Category Archives: पर्यटन
सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.
आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे


पडेल देवगड, कोंकण (महाराष्ट्र) या गावी 300-400 वर्ष जुनं शंकरेश्वराचं मंदिर आहे तिथं काल पाण्याची पाईप लाईन घालण्यासाठी खोदकाम सुरू असताना ही विष्णूची मूर्ती सापडली आहे. मूर्तीची उंची 3 फुटाच्या आसपास असून डाव्या हातात शंख,उजव्या हातात गदा आहे, उजव्या पायाशी गरुड असून डाव्या pic.twitter.com/YFQoNvPcFj
— Bhagyashri Patwardhan(Modiji Ka Parivar) (@bvpat2501) March 8, 2024
रत्नागिरी: कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकासाकरीता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेतंर्गत कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंजा उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीर्थक्षेत्रांना नवीन प्रस्तावित निकषाप्रमाणे ३ कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे. प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, स्नानगृह, भाविकांसाठी भक्तनिवास, परिसर सुशोभीकरण, वृक्षारोपण, वाहनतळ यासंह पर्यटकांची सुरक्षितता, अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत.