Category Archives: राजकारण

ग्रामपंचायत निवडणूक-2022 निकाल(Live-19:00)

   Follow us on        

ग्रामपंचायत निवडणूक २०२२ –  संपूर्ण महाराष्ट्र – पक्षनिहाय 

पक्ष ग्रामपंचायतीसरपंच
भाजप22411987
शिंदे गट772709
ठाकरे गट668571
राष्ट्रवादी15121263
काँग्रेस1038796
इतर 1255989

माविआ : 2715
शिंदे-भाजप : 2795
इतर : 1135

कोकणातील स्थिती

पक्षनिहाय ग्रामपंचायती

पक्ष रत्नागिरीसिंधुदुर्गरायगडपालघरठाणे
भाजप17182181113
शिंदे गट4524790214
ठाकरे गट1017438074
राष्ट्रवादी080245040
काँग्रेस030103000
इतर 472157394

 

 

Loading

आमदार नितेश राणे यांचे धक्कादायक विधान! “माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला तरच निधी नाहीतर…….”

GRAMPANCHAYAT ELECTION 2022 :भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धक्कादायक विधान केल्याचं समोर आलं आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाहीतर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकर्यांना दिली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवलीमधील (Kankavali) नांदगाव या ठिकाणी बोलत होते. राणे म्हणाले. आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल, नाहीतर मी निधी देणार नाही असं वादग्रस्त विधान आमदार राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात बोलतानाचा राणे यांचा व्हिडिओ समोर आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे या व्हिडिओतून समोर आले होते.

Loading

ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.

GRAMPANCHAYAT ELECTION 2022राज्यात ग्रामपंचायत निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ग्रामपंचायतींवर आप आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक जवळ आली कि मतदार राजा होतो. सर्व राजकीय नेते विविध आश्वासने देऊन मतदारांची मते जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त होतात. पण मतदारांनी चुकीचे मतदान करून चुकीचा उमेदवार निवडून दिल्यास त्याचे परिणाम गावाच्या विकासावर होतात. असे होऊ नये ह्याकरिता मतदाराने साक्षर आणि दक्ष असणे जरुरीचे आहे.
त्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य याने एक ग्रामपंचायत निवडूक संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी एक सखोल माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. ह्या पुस्तिकेत ग्रामपंचायत निवडणुकीचे नियम, प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चिती, आरक्षण, मतदार यादी आणि केंद्र, सदस्य आणि सरपंच पदाची पात्रता, चिन्हे वाटप, आचारसंहिता, मतमोजणी, निवडणुकीदरम्यान होणारे गुन्हे आणि शिक्षेची तरतूद इत्यादी सर्व माहिती ह्या पुस्तिकेतून तुम्हाला भेटेल. वाचा आणि  ही पोस्ट शेअर करा.
खालील पुस्तकावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

 

   Follow us on        

>Click Here to Download… 

Loading

राज्यात थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 

श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

 

Loading

राणेंविरुद्ध टीका भास्कर जाधवांच्या अंगलट अंगलट, ‘ह्या’ कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.  

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.

काय म्हणाले होते भास्कर जाधव? 

नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search