Category Archives: महाराष्ट्र
परवानगी नसताना फटाके फोडत आहेत.
मोठ्या आवाजात गाणी लावत आहेत.
परवानगी कोणी दिली?@Sindhudurg_SP @dvkesarkar सावंतवाडीमध्ये छटपुजा कधीपासून सुरू झाली? तुमच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे.
तुमच्या कार्यकर्त्यांना कळवले आहे.
आवरा यांना#महाराष्ट्रातमराठीच @ekikaranmarathi pic.twitter.com/W10pUOst24— निनाद सावंत (@NINADS143) November 7, 2024
Viral Video:रेल्वेने प्रवास करताना अनेकदा लहान मुले चटपटीत अशी भेळीची मागणी करतात. कांदा, मिरची, मसाला, चिवडा, शेव, कुरमुरे टाकून बनवलेली भेळ त्यांना हवी हवीशी वाटते. मात्र तुम्ही अशा प्रकारे रेल्वेस्थानकावरील दुकानातील चटपटीत भेळ खात असाल, तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण- या व्हिडीओतून असा काही किळसवाणा प्रकार दाखविला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कधीच रेल्वेमध्ये विकायला येणारी भेळ खाणार नाही. कारण या प्रवासात तुम्ही जी भेळ आवडीने खाता ती कशी बनवली जातं, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. याचा किळसवाना व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल.रेल्वेवर तयार होणाऱ्या अन्नातून अनेकांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. अतिशय अस्वच्छ पद्धतीने व गलिच्छ प्रकाराने खाद्य पदार्थ तयार केले जातात. सध्या रेल्वेमधील भेळ विक्रेत्याचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं भेळमध्ये असणारा कांदा चक्क टॉयलेटच्या बाजूला जमीनीवर कापला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Video 👇🏻
ट्रेन के सफर में गलती से भी चने मत खायेगा
देखिए कैसे तैयार किया जाता है 😡 pic.twitter.com/yOC9AO9QDZ
— 𝗠𝗮𝗻𝗶𝘀𝗵 𝗗𝗮𝘁𝘁 𝗧𝗶𝘄𝗮𝗿𝗶 (@Tiwari__Saab) October 21, 2024
नालासोपारा स्थानकावर @WesternRly च्या तिकीट तपासनीस रितेश मोर्याची भाषा एक ‘स्थानिक प्रवाशाला’ समजली नाही, मराठी बोला म्हटल्यावर मोर्याने गुंडागर्दी केली, पोलीस बोलावले धमकावून मराठीची मागणी करणार नाही लिहून घेतले
मराठी राज्यात दंडेलशाही का? @drmbct@grpmumbai @AshwiniVaishnaw— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) November 3, 2024




मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक उत्सवात क्रिकेट, होम मिनिस्टर, वेश भूषा, चित्रकला, पाक कला स्पर्धा, कोजागिरी, रास गरबा – दांडिया तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आर.एस.सी. १५ मधील बाळ-गोपाळ, बंधू – भगिनी व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरा केला. उत्सवा दरम्यान रस्ता क्रमांक १५ विद्युत रोषणाईने झगमगला होता.
क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत साईकुंज संस्थेनेच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत विजेते पद पटकविले. या स्पर्धेचे अप्रतिम नियोजन केतन धाटावकर व गिरीश दहीबावकर यांनी केले होते.
महिलांचा आवडता कार्यक्रम “होम मिनिस्टर” म्हणजेच खेळ पैठणीचा पाऊस असूनही खूपच रंगतदार ठरला. आपल्या खास शैलीत निवेदक प्रशांत प्रिंदावनकर आणि सुधाकर वस्त यांनी एकामागून एक रंगतदार खेळांचे सादरीकरण करून खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील या खेळांची भुरळ पाडली. या स्पर्धेच्या विजेत्या रंगावली संस्थेतील श्वेता सतिश कदम यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आपला माणूस भूषण अनंत विचारे यांनी पैठणी, सोन्याची नथ, स्मार्ट घड्याळे आणि एअर पौडस्, तसेच सहभगी भगिनिंस पारितोषिके देवून मंडळास मोलाचे सहकार्य केले.
सत्यनारायण पूजा दिनी बाळ गोपलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात १३६ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली. तसेच महिलांसाठी आयोजलेल्या पाककला स्पर्धेत देखील अनेक भगिनींनी भाग घेवून एकापेक्षा एक सरस पदार्थांची मेजवानी सादर केली. साई कुंज संस्थेतील सुजाता नाईक यांच्या ‘कडबू’ या पारंपरिक पदार्थाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. डी.जे.जग्गु यांच्या तालावर रास – गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध वेशभूषा करून अबाल वृद्धांनी सहभाग घेवून आनंद व्यक्त केला.
उत्सव मंडळाच्या वतीने विभागात कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे असे राजेश सोरप अध्यक्ष व अमित पालांडे, चिटणीस यांनी सांगितले.
कार्यक्रमांची सांगता भूषण विचारे, निखिल गुढेकर, राजन निकम , दिनेश साळवी, सुधाकर कदम या व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे तसेच प्रशांत प्रिदांवनकर, हरीश सूर्यवंशी, राजेश सोनवणे प्रवीण सावंत, कुणाल विश्वकर्मा, विशाल पांड्या, राजू परब, चेतन चौलकर, डॉक्टर मकरंद गावडे, कमलाकर सक्रे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले. तसेच सर्व रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार सुधाकर वस्त यांनी व्यक्त केले.




संपादकीय: वांद्रे टर्मिनस येथे काल पहाटे गाडीमध्ये चढताना चेंगराचेंगरी होऊन प्रवासी गंभीररीत्या जखमी होण्याचा प्रकार घडला होता. घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा घटनेचे गांभीर्य दाखवते.
वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पूर्ण अनारक्षित स्वरुपाची होती. या गाडीच्या आसन क्षमतेपेक्षा तिकीटविक्री झाली होती. गाडी प्लॅटफॉर्म येत असताना जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. या वेळी चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाले. त्यात 2 दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले.
या घटनेनंतर या घटनेस जबाबदार कोण? कारणे काय? हे प्रश्न उठले. अन्य कारणे अनेक असतीलच मात्र मागणी – पुरवठा यातील तफावत हेच या घटने मागचे मुख्य कारण म्हणता येईल. देशातील प्रवाशांची मागणी कोणती आहे हेच ओळखणे प्रशासनाला जमले नाही; किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देशातील प्रवाशांचा मोठा गट सामान्य आणि गरीब या प्रकारात मोडतो. या प्रवाशांना एसी आणि प्रिमीयम श्रेणीतून प्रवास प्रवास करणे परवडत नाही. एकतर जनरल नाहीतर स्लीपर या श्रेणीची तिकिटे त्यांना परवडतात. त्यामुळे प्रीमियम वंदे भारत, तेजस, राजधानी या सारख्या पूर्णपणे प्रिमीयम त्यांच्यासाठी नाहीच आहेत. आता राहिल्या बाकीच्या रेग्युलर गाड्या. या गाड्यांना फक्त 2 ते 4 जनरल डबे जोडलेले असतात, तर साधारणपणे 8 ते 10 सेकंड स्लीपर डबे या प्रवाशांसाठी असतात. ही संरचना प्रत्येक गाडीपरत्वे कमी अधिक असल्याने आपण ती आपण साधारणपणे 50% पकडून चालू. देशातील मोठ्या प्रवासगटाला ही क्षमता नक्किच कमी आहे.
रेल्वे प्रशासनाने अलीकडेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कालची घटना याच निर्णयाचा एक परीणाम आहे. यापूर्वी प्रवाशांना वेटिंग तिकीटावरून स्लीपर डब्यांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तो आता नाहीसा झाल्याने जनरल डब्यातील गर्दी वाढली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास, हे चित्र असेच राहिल्यास भविष्यातही अशा घटना घडतच राहणार.
रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्न वाढीवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे वंदे भारतसारख्या प्रिमीयम गाड्या रूळांवर आणण्यास भर देत आहे. तर देशातील लोकप्रतिनिधींना आधुनिक आणि प्रगत भारत घडवायचा आहे. मात्र या आधुनिक भारतात वंदे भारत एक्सप्रेस रिकाम्या जात असतिल आणि सामान्य प्रवासी असे चिरडले जात असतिल तर अश्या आधुनिकतेचा काय उपयोग?
अलिबाग : गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनी चालवणाऱ्या १५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून जिल्हय़ात शोध पथके कार्यन्वित करण्यात आली होती. या शोध पथकांना कर्जत येथील सागंवी गावात एका निर्जन ठिकाणी असलेल्या आलिशान फार्महाऊस परिसरात सुरु असलेल्या संशयास्पद हालचालीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने या फार्म हाऊसवर धाड टाकली. तेव्हा या बनावट सिगरेट कंपनीचा उलगडा झाला. मध्ये ही कंपनी बेकायदेशीरपणे थाटण्यात आली होती. पंधरा कर्मचारी तिथे काम करत होते. सिगरेट बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि तीन मशिन्स या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने दररोज १५ लाख रुपयांची सिगरेट्स या ठिकाणी बनवल्या जात होत्या. बॉक्स पॅकींगसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले होते. कंपनीत काम करणाऱ्या १५ कामगारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे कामगार आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आहेत. कंपनीचा सुरु करणार मुळ सुत्रधार दक्षिण भारतातील असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरु आहे. ज्या फार्म हाऊस मध्ये ही कंपनी सुरु होती. त्या मुंबईतील फार्म हाऊस मालकाची शोध पोलीसांनी सुरू केला आहे.