मुंबई :आपल्या मोबाईलवर कोणतेही ॲप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. खासकरून विश्वासार्ह स्रोत नसणारी ॲप डाउनलोड करू नयेत असे त्यांनी सांगितले आहे.
हि ॲप डाउनलोड केल्यास आपल्या मोबाईल मधील महत्वाच्या माहितीचा वापर केला जाऊन आपली फसवणूक होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या मोबाईल मधील फोटो एडिट करून त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाऊ शकते.
‘इन्स्टंट लोन ॲप’ हे ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो, त्यामुळे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये असे सांगण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर इतर ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा आवाहन करण्यात आलेले आहे.
‘इन्स्टंट लोन ॲप’ डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो.
सावध रहा- ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा.#ThodasaSochLe #सायबर_सुरक्षा pic.twitter.com/Sfx7r9eLz2
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) October 30, 2022