Category Archives: कोकण गौरव

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..

पूर्वी आपल्या देशाच्या पुरुषप्रधान संस्कृतीत काही व्यावसाय असे होते की तो व्यवसाय एक महिला करणार आहे असे म्हंटले तर असे बोलणार्‍याची गणती मूर्खात होत असे. त्यातला एक व्यवसाय म्हणजे रिक्षा चालवणे. आता विचार बदललेत, पुरुषांनी व्यापित या व्यवसायात महिलांनी प्रवेश केला आहे. अशी क्रांती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण पाहावयास मिळाली आहे. 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका गावातील तरुणी उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा चालवत आहे . वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील राऊळवाडी येथील कुमारी हेमलता रवींद्र राऊळ असे त्या तरुणीचे नाव आहे. रिक्षा चालवणारी ती जिल्ह्यातील दुसरी महिला ठरली आहे तर वेंगुर्ले तालुक्यातील पहिली महिला ठरली आहे. ह्या आधी कुडाळ तालुक्यातील मनीषा दामले यांनी १९९० ह्या वर्षी जिल्ह्यातील पहिली रिक्षाचालक होण्याचा मान मिळवला होता.

2 वर्षापुर्वी बारावीचे शिक्षण पूर्ण केलेली हेमलता आता आपल्या भागात रिक्षा चालवत आहे. तिला ही रिक्षा ‘अनाम प्रेम’ ह्या संस्थेच्या वतीने एका योजनेतून देण्यात आली आहे. त्यासाठी माऊली महिला मंडळ,शिरोडा या संस्थेकडून वाहतुक परमिट आणि परवाना मिळवण्यासाठी मदत करण्यात आली आहे. खास करून गायकवाड मॅडम कडून आपणास ह्यासाठी खूप मदत मिळाली असे हेमलता आवर्जून सांगते.हेमलताच्या आईवडिलांनी हेमलताला रिक्षा चालण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

(Also Read >विविध शासकीय योजनांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर… नावे पाहण्यासाठी ही बातमी वाचा..)

मला पोलीस किंवा सैन्य दलात जायची इच्छा आहे, त्यादृष्टीने माझे प्रयत्न चालू होते, त्याचबरोबर रिकामे राहण्यापेक्षा काहितरी करावे हा विचार करून मी नोकरीच्या पर्यायांपेक्षा रिक्षा चालवणे हा पर्याय निवडला. माझा आदर्श घेऊन जिल्हय़ातील ईतर मुलींनी पण ह्या व्यवसायात उतरावे अशी माझी इच्छा आहे असे हेमलताचे म्हणणे आहे.

(Also Read>सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

Loading

दहावीचा निकाल – कोकण विभागाची संपूर्ण आकडेवारी

आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची सविस्तर माहित दिली.

संपूर्ण राज्याचा निकाल ९६.९४% लागला आहे. राज्यामध्ये मुलींचा निकाल ९७.९६% तर मुलांचा ९६.0६% लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाची बाजी. कोकण विभागाचा ९९.२७% लागला असून नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

विभागवार निकाल खालील प्रमाणे

कोकण – ९९.२७%

पुणे – ९६.९६%

नागपूर – ९७%

औरंगाबाद – ९६.३३%

मुंबई – ९६.९४%

कोल्हापूर – ९८.५०%

अमरावती – ९६.८१%

नाशिक – ९५.९०%

लातूर – ९७.२७%

शाळानिहाय निकाल पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
श्रेणीनुसार सविस्तर निकाल पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
कॅटेगरीनुसार सविस्तर निकाल पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा

Gender Wise सविस्तर निकाल पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
टक्केवारीनुसार विभागणी पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
विषयवार सविस्तर निकाल पाहण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा

Loading

कलाकृतीच्या वैभवाला रसिकतेचा साज

अभिजात कलाकृतीतून कलाकार घडत जातो. कलाकाराने रंगलेपनसह साकारलेले अनेक वास्तववादी कलात्मक लेपन व त्यातून साधलेला एक रम्य व नादमय अविष्कार यामुळे त्याचे प्रत्येक चित्र आकर्षक व विलोभनीय वाटते. आपल्या अद्भुत कलाविष्कारांनी रसिकांच्या चक्षूंचे पारणे फेडणाऱ्या नामवंत कलाकारांपैकीच एक सिद्धेश श्रीपतराव सुर्वे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून कलेची उपासना करणाऱ्या या कलाकाराचे चित्रकलेसाठी असणारे योगदान अतुल्य आहे. व्यक्तिचित्रे रेखाटण्यात माहीर असलेल्या या कलाकाराने आतापर्यंत जवळपास अनेक चित्रप्रदर्शनास आपल्या अंगभूत कलेची चुणूक दाखवली आहे.

कुंचल्याच्या फटकाऱ्याने हुबेहूब चित्रे रेखाटणाऱ्या सिद्धेश सुर्वेने अमूर्त शैलीत रेखाटलेली विविध व्यक्तिचित्रे, त्याला बालपणसापासून असणारी चित्रविषयी ओढ व कुतूहल यांचे दर्शन घडवितात. विविध आकार, रंग, पोत, त्यातील वैशिष्ट्यमय समन्वय, बोलकी व संवेदनात्मक समरसता यांचा सुंदर मिलाप त्याचा चित्रांमधून आढळतो. मंगलमूर्ती श्रीगणेश, प्रभू येशू ख्रिस्त, राधाकृष्ण, पि.के. चित्रपटाचे पोस्टर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटलेली व्यक्तिचित्रे रसिकांची वाहव्वा मिळवून जातात. सिद्धेशने रेखाटलेले स्वामी समर्थांचे चित्र पहिले कि नकळतपणे रसिकांचे हात जोडले जातात. एवढा जिवंतपणा तो आपल्या चित्रात साकारतो.

 कोकणचा सुपुत्र

मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या असणाऱ्या सिद्धेश सुर्वेला कलाक्षेत्राची बालपणापासून आवड होती. विविध स्तरावर झालेल्या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन त्याने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. Drawing कलारंभ, राज्य पर्यटन महोत्सवात प्रथम पारितोषिक, विप्रो – पुणे आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या रांगोळी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत त्याने प्रावीण्यही मिळवले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कलादालनात सिद्धेश च्या चित्रांचा पण सहभाग होता. रांगोळी प्रदर्शनात अल्बर्ट आईन्स्टाईन, मदार तेरेसा, अण्णा हजारे, श्रीनिवास रामानुजन, शिवरामराजे भोसले, बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींची चित्रे रांगोळीतून साकारली आहेत.

कोणताही कलाकार सहजासहजी घडत नाही. सुरवातीपासून आतापर्यंत त्याला कित्येक वेळा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याची झळ त्याने कधी आपल्यातील कलाकाराला पोहोचू दिली नाही.  कलेच्या प्रवासात त्याची गाडी खूप वेळा मार्गदर्शनाअभावी रखडली गेली पण त्याने हार न मानता त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू ठेवले आणि जे मार्गदर्शन पाहिजे ते मिळवले आणि आपल्यातील एक परिपूर्ण कलाकार निर्माण केला.  अर्थांजनासाठी तो सध्या Tech Mahidra  ह्या कंपनी मध्ये मुंबईला नोकरीला आहे. नोकरीतून मिळालेला रिकामा वेळ तो कलेसाठी देतो. रसिकांनी त्याच्या कलेला दाद देऊन पैंटिंग बनवून घेतली आहेत. ह्यासर्वात त्याला खूप चांगल्याप्रकारे त्याच्या पत्नीची साथ मिळते. सौ. सिद्धी सिद्धेश सुर्वे नुसता संसार संभाळत नाही तर त्याला कलेसाठी शक्य होईल तेव्हडी मदत पण करतात.

कोकणच्या ह्या सुपुत्राला गरज आहे आपल्यातील अस्सल रसिकतेची आणि आपल्या पाठबळाची.आम्ही इथे सिद्धेश ने रेखाटली काही पैंटिंग्स आपल्यासाठी देत आहोत. जर कोणी सिद्धेश कडून पैंटिंग्स बनवून घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्याचा मोबाईल नंबर खाली दिला आहे.

 

 

 

 

सिद्धेशच्या लोकप्रिय कलाकृती

 

 

सिद्धेशच्या आजून कलाकृती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/folderview?id=12UomEeBuS37ylIgn1n8kLgUQmPCZny3V

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search