मुंबई: अधून मधून कंपनी मध्ये जात जा, नाहीतर तुम्ही असाल वर्क फ्रॉम होम मध्ये आणि कंपनी गेली असेल दुसर्या राज्यामध्ये. अशा आशयाचा एक जोक अलीकडे सोशल नेटवर्किंग मेडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरात मध्ये गेल्याने लोक ह्या प्रकारचे जोक्स करताना दिसत होते. पण ही गोष्ट आता गंभीर होत चालली आहे. कारण अजून एक कंपनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.
‘फोनपे’ ही ऑनलाइन व्यवहारांसंदर्भातील कंपनीही आपले मुख्य कार्यालय मुंबई वरून चेन्नई येथे नेण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटिस एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे.
कंपनीच्या नोटीसमध्ये काय आहे?
‘फोनपे’चे संचालक आदर्श नहाटा यांनी कंपनीच्या वतीने जारी केलेल्या या नोटीसमध्ये, “कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राहण्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा, २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे,” अशी माहिती दिली आहे.तसेच, “कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्ताविक बदलामुळे कोणत्याही व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता असेल तर ती व्यक्ती एमसीए-२१ वर गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करु शकते. विरोधाच्या कारणासाठीचे पत्र प्रादेशिक संचालक, पश्चिम विभागाकडे एव्हरेस्ट पाचवा मजला १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई येथील कार्यालयावर पाठवावे. ही सूचना प्रकाशित झाल्याच्या १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला त्याचा प्रतिसहीत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकते,” असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.