Mumbai News :मुंबई वाहतूक पोलीस सहाआयुक्तांनी आज एक कार्यालयीन आदेश जाहीर केला आहे. जे रिक्षा/टॅक्सी चालक जवळची भाडी नाकारत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यावर कारवाईबाबत हा आदेश जाहीर केला आहे.
तसेच सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपल्या वाहतूक विभागातील रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या संघटनांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करावे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागण्याबाबत व भाडे न नाकारण्याबाबत समज देऊन प्रबोधन करण्यात यावे असे ह्या आदेशात म्हंटले आहे.
तसेच अशाप्रकारे भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधीत रिक्षा व टॅक्सिचालक यांच्यावर तात्काळ मोटार वाहन कायदा कलम १७८(३) अन्वये कारवाई करण्यात यावी असा आदेश पण दिला आहे.
मोटार वाहन कायदा कलम १७८(३) आणि त्यातील त्रुटी
आमच्या प्रतिनिधींनी ह्या कायद्यातील कलम १७८(३) चेक केल्यावर त्यातील काही त्रुटी लक्षात आल्या आहे. ह्या कलमाप्रमाणे जर रिक्षाचालक भाडे नाकारत असेल तर त्यावर दंडात्मक कारवाई म्हणून फक्त जास्तीत जास्त ५० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. आणि टॅक्सीचालक भाडे नाकारत असेल तर त्याच्याकडून जास्तीत जास्त २०० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. हा दंड अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी खूप कमी आहेत. ह्या कलम मध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत.