Category Archives: रत्नागिरी

देवरुख आगाराच्या एसटी बसला बोरसूत अपघात; ‘त्या’ बस चालकाचा दावा खरा?

देवरुख : देवरुख आगाराच्या एका एसटी बसला येथील बोरसू येथे काल अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बस गाडी रस्त्याच्या बाजुच्या गटारात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र देवरुख आगाराच्या एसटी बसेसच्या दुरावस्थेमूळे या बसेस मधुन प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

व्हायरल चित्रफिती मधील चालकाचा दावा खरा?
गेल्याच आठवडय़ात याच आगारातील चालक अमित आपटे याने आगारातील बसेसच्या दुरावस्थेविषयी एक विडिओ बनवून तो समाजमाध्यमातून व्हायरल केला होता. ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन त्याने या विडिओ मध्ये केले होते. मात्र आगार व्यवस्थापनाने या चालकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला निलंबित करण्यात होते. या सर्व प्रकारामुळे देवरुख आगार वादात सापडले होते. देवरुखमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली होती.

तर मोठा अपघात झाला असता…
या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर घाट रस्त्यावर असा प्रकार घडला असता तर बस कित्येक फुटावरून दरीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असती. या प्रकरणी एसटी महामंडळाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Loading

Mumbai Goa Highway : रत्नागिरीत उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला; सुदैवाने जीवितहानी नाही

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार घडला आहे;सुदैवाने यात कोणतीही हानी  झाली नाही. मात्र  महाकाय लाँचर चे काही भाग तुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला आहे,  जास्तीच्या वजनामुळे गर्डर लाँचर खाली कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची जास्तीची कुमक घटनास्थळी तैनात झाली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली धोका टाळण्यासाठी ठेकेदाराकडून क्रेन मागवण्यात आली असून क्रेन च्या मदतीने लॉन्चर चा समतोल राखला जाणार आहे तूर्तास कोणताही धोका नसल्याचा कंपनी कडून निर्वाळा देण्यात आला आहे

Loading

“…’या’ एसटी बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा” असे आवाहन करणाऱ्या ‘त्या’ बस चालकाचे निलंबन

रत्नागिरी : ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन एका व्हिडिओद्वारे करणाऱ्या या आगारातील चालक अमित आपटे यांच्यावर एसटी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केल्याने रत्नागिरी एसटी प्रशासन चर्चेत आले आहे.
गाडय़ांची योग्य देखभाल न केल्याने आगारप्रमुख आमच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असा थेट आरोप करून आपटे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, या दोन्ही गाडय़ा सतत ब्रेक डाऊन होत असतात. गेल्या २५ दिवसांत त्याबाबत आम्ही चालकांनी अनेकदा तक्रार नोंदवली आहे. पण त्यांची दखल न घेता आमच्यावरच कारवाई केली जाते.आपण हा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कारवाई होऊन घरी बसवले जाईल, याची जाणीव आहे. पण अपघात होऊन घरी बसण्यापेक्षा असे घरी बसलेले बरे, अशी टिप्पणी आपटे यांनी केली आहे. प्रवाशांनी या परिस्थितीची गंभीरपणे नोंद घेऊन या बसगाडय़ांनी प्रवास टाळावा, तसेच राज्यकर्त्यांनी या समस्येची गंभीरपणे दखल घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक नागरिकांनीही एसटीच्या कारभाराचे छायाचित्रांसह वाभाडे काढले. देवरुखमधील सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली.
एसटी प्रशासनाचे या सर्वावर उत्तर 
दरम्यान बस चालकाने व्हिडीओत दावा केलेल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिले आहेत. शिवाय एस टी महामंडळाची बदनामी करीत प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या चालकाचे निलंबन देखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली आहे. या चालकाने कोरोना काळात देखील असे खोडसाळ व्हिडीओ केले होते असेही ते म्हणाले.

 

Loading

Ratnagiri : नमन आणि जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळणार

रत्नागिरी : कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रत्नागिरी  जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबबों ले यांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत उदय सामंत यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नमन, जाखडी या लोककला आजही येथील मंडळींनी ळीं जीवापाड जपल्या आहेत. पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी केली नाही. सध्या नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
नमन अनेक नाट्यसंमेलनांच्या माध्यमातून जगभर पोहचले. पण कोकणातील नमन, जाखडी सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित होत आहेत आणि ही हजारो मंडळे राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहेत. या कलेची शासन दरबारी आजही नोंदनों व्हावी अशी मागणी आहे. कोकणात नमन तथा खेळे, शक्तीतुरा म्हणजे जाखाडी नृत्य या कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे.

Loading

Konkan Railway | लांब पल्ल्याच्या ३ एक्सप्रेस गाड्यांना खेड आणि संगमेश्वर येथे थांबे

रत्नागिरी : कोंकण रेल्वेने कोंकणवासीयांना एक खुशखबर दिली आहे.  रेल्वे प्रशासनाने  कोकण रेल्वे मार्गावरील काही एक्सप्रेस गाड्यांना  थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत.
१) संगमेश्वर रोड येथे नेत्रावती एक्सप्रेसला थांबा
16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express हि एक्सप्रेस दिनांक २२/०८/२०२३ पासून संगमेश्वर रोड येथे थांबणार आहे. संगमेश्वर येथे या गाडीची वेळ संध्याकाळी ५ वाजुन ३४ मिनिटे अशी असणार आहे.
परतीच्या प्रवासात 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express  या गाडीची वेळ संगमेश्वर येथे सकाळी ९ वाजून ५६ मिनिटे अशी असणार आहे.
२) खेड येथे मंगला एक्सप्रेसला थांबा
12618 H. Nizamuddin – Ernakulam Jn. Mangala Express हि एक्सप्रेस दिनांक २२/०८/२०२३ पासून खेड या स्थानकावर  थांबणार आहे. खेड या स्थानकांवर या गाडीची वेळ सकाळी  १०  वाजून  ०८  मिनिटे अशी असणार आहे.
परतीच्या प्रवासात 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddin Mangala Express या गाडीची वेळ खेड  येथे सकाळी ८ वाजून १२ मिनिटे अशी असणार आहे.
3) खेड येथे एलटीटी कोचुवेल्ली एक्सप्रेसला थांबा
22113 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express हि एक्सप्रेस दिनांक २२/०८/२०२३ पासून खेड या स्थानकावर  थांबणार आहे. खेड या स्थानकांवर या गाडीची वेळ रात्री ०८ वाजून ५६ मिनिटे अशी असणार आहे.
परतीच्या प्रवासात 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express या गाडीची वेळ खेड  येथे रात्री  2 वाजून २० मिनिटे अशी असणार आहे.
Train no.StationTimingsWith Effect from Journey commences on
16345 Lokmanya Tilak (T) - Thiruvananthapuram Central Netravati ExpressSangameshwar Road17:34 / 17:3622/08/2023
16346 Thiruvananthapuram Central - Lokmanya Tilak (T) Netravati ExpressSangameshwar Road09:56 / 09:5822/08/2023
12618 H. Nizamuddin - Ernakulam Jn. Mangala ExpressKhed10:08 / 10:1022/08/2023
12617 Ernakulam Jn. - H. Nizamuddin Mangala ExpressKhed08:12 / 08:1422/08/2023
22113 Lokmanya Tilak (T) - Kochuveli Express Khed20:56 / 20:5822/08/2023
22114 Kochuveli - Lokmanya Tilak (T) ExpressKhed02:20 / 02:2224/08/2023

Loading

६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन; चिपळूण एस. टी. आगारातर्फे श्रावण विशेष बससेवा

रत्नागिरी : चिपळूण एस. टी. आगारातर्फे खास श्रावण महिन्यानिमित्त अष्टविनायक दर्शन आणि मार्लेश्वर दर्शन जादा एस.टी. बससेवा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना दर सोमवारी मार्लेश्वर दर्शनासाठी चिपळूण ते मार्लेश्वर आणि मार्लेश्वर ते चिपळूण अशी एस.टी. ची सेवा सुरू करण्यात येईल. यासंदर्भात आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी पत्रकारांना माहिती दिली.

श्रावण महिना सुरू झाला आहे. या निमित्ताने २१, २८ऑगस्ट, ४ व ११ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवारनिमित्त मार्लेश्वर जादा एस. टी. गाडी सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वा. चिपळूण मार्लेश्वर व दुपारी ३:३० वा. मार्लेश्वर चिपळूण अशी बस निघेल. या गाडीचा तिकीट दर १३० रुपये असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत लागू आहे. या गाडीचे बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने अष्टविनायक दर्शनासाठीदेखील चिपळूण आगारातून एस.टी. बस सोडली जाणार आहे. त्याचेही बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ही गाडी खास महिलांसाठी असून, ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेता येणार आहे. श्रावण
महिन्यामध्ये अनेकजण देवदर्शन घेत असतात. या निमित्ताने प्रवाशांची सोय व्हावी आणि एस.टी.च्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. चिपळूण आगारातून अष्टविनायक दर्शन गाडी सुटेल. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बुकिंग करावे. महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीमुळे एस. टी. च्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले.

Loading

गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल.

Konkan Railway News: गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्‍या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01155 दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीला दिवा या सुरवातीच्या स्थानकावरून याआधी नियोजित केलेल्या वेळेच्या 10 मिनिटे अगोदर सोडण्यात येणार आहे.

नियोजित वेळेनुसार ही गाडी संध्याकाळी 19:45 या वेळी सुटणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यामधे बदल करून ही गाडी सुधारित वेळेनुसार ही गाडी 10 मिनिटे अगोदर म्हणजे संध्याकाळी 19:35 वाजता सुटणार आहे. हा बदल दिनांक 13 सप्टेंबर पासून असणार आहे.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.

Loading

चिपळुणात ‘तुईया’ या दुर्मिळ प्रजातीच्या पोपटाच्या तस्करी विरोधात कारवाई

चिपळूण :चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे.तसेच त्याच्याकडून ‘तुईया’ Plum Headed Parakeet या प्रजातीच्या पोपटाची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ असे एकूण १२ पक्षी आढळून आले आहेत.

या प्रकरणी जितेंद्र धोंडू होळकर, (रा.कोंढेमाळ, चिपळूण) याला ताब्यात घेतले आहे. तो विशिष्ट प्रजातीचे पोपट पकडून विक्री करत असलेबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जितेंद्र होळकर याच्या कोंढेमाळ येथील राहत्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये अचानक धाड टाकली.

त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाणी केली असता घराशेजारील प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंजऱ्यामध्ये पोपट प्रजातीमधील ‘तुईया’ (प्लम हेडेड पॅराकीट) या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले. या पक्षांबाबत जितेंद्र होळकर याच्याकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असताना लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले. जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटी बसला अपघात; वाहकासह १२ प्रवासी जखमी

रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Loading

कशेडी घाटात टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात; ८ प्रवासी जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात आज सकाळी ११:५० वाजता टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात झाला.  या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डोळआ लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.
अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search