Category Archives: महाराष्ट्र

Vande Bharat Express: महाराष्ट्रातील अजून दोन जिल्ह्य़ांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची सेवा

   Follow us on        
मुंबई : राज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. तसेच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिला आहे. त्यामुळे ही वंदे भारत आणखीन दोन जिल्ह्यांना जोडली जाणार आहे.
मुंबईत ये-जा करण्यासाठी, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी राज्यासह देशभरातील महत्त्वाची ठिकाणे वंदे भारतने जोडली जात आहेत. गांधीनगर, शिर्डी, सोलापूर, मडगाव या धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक स्थळांना वंदे भारत जोडली आहे. तसेच मुंबई ते जालना या वंदे भारतमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोडली आहे.
आता या मार्गाचा विस्तार झाल्याने परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी होती. प्रवाशांच्या मागणीवर विचार करून रेल्वे मंडळाने १२ जून रोजी विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे.
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी १.१० वाजता
  • दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • कल्याण – दुपारी २.०४ वाजता / २.०६ वाजता –
  • नाशिक रोड – दुपारी ४.१८ वाजता / दुपारी ४.२० वाजता
  • मनमाड जंक्शन – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता –
  • अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.०५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता –
  • जालना – रात्री ८.५० वाजता / रात्री ८.०७ वाजता
  • परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता
  • हुजूर साहिब नांदेड – रात्री ११.५० वाजता
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • हुजुर साहिब नांदेड – पहाटे ५.०० वाजता
  • परभणी – पहाटे ५.४० वाजता / पहाटे ५.४२ वाजता –
  • जालना – सकाळी ७.२० वाजता / सकाळी ७.२२ वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता
  • अंकाई – सकाळी ९.४० वाजता
  • मनमाड जंक्शन – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता –
  • नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता
  • कल्याण जंक्शन – दुपारी १.२० वाजता / दुपारी १.२२ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • दादर – दुपारी २.०८ वाजता / दुपारी २.१० वाजता –
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी २.२५ वाजता
दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात आले आहेत.

AI ST Buses: चालकाला डुलकी लागली की अलार्म वाजणार! एसटीच्या ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक Ai बसेस

   Follow us on        

मुंबई: एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील. हे कॅमेरे चालकांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणार आहेत. गाडी चालवत असताना चालक जर अपघात होण्यास कारणीभूत होईल अशी कृती करत असेल तर  (उदा. झोप लागणे, डुलकी घेणे, जांभई देणे) मोबाईल वापरणे असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे.

एसटी महामंडळ एकूण पाच हजार बसेस विकत घेणार आहे. त्यातील किमान एक हजार बसेस या ई-बसेस असणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात,एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ई-बसेस एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे आज  सादरीकरण करण्यात आले.

नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभई देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

आणखी काय उपाययोजना ?
बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

Liquor Rates Hiked: ‘झिंगणे’ महागले! महाराष्ट्रात मद्याच्या दरांत वाढ; नेमकी किती वाढ झाली? ईथे वाचा

   Follow us on    

 

 

मुंबई: काल मंगळवारी (10 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दारू विक्रीवरील करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या दृष्टीकोनातून उत्पादन शुल्क विभाग मद्यविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचे ‘सेलिब्रेशन’ देखील महागणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे, मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल वाढणार आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या उद्दिष्टासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते.
काय असतील नवे दर? 
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) रू. २६०/- प्रति बल्क लिटर पर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या ३ पट वरुन ४.५ पट करण्यात येणार. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर रुपये १८०/- वरुन रुपये २०५/- करण्यात येणार.
महाराष्ट्र मेड लिकर (MML) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या प्रकारातील उत्पादनाची (ब्रँड) नवीन नोंदणी करुन घेणे आवश्यक राहील.
उत्पादन शुल्काच्या दरातील वाढ व अनुषंगिक एमआरपी सूत्रातील बदल यामुळे १८० मि.ली. बाटलीची किरकोळ विक्रीची किमान किंमत मद्य प्रकारनिहाय पुढीलप्रमाणे :- देशी मद्य ८० रूपये, महाराष्ट्र मेड लिकर (MML) – १४८ रूपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य- २०५ रूपये, विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड – ३६० रूपये. ही वाढ थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणार आहे.
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा ठरणार आहे.

Mumbai Local : हार्बरवर लोकलसेवा ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे पनवेल-सीएसएमटी अप-डाऊन दोन्ही बंद

   Follow us on        

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे पूर्णतः विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान अप आणि डाउन लोकलसेवा थांबवण्यात आली आहे. नेरुळ स्थानकातही गाड्या थांबवल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितलंय. बेलापूर ते सीवूड्स स्थानकादरम्यान अनेक गाड्या थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

कामाच्या वेळेत अचानक लोकलसेवा सेवा बंद झाल्याने स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काही ठिकाणी प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय. रेल्वेकडून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अद्याप हार्बरची लोकलसेवा सुरू झालेली नाही.

Loading

Kolhapur: कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेसला गांधीनगर, रुकडी येथे थांबा देण्याचा निर्णय

   Follow us on    

 

 

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.मध्य रेल्वेची १२६ वी क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही निर्णय घेण्यात आला. सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस व हुबळी-पुणे वंदे भारतला कराड येथे थांबा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याच वेळी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले.सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली-परळी एक्स्प्रेस सध्या डेमू धावतो, त्याऐवजी आयसीएफ कोचने सोडण्याचा मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी व गजाधर मानधना उपस्थित होते

Railway Updates: रेल्वेमंत्र्यांकडून मिरज कॉर्डलाईन प्रकल्पाला मंजुरी! आता प्रवास सुसाट होणार

रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेल्वेच्या प्रवासी आणि मालमत्ता गाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे कनेक्टीव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रेल्वे मंत्र्यानी मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या मिरज कॉर्ड  ( Miraj Chord Line ) लाईनमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मिरज जंक्शनवरील रेल्वे इंजिनांना बदलण्याची झंझट वाचणार आहे. त्यामुळे रेल्वेची परिचलन सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
इंटरचेंज पॉईंट मिळणार
मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी )  प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मल्टी ट्रॅकिंग, फ्लायओव्हर आणि बायपास लाईन क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचलन  सुलभ होणार आहे. त्यामुळे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉईंट उपलब्ध होणार आहे.
सध्या कुर्डुवाडू किंवा हुब्बाळी येथून येणारी आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनला १२० मिनिटांचा काळ लागतो.  कारण इंजिन किंवा ब्रेक व्हॅन बदलण्यासाठी मिरज येथे ट्रेनला मागे घेऊन डब्बे जोडण्याची वेळ जातो. त्यामुळे या ट्रेनच्या प्रवाशांचा वेळ वाया जातो. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात अधिक कार्यक्षम गतीने मालगाडी आणि प्रवासी रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.  मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासा व्हावा यासाठी या जोड मार्गाची मागणी प्रवाशांकडून होत होती. आता दीर्घकाळापासूनची ही मागणी पूर्ण होणार आहे.

Sindhudurg: शिवापूरच्या कन्येने पटकावले ”चल भावा सिटीत” शोचे विजेतेपद

   Follow us on    

 

 

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.

“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.

New Railway Line: महाराष्ट्रात अजून एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

   Follow us on    

 

 

New Railway Line:महाराष्ट्रात अजून एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शनिशिंगणापूरला थेट रेल्वे नसल्याने राहुरी-शनिशिंगणापूर या नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देण्यात आली आहे. 22 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनिशिंगणापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. शनि दर्शनासाठी दररोज सुमारे 45 हजार भाविक दर्शनासाठी येतात.
शनिशिंगणापूर राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर, पैस खांब यांसारख्या धार्मिक स्थळांना हा रेल्वे मार्ग सोयीस्कर होणार आहे. त्यातून परिसरात स्थानिक पर्यटनवाढ आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. दररोज चार रेल्वे या मार्गावर धावण्याचे प्रस्तावित असून, त्यातून वर्षाकाठी 18 लाख प्रवासी रेल्वे प्रवास करतील, असा अंदाज रेल्वे मंत्रालयाने वर्तविला आहे.
विकास आणि अध्यात्मिक केंद्र जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग एक दिशादर्शक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकल्पाला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे.

महत्वाचे: आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षांच्या संपर्क क्रमांकाची यादी जाहीर

   Follow us on    

 

 

मुंबईदि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबईजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षमहानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई

आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143,

दूरध्वनी: 022- 220227990022- 22794229022- 22023039,

आपत्कालीन संपर्क – 1070

ई-मेल [email protected]

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-

  • मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२,
  • मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४,
  • ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७,
  • पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०,
  • रायगड – ०२१४१-२२२०९७,
  • रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८,
  • सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७,
  • नाशिक – ०२५३-२३१७१५१,
  • अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४,
  • धुळे- ०२५६२-२८८०६६,
  • नंदुरबार – ०२५६४-२१०००६, 
  • जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०, 
  • पुणे – ०२०-२६१२३३७१, 
  • सोलापूर – ०२१७-२७३१०१२,
  • कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४, 
  • सांगली – ०२३३-२६००५००,
  • सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५,
  • छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७,
  • धाराशिव- ०२४७२-२२७३०१, 
  • हिंगोली – ०२४५६-२२२५६०, 
  • परभणी – ०२४५२-२२६४००,
  • बीड- ०२४४२-२९९२९९,
  • नांदेड – ०२४६२-२३५०७७, 
  • जालना- ०२४८२-२२३१३२,
  • लातूर- ०२३८२-२२०२०४,
  • अमरावती- ०७२१-२६६२०२५,
  • यवतमाळ – ०७२३२-२४०७२०, 
  • वाशिम- ०७२५२-२३४२३८, 
  • अकोला- ०७२४-२४२४४४४,
  • बुलढाणा- ०७२६२-२४२६८३, 
  • नागपूर – ०७१२-२५६२६६८,
  • वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०,
  • चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७,
  • गोंदिया – ०७१८२- २३०१९६, 
  • भंडारा- ०७१८४- २५१२२२,
  • गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५

 

महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक

  • बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७२२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९,
  • ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५, 
  • नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१,
  • भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८,
  • कल्याण – ०२५१-२२११३७३,
  • मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२,
  • उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३,
  • वसई-विरार – ०२५०-२३३४५४७,
  • पनवेल – ०२२-२७४५८०४०,
  • नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५,
  • मालेगाव – ०२५५४- २३४५६७,
  • अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०,
  •  धुळे- ०२५६२-२८८३२०,
  • जळगाव – ०२५७-२२३७६६६,
  • पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३,
  • पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११,
  • सोलापूर – ०२१७-२७४०३३५,
  • कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१,
  • सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१,
  • छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४,
  • परभणी – ०२४५२-२२३१०१,
  • नांदेड- ०२४६२-२३४४६१,
  • लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५,
  • अमरावती – ०७२१-२५७६४२६,
  • अकोला – ०७२४-२४३४४६०,
  • नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००,
  • चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७,  ०७१७२-२५९४०६/२५४६१४

 

रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी

  • कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९
  • पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९
  • मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०

Cyclone Alert: अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन!

   Follow us on    

 

 

Cyclone Alert: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात बुधवार, 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
* हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
* स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
* खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
* लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
* सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
* संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
* समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search