Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग विमानतळचे ‘बॅ. नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग’ असे नामकरण होणार…

नागपूर:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास आज विधानपरिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत शासकीय ठराव मांडला. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीमुळे आता हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव योग्य 

बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. नाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेकवेळा कारावास भोगावा लागला होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकीत विजय मिळवत १९५७ ते १९७१ अशी पंधरा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. तसेच नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची सर्व पक्षांनी मागणी केली होती.

(Also Read>उद्योजकांसाठी खुशखबर! रत्नागिरी MIDC क्षेत्रातील भूखंड वाटपासाठी तयार…अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जानेवारी)

या विमानतळ परिसरात बॅ. नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)

Loading

कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.

सावंतवाडी: सावंतवाडी शहरात कचरा गोळा करण्यासाठी आता ई-रिक्षा दिसणार आहेत. ह्या आधी घंटा गाडीतून कचरा गोळा केला जात होता त्याची जागा आता ह्या ई-रिक्षा घेणार आहेत. आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या साडे अठरा लाखाच्या निधीतून हया गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. ई-रिक्षांमुळे पालिकेचा मोठा इंधनखर्च वाचणार असून मनुष्यबळ देखील कमी लागेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

   Follow us on        

(हेही वाचा >कोकणरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव विशेष गाडीची मुदत वाढवली)

दोन दिवसांपूर्वी या गाड्या सावंतवाडीत दाखल झाल्या आहेत.  घंटागाडी मधून कचरा गोळा करण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता विजेवर धावणाऱ्या कचरा गाड्यांमुळे कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने होईल, त्यामुळे नागरिकांना कचरा जास्त वेळ साठून राहिल्याने करावा लागणारा दुर्गंधीचा सामना सुद्धा कमी होणार आहे. ह्या गाड्यांनी प्रदूषणाचा प्रश्न पण येत नाही. अगदी गल्ली बोळात पण ही रिक्षा नेता येईल अशी तिची रचना आहे त्यामुळे कचरा गोळा करण्यास या एक अधिक लवचिक आणि कार्यक्षम पर्याय आहे. ह्या आधी बहुतेक पालिकांनी आपल्या ताफ्यात अशा गाड्या सामील केल्या आहेत. त्यात  आता सावंतवाडी नगरपालिकेचा समावेश झाला आहे. हा गाड्यांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून जलद गतीने या गाड्या नागरिकांच्या सेवेत येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Loading

देवगड समुद्रात आगीचा थरार….मच्छीमारांची नौका पेटली

सिंधुदुर्ग :आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान देवगड येथे समुद्रात अचानक एका नौकेने पेट घेतला.नौकेवरील मच्छिमारांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण नौकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गणपत निकम यांच्या मालकीची पुण्यश्री नावाची हि नौका पहाटे ४ वाजता समुद्रात मच्छिमारीसाठी नेण्यात आली होती. सकाळी आठ वाजताच्या सुमारास ह्या नौकेला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नौकेवरील मच्छिमारांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचा प्रयत्नांना यश आले नाही आणि आग अजून भडकत गेली. पुढील धोका ओळखून मच्छिमारांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या आणि जवळपासच्या नौकेंचा आश्रय घेतला.

येथील स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने सुमारे ४ तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि हि नौका किनाऱ्यावर आणण्यात आली. महेश सागवेकर, बापू सागवेकर, हितेश हरम, आकाश हरम, बाबू वाडेकर, अक्षय हरम, चेतन पाटील, नागेश परब, बाबू कदम यांनी आग विझवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.

आगीचे नेमके कारण समजले नाही.ह्या आगीमध्ये २ मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार केले आहेत.

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्प सहलीचे आयोजन…

सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.

ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू  शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.

   Follow us on        

सहलीची रूपरेषा

दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.

कातळशिल्पे म्हणजे काय?

नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी  श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.

 

Loading

ओसरगाव येथे मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन

 

सिंधुदुर्ग:ग्रामिण भागातील नागरीकांना आपल्या घराच्या जवळ चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उददेशाने श्री.मंगेशजी सांवत यांच्या प्रेरणेतून मंगळवार, 21 डिसेंबर 2022 रोजी साईलिला हॉस्पिटल नाटळ, प्रथमेश हॉटेल्स प्रा.ली. मुंबई आणि माता वैष्णोदवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचाकोकण आणि कोल्हापुरातील काजू उत्पादकांसाठी खुशखबर, राज्यात काजू फळपीक विकास योजना

हे शिबीर माता वैष्णोदेवी महाविद्यालय, ओसरगांव, मुंबई-गोवा हायवे, ओसरगांव तलाव शेजारी आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 अशी आहे. तरी कणकवली, ओसरगांव,कसाल, आंब्रड, हेवाळे, पोखरण, कुंदे, बोर्डवे या पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहीती व नावनोंदणी करीता साईलिला हॉस्पिटल नाटळ संपर्क क्रमांक 02367 246099 / 246100 / 8275137575 यावर संपर्क करावा.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search