सिंधुदुर्ग: काल रेल्वे बोर्डाने ०११०३/०११०४ मुंबई – कुडाळ – मुंबई अनारक्षित गणपती विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला, वास्तविक बघता गणेशोत्सव हा पूर्ण कोकणचा मोठा उत्सव असल्याकारणाने संपूर्ण कोकणात मुंबईकर चाकरमानी हे लाखोच्या संख्येने येत असतात, असे असताना रेल्वे प्रशासनाने आधीच गुजरात वरून सुटणाऱ्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला, एकीकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, सावंतवाडी येथील अपूर्ण असणारे रेल्वे चे टर्मिनस मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्या ह्या कुडाळ पर्यंत सोडून सावंतवाडी तालुका, शिरोडा – तुळस पंचक्रोशी, आणि दोडामार्ग तालुका वासियांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे.
सदर ची गाडी ही मुंबईहून येताना पहाटे ३.३० वाजता कुडाळ ला पोचेल आणि लगेच ४.३० वाजता तिथून मुंबई करिता रवाना होणार आहे.
असे असताना फक्त २० मिनिटे अंतर असणाऱ्या सावंतवाडी स्थानकावर ही गाडी आणल्यास या गाडीचा फायदा सावंतवाडीवासियांना देखील मिळेल आणि लोकांची ऐन रात्रीच्या वेळी परवड देखील होणार नाही.
त्यामुळे ही अनारक्षित गाडी सावंतवाडी पर्यंत सोडावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
🚂सिएसएमटी – कुडाळ अनारक्षित विशेष गाडी सावंतवाडी किंवा मडुरेपर्यंत विस्तारित करण्याची मागणी – Kokanai
कुडाळ, दि. ४ सप्टें: कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १२ वाजता खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानकांचे सुशोभीकरण केले आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तिन्ही स्थानकांचे रूपडे पूर्णतः बदलून या स्थानकांना विमानतळाचे स्वरुप दिले गेले आहे. यासाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. यापूर्वी कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून गेल्याच महिन्यात त्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र कुडाळ रेल्वे स्थानकाचे काही काम अपूर्ण राहिले असल्याकारणाने त्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते.
कुडाळ स्थानकाच्या आजच्या या सोहोळ्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, विधानसभा परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्ह्या अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल यांनी केले आहे.
Konkan Railway Updates:यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक अनारक्षित विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
०११०३/०११०४ सिएसएमटी – कुडाळ – सिएसएमटी विशेष
गाडी क्रमांक ०११०३ विशेष गाडी दिनांक ०४ सप्टेंबर आणि ०६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून दुपारी ०३.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०४ विशेष गाडी दिनांक ०५ सप्टेंबर आणि ०७ सप्टेंबर रोजी कुडाळ या स्थानकावरून पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
Kokan Railway Updates:गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवत आहेत. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी पाहता याही गाड्या अपुर्या पडताना दिसत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या डब्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
खालील गाड्यांना यापुर्वी जाहीर केलेल्या डब्यांव्यतिरिक्त प्रत्येकी २ सेकंड स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत.
दिनांक ०३ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ विशेष
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद विशेष
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरु जं. विशेष
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरु जं. – अहमदाबाद विशेष
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेली वांद्रे (टी) – मडगाव जं- वांद्रे (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित फेरी आजपासून सुरु झाली असून आज सकाळी गाडी क्रमांक 10116 मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस मोठ्या उत्साहाने मडगाववरुन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
गोवा सरकारचे कायदा आणि न्यायव्यवस्था, पर्यावरण, बंदरे आणि विधिमंडळ कामकाजाचे कॅप्टन श्री.अलेक्सो ए. सिक्वेरा यांच्या तर्फे या गाडीला हिरवा बावटा दाखविणायत आला. यावेळी मडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिगंबर कामत, नवलीम विधानसभा मतदार संघाचे आमदार उल्हास तुयेकरआदी मान्यवर उपस्थित होते.
Konkan Railway News: मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे दिवाळी विशेष गाड्यांची यादी जाहीर केली आहे. देशाचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला गाडयांना मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासन नियमित गाड्या व्यतिरिक्त काही विशेष गाड्या चालविते. यावर्षीही मध्यरेल्वे प्रशासनने दिवाळीसाठी काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या दिनांक २५ ओक्टो. ते ०७ नोव्हें. दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या.
1) 01463/01464 एलटीटी-कोचुवेली विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01463 विशेष गाडी दिनांक २४ ऑक्टो. ते १४ नोव्हे. पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून संध्याकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 विशेष गाडी दिनांक २६ऑक्टो. ते १६ नोव्हे. पर्यंत दर शनिवारी कोचुवेली या स्थानकावरून संध्याकाळी १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – ०६, सेकंड स्लीपर – ०८, जनरल – ०३, एसएलआर – ०१, जनरेटर कर – ०१ असे मिळून एकूण २१ LHB डबे.
2) 01175/01176 पुणे – सावंतवाडी – पुणे विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01175 विशेष गाडी दिनांक २२ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर मंगळवारी पुणे या स्थानकावरून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01176 विशेष गाडी दिनांक २२ ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर बुधवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे.
3) 01177/01178 पनवेल – सावंतवाडी – पनवेल विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01177 विशेष गाडी दिनांक २२ ऑक्टो. ते १३ नोव्हे. पर्यंत दर बुधवारी पनवेल या स्थानकावरून सकाळी ०९.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.०५ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01178 विशेष गाडी दिनांक २३ ऑक्टो. ते १२ नोव्हे. पर्यंत दर गुरुवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.४०वाजता पनवेल येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – ०३, थ्री टीयर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे.
4) 01179/01180 एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेऱ्या)
01179 विशेष गाडी दिनांक १८ ऑक्टो. ते ०८ नोव्हे. पर्यंत दर शुक्रवारी एलटीटी, मुंबई या स्थानकावरून सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01180 विशेष गाडी दिनांक १८ ऑक्टो. ते ०८ नोव्हे. पर्यंत दर शुक्रवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटी, मुंबई येथे पोहोचेल.
Konkan Railway News:रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करायला सुरवात केली असून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर आता जनरल डब्यात करण्याचा सपाटा भारतीय रेल्वेने लावला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अजून जून एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ करून डब्यांची संरचना बदलण्यात आली आहे.
१६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, स्लीपर – १२, जनरल – ०२, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०४, स्लीपर – १२, जनरल – ०३, एसएलआर – ०२, पँट्री कार – ०१ असे मिळून एकूण २३ कोच
या गाडीच्या एका थ्री टियर एसीच्या एका कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
Konkan Railway: येत्या आठवड्यात दक्षिण रेल्वे आणि मध्य रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक नसला तरी या या दोन्ही विभागातून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी – भुसावळ विभागात लूपलाइनच्या विस्ताराचे काम हाती गेले असल्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२७४१ वास्को दा गामा – पाटणा एक्सप्रेस आणि दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०११४० मडगाव जं. – नागपूर विशेष या दोन्ही गाड्यांचा वेग मध्य रेल्वे विभागात १ तास ३० मिनिटे नियमित केला जाणार असल्याने त्या उशिराने धावणार आहेत.
याच बरोबर दक्षिण रेल्वेच्या अंगमली यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. या कारणास्तव दक्षिण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या कामा दरम्यान कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या खालील तीन गाड्यांचा वेग दक्षिण रेल्वे विभागादरम्यान नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या उशिराने धावणार आहेत.
1)दिनांक ३१ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस २ तास १० मिनिटे.
2)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९०९ कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेस २ तास २० मिनिटे
3)दिनांक ०१ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) १ तास ५० मिनिटे
Konkan Railway: काल दुपारी बोरिवली स्थानकात शुभारंभ करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांत जंगी स्वागत करण्यात आले. ही गाडी उशिरा सुटल्याने ती कोकणातील स्थानकांवर उशिरा पोहचली असली तरी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजर राहून या गाडीचे स्वागत केले.
वीर स्थानक
वीर स्थानक 1
चिपळूण स्थानक
चिपळूण स्थानक 1चिपळूण स्थानक 2
रत्नागिरी स्थानक
रत्नागिरी स्थानक 1रत्नागिरी स्थानक 2
सावंतवाडी स्थानक
सावंतवाडी स्थानक 1
सावंतवाडी स्थानक 2
वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेस मध्यरात्री अडीच वाजता सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचे सावंतवाडीत जंगी स्वागत केले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, सल्लागार महेश परुळेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, राज पवार आदी उपस्थित होते.
सावंतवाडी: नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी कायमस्वरुपी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग,आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे, मुंबई पासून कोकणापर्यंत सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी या गाडी साठी प्रयत्न केले होते.परंतु सध्या या गाडीचे वेळापत्रक बघता ही गाडी काही अंशी गैरसोयीची असेल असे काही रेल्वे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे सदर रेल्वेचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकात (सध्या पावसाळी वेळापत्रक लागू आहे)बदल करावा असे अभ्यासक आणि प्रवासी सांगत आहेत.
ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी संघटनेने पत्र व्यवहार आणि हजारो मेल प्रशासनाला केलेले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली – वसई – सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याकारणाने सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते.आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील आहे आणि सदरचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे संपर्क प्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली.
ही गाडी सुरू होण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल, खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब, आमदार सुनील राणे, माजी खासदार श्री विनायक राऊत यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले असून या गाडीचा लाभ वसई, भिवंडी, बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना नक्की होईल अशी आशा व्यक्त केली आहे.