Tag Archives: Konkanrailway

कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे

Konkan Railway News – सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दूर पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत. या दोन गाड्यांमध्ये हापा मडगाव तसेच पोरबंदर कोचुवेली या दोन एक्सप्रेसचा समावेश आहे.

हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या 22908 Hapa – Madgaon Express या गाडीला दि. 19 एप्रिल रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 22907 Madgaon Jn. – Hapa Express या गाडीला दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.

याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली 20910 Porbandar – Kochuveli Express या गाडीला दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी तर परतीच्या फेरीसाठी कोचीवेली ते पोरबंदर 20909 Kochuveli – Porbandar Express या गाडीला दि. 23 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांना अतिरिक्त डबे

Konkan Railway News | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला प्रत्येकी एका फेरीसाठी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून सुटताना 05 एप्रिल रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना 07 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेलीदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला पोरबंदर  येथून सुटताना 06 एप्रिल रोजी तर कोचुवेली येथून सुटताना 09 रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Loading

वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी लवकरच सुरू होणार – खा. गावित यांची ग्वाही..

पालघर : वसई – विरार भागातील कोकणवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील कित्येक गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खासदार श्री. गावित  यांनी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.

बोरिवली ते विरार या पट्ट्यात कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्या वसईमार्गे जातात. पण या गाड्या नियमित नाही आहेत. तसेच या गाड्या कोकणातील काही मोजकेच थांबे घेतात.शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दादर या स्थानकावर यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच पण खूप त्रास सहन करावा लागत आहे.

वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search