Author Archives: Kokanai Digital

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू.

   Follow us on        

Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.

मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.

सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती

आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती

मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक

३ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 18:04:34 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 28:30:29 पर्यंत
  • करण-वणिज – 07:33:08 पर्यंत, विष्टि – 18:04:34 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 08:56:41 पर्यंत, ब्रह्म – 29:24:11 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:58
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 09:09:00
  • चंद्रास्त- 22:15:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक वन्यजीव दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1845: फ्लोरिडा हे अमेरिकेचे 27 वे राज्य बनले.
  • 1865: हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
  • 1885: अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी (AT&T) ची स्थापना झाली.
  • 1923: टाईम मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1938: सौदी अरेबियामध्ये तेलाचा शोध लागला.
  • 1966: डॉ. धनंजय राव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू बनले.
  • 1969: अपोलो कार्यक्रम: चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी नासाने अपोलो-9 लाँच केले.
  • 2003: महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेल्या शरच्चंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • 2005: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून ६७ तासांत जगाची एकट्याने, इंधन न भरता केलेली प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 2015: 20 डिसेंबर 2013 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1839: ‘जमशेदजी टाटा’ – टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1904)
  • 1845: ‘जॉर्ज कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1918)
  • 1847: ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ – टेलिफोनचा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑगस्ट 1922)
  • 1920: ‘मुकुंद शंकरराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर मासिकाचे संपादक यांचा जन्म.
  • 1923: ‘प्रा. सदाशिव नथोबा आठवले’ – इतिहासकार आणि ललित लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 मार्च 2012)
  • 1928: ‘पुरुषोत्तम पाटील’ – कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1948: ‘स्टीव्ह विल्हाइट’ – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2022)
  • 1967: ‘शंकर महादेवन’ – गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1977: ‘अभिजित कुंटे’ – भारताचा चौथा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
  • 1987:’ श्रद्धा कपूर’ – भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1700: ‘छत्रपती राजाराम महाराज’ – मराठा साम्राज्याचे 3रे छत्रपती यांचे निधन (जन्म: 24 फेब्रुवारी 1670)
  • 1703: ‘रॉबर्ट हूक’ – इंग्लिश वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1635)
  • 1707: ‘औरंगजेब’ – सहावा मोघल सम्राट यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1618)
  • 1919: ‘हरी नारायण आपटे’ – कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1864)
  • 1924: ‘वूड्रो विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1965: ‘अमीरबाई कर्नाटकी’ – पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचे निधन.
  • 1967: ‘स. गो. बर्वे’ – माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1982: ‘रघुपती सहाय’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1896)
  • 1995: ‘पं. निखील घोष’ – तबलावादक यांचे निधन.
  • 2000: ‘रंजना देशमुख’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

 

LHBfication of Trains:रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासन जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षित असलेले ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या गाड्या ज्यांना आधुकीकरण करण्याची खरी गरज असताना अजूनही जुन्या प्रकारातील आयसीएफ रेक सह चालविण्यात येत आहेत.
कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना अनेकदा पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कमी प्राधान्य दिले असल्याचा आरोपही समितीने केला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी  ई-मेल द्वारे या एक्सप्रेस गाड्यांची यादी प्रशासनाला पाठवली असून या गाड्यांचे रूपांतर लवकरात लवकर एलएचबी स्वरूपात करावे अशी मागणी केली आहे.

कोणत्या आहेत या गाड्या?

  • ११००३/११००४  दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (२ रेक)
  • ११०२९/११०३०  कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (३ रेक)
  • ११०३९/११०४०  कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस / ०१०२३/०१०२४ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस (५ रेक)
  • १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस / १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (३ रेक)
  • १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (२ रेक)
  • २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०१/११४०२ (०१.०३.२०२५ पासून ११००१/११००२ या नावाने पुनर्क्रमित करा) मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस (3 रेक)
  • ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्सप्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) / ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (पुणे मार्गे) (2 रेक)
  • १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) / २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) (१ रेक)
  • ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (१ रेक)
या गाड्या मध्य आणि दक्षिण रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहेत. या गाड्यांचे महत्व आणि प्रवाशांकडून होणारी गर्दी पाहता या गाडयांना ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्यात यावेत अशी समितीने मागणी  केली आहे.

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

२ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 21:04:28 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 09:00:07 पर्यंत, रेवती – 30:39:55 पर्यंत
  • करण-तैतिल – 10:37:40 पर्यंत, गर – 21:04:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 12:38:39 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:59
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मीन – 30:39:55 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:28:59
  • चंद्रास्त- 21:12:59
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • १८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
  • १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
  • १९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.
  • १९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
  • १९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
  • १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
  • १९५६: मोरोक्‍को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
  • १९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.
  • १९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
  • १९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
  • २००१: बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
  • १९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
  • १९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
  • १९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.
  • १९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
  • १९४२: भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार – गीता नागाभूषण (मृत्यू : २८ जून २०२०)
  • १९१४: भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार – तोता सिंग (मृत्यू : २१ मे २०२२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५६८: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.
  • १७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
  • १८३०: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
  • १९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.
  • १९७६: मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.
  • १९९४: धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.
  • १९८६: मराठी चित्रपट अभिनेते – डॉ. काशिनाथ घाणेकर


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा

   Follow us on        

मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.

होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

पवनार-पत्रादेवी द्रुतगती महामार्गाला कोल्हापुरच्या पाच तालुक्यातील शेतकर्‍यांचा ‘सशर्त’ पाठींबा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवनार पत्रादेवी (नागपूर – गोवा) महामार्गा संबधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या 5 पट बाजारभाव मोबदल्याच्या बदल्यात पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रत्यक्षात भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी यापूर्वीच अधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून त्यांनी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष विकास पॅकेजची मागणी केली आहे.

पवनार – पत्रादेवी एक्स्प्रेस वे ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. या द्रुतगती मार्गाला सहा लेन कॉरिडॉर आहेत. नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग हा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

१ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 24:11:48 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 11:23:23 पर्यंत
  • करण-बालव – 13:45:51 पर्यंत, कौलव – 24:11:48 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 16:24:18 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:00
  • सूर्यास्त- 18:42
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 07:48:59
  • चंद्रास्त- 20:11:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक समुद्री गवत दिन
  • शून्य भेदभाव दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1803: ओहायो अमेरिकेचे 17 वे राज्य बनले.
  • 1872: जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान, यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
  • 1873: ई. रेमिंग्टन अँड सन्स कंपनीने पहिल्या व्यावहारिक टाइपरायटरचे उत्पादन सुरू केले.
  • 1893: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.
  • 1896: हेन्री बेकरेल यांनी किरणोत्सर्गी कण शोधले.
  • 1901: ऑस्ट्रेलियन सैन्याची स्थापना झाली.
  • 1907: टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली.
  • 1936: अमेरिकेतील महाकाय हूवर धरण पूर्ण झाले.
  • 1946: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण झाले.
  • 1947: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपले कामकाज सुरू केले.
  • 1948: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 2002: हबल स्पेस टेलिस्कोपची सेवा देण्यासाठी एसटीएस-109 वर स्पेस शटल कोलंबिया लाँच करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1683: ‘सांग्यांग ग्यात्सो’ – 6वे दलाई लामा (मृत्यू : 15 नोव्हेंबर 1706)
  • 1922: ‘डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी’ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे यांचा जन्म.
  • 1922: ‘यित्झॅक राबिन’ – नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1995)
  • 1930: ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 14 एप्रिल 2013)
  • 1944: ‘बुद्धदेव भट्टाचार्य’ – पश्चिम बंगाल चे 7वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1951: ‘नितीश कुमार’ – भारतीय राजकारणी आणि बिहारचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1955: ‘एस. डी. शिबुलाल’ – इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1968: ‘सलील अंकोला’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1914: ‘गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड’ – भारताचे 36वे गव्हर्नर-जनरल यांचे निधन. (जन्म: 9 जून 1845)
  • 1989: ‘वसंतदादा पाटील’ – महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1917)
  • 1999: ‘पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज कवीश्वर’ – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1910)
  • 2003: ‘गौरी देशपांडे’ – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री यांचे निधन. (जन्म: 11 फेब्रुवारी 1942)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्‍या

   Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी होळीला आणि उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षी उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पाश्चिम रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी उधना जंक्शन येथून दिनांक  ०२/०३/२०२५  ते २९/०६/२०२५ पर्यंत दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०३/०३/२०२५  ते ३०/०६/२०२५ पर्यंत गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०.१० वाजता मंगळुरु जं. येथून निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३:०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ आयसिएफ कोच = टू टियर एसी –  ०१ कोच, थ्री टियर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०२ कोच,  एसएलआर – ०२.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

२८ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:18:47 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 13:41:12 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 16:49:30 पर्यंत, भाव – 27:18:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 20:07:11 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:01
  • सूर्यास्त- 18:42
  • चन्द्र-राशि-कुंभ – 29:58:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:09:00
  • चंद्रास्त- 19:11:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय विज्ञान दिन
  • रेअर डिसीज डे (28 किंवा 29 फेब्रुवारी)
महत्त्वाच्या घटना :
  • 1922: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1928: डॉ. सी. व्ही. रमन यांच्या भौतिकशास्त्रातील शोधाला रमन इफेक्ट असे नाव देण्यात आले. हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • 1935: शास्त्रज्ञ वॉलेस कॅरोथर्स यांनी नायलॉनचा शोध लावला.
  • 1940: बास्केटबॉल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसारित झाला.
  • 1959: डिस्कव्हरर 1, एक अमेरिकन गुप्तचर उपग्रह जो ध्रुवीय कक्षेत पोहोचण्याचा पहिला उद्देश होता, त्याचे प्रक्षेपण करण्यात आले परंतु कक्षा गाठण्यात अपयश आले.
  • 1990: एसटीएस-36 वर स्पेस शटल अटलांटिसचे प्रक्षेपण झाले.
  • 2024: भारताचे पंतप्रधान मोदी यांनी भारतातील दुसऱ्या अंतराळ स्पेसपोर्टचे ‘कुलशेखरपट्टिनम’ उद्घाटन केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1873: ‘सर जॉन सायमन’ – सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1954)
  • 1897: ‘डॉ. शंकर दामोदर पेंडसे’ – मराठी ग्रंथकार यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1974)
  • 1901: ‘लिनस कार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1994)
  • 1927: ‘कृष्णकांत’ – भारताचे 10 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2002)
  • 1929: ‘रंगास्वामी श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन संशोधन यांचा जन्म.
  • 1942: ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1969)
  • 1944: ‘रवींद्र जैन’ – पद्मश्री पुरस्कार प्राप्त, भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑक्टोबर 2015)
  • 1947: ‘दिग्विजय सिंग’ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1948: ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 2000)
  • 1948: ‘विदुषी पद्मा तळवलकर’ – ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका यांचा जन्म.
  • 1951: ‘करसन घावरी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1572: ‘उदयसिंग II’ – मेवाड देशाचे राजा यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1522)
  • 1926: ‘गोविंद त्र्यंबक दरेकर’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1874)
  • 1936: ‘कमला नेहरू’ – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1899)
  • 1963: ‘डॉ. राजेन्द्र प्रसाद’ – भारताचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1884)
  • 1966: ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1898)
  • 1967: ‘हेन्री लूस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 3 एप्रिल 1898)
  • 1995: ‘कॄष्ण गंगाधर दिक्षीत’ – कथा, संवाद व गीतलेखक यांचे निधन. (जन्म: 12 एप्रिल 1914)
  • 1998: ‘राजा गोसावी’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1925)
  • 1999: ‘भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी’ – औध संस्थानचे राजे यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search