Category Archives: सिंधुदुर्ग

तळकोकणातील उद्योजकांसाठी महत्वाची बातमी; आडाळी एमआयडीसीमधील १९० भूखंड विक्रीसाठी उपलब्ध. असा करा अर्ज

सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील आणखी १९० भूखंड (एकूण क्षेत्र १२१.१५ हेक्टर) दुसऱ्या टप्प्यात उद्योजकांसाठी खुले झाले आहेत. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आडाळी येथील एमआयडीसी स्थानिक कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संचालित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर डिसेंबर २०२२मध्ये २२० भुखंड पहिल्या टप्प्यात खुले करण्यात आले होते, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली आहे.

लळीत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड खुले व्हावेत, यासाठी आमच्याबरोबरच अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता यश आले आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी बंधारा, पाण्याची टाकी, पाईपलाईन आदि सर्व कामे पूर्ण झाली आहेत. भूखंड उद्योजकांना तात्काळ उपलब्ध करावेत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आडाळीतील ग्रामस्थांनी आडाळी एमआयडीसी स्थानिक कृती समिती स्थापन केली.

तसेच ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन केली. समितीच्या पाठपुराव्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होऊन उद्योजकांनी अर्जाची प्रक्रीया पूर्ण केली. तरीही प्रत्यक्षात भूखंडाचे वितरण दीर्घकाळ होत नव्हते. महामंडळाकडुन या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने अलिकडेच समितीमार्फत आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भूखंड वितरणाचे आदेश काढण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात एकुण १२१.१५ हेक्टर क्षेत्र असलेले विविध आकाराचे एकूण १९० भूखंड वितरणासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भूखंड महामंडळाच्या
धोरणाप्रमाणे सामान्य (खुले), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व राखीवसह आहेत.

या भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असून www.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची मुदत ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५या वेळात फोन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल. आडाळी येथे एकुण ७२० एकर क्षेत्रामध्ये हे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या या प्रकल्पाला सप्टेंबर २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी स्थानिकांचे सकारात्मक सहकार्य होते. अवघ्या वर्षभरात ८० टक्केहुन अधिक क्षेत्र स्थानिकांनी महामंडळाकडे हस्तांतरित केले. मात्र आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्राचे तत्कालिन उद्योगमंत्री व सद्याचे केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे दिला आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात तो मार्गी लावला.

आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करुन आवश्यक असलेली जमीन महामंडळाला दिली. जमीन खरेदीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर महामंडळाने निविदा प्रक्रीया करुन पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर या औद्योगिक क्षेत्राच्या पायाभुत सुविधांची कामे आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.

चाकरमन्यांच्या मदतीसाठी एसटी पुढे सरसावली; सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली येथून मुंबईसाठी विशेष गाड्या

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकडे जणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ पुढे सरसारवले आहे. सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मधून 2, कणकवलीतुन 3, कुडाळमधून 1 अशा सहा गाड्या या 4:30 ला रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
अनेक भाविक गणेशविसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र काल पनवेल नजीक मालगाडीचे डबे घसरून अपघातामुळे कोकणरेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक पूर्ण बिघडले आहे. जे रेल्वे प्रवासी तिकीट कॅन्सल करतील त्यांना रेल्वे स्थानकामध्ये बस उपलब्ध व्हावी यासाठी ही एसटीने सेवा दिली असल्याचे समजत आहे.

आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Kankavali: टेम्पो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक ठार

कणकवली : तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड नजीक आज पहाटे एका टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताचे कारण समजले नसले तरी टेम्पो उलटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

”पुढच्या वर्षी लवकर या.. ” बाप्पाला निरोप देण्यासाठी साकारले गेले आकर्षक वाळूशिल्प

वेंगुर्ले: गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण. दिवाळी पेक्षाही मोठया उत्साहाने हा सण साजरा केला जातो. तसेच हा सण म्हणजे अनेक कलाकारांना आपली कला एक संधीच असते जणू. मूर्ती शिल्पकार, मखर कलाकार आणि भजनी गायक या संधीचा लाभ घेऊन आपल्या कला सादर करताना दिसतात. आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी या गणेशोत्सवात आपली कला सादर केली आहे. सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना रविराज चिपकर यांनी प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज संध्याकाळी भाविकांनी अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे जड अंतःकरणाने करत आहेत. याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे. हे शिल्प सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सावंतवाडी-ठाणे-बोरीवली-मुंबई सेंट्रल स्लीपरकोच बस सुरू करण्याची मागणी.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी-ठाणे-बोरीवली-मुंबई सेंट्रल स्लीपरकोच बस सुरू करण्याबाबत माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या माध्यमातून सावंतवाडी डेपोला दोन स्लीपरकोच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यात पहिली सावंतवाडी- मुंबई ही रातराणी बससेवा सुरूं झाली. कालांतराने हा प्रयोग सर्व राज्यात राबविण्यात आला व यशस्वी झाला. सध्या सावंतवाडीहून मुंबईसाठी बस नाही. सावंतवाडी डेपो सिंधुदुर्ग विभागात सर्वाधिक रहदारीचा असून दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने रहदारी सुरू असते. तेव्हा प्रवांशाची गरज लक्षात घेऊन उपलब्ध स्लीपरकोच बस रात्री ८.३० वा. मुंबईसाठी सोडण्यात यावी. ठाणे- घोडबंदरमार्गे बोरीवली, अंधेरी, बांद्रा, परेल, मुंबई सेंट्रल असा मार्ग असावा व परतीसाठी मुंबई सेंट्रलहून ५ वाजता सोडून बोरीवलीहून ८ वा. सोडावी. म्हणजे त्याचा लाभ ठाणे परिसर, मुंबई उपनगर व मुंबई-परेल या मध्यवर्ती भागातील प्रवाशांना घेता येईल.

Sindhudurg: महाकालेश्वर,काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराच्या विकासासाठी येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कोकणची काशी कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पावले उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगडमध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पोद्दार स्कूल कणकवली मध्ये सुरू केले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे मोठे प्रकल्प पर्यटनच्या माध्यमातून आणणार आहे, असेही आमदार श्री. राणे यांनी पत्रकातून नमुद केले आहे.

सावंतवाडी: शहरातील धोकादायक झाडे ठरत आहेत जीवघेणी

शहरातील धोकादायक झाडे त्वरित तोडण्यात यावीत अन्यथा…. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचा इशारा 

सावंतवाडी :मंगळवारी रात्री सावंतवाडी शहरात झाड पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शहरात अशी बरीच धोकादायक झाडे आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने सावंतवाडी शहरासह परिसरातील रस्त्याच्या लगत जी धोकादायक झाडे आहेत, त्या झाडांच्या मालकांना सांगून ती आठ दिवसांत तोडावीत. अन्यथा शासनासह स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना त्यांनी आज एक निवेदन सादर केले. या निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आणि रेस्ट हाऊस जवळ भर रस्त्यावर आलेली अनेक धोकादायक झाडे आहेत मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंगळवारी रात्री या दोन्ही दुर्दैवी युवकांनी काहीही चूक नसताना त्यांचा बळी गेला शहरातील सर्व धोकादायक झाडे येथे सात दिवसात तोडून घ्यावीत असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.

मंगळवारी रात्री 11 वाजता सावंतवाडी शहरातील राजवाड्याच्या नजीक एक मोठे झाड पडून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.

मालवण: माकडामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार

मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.

पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा नाहीच; पालक मंत्र्यांचे घुमजाव

मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.

नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्‍हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्‍याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search