सिंधुदुर्ग – येत्या ०१ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टोल नाक्याला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जर ओसरगाव येथे टोल वसुली करणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी केलेल्या MH07 वाहनांना टोलमुक्ती मिळावी अशी सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीची भूमिका आहे. मात्र जर हा टोल नाका खारेपाटण किंवा बांदा या ठिकाणी शिफ्ट केल्यास आपला त्याला कोणताही विरोध नसेल अथवा टोल मुक्तीची मागणी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१ जूनला ओसरगाव टोल नाका सुरू झाल्यास टोलमुक्ती समितीतर्फे लाक्षणीय आंदोलन छेडले जाईल. असा इशारा टोलमुक्ती कृती सिमतीचेअध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. टोलमुक्ती कृती सिमती तर्फे कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.