Tag Archives: farmers

सौरकृषी वाहिनी योजनेत लागणार्‍या जागेसाठी शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी ७५००० रुपये मोबदला…

Agriculture Related News: शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीज मिळावी, या हेतूने प्रारंभ करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने” साठी  लागणार्‍या जागेसाठी शेतकर्‍यांना मोबदला  देण्यात येणार आहे.प्रतिहेक्टर प्रतिवर्ष ₹75,000 इतके हे भाडे असेल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सदर योजना दिनांक १४ जून,२०१७ च्या शासन निर्णयान्वे हि योजना संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेसाठी लागणारी खाजगी जमीन महावितरण/महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपडट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या शासन परिपत्रकात नमूद केलेल्या ६ टक्के दरानुसार परागिणीत केलेला दर किंवा प्रतिवर्ष रु. ७५०००/- प्रति हेक्टर यापैकी जी जास्त रक्कम असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टीचा दर निश्चित करण्यात येणार आहे. तसेच प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (base rate ) प्रत्येक वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्यात येणार आहे. 
ह्या योजनेसाठी लागणाऱ्या जागेची निवड महावितरण/महानिर्मिती/महाऊर्जा करेल आणि त्यांचा समावेश निविदा प्रक्रियेत करण्यात येईल. या निविदांमध्ये यशस्वी झालेल्या  जमीनमालकांसोबत महावितरण/महानिर्मिती/महाऊर्जा एक करार करेल. त्या करारानुसार हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत आणि कार्यान्वित झाल्यानंतर करारात ठरलेल्या रक्कमेचे भाडे जमीनमालकाला भेटणार आहे. 
ह्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ३०% कृषी वाहिन्या ह्या सौर उर्जेवर आणण्याबाबतचे निश्चित केलेले उद्धिष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जमीन उपलब्ध करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी   प्रत्येक जिल्ह्यात समिती गठीत करण्यात आलेली आहे.
 
ज्या जमीनमालकांना आपली जमीन ह्या योजनेसाठी भाडेपट्टीवर द्यायची आहे त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येईल
https://mahadiscom.in/solar-mskvy/

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search