Category Archives: शेती

अबब..! सिंधुदुर्गातील या बागेत सापडत आहेत अर्धाकिलो पेक्षा जास्त वजन असलेले हापूस

   Follow us on        

सिंधुदुर्ग: साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथे तब्बल अर्धा किलो पेक्षा जास्त वजन असलेले आंबे एका बागेत सापडत आहेत. येथील बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेत ६०५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे. या भागात आढळून आलेले हे या हापूसचे सर्वाधिक वजनाचे फळ आहे.

आंबा काढणी करीत असताना श्री. राणे यांना काही झाडांवरील फळे नियमित आंब्यांपेक्षा आकाराने मोठी दिसून आली. त्यामुळे त्यांनी या फळांचे वजन केले असता एका फळांचे वजन ६०५ ग्रॅम आढळून आले. ४५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत सरासरी फळे दिसून येत आहेत.

साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. या बागेचे व्यवस्थापन श्री. राणे हे नैसर्गिकरीत्या व सेंद्रिय पद्धतीने करतात. या फळांची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी विभागाचे अमोल सदावर्ते, कृषी सहायक एस. व्ही. उलपे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वजनाची देखील खात्री केली.

आता हापूसच्या नावाने अस्सल हापूसच मिळणार; आधुनिक तंत्रज्ञान फसवणुकीला आळा घालणार

   Follow us on        
रत्नागिरी, दि.१० एप्रिल: कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने येथील आंब्याला जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे. मात्र अनेकदा इतर भागातील आंबा हापूस च्या नावाने विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. याचा फटका आंबा बागायतदारांनाही बसतो. मात्र आता अस्सल हापूस ओळखण्यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यूआर कोडचे लक्ष्य ठेवले आहे. क्यूआर कोडसाठी मीरो लॅब कंपनीबरोबर करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्युआर कोड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यामध्ये क्यूआर कोडला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पुनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. मागीलवेळच्या त्रुटी दूर करून यंदा क्यूआर कोड नव्याने निर्माण केले आहेत.
क्यूआर कोडमध्ये खालील माहिती भेटणार आहे.
१) आंबा पॅकिंगची तारीख
२)आंबा परिपक्व होण्याची तारीख
३) हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांची माहिती, त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल
आंब्यावरील क्यूआरकोड ६५ पैसे प्रति आंबा या दराने दिला जात असून बॉक्सवरील कोड तीन रुपये दराने दिला जाणार आहे. बागायतदारांना कोड अ‍ॅक्टिव्ह कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे. प्रचार, प्रसार, शिबिरे घेणे व शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने कार्यक्रम उत्पादक संस्था घेत आहे. शासनाच्या एखाद्या योजनेमधून संस्थेला अनुदान मिळाले तर संस्था दहा पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकते व बागायतदारांना आणखीन कमी दरामध्ये मार्केटिंगसाठी क्यूआर कोड पुरवू शकेल असे संस्थेकडून सांगण्यात आले. संस्थेची स्वतःची वेबसाईट नेहमी अपडेट होत असते आणि त्यावर वेळोवेळी माहितीही दिली जाते.

सावंतवाडी | सरसकट बंदुका जमा करण्याच्या आदेशावर शेतकरी नाराज

   Follow us on        
सावंतवाडी :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेती संरक्षण बंदूक जमा करण्यासाठी आदेश काढल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी नेमळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते,  सध्या उष्णतेतही वाढ झाली आहे. जंगलात पाणीसाठा नसल्याने वन्य प्राणी लोकवस्तीमध्ये घुसत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेती संरक्षण बंदूक गरजेची आहे. मात्र, निवडणूक विभागाने शेतकऱ्यांच्या बंदुका जमा करून करून घेण्याचे आदेश पारित केले आहेत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात माणूस जखमी किंवा मृत्यू झाला तर त्याबाबतची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे.
वन्य प्राणी त्रास देत असतील तर हवेत गोळीबार करून शेतकरी आत्मसंरक्षण करतात आणि प्राण्यांना पळवून लावतात हे परंपरेप्रमाणे अनेक वर्ष होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलिस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी असतील त्या बंदुका पोलिसांनी जप्त कराव्यात. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात शेती संरक्षक परवानधारक शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी बाजारात आला देशी जुगाड; किंमत २०० ते ३०० रुपये फक्त

रत्नागिरी |कोकणातील शेतकरी आणि बागायतदार माकडांच्या उपद्रवामुळे पुरता हैराण झाला आहे. माकडे इथल्या बागायतीत, शेतात नुसता हैदोस घालत आहेत. नारळांची झाडे असून नसण्यासारखी आहेत. कारण त्याला लागणारे नारळांची फळे परिपक्व होण्याअगोदरच त्याची नासाडी करतात. एवढेच नाही तर संधी मिळेल तशी माकडे घरात घुसून खायच्या वस्तू पळवू लागली आहेत. 
माकडामंध्ये दहशत निर्माण जाण्यासाठी कोकणच्या काही बाजारपेठेत कार्बाइड गन विकली जात आहे. या बंदुकीने फक्त मोठा आवाज होतो त्यामुळे माकडामंध्ये दहशत निर्माण होते आणि ती पळून जातात आणि पुन्हा यायला घाबरतात. ही बंदूक पीविसी पाइपांपासून तयार केलेली ही बंदूक २०० ते २५० रुपयांमध्ये विकली जात आहे. या बंदुकीमध्ये कार्बाइड चे एक दोन तुकडे आणि काही  थेंब पाणी घालून हलवली जाते. त्यानंतर मागे दिलेले स्पार्क बटण दाबले कि मोठा आवाज येतो. हे कार्बाइड चे तुकडे पुन्हा पुन्हा वापरले जातात त्यामुळे खर्च कमी येतो. 
 
माकडांपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग भारतात या पूर्वी केला गेला आहे. तसेच दिवाळी सणाला फटाक्यांना पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. 
महत्वाची सूचना 
कार्बाइड मुळे निर्माण झालेला धूर डोळ्यांना हानिकारक असतो. त्यामुळे दिवाळीसाठी फटाक्यांचा पर्याय म्हणून या बंदुकीला बंदी घालावी अशी मागणी मध्येप्रदेशच्या इंदोर या शहरात जोर धरली होती.  तुम्ही ही बंदूक जर घेतली असेल किंवा घेणार असाल तर कार्बाइड चा धूर डोळ्यात जाणार नाही याबाबत काळजी घेतली पाहिजे.लहान मुलांना ही बंदूक अजिबात वापरण्यास दिली जाऊ नये.  

Konkan | स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

रत्नागिरी : कोकणातील आंबा व्यावसायिकांसाठी एक दिलासा देणारी  बातमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र आंबा बोर्डासाठी २०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.
आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल.
आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्‍या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत.

काजूला मिळणारा दर यंदाही निराशाजनक; आम्ही जगावे तरी कसे? शेतकर्‍यांचा प्रश्न…

सिंधुदुर्ग :काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. या वर्षी काजू हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. मात्र काजू बीला प्रतिकिलो फक्त १२६ रुपये दर सध्या दिला जात असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. 

नोव्हेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे या वर्षी काजूला चांगला मोहर आला नाही. त्याचा परिणाम काजू उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तरीदेखील काजू बीला १२६ रुपयेच दर मिळत आहे. काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी बागायतदारांकडून सध्या सुरू आहे. 

हंगामाच्या सुरवातीलाच जर असा कमी दर भेटत असेल तर काही दिवसांत आवक वाढली काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न काजू उत्पादक शेतकरी विचारताना दिसत आहेत. कारण मागील दोन तीन वर्षे पाहता हा दर शंभर रुपयाच्या खाली गेला आहे. काजूला हमी भाव मिळावा या शेतकर्‍यांच्या मागणीला शासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवली जात आहे. 

वन्यप्राणी, माकडे यामुळे ईतर शेती उत्पादन करणे खूप तोट्याचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग काजू बागायती कडे वळला आहे. वडिलोपार्जित तुकड्यांत जेथे जमेल तेथे विकत आणून काजू कलमांची लागवड करणे, त्याला खतपाणी आणि ईतर मशागत करून वाढवून शेवटी मिळणार्‍या उत्पन्नातून मजुरी आणि बाकीचे खर्च सुध्दा निघत नसतील तर आम्ही जगावे तरी कसे असा प्रश्न काजू उत्पादक शेतकर्‍यांकडून विचाराला जात आहे. 

शेती: कोकणात होणार सुपारी संशोधन केंद्र

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.
रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती  पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.
या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शेतमाल तारण योजना; काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना

रत्नागिरी : ऐन हंगामात कोणतेही कृषी उत्पादन एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पैशाची निकड असल्याने कमी बाजारभावात उत्पादन विकून त्याला मोठा होतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती Ratnagiri District Agricultural Produce Market Committee व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्तपणे दर वर्षी जिल्ह्यात काजू बी Cashew Nut Mortgage Scheme शेतमाल तारण योजना राबवित असते.

ज्या शेतकऱ्यांना पडलेल्या भावात काजू न विकता तारण ठेवायचे आहेत त्यांना हे काजू तारण ठेवून वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज दिले जाते. यासाठी कालमर्यादा सहा महिने (१८० दिवस) एवढी आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील जोडणे अनिवार्य आहे. तसेच काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत १७.५ टन काजू बी तारण ठेवण्यात आला असून, १३ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

सध्या ९० रुपये दर सुरू आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतमाल तारण योजना फायदेशीर ठरते. हंगामाच्या प्रारंभी काजूला चांगला दर मिळतो; मात्र जसजशी आवक वाढते, तसेतसे भाव गडगडतात. आता तर हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे. आधीच उत्पादन कमी आहे. त्यातच काजू कमी किमतीत विकणे परवडणारे नाही. त्याऐवजी तारण ठेवणे शक्यआहे

गोव्यात काजूला १५० रुपये हमीभाव जाहीर; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा कधी संपणार?

सिंधुदुर्ग: गोवा राज्यात काजू शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. गोवा राज्यात काजूला  १२५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव चालला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काजूची आधारभूत किमंत (हमीभाव) प्रतिकिलो १५० रुपये करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जानेवारी पासून शेतकऱ्यांनी विकलेल्या काजूला पूर्वलक्षी प्रभावानुसार अनुदान मिळणार आहे. त्यामुळे यंदा पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान भरून निघणार आहे. 
कोकणातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
महाराष्ट्र राज्यात कोकणात आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात काजू उप्तादन होते. काजू हे पीक वर्षातून एकदा येते, कोकणात काजूपीकाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमीन आणि उत्पादन  खर्चाचा विचार करता काजूला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान, उत्पादन खर्चापेक्षा कमी परतावा यामुळे कोकणातील शेतकरी पारंपरिक पिकांकडून काजू पिकाकडे वळला आहे. डोंगराळ भागात जेसीपीच्या साहाय्याने जमीन लागवडीयोग्य बनवून तिथे काजूची रोपे लावण्यात आली. पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या गेल्या. त्यावेळी  मिळणारा भाव निश्चित आणि योग्य होता त्यामुळे योग्य परतावा मिळेल या हिशोबाने हा खर्च काण्यात आला.  मात्र मागील २ ते ३ वर्षांपासून काजूला मिळणार भाव खूप कमी झाला आहे. आता तर तो १०० रुपये प्रति किलो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता तर नफा तर सोडाच तर शेतकऱ्यांचा झालेला खर्च पण वसूल होत नाही आहे. 
वारंवार मागणी करूनही सरकारद्वारे काही ठोस पावले उचलण्यात येत नाही आहेत. महाराष्ट्रातील इतर भागात होणाऱ्या पिकांना सरकार हमी भाव देत आहे मात्र कोकणात होणाऱ्या पिकांना कधी हमीभाव देऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा का मिळत नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोकणातील राजकीय नेते राजकारणातच जास्त व्यग्र असल्याचे दिसत आहे. येथील शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही असे पुन्हा निदर्शनास येत आहे. 

हत्ती परत आलेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दोडामार्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी परत येवून  धुडगूस घालणे चालू केल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे अणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवस केर आणि मोर्ले या गावांतील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करून त्यांनी आपला मोर्चा वायंगणतड या गावी वळवला आहे.

अचानक शेतात हत्तीं आल्याने वायंगणतड ग्रामस्थांनी शेतात घाव घेवून त्यांना हिसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र हत्तींना त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. त्यानंतर खबर मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी हजर झाले. ग्रामस्थांनी आणि या कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्यांना हिसकावून लावले. मात्र हत्तीं पुन्हा आल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेताची, बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने हाता तोंडाशी आलेले शेती उत्पादन शेतकर्‍यांना गमावण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search