Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
konkan news Archives - Kokanai

Tag Archives: konkan news

कोकणवासियांचा राग दिसून येत नाही–मनसे अध्यक्ष राज ठाकरे

   Follow us on        
रत्नागिरी : कोकणवासियांचा राग दिसून येत नाही, तो कमालीचा सहनशील आहे आणि त्याची सहनशीलता त्यांना घातक ठरत आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत  रिफायनरी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असे त्यांनी प्रकल्पाबत संमिश्र वक्तव्य केले आहे.   
राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. 
कोकणवासियांचा राग दिसून येत नाही. 
या राज ठाकरे यांनी म्हटले की, कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. कोकणवासीयांची सहनशक्ती त्यांना घातक ठरत आहे. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.
कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय,  बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जेव्हा मोठ्या प्रमाणात अशी बाहेरच्या भुरट्यांकडून खरेदी होते तेव्हा कोकणी माणूस जागृत राहिला पाहिजे असे ते म्हणाले. 

Loading

पर्यटनाचा हंगाम…कोंकणरेल्वे मार्गावरील ८ गाड्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार

   Follow us on        
Konkan Railway News : पर्यटनाचा हंगाम, तळकोंकणातील जत्रेचा हंगाम तसेच कोकण मार्गावरील गाडयांना गर्दी होत असल्याने कोंकण रेल्वेने ह्यावर उपाय म्हणून कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा : कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….

खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार आहेत. 

अ. क्र.ट्रेनचे नाव
अतिरिक्त डबे दिनांककोकणातील थांबे
319260 Bhavnagar - Kochuveli ExpressOne Sleeper CoachOn 29/11/2022Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
419259 Kochuveli - Bhavnagar ExpressOne Sleeper CoachOn 01/12/2022Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
722908 Hapa - Madgaon Jn. ExpressOne Sleeper CoachFrom 30/11/2022 to 28/12/2022Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
120924 Gandhidham - Tirunelveli ExpressOne Sleeper CoachFrom 28/11/2022 to 26/12/2022Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
619577 Tirunelveli - Jamnagar ExpressOne Sleeper CoachFrom 05/12/2022 to 27/12/2022Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
822907 Madgaon Jn. - Hapa ExpressOne Sleeper CoachFrom 02/12/2022 to 30/12/2022Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
519578 Jamnagar - Tirunelveli ExpressOne Sleeper CoachFrom 02/12/2022 to 24/12/2022Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
220923 Tirunelveli - Gandhidham ExpressOne Sleeper CoachFrom 01/12/2022 to 29/12/2022Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri

अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.

हेही वाचा : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search