Category Archives: महाराष्ट्र

राज्यातील ८४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

आज दिनांक १५/०८/२०२२ स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात येणारे १) पोलीस शौर्य पथक २) मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पोलीस पथक आणि ३) गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक महाराष्ट पोलीस दलाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील तीन पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याबरोबरच 42 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत. देशभरातील अधिकाऱ्यांना 1082 पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 84 पदक मिळाली आहेत.

उल्लेखनीय सेवेचे पोलीस पदक

अ. क्र. नावपद आणि ठिकाण
1श्री. सुनील वसंत कोल्हेसहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
2श्री. प्रदीप परशुराम कन्नलू सहाय्य्क पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश विभाग, ठाणे
3श्री मनोहर दगडू धनवडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई शहर

पोलीस शौर्य पदक

अ. क्र. नाव आणि पद
1मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षकऔरंगाबाद
2समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षकगडचिरोली
3भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षकगडचिरोली
4 महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षकबीड
5 राजरत्न खैरनार,  सहायक पोलीस निरीक्षकनवी मुंबई
6 राजू कांडो ,  पोलीस नाईकगडचिरोली
7 अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
8 गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
9संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षकगडचिरोली
10मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक (द्वितीय बार)गडचिरोली
11दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
12राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
13सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
14शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
15रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
16महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबलगोंदिया
17साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
18रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
19संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षकगडचिरोली
20मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षकगडचिरोली
21दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षकनवी मुंबई
22जीवन उसेंडी,  नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
23राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
24विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
25मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
26मनोज गज्जमवार, पोलीस नाईकगडचिरोली
27अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
28देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल      गडचिरोली
29हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षकपालघर
30जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल (मरणोत्तर)गडचिरोली
31सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबलगडचिरोली
32सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
33रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
34योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षकगडचिरोली
35धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर)गडचिरोली
36दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
37दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
38सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
39किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर)गडचिरोली
40गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
41योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली
42अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबलगडचिरोली

गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक

अ. क्र. नाव आणि पद
1सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद
2आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
3संतोष जोशी , पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय,औरंगाबाद
4भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई
5अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे
6नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट,मुंबई
7व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर
8दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद
9श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई
10राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई
11सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई
12शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम,मुंबई
13देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया
14क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद
15प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव
16वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर
17सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण
18माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर
19जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी
20विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी)
21अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर
22जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
23माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव
24विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर
25प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली
26प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली
27गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर
28धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर
29अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर
30संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड
31भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा
32प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव
33सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई
34विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव
35सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
36राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई
37सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
38अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
39सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद

आता फोनवर ‘हॅलो’ च्या जागी ‘वंदे मातरम’ मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच मुनगंटीवारांचा मोठा निर्णय!

आजपासूनमहाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नमस्कार न म्हणता वंदे मातरमने फोनवर संभाषण सुरू करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

 

आज मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नाव सांस्कृतिक खात्यासाठी जाहीर केल्यानंतर त्यांनी हि एक महत्वाची घोषणा केली आहे.
शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. 18 व्या शतकामध्ये दुरध्वनीच्या माध्यमातून सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हे अभियान ते १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी पर्यंत राबवली जाणार आहे. ह्यासंबंधीचा अधिकृत जीआर ते लवकरच काढणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. 

 
 

शिंदे सरकारमधील खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.. जाणून घ्या कोणाला कोणते खाते मिळाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

अपेक्षेप्रमाणे गृह, वित्त , गृहनिर्माण, ऊर्जा हि महत्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती तंत्रज्ञान, नगरविकास, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम इ. खाती आपल्याकडे ठेवली आहेत.

कोणाला कोणते खाते याची सविस्तर माहिती

◾️मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्व. प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

 

◾️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

◾️ राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

◾️ सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

◾️ चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

◾️ डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

◾️ गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

◾️ गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

◾️ दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

◾️ संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

◾️ सुरेश खाडे- कामगार

◾️ संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

◾️ उदय सामंत- उद्योग

◾️ प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

◾️ रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

◾️ अब्दुल सत्तार- कृषी

◾️ दीपक केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा

◾️ अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

◾️ शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

◾️ मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

.. तर विनायक मेटे यांचा जीव वाचला असता…

आज सकाळी झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अपघातानंतर त्यांना एक तास मदत मिळाली नाही. वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता.

त्याच गाडीत त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितले की अपघात झाल्यावर विनायक मेटे हे त्यांच्याशी बोलले होते. आम्ही तिथून जाणार्‍या वाहनांना हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कोणी गाडी थांबवली नाही. एवढेच नव्हे तर अक्षरशः रस्त्यावरून झोपून पण त्यांनी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केला.

ह्याबरोबरच 100 ह्या emergency नंबर वर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिथून पण त्यांना मदत मिळाली नाही. अनेकदा फोन करून पण तिथून फोन उचलला गेला नाही.

शेवटी एका वाहनचालकाने गाडी थांबवली. आणि एका तासाने मदत मिळाली. ताबडतोब मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते असे त्यांचे सहकारी म्हणाले.

हे सर्व खूपच निंदनीय म्हणावे लागेल. राज्याचा राजकारणातील एका मोठ्या नेत्याला असे अनुभव आलेत तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धक्कादायक:शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन

नवी मुंबई :आज सकाळी घडलेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

विनायक मेटे कोण होते 

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.

मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. 

अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य

विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे आणि त्यांचा सुरक्षारक्षक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.

सरकारच्या मराठा आरक्षण संबंधित आजच्या सभेच्या उपस्थितीसाठी ते मुंबई येथे येत असताना हा अपघात घडला आहे. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता तो किरकोळ जखमी झाल्याचे समजते आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र  वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन डोंगर कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  

आमदार संजय शिरसाट शिवसेनेच्या वाटेवर? डिलीट केलेली ट्विट चर्चेत….

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पहिला टप्पा पार पाडला आहे,त्यात शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. पण ह्या वाटपावरून शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याचे पहावयास मिळाले. काहीजणांनी तर आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली तर काहीजणांनी ती आपल्या कृतीमधून दाखवून दिली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढविणारी एक घटना समोर आली आहे.

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केली होती त्यामध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक विडिओ पोस्ट करून ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब…’ असे ट्विट केले आहे.

त्यांच्या ह्यांच्या ट्विट मुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने ते पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत अशा चर्चा होवू लागल्या आहेत.

दरम्यान, ह्यासंबधी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते त्यांनी सारवासारवीची उत्तरे दिल्याचेही समजते. आधी ते म्हणाले की माननीय उद्धव ठाकरे यांचे स्थान हे आमच्यासाठी कुटुंबप्रमुखाचेच आहे असे समजते. ह्या ट्विटचा वेगळा अर्थ घेवू नये असे ते म्हणाले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी ही ट्विट डिलीट केली आणि आपल्याकडून ही ट्विट चुकून पोस्ट झाली असे ते म्हणाले. आपला राजकारणातील 38 वर्षाचा अनुभव आणि मताधिक्य पाहता मला मंत्रिपद मिळायला हवे होते. तसा शब्दही दिला गेला होता असे बोलून त्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली.

मी मंत्रिपदासाठी पात्र नसेन म्हणुन मला मंत्रिपद दिले नसेल – पंकजा मुंडे

कदाचित मी मंत्रिपदासाठी पात्र नसेन म्हणुन मला मंत्रिपद दिले नसेल, पुढे कधितरी त्यांना मी पात्र झाली असे वाटेल तेव्हा ते मला मंत्रिपदा देतील अशा शब्दात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना मंत्रिपद का दिले नाही ह्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या आहेत. त्यांच्या ह्या वक्तव्यातून त्यांची नाराजी व्यक्त होत असून त्यासंबंधी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना मुद्दाम डावलले जात आहे असे भाजपवर आरोप केले आहेत. एकंदर माजी भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जवळील नेत्यांना आताच्या भाजपा नेत्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पंकजा मुंडे ह्या ओबीसी आहेत आणि त्यांना डावलून त्यांनी ओबीसी समाजावर पण अन्याय केला आहे असेही आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेत.

एकनाथ खडसे ह्यांच्या ह्या विधानावर प्रत्युत्तर देताना भाजपचे नवनिर्वाचित मंत्री गिरीश महाजन म्हणाले की भाजपने ओबीसी समजाला न्याय दिला आहे. मी स्वतः ओबीसी आहे तसेच जिल्हय़ाचे बघायचे तर मंत्रिपदाची शपथ घेतलेले गुलाबराव पाटील पण ओबीसी आहेत. पंकजा मुंडे संबंधी बोलायचे झाले तर त्यांना लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार असे सूचक विधान केले आहे.

 

आता मुंबईत शिंदेगट प्रतिसेनाभवन उभारणार..मुंबईत ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा उघडणार…

मुंबई :खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा हा वाद चालू असताना शिंदे गटाने नवीन प्लॅन आखला आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करणार असे बोलले जात होते पण आज आज एक नवीन माहिती समोर आली आहे. शिंदेगट आता दादर आणि कुलाबा येथे प्रतिसेनाभवन उभे करणार आहे आणि त्यासाठी जागेचे संशोधन चालू केले गेले आहे. एवढेच नाही तर मुंबई मध्ये सर्व ठिकाणी शिंदे गट आपल्या गटाच्या शाखा खोलणार आहेत. अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची गती पाहता त्यांना एका अशा भवनाची गरज आहे जे आमच्या पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय समजले जाईल. असे ते पुढे म्हणाले.
शिवसेनाभवन हे पक्षाचे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते, ह्या ठिकाणी पक्षासंबंधी सर्व बैठकी आणि निर्णय घेतले जातात. शिवसेनेच्या शाखा ह्या शिवसेना पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेला जोडण्याचा एक मुख्य दुवा समजला जातो.  बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष ह्या शाखेंद्वारे घरोघरी पोहचवला होता. आता त्याची पुनरावृत्ती शिंदेगट आपल्या गटाचे राजकारणातील स्थान मजबूत करण्यासाठी करणार आहे. सुरवातीला मुंबईमध्ये सर्व विभागात ह्या शाखा असतील, तसेच प्रत्येक शाखेत शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांची नियुक्ती करण्यात येणार आहे असे  त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
दरम्यान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी ह्यावर टीका केली आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी हे मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असे ते म्हणाले.

फक्त आपल्या अहंकारासाठी आरेच्या कारशेडला विरोध. देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मेट्रो 3 च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील प्रस्तावित जागा कोणत्याही दृष्टीने योग्य नसून फक्त आपल्या ‘EGO’ साठी ठाकरे सरकार आरे येथील कारशेडला विरोध करून कांजूरमार्ग येथील जागेसाठी प्रयत्नशील होते असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. 
 
मविआ सरकार सत्तेत असताना त्यांनी कारशेड च्या जागेच्या प्रश्नासाठी एक समिती नेमली होती त्याच समितीने ह्यावर आपला अहवाल दिला होता. त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केले होते की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आजून ४ वर्षे लागतील आणि प्रचंड खर्च होईल आणि व्यवहार्यदृष्ट्या पाहता योग्य नाही. त्यांचाच समितीने हा निर्णय दिला असताना कांजूरमार्गच्या जागेला मेट्रो 3 च्या कारशेड साठी निवडणे हा निर्णय केवळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त आपल्या ‘EGO’ साठी घेतला आहे. 
 
आरे येथील कारशेडचे काम 29% पूर्ण झाले आहे, एकूण प्रकल्पाचे काम 85% पूर्ण झाले आहे. ह्यापुढे एकही झाड ह्या प्रकल्पासाठी तोडावे लागणार नाही. आणि आता जर कारशेड तिकडे हलवायचे म्हंटले तर त्यासाठी बराच खर्च करावा लागेल. सामान्य जनतेच्या खिशातून आलेल्या पैशाची अशी उधळण करता येणार नाही असे ते पुढे म्हणाले. 
 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search