Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार पाटणा – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस

   Follow us on        
Konkan Railway: होळी उत्सव – २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल या गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे  घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
१) गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल:
ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल मंगळवार, ११/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार, १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २० एलएचबी कोच = दोन टायर एसी – ०१  कोच, थ्री टायर एसी – ०५  कोच, स्लीपर – १२  कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.

Konkan Railway: पुणे – कल्याण – सावंतवाडी विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत

पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड

रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Konkan Railway: उधना – मंगळुरू विशेष एक्सप्रेसला अतिरिक्त कोच

   Follow us on        
Konkan Railway: प्रवाशांची  अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर होळी सणासाठी चालविण्यात आलेल्या गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन मंगळुरू-  उधना जंक्शन  या गाडीला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे. याबद्दल अधिक तपशील खालीलप्रमाणे
१. उधना जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला ०९ मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
२. मंगळुरू जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला १० मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हातील रेल्वे स्थानकांवरील समस्या मार्गी लावणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसांत स्टेशन पाहणी दौरा करू, तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग व वैभववाडी स्थानकातील पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.
सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. सा. बां. विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Konkan Railway: होळी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर पनवेल – चिपळूण विशेष मेमू सेवा

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने होळी सणा दरम्यान म्हणजेच दिनांक 13 मार्च ते 16 मार्च पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर पनवेल – चिपळूण विशेष मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा अधिक तपशील खालीलप्रमाणे

गाडी क्रमांक 01018 / 01017 चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी

चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू विशेष (01018) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान दररोज चिपळूण वरून दुपारी 15:25 वाजता निघेल आणि पनवेल येथे रात्री 20:20 वाजता पोहोचेल.

पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष (01017) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान पनवेल वरून रात्री 21:10 वाजता सुटून चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 02:00 वाजता पोहोचणार आहे.

थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण.

डब्यांची रचना: ८ कार मेमू

Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे होळीसाठी अजून दोन गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,

१)गाडी क्र. ०११०२/०११०१ मडगाव – पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष 

गाडी क्र. ०११०२ मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी मडगाव येथून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्र. ०११०१ पनवेल – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी शनिवार दिनांक १५/०३/२०२५ आणि २२/०३/२०२५ रोजी पनवेल येथून संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ६:४५ वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१

२)गाडी क्र. ०११०४/०११०३ मडगाव – एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष

गाडी क्र. ०११०४ मडगाव – एलटीटी साप्ताहिक विशेष ही गाडी रविवार दिनांक १६/०३/२०२५ आणि २३/०३/२०२५ रोजी मडगाव येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ०६:२५ वाजता एलटीटी मुंबई या स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्र. ०११०३ एलटीटी – मडगाव साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दिनांक १७/०३/२०२५ आणि २४/०३/२०२५ रोजी एलटीटी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

डब्यांची रचना: एकूण २० एलएचबी कोच: टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३, थ्री टायर एसी इकॉनॉमी- ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१

 

 

 

 

 

 

 

Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘अनारक्षित विशेष’ गाड्या

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या दादर ते रत्नागिरी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहेत. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे.

गाडी क्रमांक ०११३१/०११३२ दादर-रत्नागिरी दादर त्रि-साप्ताहिक विशेष 

गाडी क्रमांक ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.

या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

डब्यांची संरचना: जनरल – १४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण १६ आयसिएफ कोच

 

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू.

   Follow us on        

Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.

मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.

सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती

आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती

मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक

4564 वाचकांनी ही बातमी वाचली

तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

 

LHBfication of Trains:रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासन जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षित असलेले ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या गाड्या ज्यांना आधुकीकरण करण्याची खरी गरज असताना अजूनही जुन्या प्रकारातील आयसीएफ रेक सह चालविण्यात येत आहेत.
कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना अनेकदा पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कमी प्राधान्य दिले असल्याचा आरोपही समितीने केला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी  ई-मेल द्वारे या एक्सप्रेस गाड्यांची यादी प्रशासनाला पाठवली असून या गाड्यांचे रूपांतर लवकरात लवकर एलएचबी स्वरूपात करावे अशी मागणी केली आहे.

कोणत्या आहेत या गाड्या?

  • ११००३/११००४  दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (२ रेक)
  • ११०२९/११०३०  कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (३ रेक)
  • ११०३९/११०४०  कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस / ०१०२३/०१०२४ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस (५ रेक)
  • १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस / १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (३ रेक)
  • १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (२ रेक)
  • २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०१/११४०२ (०१.०३.२०२५ पासून ११००१/११००२ या नावाने पुनर्क्रमित करा) मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस (3 रेक)
  • ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्सप्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) / ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (पुणे मार्गे) (2 रेक)
  • १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) / २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) (१ रेक)
  • ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (१ रेक)
या गाड्या मध्य आणि दक्षिण रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहेत. या गाड्यांचे महत्व आणि प्रवाशांकडून होणारी गर्दी पाहता या गाडयांना ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्यात यावेत अशी समितीने मागणी  केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.