Category Archives: रत्नागिरी

Mumbai Goa Highway | प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे परशुराम घाटात निर्माण झाला खतरनाक स्पॉट; अपघाताची दाट शक्यता

Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्ग हा कोकणवासियांचे अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. १३/१४ वर्षे रखडलेला हा महामार्ग पूर्ण होण्याचे नावच घेत नाही आहे. त्यात  महामार्गाचे करण्यात येत असणारे सुमार काम आणि घेतली जाणारा निष्काळजीपणाची स्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. या मार्गावर काही ठिकाणी केलेल्या चुकांमुळे ती ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्रे बनली आहेत. जनआक्रोश समितीचे अजय यादव यांनी परशुराम घाटातील असाच एक स्पॉट जिथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तो समाज माध्यमाच्या साहाय्याने निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट नुसार ते म्हणत आहेत …. 
कोकण हायवेवर अपघात का होत आहेत अथवा कसा होवू शकतो याचा अतिशय उत्तम नमुना म्हणजे हा खतरनाक स्पॉट परशुराम घाटात… राम भरोसे कारभार! घाट उतरताना एका ब्लाइंड स्पॉटवरच चक्क डायवर्जन दिलं आहे. काय विचार करून ही लोक काम करत आहेत? लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.
परशुराम घाटात गाडी सांभाळून चालवा खासकरून घाट उतरताना… Diversion चे क्लिअर सूचना देणारे कोणतही फलक नसल्याने अश्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आपणच काळजी घ्या भावांनो…
या संदर्भात पुढे जावून मी पोलिसांच्या चौकीवर ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्वरित मान्य करून त्या संबंधित कल्याण टोल कॉन्ट्रॅक्टरचा माणूस ला फोन लावून माझ्याशी बोलणे करून दिले. मी त्यांना सदर कल्पना दिली. यावर त्यांनी हे काम माझ्या अखत्यारीत येत नसून ईगल कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर सोबत बोला असे सांगितले. त्यांनी तसे केले आहे. आता यावर अधिक काय बोलावे मला सुचत नाही. पण याला तिथली प्रशासन व्यवस्था जबाबदार इतके मला कळले. तूर्तास तुम्ही या रस्त्याने जाणाऱ्या मंडळींनी काळजी घ्या. उद्या परत चेक करतो काय परिस्थिती आहे. त्यानुसार काय ॲक्शन घेता येईल पाहतो…

 

 

Loading

Kashedi Tunnel: नियम तोडून चुकीच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली

Kashedi Tunnel :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या हलक्या वजनाच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेनेही जाणारी वाहने बोगद्यातून मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांची फसगतच होत आहे. विरूद्ध दिशेने धावणार्‍या वाहनांमुळे बोगद्यात एकेरी वाहतुकीची पायमल्ली सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे अपघातांचा धोका कायम असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवरच आली आहे.
एकेरी वाहतुक चालू केली असली तरीही हा नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विरोधी बाजूने म्हणजे गोव्यावरून मुंबईच्या दिशेने सुद्धा काही वाहनचालक वाहने चालवताना दिसत आहे. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी  तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला होता. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

Loading

मंडणगड | होळीसाठी परळ ते डौली एस् .टी. बससेवा सुरू

मुंबई, दि. २६ फेब्रु.: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले.

यावेळी वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन सिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading

गणपतीपुळे येथे सुरु होणार देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी :देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय संग्रहालय गणपतीपुळे जवळील मालगुंड मालगुंड मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालगुंड येथे केली आहे. मालगुंड गावच्या सुकन्या तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती साधनाताई साळवी यांच्या वाढदिवसाला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली उपस्थिती दाखवली होती यावेळी ते बोलत होते.
या प्राणिसंग्रहालयाची  जागा एक दोन दिवसांतच निश्चित होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच हे प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे झाल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की गणपतीपुळे येथे दरवर्षी 22 लाख पर्यंत भेट देतात मात्र त्याहीपेक्षा 30 लाखापर्यंत मालगुंड मध्ये पर्यटक भेटी देऊन मालगुंडच्या विकासाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading

Konkan | स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

रत्नागिरी : कोकणातील आंबा व्यावसायिकांसाठी एक दिलासा देणारी  बातमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र आंबा बोर्डासाठी २०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.
आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल.
आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्‍या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत.

Loading

रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील रामभक्‍तांना भाजपतर्फे अयोध्यावारी; पनवेल येथून सोडण्यात येणार विशेष ट्रेन

मुंबई: रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारांतून प्रत्‍येकी अडीचशे या प्रमाणे दीड हजार रामभक्‍तांना आम्‍ही अयोध्यावारी घडविणार आहोत. त्‍यासाठी ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार असल्‍याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
श्री. जठार म्हणालेत  ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार आहे 
 या ट्रेनचा प्रमुख आपण आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ येथून निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे त्या त्या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर या इच्छुक राम भक्तांनी या ट्रेनमधून अयोध्या वारी करण्यासाठी भाजपच्या तालुकानिहाय मंडल अधिकारी तथा तालुकाध्यक्षांकडे संपर्क साधावयाचा आहे असे ते पुढे म्हणालेत.
                                       

Loading

प्रसिद्ध ‘कोका कोला’ कंपनीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत उद्घाटन 

रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी ‘कोका कोला’ चे उद्घाटन  रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडलं. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून चांगली सुरुवात कोकणच्या भूमीत होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनीनं सुरुवातीला २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. विविध प्रकारची ६० उत्पादनं या कंपनीची देशभरात आहेत. या कंपनीनं हजारो कर्मचारी काम करतात. या कंपनीनं २०२३ मध्ये भारतात एकूण १२८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशी एक मोठी कंपनी इथं उभी राहत आहे त्यामुळं लोकांना चांगला रोजगार उभा राहिलं. व्यवस्थापनानं स्थानिक लोकांना प्राधान्य कारखान्यात दिलं पाहिजे, असा आग्रह यावेळी मुख्यंमत्र्यांनी धरला.
फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ अमेरिका दौऱ्यातच याबाबत बोलणी झाली होती. पण नंतर सरकार बदलल्यानंतर ते काम थांबलं. कोकणानं नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यामुळं कोकणी माणला वापरुन घ्यायचं काम आमचं सरकार कधी करणार नाही. इथल्या भूमिपुत्रांना मोठी स्वप्न दाखवायची आणि एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायचं हे आम्हाला कधी शिकवलं नाही. त्यामुळेच आता हा प्रकल्प इथं सुरु होत आहे.

Loading

कोकणकन्येची भरारी; जिल्ह्यातील पहिली मेट्रो चालक बनण्याचा मिळवला मान

रत्नागिरी: राजापूर आडवली येथील आदिती पडयार ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली कोकणसुकन्या मेट्रो चालक ठरली आहे. नवी मुंबई येथे सुरू झालेल्या मेट्रोच्या शुभारंभाची ट्रेन चालवण्याचा मोठा बहुमान या कोकणकन्येला मिळाला आहे. 
आदिती पडयार यांना मुंबई येथील मोनोरेलमध्ये ट्रेन कॅप्टन म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.  मोनोरेलमधील दोन वर्षाच्या अनुभवानंतर आता आदिती पडियार मेट्रो चालक आहेत. नवी मुंबई येथे शुभारंभ दिवशी त्यांना २२ किलोमीटरची पॅसेंजर मेट्रो ट्रेन चालवली. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या कोणत्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात अशा शब्दात अदिती पडियार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकणातील सगळ्याच मुलींनी आता आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
आपल्याला मेट्रो चालवण्याची संधी मिळाल्यानंतर मला कोकणातून गावावरून अभिनंदन व कौतुकाचे कॉल येत आहेत. त्यावेळेला वाटत असेल तर समाधान खूप मोठ आहे अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. मला भविष्यात अशा आव्हानात्मक संधी मिळाल्या तर नक्कीच मी त्याचा उपयोग करेन, असाही आत्मविश्वास  यांनी पत्रकारांशी व्यक्त केला. नवी मुंबईतील मेट्रो चालक पदावर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आदिती पडियार यांचे सामाजिक शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आलं आहे.

Loading

रत्नागिरीत एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प येण्याच्या बेतात

रत्नागिरी: जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्याची शक्यता आहे. एप्रिल एशिया कंपनी असे त्याचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमआयडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे; परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.(Latest Marathi News)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या काही उद्योगांची धडधड पुन्हा सुरू केली आहे. नवे उद्योग यावे यासाठी स्टर्लाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जेके फाइल्सच्या जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगांना सहज गुंतवणूक करता यावी यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे.
त्यामुळे सिंगापूरची एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. हे टिश्यू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात. हे टिश्यू निर्यात केले जाणार असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे. 

Loading

अबब! गरवताना गळाला लागला चक्क २० किलोचा मासा

राजापूर: फावल्या वेळात गरवून मासे पकडणे हा बऱ्याच जणांचा आवडता छंद. तीन ते चार तास गरवून फक्त कालवणापुरते मासे भेटले तरी पुरे असे म्हणून वेळ घालवणारे पण तुम्ही पहिले असतील. पण एक कल्पना करा गरवताना एक दोन किलो नाही तर चक्क २० किलोचा मासा गळाला लागला तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हो असे झाले आहे.. बाकाळे गावातील राहुल वामन राऊत याला समुद्रकिनारी गरवताना काल चक्क 20 किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला आहे. त्याने तो साखरी नाटे येथील विक्री केंद्रावर नेऊन विकला त्याला 180 रुपये किलोचा दर मिळाला आहे. म्हणजे त्याला एकूण या माशापासून  3600 रुपये इतका फायदा झाला आहे.
मजुरीची कामे करून चा उदरनिर्वाह करणारा राहुल फावल्या वेळात संध्याकाळी कामावरून सुटल्यावर बाकाळे परिसरातील समुद्रा जवळच्या कड्यावर मासे गरवण्यासाठी जात असतो. त्याच्यासारखे बरेच तरुण  युवक लोखंडी रॉड म्हणजेच गरीच्या साह्याने मासेमारी करताना दिसतात. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search