Category Archives: आंतरराष्ट्रीय

खळबळजनक! स्मार्ट वॉचच्या वापराने कॅन्सर होण्याचा धोका

   Follow us on        

अनेक जुन्या गोष्टी आता कालबाह्य होत असून त्यांची जागा आता स्मार्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत आहेत. आपणही आपले आयुष्य आरामदायी आणि सुखकारक व्हावे यासाठी या वस्तू वापरतो. मात्र या वस्तूंचे जेवढे फायदे आहेत तेवढे दुष्परिणाम असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र आपण वापरत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे आपल्याला जीवघेणा आजार होऊ शकतो अस कोणी म्हंटले तर?

हो, असा दावा केला जात आहे अॅपल  Apple कंपनीच्या स्मार्ट वॉचमुळे युझरला कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून या कंपनीवर टीका केली जात आहे. या दाव्यावरून Apple कंपनीविरोधात एक खटला दाखल करण्यात आला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

डेली मेल युके यांनी सादर केलेल्या एका अहवालात अ‍ॅपल वॉचमध्ये PFAS म्हणजेच पॉली फ्लोरोअल्किल पदार्थ आढळला आहे. हे एक हानिकारक रसायन म्हणून ओळखले जाते आणि यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावरूनच कॅलिफोर्नियाच्या नॉर्दन डिस्ट्रिक्टमध्ये अ‍ॅपल कंपनीविरोधात नुकताच एक खटला दाखल करण्यात आला असून Apple ने जाणूनबुजून हे तथ्य ग्राहकांपासून लपविल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

एवढेच नव्हे तर मार्केटमध्ये असलेल्या १५वॉच कंपनीच्या स्मार्ट वॉच मध्ये हे रसायन भेटले आहे. नोट्रे डेम विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या २२ ब्रँड च्या  केलेल्या अभ्यासात एकूण १५ ब्रँडमध्ये ही रसायने असल्याचे आढळून आली आहेत.

…तर चॅम्पियन्स ट्रॉफि स्पर्धा पाकिस्तानात न खेळवता ‘या’ देशात खेळवली जाणार

ICC Champions Trophy 2025 :चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. पाकिस्तानने आयसीसीला पाठवलेल्या ड्राफ्ट वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होणार आहे. पण टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने भारताच्या हायब्रिड मॉडेलच्या ऑफरवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. खरंतर, बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास भारत सरकारने नकार दिल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात जाणे जवळपास अशक्य झाले आहे.
पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर टीम इंडियाने तिथे न गेलेलेच बरे आहे. मात्र, पाकिस्तान भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी सातत्याने विनंती करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याबाबत भारताने आयसीसीशी चर्चा केल्याचे वृत्त आहे, आयसीसीने याबाबत पीसीबीकडून उत्तर मागितले आहे.
पण आता मोठा ट्विस्ट आला आहे. पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. जर पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केली आणि ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळेल. असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की भारत समोर आणि पाकिस्तान हरला आहे.

Loading

धक्कादायक: अफगाणिस्तानात क्रिकेटवर पूर्णपणे बंदी?

   Follow us on        

आंतरराष्ट्रीय: क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी तालिबान सरकारने केली असल्याची चर्चा आहे. तालिबानी नेता हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी देशात क्रिकेटवर बंदी घालण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आहे. याबाबतची बातमी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य संघांना पराभूत करत अफगाणिस्तानने लक्ष वेधून घेतलं. तसेच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. आता अफगाणिस्तान संघ कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना तालिबान सरकारच्या डोळ्यात क्रिकेट खुपलेलं दिसत आहे.

क्रिकेटमुळे देशात वाईट वातावरण तयार होत आहे.तसेच हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात असल्याचं तालिबानी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खेळावर बंदी घालण्यात येत असल्याचं तालिबानचा नेता हिबतु्ला अखुंदजादा याने सांगितलं. देशात तालिबान सरकार आल्यानंतर सरकारने पहिल्यांदा महिला क्रिकेट आणि महिला सहभागी होत असलेल्या इतर खेळांवर बंदी घातली होती. आता पुरुष क्रिकेटवरी बंदी घालणार असल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

तालिबान सरकारने ही बंदी कधी आणि कशी लागू करणार याबाबत काही अधिकृत माहिती सांगितलेली नाही.

Loading

T20 WorldCup: उद्यापासून सुपर-8 सामन्यांचा थरार; असे रंगणार सामने

   Follow us on        

T20 WorldCup: भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत 19 जूनपासून सुपर-8 सामने खेळवले जाणार आहेत.

प्रत्येक संघ सुपर-8 फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघांनी 3-3 सामने खेळल्यानंतर, दोन्ही गटात जे संघ टॉप-2 मध्ये असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अंतिम विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

ग्रुप-1 : अफगाणिस्तान,भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश

सुपर-8 मधील भारताचे सामने
20 जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
22 जून- भारत विरुद्ध बांगलादेश
24 जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचे सामने
20 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
22 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
24 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

सुपर-8 मधील बांग्लादेशचे सामने
20 जून- बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया
22 जून- बांगलादेश विरुद्ध भारत
24 जून- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

सुपर-8 मधील अफगाणिस्तानचे सामने
20 जून- अफगाणिस्तान विरुद्ध भारत
22 जून- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
24 जून- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश

ग्रुप-2 : युएसए(अमेरिका),इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज

सुपर-8 मध्ये यूएसएचे सामने-
19 जून – यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका
21 जून- यूएसए विरुद्ध वेस्ट इंडिज
23 जून- यूएसए विरुद्ध इंग्लंड

सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचे सामने
19 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
21 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध यूएसए
23 जून- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचे सामने
19 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएसए
21 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
23 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज

सुपर-8 मधील इंग्लंडचे सामने
19 जून- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज
21 जून- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
23 जून- इंग्लंड विरुद्ध यूएसए

Loading

Cricket: कमी धावसंख्येमुळे चर्चेत असलेले न्यूयॉर्क येथील ते स्टेडियम कायमस्वरूपी हटविण्यास सुरवात; कारण काय?

   Follow us on        

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत चालू असलेल्या यंदाच्या टी20 वर्ल्डकप मध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची ( New York Nassau County stadium ) खूप चर्चा झाली. या स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत राहिली. या मैदानावर लो स्कोअरिंग मॅचेस झाल्या. गोलंदाजांना या मौदानावर फायदा मिळाला.हे मैदान अस्थायी स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅचनंतर मैदानाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे.

न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम अवघ्या पाच महिन्यांत बांधले गेले. हे स्टेडियम केवळ टी-२० विश्वचषकातील सामन्यांसाठी बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ICC ने टी-२० विश्वचषक सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय डॅलस (टेक्सास) आणि फ्लोरिडा या ठिकाणांचीही स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम तयार करण्याबाबत अंतिम निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये झाला.

न्यूयॉर्कमधील या मैदानाच्या उभारणीचा खर्च 30 मिलियन डॉलर होता. या मैदानाची निर्मिती 8 महिन्यात करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड ओवल स्टेडियमवरुन विशेष माती मागवण्यात आली होती. हे स्टेडियम पुढील 6 आठवड्यात पूर्णपणे हटवण्यात येईल.

बुधवारपासून स्टेडियम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कमधील आयजनहावर पार्कमध्ये बांधण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.  या पार्कमधून नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिमय गायब होईल.

नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आठ मॅच खेळवण्यात आल्या. इथं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तीन संघानं विजय मिळवला. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं पाचवेळा विजय मिळवला. भारतानं  दोन वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक 137 धावा केल्या होत्या. कॅनडानं ती मॅच 12 धावांनी जिंकली होती.

 

 

 

 

 

 

 

Loading

धक्कादायक: कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका; लस बनविणाऱ्या कंपनीची कबुली

   Follow us on        

Covishield Vaccine Side Effects:कोरोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. दरम्यान यावेळी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस लोकांना देण्यात आली होती. आपल्या भारतात अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली होती. देशभरातील अनेकांनी ही लस घेतली. साथीच्या आजारानंतर जवळपास 4 वर्षांनी AstraZeneca ने आता कबूल केलंय की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.

कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका

एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.

ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत.

यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

AstraZeneca-Oxford ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव यूकेमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास कंपनीला मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.

Loading

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चेनाब रेल्वे पूलची यशस्वी चाचणी; पुलाच्या उभारणीत कोकण रेल्वेचे महत्वपूर्ण योगदान

Indian Railway News :पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असणारे चेनाब रेल्वे पूल पूर्ण झाले असून काल दिनांक 26 मार्च रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत उधमपुर – श्रीनगर – बारामुल्ला या रेल्वे मार्गावर एक चाचणी पण घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून लवकरच हा पूलाचे लोकार्पण करण्याची आशा आहे. 

 जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रिज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.

1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. चेनाब ब्रिजमध्ये, 93 डेक सेगमेंट (deck segment), ज्याचे प्रत्येकी वजन सुमारे 85 टन आहे, एकाच वेळी दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले आहेत.

कोकण रेल्वेच्या मदतीनं पुलाची उभारणी

उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली आहे. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप चुकूनही लहान मुलांना देवू नका.. ठरू शकतात जीवघेणी.

मुंबई :भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपमुळे आतापर्यंत गांबिया नावाच्या देशात 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या या कफ सिरप बद्दल पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.

या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.

कोणती आहेत ही सिरप

प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.

 

संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search