कोकण विकास समितीचे रेल्वे अभ्यासक अक्षय मधुकर महापदी यांनी आर टी आय मधून एक माहिती मिळवलेली आहे. या माहितीत भारतीय रेल्वाच्या अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) रेल्वे मार्गाची यादी दिलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत क्षमेतपेक्षा जास्त वापर असेलेल्या कोकण रेल्वेचा समावेश नाही आहे.
Follow us on
आवाज कोकणचा: आपल्या गावाला टंचाई असेल आणि टँकर सुरू करायचा असेल तर आपल्या गावचं नाव टंचाईच्या यादीत असणं गरजेचं असतं. जर हे नाव टंचाईचे यादीत असेल तर आपल्याला शासनाकडून टँकर उपलब्ध केला जातो.
तसेच भारतीय रेल्वेच्या वतीने अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) या दोन याद्यांमध्ये सूचीबद्ध झालेले आहेत. भारतीय रेल्वे या मार्गावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अनेक नवनवीन प्रकल्प, दुहेरीकरण, गती-शक्ती सारख्या माध्यमातून क्षमतावृद्धीचे प्रयत्न करत आहे. याकडे रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष असते.पण या यादीमध्ये अतिशय व्यस्त असलेला कोकण रेल्वे मार्ग (एकूण क्षमतेच्या १६८% वापर असूनही) स्थान घेऊ शकला नाही कारण कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये त्याला स्थान नाही.जर या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गाची नोंद झाली तर या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करून प्रवाशांना वाढीव सोयी सुविधा व गाड्या पुरवल्या जाऊ शकतात.
त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झालेच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील मार्ग मध्य रेल्वेच्या ताब्यात जायला हवा.
आतापर्यंत कोकणातील खासदारांनी याचा विचार केला नाही पण आता निवडून येणाऱ्या खासदारांनी संसदेत विषय चर्चेत घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावा.
*HDN and HUN Routes*
As per the Indian Railways classification of the network, a total of 7 High-Density Network (HDN) routes and 11 Highly Utilised Network (HUN) routes have been classified based on the passenger and freight volumes carried by these corridors.#konkanrailwaypic.twitter.com/yBxQZLCpMh
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 28, 2024
श्री. सागर तळवडेकर
सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे अभ्यासक
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....
सिंधुदुर्ग: कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी रेल्वे सेवा फक्त सावंतवाडी पर्यंत देण्यात येणार होती. परंतु नंतर ती ठोकूर पर्यंत नेवून दक्षिण रेल्वेला नेवून पोहोचवली. त्यामुळे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक कारवार पासून पुढचा आठ तासाचा प्रवासाचा वेळ वाचला. दक्षिणेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्राने कोकण रेल्वेच्या स्थापनेत मोठा वाटा उचलला होता. कित्येक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. मात्र ही वस्तुस्तिथी असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला किती लाभ मिळाला याबाबत नेहमीच प्रश्न उठवले जात आहेत. त्याची कारणेही आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हयाचे देता येईल. राज्यातील पहिला आणि एकमेव पर्यटन जिल्हा जाहीर झालेल्या या जिल्ह्यातून एक दोन नाही तर तब्बल १५ गाड्या (दोन्ही बाजूने विचार केल्यास एकूण ३० गाड्या) येथे थांबत नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथे थांबे देण्यात येत नाहीत. मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर ४५०/५०० किलोमीटर आहे. येथे सुपरफास्ट गाडयांना थांबे देणे गरजेचे असूनही वारंवार या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
४) १२२८३/८४ – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
५) १२४४९/५० गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
७) १२९७७/७८ – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा – वीर
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१२) २०९२३/२४ गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
यशसावंत | सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे दिसत आहे. आज दिनांक ०१ सप्टेंबर असूनही अजूनही येथे नियमित सेवा चालू झाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही.
विमानाची बूकिंग सेवा उपलब्ध करून देणार्या क्लीअर ट्रीप तसेच मेक माय ट्रीप या वेबसाईटवर तपासले असता मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान एक दोन दिवस आड करून विमान फेरी असल्याचे चित्र दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या जवळील तारखांचे विमान भाडे दहा हजाराच्या वर गेले आहे. त्यामुळे यंदा विमानाने गावी जाण्याचा बेतात असणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे.
.. तर सिंधुदुर्ग विमानतळाचा उपयोग काय?
गणेश चतुर्थी आणि इतर हंगामाच्या दिवसांत सुद्धा अशा अनियमित फेर्या असतील तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विमान सेवेचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमानसेवेच्या तिकीट बूकिंग साठी Dynamic Pricing Strategy चा अवलंब करण्यात येत असतो. तरीपण मुंबई ते गोवा विमानसेवा तिकीट भाडे सर्व चार्जेस पकडून साधारणपणे 1800 ते 2000 रुपये एवढे आहे. हंगाम असल्याने एवढे भाडे देवून कोकणात गावी जाण्यासाठी किती तरी कोकणवासिय उत्सुक आहेत. प्रवासी असूनही विमानसेवा अनियमित असल्याने प्रशासनाला हंगामाचा फायदा घेणे जमत नसल्याचे दिसत आहे. येथील राजकिय पक्ष पण यामध्ये लक्ष घालताना दिसत नाही आहेत. अनियमित सेवेमुळे पर्यटकांनी सुद्धा या सेवेकडे पाठ फिरवली आहे. असेच चित्र राहिले तर एक दिवस हे विमानतळ बंद होईल असे बोलले तर नवल वाटायला नको.