर-8 मधील भारताचे सामने
20 जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
22 जून- भारत विरुद्ध बांगलादेश
24 जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचे सामने
20 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
22 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
24 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

सुपर-8 मधील बांग्लादेशचे सामने
20 जून- बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया
22 जून- बांगलादेश विरुद्ध भारत
24 जून- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

सुपर-8 मधील अफगाणिस्तानचे सामने
20 जून- अफगाणिस्तान विरुद्ध भारत
22 जून- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
24 जून- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश

ग्रुप-2 : युएसए(अमेरिका),इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज

सुपर-8 मध्ये यूएसएचे सामने-
19 जून – यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका
21 जून- यूएसए विरुद्ध वेस्ट इंडिज
23 जून- यूएसए विरुद्ध इंग्लंड

सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचे सामने
19 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
21 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध यूएसए
23 जून- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचे सामने
19 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएसए
21 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
23 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज

सुपर-8 मधील इंग्लंडचे सामने
19 जून- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज
21 जून- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
23 जून- इंग्लंड विरुद्ध यूएसए

Loading

Cricket: कमी धावसंख्येमुळे चर्चेत असलेले न्यूयॉर्क येथील ते स्टेडियम कायमस्वरूपी हटविण्यास सुरवात; कारण काय?

   Follow us on        

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत चालू असलेल्या यंदाच्या टी20 वर्ल्डकप मध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची ( New York Nassau County stadium ) खूप चर्चा झाली. या स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत राहिली. या मैदानावर लो स्कोअरिंग मॅचेस झाल्या. गोलंदाजांना या मौदानावर फायदा मिळाला.हे मैदान अस्थायी स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅचनंतर मैदानाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे.

न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम अवघ्या पाच महिन्यांत बांधले गेले. हे स्टेडियम केवळ टी-२० विश्वचषकातील सामन्यांसाठी बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ICC ने टी-२० विश्वचषक सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय डॅलस (टेक्सास) आणि फ्लोरिडा या ठिकाणांचीही स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम तयार करण्याबाबत अंतिम निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये झाला.

न्यूयॉर्कमधील या मैदानाच्या उभारणीचा खर्च 30 मिलियन डॉलर होता. या मैदानाची निर्मिती 8 महिन्यात करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड ओवल स्टेडियमवरुन विशेष माती मागवण्यात आली होती. हे स्टेडियम पुढील 6 आठवड्यात पूर्णपणे हटवण्यात येईल.

बुधवारपासून स्टेडियम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कमधील आयजनहावर पार्कमध्ये बांधण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.  या पार्कमधून नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिमय गायब होईल.

नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आठ मॅच खेळवण्यात आल्या. इथं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तीन संघानं विजय मिळवला. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं पाचवेळा विजय मिळवला. भारतानं  दोन वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक 137 धावा केल्या होत्या. कॅनडानं ती मॅच 12 धावांनी जिंकली होती.

 

 

 

 

 

 

 

Loading

‘त्या’ ओव्हर नंतर अर्जुन तेंडुलकर होतोय ट्रोल; नक्की काय म्हणत आहेत नेटकरी? इथे वाचा…

सध्या क्रिकेट चाहत्यामंध्ये आयपीएलचा फिव्हर आहे. सोशल मीडियावर तर या संदर्भात दिवसाला हजारोने पोस्ट व्हायरल होताना दिसतात. कोण चांगला खेळाला, कोण वाईट खेळाला याची चर्चा तर होतेच. असाच एक विषय सध्या सोशल मीडिया वर खूप गाजतोय तो म्हणजे अर्जुन तेंडुलकरची एक वाईट ओव्हर. पंजाब विरुद्ध खेळताना एका ओव्हरमध्ये त्याने ३१ रन दिलेत आणि तो सोशल मीडियावर एक महत्वाचा विषय बनला. या संदर्भात क्रिकेट चाहते दोन्ही बाजूनी आपली आपली मते मांडत आहेत. त्यातील काही कंमेंट्स आपण खाली बघू.
@nilzalte
अर्जुन तेंडुलकरने एका ओव्हरमध्ये 31 रन दिल्या. 
अर्शदिप सिंहनं अटीतटीच्या ओव्हरमध्ये दोन स्टंप तोडून केवळ दोन रन दिल्या. 
टॅलेंट इसे कहते है! बाकी आप समझदार है.
@prashantsuroshi
स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने ६ सिक्स मारले होते पण आज तो जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. कार्लोस ब्रेथवेटने बेन स्टोक्सला ५ सिक्स मारले होते आज स्टोक्स कुठे पोहोचला आहे आणि कार्लोस कुठे आहे ? बॉब विलीसला संदीप पाटील ने ६ फोर्स मारले होते पण तरी तो इंग्लडच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहे. प्रत्येकाचा दिवस असतो हो. इतक्या लवकर निष्कर्ष काढून काय होणार आहे. 
@हेमन्त१८५६
युवराज सिंग ने स्टुअर्ट ब्रॉड ला एका षटकात सहा षटकार मारले होतें,कसोटी सामन्यांमध्ये याच ब्रोडने
पुढे 576 बळी घेतले आहेत.
@rohitjangam01
अनुभव येण्यासाठी काही सामने खराब जावे लागतात, सगळेच पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतीलच अस नाही. मुळात तुलना होऊ नये. प्रत्येक खेळाडू हा चांगल्या किंवा वाईट परिस्थितितून शिकण्याचा व त्यातून चांगल देण्याचा प्रयत्न करत असतो.
@ivikas_bhartiya
Arjun Tendulkar conceded 31 runs in the 16th Over. He is a brilliant bowler but his ups and downs will make him a better player. Stop trolling and give Support.
@Nidhin_B_
Here we gooo.. The result of nepotism, 31 runs in one over and he couldn’t handle the pressure.  
I’ve seen lot of players coming in support of Arjun, and speaking against 
SanjuSamson
. Yeah he’s not a nepo product
@Msabzar2
Surprised to c mumbai playing handicaped Arjun tendulkar in their squad. Sachin Tendulkar shouldn’t let his son play this game. He is not worth it

Loading

क्रिकेटप्रेमींना खुशखबर.. वर्ल्डकपचे सामने थिएटर मध्ये पाहता येतील…

मुंबई :तुम्हाला क्रिकेटची आवड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही T20 वर्ल्ड कपचे मॅच थिएटर देखील पाहू शकता. मल्टिप्लेक्स कंपनी INOX ने ICC सोबत वर्ल्डकपसंदर्भात करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतातील सर्व सामने आपल्या आता थिएटरमध्ये दाखवणार आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनलचे सामनेही थिएटरमध्ये दाखवण्यात येण्याची सोय करण्यात आली आहे.

 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 25 शहरांमध्ये जिथे INOX चे स्क्रीनिंह होतात. त्या ठिकाणी T20 वर्ल्डकप 2022 मध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्यात येईल. अशा परिस्थितीत भारताचे सामने मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असणाऱ्या चाहत्यांसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे. 

येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 16 टीम या स्पर्धेचा भाग असणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार असून तो पाकिस्तानसोबत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या सामन्याची उत्सुकता लागलीये. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Loading

भारत – ऑस्ट्रेलिया क्रिकेट श्रुंखला २० सप्टेंबर पासून. जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम भारत दौऱ्यासाठी येणार आहे. ह्या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या क्रिकेट संघासोबत तीन T २०-२० सामने खेळणार आहे. पहिला सामना मोहाली येथे पंजाब क्रिकेट असोसिएशन च्या बिंद्रा स्टेडियम येथेर दिनांक मंगळवारी २० सप्टेंबर रोजी दोन्ही संघासोबत रंगणार आहे. दुसरा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे दिनांक शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी तर तिसरा सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे रविवार दिनांक २५ सप्टेंबर खेळवण्यात येणार आहे. हे सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता चालू होतील.

ह्या सामन्यासाठी भारतीय संघ

Rohit Sharma (Captain)Batsman
Virat KohliBatsman
Suryakumar YadavBatsman
Deepak HoodaBatting Allrounder
Hardik PandyaBatting Allrounder
Ravichandran AshwinBowling Allrounder
Axar PatelBowling Allrounder
KL RahulWK-Batsman
Rishabh PantWK-Batsman
Dinesh KarthikWK-Batsman
Yuzvendra ChahalBowler
Bhuvneshwar KumarBowler
Umesh YadavBowler
Harshal PatelBowler
Deepak ChaharBowler
Jasprit BumrahBowler

ह्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ

Aaron Finch (Captain)Batsman
Steven SmithBatsman
BatsmanALL ROUNDER
Tim DavidBatting Allrounder
Glenn MaxwellBatting Allrounder
Ashton AgarBowling Allrounder
Cameron GreenBowling Allrounder
Daniel SamsBowling Allrounder
Sean AbbottBowling Allrounder
Bowling AllrounderWICKET KEEPER
Josh InglisWK-Batsman
Matthew WadeWK-Batsman
WK-BatsmanBOWLER
Pat CumminsBowler
Josh HazlewoodBowler
Kane RichardsonBowler
Adam ZampaBowler
Nathan EllisBowler

आगामी २०-२० विश्वचषकाच्या धर्तीवर हा दौरा महत्वाचा मानला जातो. आशिया कप मधील गोलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ खूप आधीच त्या मालिकेतून बाहेर पडला, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसपिर्त बुमराह चे पुनरागमन आणि विराट कोहली याला भेटलेला सूर भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरेल.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search