नक्की शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे ह्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद चालू आहे त्यात निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याना एक आजून धक्का दिला आहे. पक्षावर किंवा निवडणूक चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला त्यासंबंधी पुरावे आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी १ महिन्यांची मुदत मागितली होती.पण आज निवडणूक आयोगाने एक महिन्याची मुदत न देता जेमतेम १५ दिवसांची मुदत दिली आहे.
येत्या २३ ऑगस्ट पर्यंत त्यांना सर्व पुरावे आणि कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागतील. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याचे पुरावे म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आणि इतर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतील.