Konkan Railway News :ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे स्थानकावरून पुढे जाणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत काही बदल केले गेले आहेत. दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून हे बदल अंमलात आणले गेले आहेत अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
कोकणात जाणार्या सर्व गाड्यांसाठी खालील बदल करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा >आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….
जनरल डब्यांच्या स्थानात बदल
कोकणात जाणार्या सर्व गाड्यांचे ठाण्याला उघडणारे जनरल डबे शेवटी म्हणजे (दादर दिशेने) केले आहेत. त्यामुळे ह्या डब्यांसाठी लागणारी रांग आता मागे लागत आहे.
गाड्यांच्या प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल
हेही वाचा > कोकणरेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाड्या! उद्यापासून आरक्षण चालू..
मुंबई वरून कोकणात जाणार्या तुतारी व मांडवी एक्सप्रेस ठाणे स्टेशनला प्लॅटफॉर्म नं. 5 वर तर कोकण कन्या आणि मंगलोर एक़्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म नं 7 वर येत आहेत.
Follow us onठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे मार्फत करण्यात आले आहे.